दौलतनगर दि.14:- पाटण मतदारसंघातील
दऱ्याखोऱ्यात वसलेल्या व अनेक वर्षे विकासकामांपासून वंचीत असलेल्या पाटण
मतदारसंघातील मग ते ढेबेवाडी,कुंभारगांव,काळगांव असो वा पाटण असो किवा तारळेचे
डोंगरपठार असेल या डोंगरपठारावरील गांवामध्ये गत साडेचार वर्षात कधीही न झालेला
विकासकामांचा झंझावात सुरु असल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे.पाटण मतदारसंघातील डोंगरपठारावरील अनेक
गांवाना व वाडयावस्त्यांना मुलभूत विकासापासून वंचीत ठेवण्याचे काम आपल्या
मतदारसंघाच्या माजी आमदारांनी केले ते मी केले नाही व करणार देखील नाही.त्यामुळेच
मतदारसंघातील डोंगर पठारावरील गांवामध्ये व वाडया वस्त्यांमध्ये विकासाचे कामे मोठया
प्रमाणात दिसू लागली आहेत असा दावा आमदार शंभूराज देसाईंनी केला असून विकासापासून वंचित राहिलेल्या डोंगरपठारावरील गांवामध्ये विकासाचा शिल्लक राहिलेला बॅकलॉग भरुन काढण्याचे काम आपण करीत असल्याचे प्रतिपादन आमदार शंभूराज देसाई यांनी केले आहे.
निवी
ता.पाटण येथे निवी-कसणी या रस्त्याच्या कामाकरीता आमदार शंभूराज देसाईंनी शासनाच्या हरित ऊर्जा निधी कार्यक्रमातंर्गत मंजुर करुन आणलेल्या निधींच्या कामाचे भुमीपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.या रस्त्यासाठी त्यांनी सुमारे १ कोटी ७ लाख रुपयांचा निधी मंजूर करुन आणलेला असून गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या रस्त्याचे काम आमदार शंभूराज देसाईंनी मार्गी लावल्याने येथील नागरिकांमध्ये समाधान दिसून आले.यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे माजी
चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण, पंचायत समिती गटनेते पंजाबराव देसाई,सदस्या सौ.सीमा मोरे,शिवसेना तालुका अध्यक्ष
राजेंद्र चव्हाण,नानासो साबळे,मनोज मोहिते,आनंदराव मत्रे,संजय
पाटील,तामिज डांगे आदी मान्यवरांसह प्रमुख
पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच निवी व कसणी,कसणी
धनगरवाडा,निगडे,माईंगडेवाडी,मत्रेवाडी,जाधववाडी मेंढ येथील नागरिक व महिलांची
प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आमदार देसाई म्हणाले,पिढयानपिढया पाटण मतदारसंघातील डोंगरपठारावरील गांवे आणि
वाडया वस्त्या विकासापासून वंचीत ठेवण्याचे काम माजी आमदारांनी केले त्यामुळेच
मतदारसंघातील जनतेने त्यांना राज्याचे कॅबिनेट मंत्री असताना घरी बसविले होते.
डोंगर फोडून विकास केला असा डांगोरा माजी आमदार आणि त्यांचे कार्यकर्ते पिटत असले
तरी डोंगरपठारावरील किती गांवाना त्यांनी त्यांच्या आमदारकीच्या आणि मंत्रीपदाच्या
कारकीर्दीमध्ये बारमाही पक्के रस्ते देण्याचे काम केले हे जगजाहीर आहे. या
विभागातील निगडे पर्यंतच रस्ता असो व माईंगडेवाडीचा रस्ता असो दे इतक्या वर्षात
माजी आमदारांना तो करता आला नाही. रस्त्याचे राहू दया निवी गावाला पिण्याच्या
पाण्याची योजना त्यांना इतक्या वर्षात मंजुर करता आली नाही. निवी गांवातील
ग्रामस्थांनी आपली हयात त्यांच्या पाठीशी राहण्यात घालविली पंरतू बोलाचीच कडी आणि
बोलाचाच भात अशी परिस्थिती असणाऱ्या विरोधकांकडून आपल्याला काही मिळणार नाही या
भूमिकेतुन निवी गांवातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आपले नेतृत्व मानण्याचा
निर्णय घेतला.मत्रेवाडी किंवा जाधववाडी मेंढची पाण्याची योजना असू देत.या गांवातील
मागणी केली आणि आपण कामे दिली.आपल्याला यां गांवामध्ये किती मतदान पडते याचा
सारासार विचारही आपण कधी केला नाही.निगडयाच्या कार्यक्रमाहून येताना जाधववाडीच्या
नागरिकांनी गढूळ पाण्याची बाटली घेवूनच रस्त्यावर
उभे होते आमच्या गांवाला असले पाणी येते आमदारसाहेब काही तरी करा असे त्यांनी
सांगितले, दुसऱ्याच महिन्यात त्या गांवाला पिण्याच्या पाण्याची योजना मंजुर केली
आज मत्रेवाडी आणि जाधववाडी गावच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना पुर्ण झाल्या
आहेत. निवीच्या पाणी पुरवठा योजनेला वनविभागाची मान्यता गरजेचे आहे तो प्रस्ताव
जिल्हाधिकारी यांचेकडे सादर केला आहे लवकरच यास मान्यता मिळेल. निवी कसणी या
गांवामध्ये युवकांची चांगली एकी झाली आहे. विकासाच्या बाबतीत या गांवाना पाठबळ
देण्याकरीता मी कटीबध्द आहे. येथील नागरिकांनीही आपले पाठबळ विकास करणाऱ्या
नेतृत्वाच्या मागे उभे करावे असे आश्वासनही त्यांनी यावेळी
बोलताना दिले.प्रारंभी माजी
सरपंच पाटील यांनी प्रलंबित कामांचा पाडाच वाचला
व एवढो वर्ष आम्ही ज्यांना पोत्याने मते दिली त्यांनी आपर्यंत आमचा भ्रमनिराश
केल्याने आपणच ही कामे मार्गी लावावी अशी विनंती केली.त्यावर
आ.शंभूराज देसाई यांनी सगळी प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.यावेळी राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकत्यांनी देसाई गटात जाहीर प्रवेश केला.त्यांचे स्वागत व सत्कार आमदार शंभूराज देसाईंचे हस्ते
करण्यात आला.उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक माजी सरपंच पाटील यांनी केले.
No comments:
Post a Comment