Wednesday 13 February 2019

मतदारसंघातील एकही वाडीवस्ती मुलभूत विकासापासून वंचित राहणार नाही. आ.शंभूराज देसाई यांची ग्वाही.




दौलतनगर दि.13:- 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मतदारसंघातील जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याचे काम गत साडेचार वर्षात मतदारसंघाचा आमदार म्हणून मी करीत आहे. कुंभारगांव असो व काळगांव विभागातील बहुतांशी वाडयावस्त्यांची विकासकामे मार्गी लावण्याचे काम केले आहे. काही कामे शिल्लक असतील तर ती येत्या काही महिन्यात मार्गी लावणेकरीता मी कटीबध्द आहे.पाटण मतदारसंघातील एकही वाडीवस्ती मुलभूत विकासापासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही शंभूराज देसाई यांनी दिली आहे.
                     चाळकेवाडी (ता.पाटण) येथे आ.शंभूराज देसाई यांचे प्रत्यनातून जिल्हा नियोजन समितीमधून मंजूर झालेल्या कामांचे भूमीपुजनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य आशिष आचरे, पंचायत समिती गटनेते पंजाबराव देसाई,सदस्या सौ.सीमा मोरे, माजी उपसभापती जितेंद्र केसेकर,माजी सदस्य रघूनाथ माटेकर, शंकरराव चव्हाण,शिवदौलत बँकेचे संचालक नेताजीराव मोरे,मधूकर पाटील,चाळकेवाडी सरपंच नंदा शांताराम चाळके,उपसरपंच भरत चाळके,चंद्रकांत चाळके,महादेवराव पानवळ,प्रकाशराव तवटे आदी मान्यवरांसह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.   
                     याप्रसंगी बोलताना ते म्हणाले, .शंभूराज देसाई म्हणाले,कुंभारगांव ते गलमेवाडी रस्त्यावरुन जाताना चाळकेवाडी या रस्त्याची पूर्वी काय अवस्था होती? मागील विधानसभा निवडणुकीत मी या विभागातील जनतेला दिलेल्या आश्वासनानुसार चाळकेवाडी रस्ता पुर्ण करुन देण्याचे आश्वासन मी दिले होते त्यानुसार चाळकेवाडी रस्त्याच्या कामांकरीता जिल्हा नियोजन समितीमधून 10 लाख रुपयांचा निधी मंजुर करुन दिला आहे. यापुर्वी डोंगरी विकास निधीमधून चाळकेवाडी  प्राथमिक शाळा ते भैरवनाथ मंदीर रस्ता खडीकरण डांबरीकरण करण्याचे आपण काम केले. चाळकेवाडी येथे गणेश मंदीराकरीता सभामंडप आणि नवीन नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामांची मागणी आहे. गणेश मंदीराचे सभामंडपाचे काम प्रस्तावित केले आहे तर पिण्याच्या पाण्याच्या योजनेचे काम राष्ट्रीय पेयजल च्या २०१९ च्या आराखडयामध्ये प्रस्तावित केले आहे. ज्याप्रमाणे या गांवाने मला मताधिक्क दिले त्याचप्रमाणे या गांवास विविध विकासकांमे देण्याचेही आपण काम केले आहे. नागनाथ मंडळ चाळकेवाडी ते स्मशानभूमि असा ६०० मीटरचा रस्ता करावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे यंदाच्या वर्षीच हेही काम आपण पुर्ण करुन घेवू अशी ग्वाही ते म्हणाले, आज जी कामे आपल्या माध्यमातून या वाडीमध्ये झाली आहेत ती कामे माजी आमदारांच्या काळात झाली होती का? तरीही विरोधक म्हणतात की आपला विकास कुठे दिसत नाही मग ही सुरु असलेली विकास कामे कशाचे प्रतिक आहे. आज कुंभारगांव विभागातील वाडयावस्त्यांची रस्त्यांची परिस्थीती पहाता बहुतांशी वाडयावस्त्यांमध्ये आपण रस्त्यांची कामे पुर्ण केली आहेत अनेक गांवाना जोडणारे छोटे पुल नव्हते ते पुर्ण करुन देण्याचे काम केले आहे.आपले विरोधक नेहमीच विकासकामांबाबत दिशाभूल करतात.मात्र मागील चार वर्षात आपण मतदारसंघाचा कायापालट करत सर्वसामान्य नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा मिळाव्यात,यासाठी प्रयत्न केले आहेत.गेल्या चार वर्षात काहीही न देता केवळ आता मत मागायला येणाऱ्या विरोधकांना मते मागण्याअगोदर मतदारसंघातील गांवानी आणि वाडयावस्त्यांनी गेल्या चार वर्षात विद्यमान आमदारांनी आम्हाला ही विकासकांमे दिली तुम्ही काय दिले? असा जाब विचारण्याची वेळ आली आहे,या विभागातील जनता विरोधकांच्या भूलथापांना कधीच बळी पडली नाही आणि यापुढेही कधी बळी पडणार नाही याची मला खात्री आहे.आपण साडेचार वर्षात केलेली चौफेर विकासकामे लक्षात घेऊन येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत आपला हक्काचा आमदार निवडावा असे आवाहन करुन आमदार शंभूराज देसाई म्हणाले, यावेळी डॉ.दिलीपराव चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले.स्वागत व प्रास्ताविक भरत चाळके यांनी केले.

No comments:

Post a Comment