Thursday 14 February 2019

विरोधंकाच्या बालेकिल्लयातच कोटयावधींच्या कामांना आणली मंजुरी. आमदार शंभूराज देसाई.


दौलतनगर दि.1:-  पाटण मतदारसंघातील जनतेने मोठया विश्वासाने आपल्या ताब्यात मतदारसंघाची आमदारकी दिली त्याच विश्वासाने मतदारसंघातील विकासाची कामे मार्गी लावण्याचे काम आपण गेल्या चार वर्षात केले व करीत आहेचिटेघर ग्रामस्थांनी त्यांचे ग्रामदैवताच्या देवालयाकरीता सभामंडप दयावे अशी बरेच दिवसांची मागणी आज पुर्ण होत आहे याचा आनंद आहे.चिटेघर असो वा हा भाग असो हा भाग माजी आमदारांचा बालेकिल्ला समजला जातोविरोधकांच्या याच बालेकिल्ल्यात आपण साडेचार वर्षात कोटयावधींची विकासकामे मंजुर करुन दिली असल्याचा दावा करुनविरोधकांनी यापुर्वी विकासनिधी न देता केवळ टिकाटिपणीच करण्याचे काम केले असून आजही तोच उद्योग सुरु आहे.त्याकडे दुर्लक्ष करत आपल्या कार्यकर्त्यांनी माणसाला माणूस जोडावा,असे जाहीर आवाहन आमदार शंभूराज देसाई यांनी केले.
                   चिटेघर ता.पाटण येथे .शंभूराज देसाई यांचे डोंगरी विकास निधीमधून मंजूर झालेल्या सभामंडपाचे कामांचे भूमीपुजनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,पाटण पंचायत समितीच्या माजी सभापती सौ.मुक्ताबाई माळी,शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार,माजी पंचायत समिती सदस्य सुरेश जाधव,ग्रा.पं.सदस्य संजय पुजारी,ग्रा.पं.सदस्या सिताबाई भोसले,सखाराम शिंदे,तुकाराम भोसले,बापूराव सावंतहणमंत शिंदे,बाळासो जाधव,कोंडिबा साळुंखे,डोंगरीविभागातील शंभूराज युवा संघटनेचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच महिलांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.
                       आमदार देसाई म्हणाले, पाटण मतदारसंघातील गावांसह वस्त्यांचा विकास व्हावा हे मतदारसंघाचा प्रथम नागरिक म्हणून आपले ध्येय असून विकासकामाला निधी ‍द्यायला आपण कमी पडणार नाहीअशी ग्वाही मी अनेकदा मतदारसंघातील जनतेला दिली आहे. त्यानुसारच आपले काम सुरु असून मागेल त्याला विकास देण्याचे काम आपण करीत आहोत. सातारा जिल्हयात सर्वाधिक मते देऊन मतदारसंघातील जनतेने आपणांस निवडूण दिले. जनतेच्या वि श्वासाला कुठेही तडा न जावू देता गत साडेचार वर्षात सातारा जिल्हयात  सर्वाधिक  निधी आपण पाटण मतदारसंघात मंजुर करुन आणला आहे याचा मला सार्थ अभिमान आहे.पाटण जिल्हा परिषद मतदारसंघ हा माजी आमदारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघाने माजी आमदारांना प्रत्येक निवडणूकीत भरभरुन मते देण्याचे काम केले परंतू माजी आमदारांनी त्या मानाने या विभागाचा म्हणावा असा विकास केला नाही. विकास झाला तर या विभागातील जनता सुज्ञ होईल आणि हे आपल्याला घातक आहे या दृष्टीकोनातून त्यांनी या विभागाला विकासापासून कोसो मैल दुरच ठेवण्याचे काम केले. अनेक निवडणूकीमध्ये आम्ही प्रचाराला आलो की चिटेघरच्या बुंवाच्या घरी यायचे या वि भागाची बैठक घ्यायची काय प्रचार असेल तो येथेच व्हायचा परंतू काळ बदलला तसे दिवसही बदलले या विभागात गत दोन निवडणूकीत जनतेने चांगला उठाव केला. आणि विकास करणाऱ्या नेतृत्वाच्या मागे ठामपणे उभे राहण्याचा निर्णय या वि भागाने घेतल्यामुळे या विभागातील प्रत्येक गांवामध्ये आणि वाडी वस्तीमध्ये मोठया प्रमाणात आता विकासाचे नवे पर्व सुरु झालेले पहावयास मिळत आहे.या विभागात माजी आमदारांची असणारी दहशत या विभागातील जनतेने मोडीस काढली पाहिजेत्याचा परिणाम विकासकामांच्या माध्यमातून दिसून येत आहे. गत साडेचार वर्षात या विभागातील प्रत्येक वाडीवस्तीवर विकासाचे काम आपण दिले आहे याचा मला मनस्वी खुप आनंद वाटत आहे. केवळ आश्वासन न देता ज्या गांवाने वाडीवस्तींने आपणाकडे काम मागितले त्या त्या गांवाना आणि वाडीवस्तीस आपण काम दिले आहे.विरोधकांच्या बालेकिल्ल्यात आपण साडेचार वर्षात कोटयावधींची विकासकामे मंजुर करुन दिली व ती कामे प्रत्यक्षात सुरु झाली आहेत याचा आनंद व्दिगुणीत आहे.पण काम करायला आपण अन मत मागायला विरोधक असे भविष्यात होता कामा नये याची काळजी या  विभागातील जनतेने घेणे आवश्यक आहे.चिटेघर गांवास विकासाच्या बाबतीत झुकते माप देण्याचा मी कायम प्रयत्न करीन असे आश्वासनही त्यांनी यावेळी बोलताना दिले.उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक सखाराम शिंदे यांनीकेले तुकाराम भोसले यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment