Tuesday, 11 June 2019

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत पाटण विधानसभा मतदारसंघातील ५ मोठया रस्त्यांच्या कामांना ०९ कोटी ९५ लक्ष रुपयांच्या निधीची शासनाची मंजुरी. आमदार शंभूराज देसाईंची माहिती.





दौलतनगर दि.11 :- राज्य शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत सन २०१९-२० करीता बॅच २ मध्ये सुचविण्यात आलेल्या पाटण विधानसभा मतदारसंघातील पाच मोठया रस्त्यांच्या कामांना राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने मंजुरी दिली असून या कामांना देण्यात आलेल्या प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय शासनाच्या ग्रामविकास विभागाने दि. ०७ जून, २०१९ रोजी पारित केला आहे. पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध भागातील पाच महत्वाच्या रस्त्यांच्या कामांकरीता एकूण ०९ कोटी ९५ लाख ४२ हजार रुपयांचा निधी मंजुर केला असून ११.०७० किलोमीटर रस्त्याची लांबी या निधीतून पुर्ण होणार असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाईंनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
    पत्रकामध्ये आमदार शंभूराज देसाईंनी म्हंटले आहे की, पाटण विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण आणि डोंगरी भागातील मोठया रस्त्यांच्या कामांना राज्य शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत प्रतिवर्षाप्रमाणे सन २०१९-२० मध्ये आवश्यक असणारा निधी मंजुर करणेविषयी राज्याच्या ग्रामीण विकास मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांचेकडे विनंती करुन या कामांचे प्रस्ताव शासनाच्या ग्रामविकास विभागाकडे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या संबधित यंत्रणेमार्फत सादर करण्यात आले होते.सदरच्या कामांना ग्रामीण विकास मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांचे सुचनेवरुन राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने प्रशासकीय मान्यता देवून या पाच रस्त्यांच्या कामांकरीता एकूण ०९ कोटी ९५ लाख ४२ हजार रुपयांचा निधी मंजुर केला आहे. या निधीमधून ११.०७० किलोमीटर रस्त्याची लांबी पुर्ण होणार आहे. प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांमध्ये पाटण विधानसभा मतदारसंघातील नाडोली पोहोच रस्ता करणे २.३०० किमी ०२ कोटी १६ लाख ०७ हजार,  दिवशी बुद्रुक ते मारुलहवेली रस्ता करणे ३.६०० किमी ०३ कोटी ०३ लाख १२ हजार, नावडी रस्ता करणे १.५२० किमी, ०१ कोटी ३१ लाख ७० हजार, मणदुरे ते निवकणे रस्ता करणे १.६५० किमी, ०१ कोटी ३९ लाख ०६ हजार, वर्पेवाडी (गोकूळ तर्फ पाटण) रस्ता करणे ०२ किमी ०२ कोटी ०५ लाख ४७ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांना प्रशासकीय मान्यता दिल्याचा शासन निर्णय शासनाच्या ग्रामविकास विभागाने दि. ०७ जून, २०१९ रोजी पारित केला आहे. या कामांच्या निविदा लवकरच प्रसिध्द होवून या कामांना लवकरच सुरुवात होईल असेही आमदार शंभूराज देसाईंनी पत्रकात म्हंटले असून सदरचे ग्रामीण भागातील अडचणीतील हे रस्ते पुर्ण करण्याकरीता आमदार शंभूराज देसाई यांनी विशेष प्रयत्न केल्यामुळे या गांवातील ग्रामस्थांनी आमदार शंभूराज देसाई यांचे आभार व्यक्त केले आहेत.
चौकट :- मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत सन २०१९-२० मध्येच शिरळ व मरळी-कदमवाडी प्रस्ताव सादर.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत सन २०१९-२० करीता बॅच २ मध्ये यंदाच्या वर्षीच्या कामांमध्ये कराड चिपळूण रोड ते शिरळ रस्ता १.२०० किमी व मरळी -मंगेवाडी ते कदमवाडी रस्ता १.५०० किमी असे एकूण दोन रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळणेकरीताचे प्रस्ताव ग्रामीण विकास विभागाकडे सादर करण्यात आले यासही लवकरच मान्यता मिळणार असल्याचेही आमदार शंभूराज देसाईंनी म्हटंले आहे.


Saturday, 8 June 2019

कोयना पर्यटनातील मंजुर कामांना लवकरात लवकर सुरुवात करा. आमदार शंभूराज देसाईंच्या संबधित अधिकाऱ्यांना सुचना.




दौलतनगर दि.०८:-महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरण या धरणाच्या आसपासचा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसीत करणे करीता कोयना पर्यटनाच्या माध्यमातून आपण मागणी केल्याप्रमाणे युतीच्या शासनाने आवश्यक असणारा निधी मंजुर केला आहे. पहिल्या टप्प्यात कोयना विश्रामगृहाचे बांधकाम करणे व दुसऱ्या टप्प्यातील कामांनाही मंजुरी देत जिल्हाधिकारी,सातारा यांच्याकडे निधीही उपलब्ध करुन दिला आहे.कोयना पर्यटनातील मंजुर झालेली सर्व कामांच्या निविदा तात्काळ प्रसिध्द करुन या कामांना लवकरात लवकर सुरुवात करावी अशा सुचना आमदार शंभूराज देसाईंनी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या.
                        कोयनानगर ता.पाटण येथे कोयना पर्यटनातील विविध विकासकामांकरीता आमदार शंभूराज देसाईंनी मंजुर करुन आणलेल्या निधीमधून या कामांना तातडीने सुरुवात करण्यात यावी याकरीता आमदार शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजीत करण्यात आली होती.या बैठकीस पाटणचे प्रातांधिकारी श्रीरंग तांबे,कोयना धरण व्यवस्थापनचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील,सार्वजनीक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता एस.व्ही.पाटील,वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक कुलकर्णी यांच्यासह शिवसेना जिल्हाप्रमुख जयंवतराव शेलार,शिवदौलत सहकारी बँकेचे संचालक अशोकराव पाटील,माजी पंचायत समिती सदस्य हरीष भोमकर, धोंडींराम भोमकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
                         याप्रसंगी आमदार शंभूराज देसाईंनी महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरण व धरणाच्या १० कि.मीचा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसीत करणेकरीता राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन व पर्यटनमंत्री ना.जयकुमार रावल यांचेकडे जिल्हाधिकारी,सातारा यांच्या मार्फत सादर केलेल्या पर्यटन आराखडयातील मंजुर झालेल्या कामांची माहिती देत या आराखडयात उर्वरीत राहिलेल्या कामांची सध्याची स्थिती काय आहे याचीही माहिती करुन घेतली.पहिल्या टप्प्यात जलसंपदा विभागाकडून कोयना विश्रामगृहाचे बांधकामासाठी २ कोटी ५० लाख तसेच दुसऱ्या टप्प्यात पर्यटनाच्या दृष्टीने आराखडयात सुचविलेल्या कोयनानगर येथील अस्तित्वात असणाऱ्या नेहरु उद्यानाचे तसेच धरण परिसराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील जुन्या झालेल्या कारंजाचे सुशोभिकरण व नुतनीकरण करणे,विश्रामगृहाचे नुतनीकरण करणे, पर्यटकांना बसण्याकरीता ठिकठिकाणी बसण्याची व्यवस्था करणे व शिवसागर जलाशयामध्ये बोटिंगची व्यवस्था करणे या कामांकरीता एकूण २ कोटी ०५ लाख रुपयांचा निधी मंजुर झाला आहे.विश्रामगृहाचा निधी कोयना सिंचन विभागाकडे व दुसऱ्या टप्प्यातील कामांचा निधी जिल्हाधिकारी,सातारा यांचेकडे वर्ग करण्यात आला आहे. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील सर्व कामे ही कोयना धरण व्यवस्थापनाकडील असून सदरची कामे लवकर सुरु करणेकरीता आवश्यक असणारी निविदा प्रक्रिया कार्यकारी अभियंता,कोयना धरण व्यवस्थापन यांनी तात्काळ सुरु करावी असे त्यांनी सुचित केले.
                             पहिल्या टप्प्यात एकूण ४ कोटी ५५ लाख रुपयांचा निधी शासनाने मंजुर केला असून पर्यटन आराखडयातील उर्वरीत राहिलेल्या कामांना यंदाच्या आर्थिक वर्षात निधी देण्याचे राज्याचे पर्यटनमंत्री ना.जयकुमार रावल यांनी मला आश्वासित केले आहे. दि.१७ जुन रोजी राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे या अधिवेशनात उर्वरीत कामांना निधी आणणेकरीता मी शासनाकडे प्रयत्नशील आहे.त्यापुर्वी पहिल्या टप्प्यातील कामांना लवकरात लवकर सुरुवात होणे गरजेचे आहे. असे त्यांनी सांगितले.तसेच वन्यजीव विभागाकडे कोयना अभयारण्यातील काही प्रेक्षणिय स्थळे विकसीत करणेकरीताही निधी मंजुर व्हावा याकरीताही कोयना पर्यटनाच्या आराखडयात आपण प्रमुख कामांचा समावेश केला होता. त्या कामांची सद्यस्थिती काय आहे याचीही माहिती आमदार शंभूराज देसाईंनी वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक कुलकर्णी यांचेकडून करुन घेतली. या कामांचे अंदाजपत्रक करण्याचे काम सध्या सुरु असून प्रत्यक्ष पहाणी अहवाल लवकरच सादर केला जाईल यामध्ये कोयनानगर येथे पर्यटकांकरीता निसर्ग परीचर केंद्र उभारणेकरीता २.० कोटी,ओझर्डे येथील तीनधरी धबधबा परिसर सुशोभिकरण व नुतनीकरण करणे १.० कोटी, कोंडावळे रामघळ व गाढवराई येथील धबधबा सुशोभिकरण करणे याकरीता प्रत्येकी १.० कोटी व ५० लाख तसेच घाटमाथा ते हुंबरळी व जंगली जयगड येथील वॉकींग ट्रेक बळकटीकरण करणे आणि केमसे नाका (घाटमाथा) रासाठी संरक्षण कुटी- केमसे नाका ट्रेकरुट तयार करणे या कामांकरीता एकूण १ कोटी ५० लाख असा एकूण ६.०० कोटी  लाख रुपयाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. ट्रेकरुटमुळे  एकूण ११ किलोमीटर वॉकींग ट्रेकचे बळकटीकरण होणार असून लवकरच याही कामांना आवश्यक असणारा निधी मिळवून ही कामेही सुरु करणेकरीता मी पाठपुरावा करणार असल्याचे सांगत कोयना पर्यटनाला आवश्यक असणारा निधी मंजुर झाल्याने कोयना पर्यटनाच्या कामांना गती मिळाली असून पर्यटनाला चालना देण्याचे काम व  यामुळे कोयनानगर परिसराचे रुपडे पालटणार असल्याचा आनंद होत आहे. असेही आमदार शंभूराज देसाई शेवठी म्हणाले.
चौकट :- केवळ घोषणा नाही तर करुन दाखविले.             
              कोयना पर्यटनाच्या आराखडयाला राज्य शासनाकडून मंजुरी मिळवून येथील पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या ठिकाणांची तसेच महत्वाची प्रेक्षणीय स्थळांची निर्मिती व दुरुस्ती करणेकरीता आवश्यक असणारा निधी कोयना पर्यटनाच्या माध्यमातून मंजुर करुन आणणार असे मी सांगितले होते.मी केवळ घोषणा करीत नाही तर त्याचा पाठपुरावा करुन जे जे ठरवतो ते दाखवून देतो त्याचप्रमाणे कोयना पर्यटनाची नुसती घोषणा केली नाही तर यातील कामांना निधी मंजुर करुन आणला आणि ते करुन दाखविले.

Friday, 7 June 2019

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील १४ गांवे वगळण्याच्या निर्णयाचे सर्व श्रेय मुख्यमंत्री व वनमंत्री यांचे - आमदार शंभूराज देसाई. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील त्या १४ गांवांनी मानले आमदार शंभूराज देसाईंचे आभार.




दौलतनगर दि.०७:-सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कोअर झोनमध्ये असणारी १४ गांवे बफर झोनमध्ये घेणेची शासनाकडे बरेच वर्षापासून प्रलंबीत असणाऱ्या कार्यवाहीची अंमलबजावणी युतीच्या शासनानेच केली असून या घेतलेल्या निर्णयाचे सर्व श्रेय हे राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व वनमंत्री ना.सुधिर मुनगंटीवारयांचे आहे पाटण मतदारसंघातील तमाम जनतेच्या व या १४ गावातील जनतेच्या वतीने मी त्यांचे जाहीर आभार मानतो असे प्रतिपादन आमदार शंभूराज देसाईंनी केले.
                     सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कोअर झोनमध्ये असणारी १४ गांवे बफर झोनमध्ये घेणेकरीता सातत्याने युतीच्या शासनाकडे पाठपुरावा करुन या प्रयत्नांना यश मिळवून देणारे तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई यांचे जाहीर विशेष आभार मानण्यचा कार्यक्रम कोयनानगर ता.पाटण येथे आयोजीत केला होता.याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कोअर झोनमध्ये असणाऱ्या १४ गांवातील प्रमुख कार्यकर्त्यांनी आमदार शंभूराज देसाई यांचा सत्कार करुन जाहीर आभार व्यक्त केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख जयंवतराव शेलार, शिवदौलत सहकारी बँकेचे संचालक अशोकराव पाटील, माजी पंचायत समिती सदस्य हरीष भोमकर,धोंडींराम भोमकर,प्रदीप पाटील,नथूराम सावंत,भागोजी शेळके,शैलेंद्र शेलार,बबनराव कदम,धोंडीराम बाकाडे,शशिकांत जाधव,शामराव सावंत,राजेश पवार,अंकुश देसाई,महेंद्र चाळके,रामचंद्र कदम,गोविंद चाळके,वसंतराव शेलार, आर.के. जाधव यांच्यासह प्रमुख गावचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
                     याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे खरे भूत हे तालुक्याच्या माजी आमदारांनीच या विभागातील जनतेच्या मानगुटीवर बसविले होते. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प साकारत असतानाच तालुक्याच्या माजी आमदारांनी जागरुकता दाखविली असती तर कदाचित ही वेळ या विभागातील जनतेवर आली नसती. या प्रकल्पाला माझा सुरुवातीपासून विरोध होता आणि श्रेय लाटण्याकरीता मी पत्रकबाजी करीत आहे असे अनेक आरोप माजी आमदारांनी माझेवर केले.माझा विरोध होता कारण विभागातील जनतेवर हे संकट येणार हे मला माहिती होते.प्रकल्प आला तेव्हा या तालुक्याचे आमदार कोण होते. राज्यात आणि केंद्रात सत्ता कुणाची होती.हे तालुक्यातील जनतेलाही चांगलेच माहिती आहे. हातात असताना जागरुकता दाखविता आली नाही आणि हा निर्णय झाल्यानंतर गुलाल,भंडारा उडविण्याकरीता पुढे पुढे करणारे हेच माजी आमदार आम्ही संघर्ष केला,आम्ही आंदोलने केली, आम्ही यांना भेटलो,आम्ही त्यांना भेटलो म्हणून ढोल वाजवित आहेत त्यांना त्या काळातच त्यांच्या सत्तेत असणाऱ्या सरकारकडून हा निर्णय त्यावेळीच का करुन घेता आला नाही याचे उत्तर त्यांनी प्रथमत: या १४ गावातील नागरिकांना दयावे.आपली निष्क्रीयता झाकण्या करीता बिनबुडाचे आरोप करण्यारे माजी आमदार यांनी कितीही आटापिटा केला तरी हा निर्णय कुणाच्या काळात आणि कुणाच्या मागणीवरुन झाला आहे हे जनतेच्या चांगले लक्षात आले. गेली साडेचार वर्षे हा निर्णय करुन घेणेकरीता माझे शासनाकडे प्रयत्न सुरु होते हे या विभागातील जनतेलाही माहिती आहे.या विषयासंदर्भात होणाऱ्या सर्व बैठकांना मी उपस्थित होतो.राज्याचे वनमंत्री यांचेकडे माझे सातत्याने प्रयत्न सुरु होते.वनमंत्री ना.सुधिर मुनगंटीवार हे दि.२५.१२.२०१८ रोजी कराड येथील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यालयाच्या उदघाटन समारंभास आले होते तेव्हाही यासंदर्भात मी त्यांच्याकडे या विभागातील पदाधिकाऱ्या समवेत प्रत्यक्ष भेट घेवून ही गांवे वगळण्याची कार्यवाही लवकर पुर्ण करावी अशी मागणी केली होती.तेव्हा त्यांनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील ही १४ गांवे वगळण्याचा आदेश येत्या ६० दिवसात काढण्यात येईल असे आश्वासन दिले होते त्यानतंर लोकसभेची आचारसंहिता सुरु झाली आचारसिंहतेनंतरही वनमंत्री यांची भेट घेतली आणि लवकरात लवकर हा निर्णय करावा अशी मागणी केली त्यावेळी माझे लेखी पत्रावर ४८ तासात हा निर्णय पारित करावा असा लेखी आदेश त्यांनी वन सचिव यांना माझ्या पत्रावर दिला आहे तो कागद मी आज मुद्दामहुन तुम्हा सर्वांना दाखविण्यास आणला आहे.सत्तेत युतीचे शासन असले तरी हा निर्णय करुन घेणेकरीता मला साडेचार वर्षे लागली हा निर्णय सहजा सहजी झालेला नाही वेळप्रसंगी सत्ताधारी पक्षाचा आमदार असताना सुध्दा शासनाकडे मला संघर्ष करावा लागला आणि तो मी केला म्हणूनच हे यश आपल्याला मिळाले या निर्णयाचे सर्व श्रेय हे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व वनमंत्री ना.सुधिर मुनगंटीवार यांचे आहे मी त्यांचे जाहीर आभार व्यक्त करतो प्रत्यक्ष भेटूनही मी या दोघांचे जाहीर विशेष आभार मानणार असल्याचेही आमदार शंभूराज देसाई शेवठी बोलताना म्हणाले.यावेळी जिल्हाप्रमुख जयंवतराव शेलार,अशोकराव पाटील,माजी हरीष भोमकर यांची भाषणे झाली यावेळी शैलेंद्र पवार, बाबुराव बाकाडे,लक्ष्मण सुतार,मनोहर कदम,रविंद्र सपकाळ,चंद्रकांत जाधव,दिलीप सपकाळ,रमेश कदम, हणमंत मिसाळ,धोंडू पाटील,प्रदिप पवार,योगेश शिर्के,सावळाराम कदम १४ गावातील या प्रमुख कार्यकर्त्यांची प्रमुख उपस्थिती होती.


Tuesday, 4 June 2019

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील ती १४ गांवे वगळण्यास वनमंत्र्यांची मान्यता. अंतिम मान्यतेकरीता मुख्यमंत्र्यांकडे फाईल सादर, दोनच दिवसात निर्णय होण्याची शक्यता. आ.शंभूराज देसाईंची माहिती.


                


 दौलतनगर दि.०४:- पाटण विधानसभा मतदारसंघातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कोअर झोनमध्ये असणारी १४ गांवे बफर झोनमध्ये घेणेची शासनाकडे प्रलंबीत असणारी कार्यवाहीची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी अशी मागणी सातत्याने पाटणचे आमदार शंभूराज देसाई हे राज्याचे वनमंत्री ना.सुधिर मुनगंटीवार यांचेकडे करीत होते. वनमंत्री यांची आमदार शंभूराज देसाईंनी यासंदर्भात नुकतीच भेट घेतली असता वनमंत्री यांनी आजच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील ती १४ गांवे वगळण्यास मान्यता दिली आहे व या प्रस्तावावर अंतिम मान्यता घेणेकरीता राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचेकडे फाईल सादर करण्यात आली असून येत्या दोनच दिवसात यावर निर्णय होण्याची शक्यता असल्याचे वनमंत्री ना.सुधिर मुनगंटीवार यांनी आमदार शंभूराज देसाईंना सांगितले असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाईंनी दिली आहे.
              आमदार शंभूराज देसाईंनी दिलेल्या माहितीनुसार सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील ती १४ गांवे वगळण्याचा आदेश तात्काळ काढावा असे लेखी आदेश माझे पत्रावर राज्याचे वनमंत्री ना.सुधिर मुनगंटीवार यांनी २०१९ च्या मुंबई येथील विधानसभेच्या अधिवेशनात वनविभागांचे प्रधान सचिव यांना दिले होते.आजच त्यास वनमंत्री ना.सुधिर मुनगंटीवार यांनी मान्यता दिली असून या प्रस्तावावर अंतिम मान्यता घेणेकरीता सदरची फाईल वनमंत्री ना.सुधिर मुनगंटीवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचेकडे सादर केली आहे. मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचेकडून येत्या दोनच दिवसात यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.पाटण विधानसभा मतदारसंघातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कोअर झोनमध्ये असणारी १४ गांवे बफर झोनमध्ये घेणेची कार्यवाहीची अंमलबजावणी शासनस्तरावर बरेच वर्षापासून प्रलंबीत होती. बरेच वर्षापासून लालफितीत अडकलेल्या या प्रस्तावावर शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा याकरीता माझा सातत्याने शासनाकडे विशेषत: राज्याचे वनमंत्री ना.सुधिर मुनगंटीवार यांचेकडे पाठपुरावा सुरु होता.राज्याचे वनमंत्री ना.सुधिर मुनगंटीवार हे दि.२५.१२.२०१८ रोजी कराड येथील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यालयाच्या उदघाटन समारंभास आले होते तेव्हाही यासंदर्भात मी त्यांच्याकडे या विभागातील पदाधिकाऱ्यासमवेत प्रत्यक्ष भेट घेवून ही गांवे वगळण्याची कार्यवाही लवकर पुर्ण करावी अशी मागणी केली होती. तेव्हा त्यांनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील ही १४ गांवे वगळण्याचा आदेश येत्या ६० दिवसात काढण्यात येईल असे आश्वासन देखील कराडच्या कार्यक्रमात जाहीरपणे दिले  होते. त्यानंतर २०१९ च्या मुंबई येथील विधानसभेच्या अधिवेशनात प्रत्यक्ष भेट घेवून लेखी पत्र देत पुनश्च: या विषयाची वनमंत्री ना.सुधिर मुनगंटीवार यांना आठवण करुन दिली होती. तेव्हा वनमंत्री यांनी माझे पत्रावर वनविभागांचे प्रधान सचिव यांना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील ती १४ गांवे वगळण्याचा आदेश तात्काळ काढावा असे लेखी आदेश दिले होते. आज त्यास वनमंत्री यांनी स्वत: मान्यता दिली असून अंतिम मान्यतेकरीता ही फाईल राज्याचे मुख्यमंत्री यांचेकडे आजच सादर केली आहे. दोनच दिवसात यावर अंतिम निर्णय होईल असा विश्वास वनमंत्री यांनी मला दिला असून लवकरच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कोअर झोनमध्ये असणारी १४ गांवे बफर झोनमध्ये घेणेची शासनाकडे प्रलंबीत असणारी मागणी लवकरच पुर्ण होईल असे आमदार शंभूराज देसाईंनी सांगितले आहे.

पाटण तालुक्यातील कोयना पुनर्वसित गावठाणातील कामांना ०१ कोटी 02 लाखाचा निधी मंजूर. आमदार शंभूराज देसाई.





दौलतनगर दि.०४:- राज्य शासनाकडे प्रलंबित राहिलेल्या कोयना प्रकल्प टप्पा 1 व 2 अंतर्गत सातारा जिल्हयातील पाटण तालुक्यातील पुनर्वसित गावठाणामधील नागरी सुविधांच्या 06 कामांना ०१ कोटी 02 लाख 39 हजार 326 रुपयांचा निधी राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने नुकताच मंजूर केला असून सदरचा निधी मंजूर केल्याचा शासन निर्णय शासनाच्या महसूल व वनविभागाने दि.28 मे,२०१९ रोजी पारित केला असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
                             आमदार शंभूराज देसाई यांनी दिलेल्या पत्रकांत पुढे म्हंटले आहे की, कोयना प्रकल्पातील पुनर्वसित गावठाणांमधील नागरी सुविधांच्या कामांना आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन देणेबाबत राज्याचे महसूल व वनविभागाचे मंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे मी सातत्याने पाठपुरावा करीत होतो. तसेच कोयना प्रकल्प टप्पा १ व २ अंतर्गत सातारा जिल्हयातील पाटण तालुक्यातील पुनर्वसित गावठाणांमधील नागरी सुविधांच्या कामांना राज्य शासनाने तातडीने निधी मंजूर करणेकरीता महाराष्ट्र विधीमंडळाच्या सन २०१८ च्या पहिल्या अधिवेशनामध्ये कोयना प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत लक्षवेधी सुचना उपस्थित केली होती. सदर लक्षवेधी सुचनेवर झालेल्या चर्चेदरम्यान मदत व पुनर्वसन राज्यमंत्री महोदय यांनी कार्यवाहीच्या अनुषंगाने आश्वासने दिली होती. त्यानुसार पाटण तालुक्यातील पुनर्वसित गावठाणामधील नागरी सुविधांच्या १३ कामांना ०१ कोटी ३९ लाख ५८ हजार ४२० रुपयांचा निधी राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने यापुर्वी मंजूर केला असून सदरचा निधी मंजूर केल्याचा शासन निर्णय शासनाच्या महसूल व वनविभागाने दि. ०७ मार्च,२०१९ रोजी पारितही केला आहे. त्याचबरोबर उर्वरित पुनर्वसित गावठाणामधील नागरी सुविधांच्या 06 कामांना नुकताच 01 कोटी 02 लाख 39 हजार 326 रुपयांचा निधी राज्य शासनाच्या महसूल व वनविभागाने मंजूर केला असून सदरचा निधी मंजूर केल्याचा शासन निर्णय शासनाच्या महसूल व वनविभागाने दि. 28 मे, 2019 रोजी पारित केला आहे. या 06 कामांमध्ये मिरगाव चाफेर अंतर्गत रस्ते तयार करणे 52.30 लाख, नवजा (ढाणकल) अंतर्गत रस्ते तयार करणे 14.25 लाख, हुंबरळी (देशमुखवाडी) अंतर्गत रस्ते तयार करणे 13.01 लाख, बाजे वरसरकून येथे समाजमंदिर 6.90 लाख, पुनवली रिसवड येथे समाजमंदिर 6.87 लक्ष व मिरगाव चाफेर आर.सी.सी.गटर 09.07 लाख या कामांचा समावेश असून सदरच्या निधीमुळे कोयना प्रकल्पातील पुनर्वसित गावांमध्ये नागरी सुविधांतर्गत प्रलंबित राहिलेल्या कामांना चालना मिळणार असून लवकर या कामांच्या निविदा प्रसिध्द करुन सदरच्या मंजूर कामांना लवकरात लवकर सुरुवात करण्याच्या सुचना कार्यकारी अभियंता,कण्हेर कालवे विभाग क्रं.२ करवडी कराड यांना दिले असल्याचे आमदार देसाई यांनी शेवटी पत्रकांत म्हंटले आहे.
चौकट:- २२ पुनर्वसित गावठाणांमधील कामांचे प्रस्ताव मंजुरीकरीता सादर.
             सन २०१८ च्या अधिवेशनामध्ये कोयना प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत मांडलेल्या लक्षवेधी सुचनेवेळी मदत व पुनर्वसन राज्यमंत्री यांनी दिलेल्या आश्वासनानुसार २२ पुनर्वसित गावठाणांमधील ४ कोटी ६२ लाख ८२ हजार रुपयांची कामे मंजुरीकरीता शासनाच्या महसूल व वन विभागाकडे सादर करण्यात आली असल्याचे आमदार शंभूराज देसाईंनी पत्रकात म्हंटले आहे.

Thursday, 23 May 2019

बौध्द वस्त्यांमध्ये बौध्दविहार व अभ्यासिका बांधणेकरीता १ कोटी ०५ लाख निधी मंजुर. पाटण विधानसभा मतदारसंघात ७ गांवात (नाविण्यपुर्ण) योजनेअंतर्गत नाविण्यपुर्ण उपक्रम. आमदार शंभूराज देसाई.



दौलतनगर दि.23:- पाटण विधानसभा मतदारसंघात अनेक गांवामध्ये असणाऱ्या बौध्द वस्त्यांमध्ये बौध्दविहार नसलेने येथील बौध्द समाजातील ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपुर्ण योजनेतंर्गत बौध्द वस्त्यांमध्ये बौध्दविहार व अभ्यासिका बांधणे हा उपक्रम हाती घ्यावा अशी मागणी जिल्हयाचे पालकमंत्री ना.विजयबापू शिवतारे व जिल्हयाच्या जिल्हाधिकारी श्रीमती श्वेता सिंघल यांचेकडे केली होती. त्यानुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील ७ गावातील बौध्द वस्त्यांमध्ये बौध्दविहार व अभ्यासिका बांधणे या कामांकरीता एकूण १ कोटी ०५ लाख रुपयांचा निधी मंजुर केला असल्याचा आदेश जिल्हाधिकारी श्रीमती श्वेता सिंघल यांनी काढला असल्याची माहिती पाटणचे आमदार शंभूराज देसाईंनी दिली असून पाटण मतदारसंघात हा नाविन्यपुर्ण उपक्रम सुरु झाल्याचा आनंद वाटत असल्याचे आमदार शंभूराज देसाईंनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे म्हंटले आहे.
                         आमदार शंभूराज देसाईंनी पत्रकात म्हंटले आहे की, जिल्हा नियोजन समितीच्या लघू समितीचा सदस्य या नात्याने सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचा आराखडा तयार करताना नाविन्यपुर्ण योजनेतंर्गत नाविन्यपुर्ण अशा उपक्रमांना आवश्यक तो निधी राखीव ठेवावा अशी शिफारस मी समितीपुढे केली होती. त्यानुसार सदरचा आराखडा तयार करताना पाटण विधानसभा मतदारसंघात डोंगराळ आणि दुर्गम भागात वसलेल्या विविध गांवातील बौध्द वस्त्यांमध्ये बौध्दविहार नसल्याने येथील ग्रामस्थांना अनेक अडचणी निर्माण होत असल्याने बौध्द वस्त्यांमध्ये नागरिकांना आवश्यक असणारे बौध्दविहार व या समाजातील मुलामुंलीच्या अभ्यासाकरीता अभ्यासिका बांधणे हा उपक्रम हाती घेण्याचे मी ठरविले त्यानुसार  बौध्दविहार व अभ्यासिका बांधणे या कामांचे अंदाजपत्रक सार्वजनीक बांधकाम विभाग यांचेकडून तयार करुन घेवून पाटण मतदारसंघातील बौध्द वस्त्यांमध्ये बौध्दविहार व अभ्यासिका बांधणे हा उपक्रम नाविन्यपुर्ण असून जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपुर्ण योजनेतंर्गत आवश्यक असणारा निधी मंजुर करावा अशी मागणी जिल्हयाचे पालकमंत्री ना.विजयबापू शिवतारे व जिल्हयाच्या जिल्हाधिकारी श्रीमती श्वेता सिंघल यांचेकडे केली होती. माझे मागणीनुसार जिल्हाधिकारी श्रीमती श्वेता सिंघल यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील ७ गांवातील बौध्द वस्त्यांमध्ये बौध्दविहार व अभ्यासिका बांधणेच्या कामांना मंजुरी दिले असल्याचे आदेश पारित केले असून या कामांकरीता एकूण १ कोटी ०५ लाख रुपयांचा निधी मंजुर केला असल्याचे आदेशात म्हंटले आहे. मंजुर केलेल्या बौध्दविहार व अभ्यासिका बांधणेच्या कामांमध्ये  मौजे मारुल तर्फ पाटण-15.00 लाख, येराड-15.00 लाख, शिरळ-15.00 लाख, बहुले -15.00 लाख, आटोली- 15.00 लाख, मरळी-14.98 लाख, साईकडे-14.99 लाख  असा एकूण १ कोटी ४ लाख ९७ हजार रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. या कामांच्या प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या असून लवकरच निविदा प्रसिध्द होवून या कामांना प्रत्यक्षात सुरुवात होईल असेही आमदार शंभूराज देसाईंनी पत्रकात म्हंटले आहे.
चौकट:-  धनगर समाज वस्त्यांच्या रस्ते बांधणेकरीता ५० लाख रुपयांचे प्रस्ताव शासनाने मागविले.
              वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेतंर्गत सन २०१८-१९ मध्ये पाटण मतदारसंघातील धनगरसमाज वस्त्यांमधील रस्ते करणेकरीता ५० लाखांचा निधी मंजुर करण्याची मागणी शासनाकडे केली होती.यामध्ये मरड धनगरवाडा १ धनगरवस्ती गवळीसमाज गावपोहोच रस्ता,मरडफाटा ते मिसाळवाडी धनगरसमाज वस्ती,रामेल ते गवळीवस्ती धनगरसमाज, सडादाढोली धनगरसमाज पोहोच रस्ता व कसणी ते धनगरवाडा गावपोहोच रस्ता करणेकरीता प्रत्येकी १० लाख रुपयेप्रमाणे ५० लाख रुपये या कामांना मंजुर करावेत अशी मागणी होती मागणीनुसार प्रशासकीय मान्यतेकरीता प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना शासनाकडून संबधितांना आल्या आहेत.

Monday, 20 May 2019

कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) शिष्यवृत्ती योजनेचा मतदारसंघातील १४६ गरजू मुलींना लाभ. आमदार शंभूराज देसाई. कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांची ६० वी पुण्यतिथी साजरी.



दौलतनगर दि.20:- पाटण मतदारसंघातील गोरगरीब कुटुंबातील गरजू मुलींचे शिक्षण त्यांच्या कुटुंबातील गरीबीमुळे थांबू नये ही भावना मनी बाळगून सन २०१२ पासून पाटण विधानसभा मतदारसंघातील गोरगरीब कुटुंबातील गरजू मुलींच्या शिक्षणाला आपला हातभार लागावा याकरीता स्व.शिवाजीराव देसाई चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आपण कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे नावाने सुरु केलेली शिष्यवृत्ती योजना ही एक आदर्शवत व गरीब कुटुंबातील मुलींना प्रेरणादायी ठरत आहे. गत आठ वर्षात पाटण मतदारसंघातील एकूण १४६ गरजू मुलींना या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ झाला असुन आतापर्यंत आपण स्व.शिवाजीराव देसाई चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सुमारे २२ लाख ३० हजार रुपये हे शिष्यवृत्ती योजनेकरीता दिले आहेत.कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) शिष्यवृत्ती योजना गरजू मुलींकरीता एक आधार म्हणून काम करीत आहे याचा मला फार आनंद वाटत असल्याचे प्रतिपादन आमदार शंभूराज देसाईंनी असल्याचे प्रतिपादन कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे ६० व्या पुण्यस्मरण कार्यक्रमात केले.
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या धर्मपत्नी कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांची ६० वी पुण्यतिथी कार्यक्रम व पुण्यतिथीच्या निमित्ताने आयोजीत कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) शिष्यवृत्ती कार्यक्रमात आमदार शंभूराज देसाई बोलत होते.याप्रसंगी कार्यक्रमास सुप्रसिध्द चित्रकार दादासाहेब सुतार,कराड, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, शिवदौलत बँक चेअरमन मिलींद पाटील, या प्रमुख पदाधिकाऱ्यासंह लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहातील विविध संस्थांचे पदाधिकारी,कार्यकर्ते, जिल्हा परीषद,पंचायत समिती सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले,महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाई व कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे खुप खुप आर्शिवाद आपल्या पाठीशी आहेत. म्हणूनच आमदार म्हणून त्यांच्या नावाने आपण नवनवीन कल्पना राबवून पाटण मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी अगदी तळमळीने काम करीत आहेत. माझ्या आज्जी कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे नावाने पाटण मतदारसंघातील गरीब कुटुंबातील गरजू मुलींच्या शिक्षणाकरीता एक शिष्यवृत्ती योजना सुरु करावी आणि या शिष्यवृत्ती योजनेचे वितरण कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे पुण्यस्मरण कार्यक्रमात करावे अशी कल्पना सन २०१२ मध्ये मी मांडली प्रतिवर्षी मुलींच्या शिक्षणाकरीता ५००० रुपये आपण दयावेत अशी भावना मनी बाळगली.याकरीता फंड कशातून उभा करायचा असा विषय जेव्हा समोर आला तेव्हा माझे चेअरमन पदाची १० वर्षे पुर्ण झालेनंतर दशकपुर्तीच्या कार्यक्रमातून शिल्लक राहिलेली रक्कम आपण  स्व.शिवाजीराव देसाई चॅरिटेबल ट्रस्टमध्ये ठेवली व या रक्कमेच्या व्याजातून ही शिष्यवृत्ती सुरु करण्याचा निर्णय घेतला आतापर्यंत मतदारसंघातील १४६ गरजू मुंलीना आपण ही शिष्यवृत्ती दिली आहे.या योजनेमुळे मुलींना त्यांच्या शिक्षणासाठी प्रेरणा मिळत आहे. याकरीता कोयना परीसर साखर कामगार संघटना आणि शिवदौलत बँकेचे सर्व कामगार हे प्रत्येकी १ लाख व २५ हजार रुपयांची मदत प्रतिवर्षी करीत आहेत. समाजासाठी आपण काहीतरी देणे लागतो या भूमिकेतुन गरीब कुंटुबांतील गरजू मुलींच्या शिक्षणासाठी आपण हा धाडसी निर्णय घेतला आहे. गतवर्षीपासून आपण या शिष्यवृत्ती योजनेत ५०० रुपयांनी वाढ करुन ५५०० रुपये प्रतिवर्षी शिष्यवृत्ती देत आहोत.आज गरीब कुटुंबातील मुलींना केवळ त्यांच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी प्रतिवर्षी शिष्यवृत्ती देण्याकरीता म्हणून नव्हे तर सर्वसामान्य महिला किती सक्षम असू शकते याचे दर्शन ग्रामीण भागातील मुलींना घडविण्याकरीताचा आपला हा प्रयत्न आहे. मला कौतुक एका गोष्टीचे नेहमी वाटते, दोन वर्षापुर्वी असेच मतदारसंघातील एका मुलींस आपण शिष्यवृत्ती योजना सुरु केली होती तीन वर्षे त्या मुलींने त्याचा लाभ घेतला कालांतराने तिच्या घरची परिस्थिती सुधारल्यानंतर तिने आमच्या संस्थेच्या प्राचार्यांना येवून सांगितले सर, माझा भाऊ आता नोकरीला लागला आहे त्यामुळे माझे घरची परिस्थिती आता चांगली आहे मला सुरु असलेली शिष्यवृत्ती आपण दुसऱ्या कोणत्याही गरजू मुलींस सुरु करावी असेही चांगले संस्कार या शिष्यवृत्ती योजनेतून आपण देवू शकलो हे कौतुकास्पद आहे. असे सांगून ते म्हणाले, शासनाच्या वतीने आपण आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे शताब्दी स्मारक पुर्ण केले आहे या स्मारकामध्ये गरीब कुटुंबातील मुलामुलींना ई-लर्निंगचे शिक्षण मिळावे याकरीता सर्व सोयीनीयुक्त अभ्यासिकाही आपण सुरु केली आहे.ग्रामीण भागातील मुलांमुलींना खरोखरच चांगला उपयोग होणार असून शिष्यवृत्तीधारक मुलींनीही या अभ्यासिकेचा वापर करुन घ्यावा. असे आवाहन त्यांनी करुन कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांना ६० व्या पुण्यतिथीनिमित्त पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेच्या वतीने विनम्र अभिवादन केले.
प्रारंभी आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाई व कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे कार्य जवळून पाहिलेले सुप्रसिध्द चित्रकार दादासाहेब सुतार,कराड, यांचा मानाची शाल,श्रीफळ व लोकनायक ग्रंथ देवून आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी दादासाहेब सुतार,कराड यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते पाटण मतदारसंघातील यंदाच्या वर्षीच्या २२ मुलींना कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले.उपस्थितांचे आभार माजी जि.प.सदस्य जालंदर पाटील यांनी मानले.
चौकट:- कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे पुतळयास प्रथमत: अभिवादन.
मरळी हायस्कुलच्या प्रांगणात कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे पुतळयास त्यांचे ६० व्या पुण्यतिथी सोहळयाच्या निमित्ताने आमदार शंभूराज देसाई, रविराज देसाई यांनी प्रथमत: पुष्पचक्र अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. यावेळी मरळी गावांतील विविध संस्थांचे पदाधिकारी व कै.सौ.वत्सलादेवी देसाई हायस्कूल,मरळीचे सर्व शिक्षक वर्ग यांनीही अभिवादन केले.