Saturday 8 June 2019

कोयना पर्यटनातील मंजुर कामांना लवकरात लवकर सुरुवात करा. आमदार शंभूराज देसाईंच्या संबधित अधिकाऱ्यांना सुचना.




दौलतनगर दि.०८:-महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरण या धरणाच्या आसपासचा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसीत करणे करीता कोयना पर्यटनाच्या माध्यमातून आपण मागणी केल्याप्रमाणे युतीच्या शासनाने आवश्यक असणारा निधी मंजुर केला आहे. पहिल्या टप्प्यात कोयना विश्रामगृहाचे बांधकाम करणे व दुसऱ्या टप्प्यातील कामांनाही मंजुरी देत जिल्हाधिकारी,सातारा यांच्याकडे निधीही उपलब्ध करुन दिला आहे.कोयना पर्यटनातील मंजुर झालेली सर्व कामांच्या निविदा तात्काळ प्रसिध्द करुन या कामांना लवकरात लवकर सुरुवात करावी अशा सुचना आमदार शंभूराज देसाईंनी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या.
                        कोयनानगर ता.पाटण येथे कोयना पर्यटनातील विविध विकासकामांकरीता आमदार शंभूराज देसाईंनी मंजुर करुन आणलेल्या निधीमधून या कामांना तातडीने सुरुवात करण्यात यावी याकरीता आमदार शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजीत करण्यात आली होती.या बैठकीस पाटणचे प्रातांधिकारी श्रीरंग तांबे,कोयना धरण व्यवस्थापनचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील,सार्वजनीक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता एस.व्ही.पाटील,वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक कुलकर्णी यांच्यासह शिवसेना जिल्हाप्रमुख जयंवतराव शेलार,शिवदौलत सहकारी बँकेचे संचालक अशोकराव पाटील,माजी पंचायत समिती सदस्य हरीष भोमकर, धोंडींराम भोमकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
                         याप्रसंगी आमदार शंभूराज देसाईंनी महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरण व धरणाच्या १० कि.मीचा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसीत करणेकरीता राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन व पर्यटनमंत्री ना.जयकुमार रावल यांचेकडे जिल्हाधिकारी,सातारा यांच्या मार्फत सादर केलेल्या पर्यटन आराखडयातील मंजुर झालेल्या कामांची माहिती देत या आराखडयात उर्वरीत राहिलेल्या कामांची सध्याची स्थिती काय आहे याचीही माहिती करुन घेतली.पहिल्या टप्प्यात जलसंपदा विभागाकडून कोयना विश्रामगृहाचे बांधकामासाठी २ कोटी ५० लाख तसेच दुसऱ्या टप्प्यात पर्यटनाच्या दृष्टीने आराखडयात सुचविलेल्या कोयनानगर येथील अस्तित्वात असणाऱ्या नेहरु उद्यानाचे तसेच धरण परिसराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील जुन्या झालेल्या कारंजाचे सुशोभिकरण व नुतनीकरण करणे,विश्रामगृहाचे नुतनीकरण करणे, पर्यटकांना बसण्याकरीता ठिकठिकाणी बसण्याची व्यवस्था करणे व शिवसागर जलाशयामध्ये बोटिंगची व्यवस्था करणे या कामांकरीता एकूण २ कोटी ०५ लाख रुपयांचा निधी मंजुर झाला आहे.विश्रामगृहाचा निधी कोयना सिंचन विभागाकडे व दुसऱ्या टप्प्यातील कामांचा निधी जिल्हाधिकारी,सातारा यांचेकडे वर्ग करण्यात आला आहे. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील सर्व कामे ही कोयना धरण व्यवस्थापनाकडील असून सदरची कामे लवकर सुरु करणेकरीता आवश्यक असणारी निविदा प्रक्रिया कार्यकारी अभियंता,कोयना धरण व्यवस्थापन यांनी तात्काळ सुरु करावी असे त्यांनी सुचित केले.
                             पहिल्या टप्प्यात एकूण ४ कोटी ५५ लाख रुपयांचा निधी शासनाने मंजुर केला असून पर्यटन आराखडयातील उर्वरीत राहिलेल्या कामांना यंदाच्या आर्थिक वर्षात निधी देण्याचे राज्याचे पर्यटनमंत्री ना.जयकुमार रावल यांनी मला आश्वासित केले आहे. दि.१७ जुन रोजी राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे या अधिवेशनात उर्वरीत कामांना निधी आणणेकरीता मी शासनाकडे प्रयत्नशील आहे.त्यापुर्वी पहिल्या टप्प्यातील कामांना लवकरात लवकर सुरुवात होणे गरजेचे आहे. असे त्यांनी सांगितले.तसेच वन्यजीव विभागाकडे कोयना अभयारण्यातील काही प्रेक्षणिय स्थळे विकसीत करणेकरीताही निधी मंजुर व्हावा याकरीताही कोयना पर्यटनाच्या आराखडयात आपण प्रमुख कामांचा समावेश केला होता. त्या कामांची सद्यस्थिती काय आहे याचीही माहिती आमदार शंभूराज देसाईंनी वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक कुलकर्णी यांचेकडून करुन घेतली. या कामांचे अंदाजपत्रक करण्याचे काम सध्या सुरु असून प्रत्यक्ष पहाणी अहवाल लवकरच सादर केला जाईल यामध्ये कोयनानगर येथे पर्यटकांकरीता निसर्ग परीचर केंद्र उभारणेकरीता २.० कोटी,ओझर्डे येथील तीनधरी धबधबा परिसर सुशोभिकरण व नुतनीकरण करणे १.० कोटी, कोंडावळे रामघळ व गाढवराई येथील धबधबा सुशोभिकरण करणे याकरीता प्रत्येकी १.० कोटी व ५० लाख तसेच घाटमाथा ते हुंबरळी व जंगली जयगड येथील वॉकींग ट्रेक बळकटीकरण करणे आणि केमसे नाका (घाटमाथा) रासाठी संरक्षण कुटी- केमसे नाका ट्रेकरुट तयार करणे या कामांकरीता एकूण १ कोटी ५० लाख असा एकूण ६.०० कोटी  लाख रुपयाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. ट्रेकरुटमुळे  एकूण ११ किलोमीटर वॉकींग ट्रेकचे बळकटीकरण होणार असून लवकरच याही कामांना आवश्यक असणारा निधी मिळवून ही कामेही सुरु करणेकरीता मी पाठपुरावा करणार असल्याचे सांगत कोयना पर्यटनाला आवश्यक असणारा निधी मंजुर झाल्याने कोयना पर्यटनाच्या कामांना गती मिळाली असून पर्यटनाला चालना देण्याचे काम व  यामुळे कोयनानगर परिसराचे रुपडे पालटणार असल्याचा आनंद होत आहे. असेही आमदार शंभूराज देसाई शेवठी म्हणाले.
चौकट :- केवळ घोषणा नाही तर करुन दाखविले.             
              कोयना पर्यटनाच्या आराखडयाला राज्य शासनाकडून मंजुरी मिळवून येथील पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या ठिकाणांची तसेच महत्वाची प्रेक्षणीय स्थळांची निर्मिती व दुरुस्ती करणेकरीता आवश्यक असणारा निधी कोयना पर्यटनाच्या माध्यमातून मंजुर करुन आणणार असे मी सांगितले होते.मी केवळ घोषणा करीत नाही तर त्याचा पाठपुरावा करुन जे जे ठरवतो ते दाखवून देतो त्याचप्रमाणे कोयना पर्यटनाची नुसती घोषणा केली नाही तर यातील कामांना निधी मंजुर करुन आणला आणि ते करुन दाखविले.

No comments:

Post a Comment