दौलतनगर दि.11 :- राज्य
शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत सन २०१९-२० करीता बॅच २ मध्ये सुचविण्यात
आलेल्या पाटण विधानसभा मतदारसंघातील पाच मोठया रस्त्यांच्या कामांना राज्य
शासनाच्या ग्रामविकास विभागाने मंजुरी दिली असून या कामांना देण्यात आलेल्या
प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय शासनाच्या ग्रामविकास विभागाने दि. ०७ जून, २०१९
रोजी पारित केला आहे. पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध भागातील पाच महत्वाच्या
रस्त्यांच्या कामांकरीता एकूण ०९ कोटी ९५ लाख ४२ हजार रुपयांचा निधी मंजुर केला
असून ११.०७० किलोमीटर रस्त्याची लांबी या निधीतून पुर्ण होणार असल्याची माहिती
आमदार शंभूराज देसाईंनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
पत्रकामध्ये आमदार शंभूराज देसाईंनी म्हंटले आहे की, पाटण विधानसभा
मतदारसंघातील ग्रामीण आणि डोंगरी भागातील मोठया रस्त्यांच्या कामांना राज्य
शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत प्रतिवर्षाप्रमाणे सन २०१९-२० मध्ये
आवश्यक असणारा निधी मंजुर करणेविषयी राज्याच्या ग्रामीण विकास मंत्री ना.पंकजाताई
मुंडे यांचेकडे विनंती करुन या कामांचे प्रस्ताव शासनाच्या ग्रामविकास विभागाकडे
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या संबधित यंत्रणेमार्फत सादर करण्यात आले
होते.सदरच्या कामांना ग्रामीण विकास मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांचे सुचनेवरुन
राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने प्रशासकीय मान्यता देवून या पाच रस्त्यांच्या
कामांकरीता एकूण ०९ कोटी ९५ लाख ४२ हजार रुपयांचा निधी मंजुर केला आहे. या
निधीमधून ११.०७० किलोमीटर रस्त्याची लांबी पुर्ण होणार आहे. प्रशासकीय मान्यता
दिलेल्या कामांमध्ये पाटण विधानसभा मतदारसंघातील नाडोली पोहोच रस्ता करणे २.३००
किमी ०२ कोटी १६ लाख ०७ हजार, दिवशी
बुद्रुक ते मारुलहवेली रस्ता करणे ३.६०० किमी ०३ कोटी ०३ लाख १२ हजार, नावडी रस्ता
करणे १.५२० किमी, ०१ कोटी ३१ लाख ७० हजार, मणदुरे ते निवकणे रस्ता करणे १.६५०
किमी, ०१ कोटी ३९ लाख ०६ हजार, वर्पेवाडी (गोकूळ तर्फ पाटण) रस्ता करणे ०२ किमी ०२
कोटी ०५ लाख ४७ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांना प्रशासकीय
मान्यता दिल्याचा शासन निर्णय शासनाच्या ग्रामविकास विभागाने दि. ०७ जून, २०१९
रोजी पारित केला आहे. या कामांच्या निविदा लवकरच प्रसिध्द होवून या कामांना लवकरच
सुरुवात होईल असेही आमदार शंभूराज देसाईंनी पत्रकात म्हंटले असून सदरचे ग्रामीण
भागातील अडचणीतील हे रस्ते पुर्ण करण्याकरीता आमदार शंभूराज देसाई यांनी विशेष
प्रयत्न केल्यामुळे या गांवातील ग्रामस्थांनी आमदार शंभूराज देसाई यांचे आभार
व्यक्त केले आहेत.
चौकट
:- मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत सन २०१९-२० मध्येच शिरळ व मरळी-कदमवाडी
प्रस्ताव सादर.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत सन २०१९-२० करीता बॅच
२ मध्ये यंदाच्या वर्षीच्या कामांमध्ये कराड चिपळूण रोड ते शिरळ रस्ता १.२०० किमी
व मरळी -मंगेवाडी ते कदमवाडी रस्ता १.५०० किमी असे एकूण दोन रस्त्यांच्या कामांना
मंजुरी मिळणेकरीताचे प्रस्ताव ग्रामीण विकास विभागाकडे सादर करण्यात आले यासही
लवकरच मान्यता मिळणार असल्याचेही आमदार शंभूराज देसाईंनी म्हटंले आहे.
No comments:
Post a Comment