Tuesday 4 June 2019

पाटण तालुक्यातील कोयना पुनर्वसित गावठाणातील कामांना ०१ कोटी 02 लाखाचा निधी मंजूर. आमदार शंभूराज देसाई.





दौलतनगर दि.०४:- राज्य शासनाकडे प्रलंबित राहिलेल्या कोयना प्रकल्प टप्पा 1 व 2 अंतर्गत सातारा जिल्हयातील पाटण तालुक्यातील पुनर्वसित गावठाणामधील नागरी सुविधांच्या 06 कामांना ०१ कोटी 02 लाख 39 हजार 326 रुपयांचा निधी राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने नुकताच मंजूर केला असून सदरचा निधी मंजूर केल्याचा शासन निर्णय शासनाच्या महसूल व वनविभागाने दि.28 मे,२०१९ रोजी पारित केला असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
                             आमदार शंभूराज देसाई यांनी दिलेल्या पत्रकांत पुढे म्हंटले आहे की, कोयना प्रकल्पातील पुनर्वसित गावठाणांमधील नागरी सुविधांच्या कामांना आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन देणेबाबत राज्याचे महसूल व वनविभागाचे मंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे मी सातत्याने पाठपुरावा करीत होतो. तसेच कोयना प्रकल्प टप्पा १ व २ अंतर्गत सातारा जिल्हयातील पाटण तालुक्यातील पुनर्वसित गावठाणांमधील नागरी सुविधांच्या कामांना राज्य शासनाने तातडीने निधी मंजूर करणेकरीता महाराष्ट्र विधीमंडळाच्या सन २०१८ च्या पहिल्या अधिवेशनामध्ये कोयना प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत लक्षवेधी सुचना उपस्थित केली होती. सदर लक्षवेधी सुचनेवर झालेल्या चर्चेदरम्यान मदत व पुनर्वसन राज्यमंत्री महोदय यांनी कार्यवाहीच्या अनुषंगाने आश्वासने दिली होती. त्यानुसार पाटण तालुक्यातील पुनर्वसित गावठाणामधील नागरी सुविधांच्या १३ कामांना ०१ कोटी ३९ लाख ५८ हजार ४२० रुपयांचा निधी राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने यापुर्वी मंजूर केला असून सदरचा निधी मंजूर केल्याचा शासन निर्णय शासनाच्या महसूल व वनविभागाने दि. ०७ मार्च,२०१९ रोजी पारितही केला आहे. त्याचबरोबर उर्वरित पुनर्वसित गावठाणामधील नागरी सुविधांच्या 06 कामांना नुकताच 01 कोटी 02 लाख 39 हजार 326 रुपयांचा निधी राज्य शासनाच्या महसूल व वनविभागाने मंजूर केला असून सदरचा निधी मंजूर केल्याचा शासन निर्णय शासनाच्या महसूल व वनविभागाने दि. 28 मे, 2019 रोजी पारित केला आहे. या 06 कामांमध्ये मिरगाव चाफेर अंतर्गत रस्ते तयार करणे 52.30 लाख, नवजा (ढाणकल) अंतर्गत रस्ते तयार करणे 14.25 लाख, हुंबरळी (देशमुखवाडी) अंतर्गत रस्ते तयार करणे 13.01 लाख, बाजे वरसरकून येथे समाजमंदिर 6.90 लाख, पुनवली रिसवड येथे समाजमंदिर 6.87 लक्ष व मिरगाव चाफेर आर.सी.सी.गटर 09.07 लाख या कामांचा समावेश असून सदरच्या निधीमुळे कोयना प्रकल्पातील पुनर्वसित गावांमध्ये नागरी सुविधांतर्गत प्रलंबित राहिलेल्या कामांना चालना मिळणार असून लवकर या कामांच्या निविदा प्रसिध्द करुन सदरच्या मंजूर कामांना लवकरात लवकर सुरुवात करण्याच्या सुचना कार्यकारी अभियंता,कण्हेर कालवे विभाग क्रं.२ करवडी कराड यांना दिले असल्याचे आमदार देसाई यांनी शेवटी पत्रकांत म्हंटले आहे.
चौकट:- २२ पुनर्वसित गावठाणांमधील कामांचे प्रस्ताव मंजुरीकरीता सादर.
             सन २०१८ च्या अधिवेशनामध्ये कोयना प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत मांडलेल्या लक्षवेधी सुचनेवेळी मदत व पुनर्वसन राज्यमंत्री यांनी दिलेल्या आश्वासनानुसार २२ पुनर्वसित गावठाणांमधील ४ कोटी ६२ लाख ८२ हजार रुपयांची कामे मंजुरीकरीता शासनाच्या महसूल व वन विभागाकडे सादर करण्यात आली असल्याचे आमदार शंभूराज देसाईंनी पत्रकात म्हंटले आहे.

No comments:

Post a Comment