दौलतनगर दि.०७:-सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कोअर
झोनमध्ये असणारी १४ गांवे बफर झोनमध्ये घेणेची शासनाकडे बरेच वर्षापासून प्रलंबीत असणाऱ्या
कार्यवाहीची अंमलबजावणी युतीच्या शासनानेच केली असून या घेतलेल्या निर्णयाचे सर्व
श्रेय हे राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व वनमंत्री ना.सुधिर मुनगंटीवारयांचे
आहे पाटण मतदारसंघातील तमाम जनतेच्या व या १४ गावातील जनतेच्या वतीने मी त्यांचे
जाहीर आभार मानतो असे प्रतिपादन आमदार शंभूराज देसाईंनी केले.
सह्याद्री व्याघ्र
प्रकल्पातील कोअर झोनमध्ये असणारी १४ गांवे बफर झोनमध्ये घेणेकरीता सातत्याने
युतीच्या शासनाकडे पाठपुरावा करुन या प्रयत्नांना यश मिळवून देणारे तालुक्याचे
आमदार शंभूराज देसाई यांचे जाहीर विशेष आभार मानण्यचा कार्यक्रम कोयनानगर ता.पाटण
येथे आयोजीत केला होता.याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी सह्याद्री व्याघ्र
प्रकल्पातील कोअर झोनमध्ये असणाऱ्या १४ गांवातील प्रमुख कार्यकर्त्यांनी आमदार
शंभूराज देसाई यांचा सत्कार करुन जाहीर आभार व्यक्त केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख
जयंवतराव शेलार, शिवदौलत सहकारी बँकेचे संचालक अशोकराव पाटील, माजी पंचायत समिती
सदस्य हरीष भोमकर,धोंडींराम भोमकर,प्रदीप पाटील,नथूराम सावंत,भागोजी शेळके,शैलेंद्र
शेलार,बबनराव कदम,धोंडीराम बाकाडे,शशिकांत जाधव,शामराव सावंत,राजेश पवार,अंकुश
देसाई,महेंद्र चाळके,रामचंद्र कदम,गोविंद चाळके,वसंतराव शेलार, आर.के. जाधव
यांच्यासह प्रमुख गावचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठया संख्येने उपस्थिती
होती.
याप्रसंगी बोलताना आमदार
शंभूराज देसाई म्हणाले, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे खरे भूत हे तालुक्याच्या
माजी आमदारांनीच या विभागातील जनतेच्या मानगुटीवर बसविले होते. सह्याद्री व्याघ्र
प्रकल्प साकारत असतानाच तालुक्याच्या माजी आमदारांनी जागरुकता दाखविली असती तर
कदाचित ही वेळ या विभागातील जनतेवर आली नसती. या प्रकल्पाला माझा सुरुवातीपासून
विरोध होता आणि श्रेय लाटण्याकरीता मी पत्रकबाजी करीत आहे असे अनेक आरोप माजी
आमदारांनी माझेवर केले.माझा विरोध होता कारण विभागातील जनतेवर हे संकट येणार हे
मला माहिती होते.प्रकल्प आला तेव्हा या तालुक्याचे आमदार कोण होते. राज्यात आणि
केंद्रात सत्ता कुणाची होती.हे तालुक्यातील जनतेलाही चांगलेच माहिती आहे. हातात
असताना जागरुकता दाखविता आली नाही आणि हा निर्णय झाल्यानंतर गुलाल,भंडारा
उडविण्याकरीता पुढे पुढे करणारे हेच माजी आमदार आम्ही संघर्ष केला,आम्ही आंदोलने
केली, आम्ही यांना भेटलो,आम्ही त्यांना भेटलो म्हणून ढोल वाजवित आहेत त्यांना त्या
काळातच त्यांच्या सत्तेत असणाऱ्या सरकारकडून हा निर्णय त्यावेळीच का करुन घेता आला
नाही याचे उत्तर त्यांनी प्रथमत: या १४ गावातील नागरिकांना दयावे.आपली निष्क्रीयता
झाकण्या करीता बिनबुडाचे आरोप करण्यारे माजी आमदार यांनी कितीही आटापिटा केला तरी
हा निर्णय कुणाच्या काळात आणि कुणाच्या मागणीवरुन झाला आहे हे जनतेच्या चांगले
लक्षात आले. गेली साडेचार वर्षे हा निर्णय करुन घेणेकरीता माझे शासनाकडे प्रयत्न
सुरु होते हे या विभागातील जनतेलाही माहिती आहे.या विषयासंदर्भात होणाऱ्या सर्व
बैठकांना मी उपस्थित होतो.राज्याचे वनमंत्री यांचेकडे माझे सातत्याने प्रयत्न सुरु
होते.वनमंत्री ना.सुधिर मुनगंटीवार हे दि.२५.१२.२०१८ रोजी कराड येथील सह्याद्री
व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यालयाच्या उदघाटन समारंभास आले होते तेव्हाही यासंदर्भात
मी त्यांच्याकडे या विभागातील पदाधिकाऱ्या समवेत प्रत्यक्ष भेट घेवून ही गांवे
वगळण्याची कार्यवाही लवकर पुर्ण करावी अशी मागणी केली होती.तेव्हा त्यांनी सह्याद्री
व्याघ्र प्रकल्पातील ही १४ गांवे वगळण्याचा आदेश येत्या ६० दिवसात काढण्यात येईल
असे आश्वासन दिले होते त्यानतंर लोकसभेची आचारसंहिता सुरु झाली आचारसिंहतेनंतरही
वनमंत्री यांची भेट घेतली आणि लवकरात लवकर हा निर्णय करावा अशी मागणी केली
त्यावेळी माझे लेखी पत्रावर ४८ तासात हा निर्णय पारित करावा असा लेखी आदेश त्यांनी
वन सचिव यांना माझ्या पत्रावर दिला आहे तो कागद मी आज मुद्दामहुन तुम्हा सर्वांना
दाखविण्यास आणला आहे.सत्तेत युतीचे शासन असले तरी हा निर्णय करुन घेणेकरीता मला
साडेचार वर्षे लागली हा निर्णय सहजा सहजी झालेला नाही वेळप्रसंगी सत्ताधारी
पक्षाचा आमदार असताना सुध्दा शासनाकडे मला संघर्ष करावा लागला आणि तो मी केला
म्हणूनच हे यश आपल्याला मिळाले या निर्णयाचे सर्व श्रेय हे मुख्यमंत्री
ना.देवेंद्र फडणवीस व वनमंत्री ना.सुधिर मुनगंटीवार यांचे आहे मी त्यांचे जाहीर
आभार व्यक्त करतो प्रत्यक्ष भेटूनही मी या दोघांचे जाहीर विशेष आभार मानणार
असल्याचेही आमदार शंभूराज देसाई शेवठी बोलताना म्हणाले.यावेळी जिल्हाप्रमुख
जयंवतराव शेलार,अशोकराव पाटील,माजी हरीष भोमकर यांची भाषणे झाली यावेळी शैलेंद्र
पवार, बाबुराव बाकाडे,लक्ष्मण सुतार,मनोहर कदम,रविंद्र सपकाळ,चंद्रकांत जाधव,दिलीप
सपकाळ,रमेश कदम, हणमंत मिसाळ,धोंडू पाटील,प्रदिप पवार,योगेश शिर्के,सावळाराम कदम
१४ गावातील या प्रमुख कार्यकर्त्यांची प्रमुख उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment