दौलतनगर दि.०४:- पाटण
विधानसभा मतदारसंघातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कोअर झोनमध्ये असणारी १४
गांवे बफर झोनमध्ये घेणेची शासनाकडे प्रलंबीत असणारी कार्यवाहीची अंमलबजावणी
लवकरात लवकर करावी अशी मागणी सातत्याने पाटणचे आमदार शंभूराज देसाई हे राज्याचे
वनमंत्री ना.सुधिर मुनगंटीवार यांचेकडे करीत होते. वनमंत्री यांची आमदार शंभूराज
देसाईंनी यासंदर्भात नुकतीच भेट घेतली असता वनमंत्री यांनी आजच सह्याद्री व्याघ्र
प्रकल्पातील ती १४ गांवे वगळण्यास मान्यता दिली आहे व या प्रस्तावावर अंतिम
मान्यता घेणेकरीता राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचेकडे फाईल सादर
करण्यात आली असून येत्या दोनच दिवसात यावर निर्णय होण्याची शक्यता असल्याचे वनमंत्री
ना.सुधिर मुनगंटीवार यांनी आमदार शंभूराज देसाईंना सांगितले असल्याची माहिती आमदार
शंभूराज देसाईंनी दिली आहे.
आमदार शंभूराज
देसाईंनी दिलेल्या माहितीनुसार सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील ती १४ गांवे
वगळण्याचा आदेश तात्काळ काढावा असे लेखी आदेश माझे पत्रावर राज्याचे वनमंत्री
ना.सुधिर मुनगंटीवार यांनी २०१९ च्या मुंबई येथील विधानसभेच्या अधिवेशनात वनविभागांचे
प्रधान सचिव यांना दिले होते.आजच त्यास वनमंत्री ना.सुधिर मुनगंटीवार यांनी
मान्यता दिली असून या प्रस्तावावर अंतिम मान्यता घेणेकरीता सदरची फाईल वनमंत्री
ना.सुधिर मुनगंटीवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचेकडे सादर
केली आहे. मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचेकडून येत्या दोनच दिवसात यावर
अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.पाटण विधानसभा मतदारसंघातील सह्याद्री व्याघ्र
प्रकल्पातील कोअर झोनमध्ये असणारी १४ गांवे बफर झोनमध्ये घेणेची कार्यवाहीची
अंमलबजावणी शासनस्तरावर बरेच वर्षापासून प्रलंबीत होती. बरेच वर्षापासून लालफितीत
अडकलेल्या या प्रस्तावावर शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा याकरीता माझा
सातत्याने शासनाकडे विशेषत: राज्याचे वनमंत्री ना.सुधिर मुनगंटीवार यांचेकडे
पाठपुरावा सुरु होता.राज्याचे वनमंत्री ना.सुधिर मुनगंटीवार हे दि.२५.१२.२०१८ रोजी
कराड येथील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यालयाच्या उदघाटन समारंभास आले
होते तेव्हाही यासंदर्भात मी त्यांच्याकडे या विभागातील पदाधिकाऱ्यासमवेत
प्रत्यक्ष भेट घेवून ही गांवे वगळण्याची कार्यवाही लवकर पुर्ण करावी अशी मागणी
केली होती. तेव्हा त्यांनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील ही १४ गांवे वगळण्याचा
आदेश येत्या ६० दिवसात काढण्यात येईल असे आश्वासन देखील कराडच्या कार्यक्रमात
जाहीरपणे दिले होते. त्यानंतर २०१९ च्या मुंबई
येथील विधानसभेच्या अधिवेशनात प्रत्यक्ष भेट घेवून लेखी पत्र देत पुनश्च: या
विषयाची वनमंत्री ना.सुधिर मुनगंटीवार यांना आठवण करुन दिली होती. तेव्हा वनमंत्री
यांनी माझे पत्रावर वनविभागांचे प्रधान सचिव यांना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील
ती १४ गांवे वगळण्याचा आदेश तात्काळ काढावा असे लेखी आदेश दिले होते. आज त्यास
वनमंत्री यांनी स्वत: मान्यता दिली असून अंतिम मान्यतेकरीता ही फाईल राज्याचे
मुख्यमंत्री यांचेकडे आजच सादर केली आहे. दोनच दिवसात यावर अंतिम निर्णय होईल असा
विश्वास वनमंत्री यांनी मला दिला असून लवकरच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कोअर
झोनमध्ये असणारी १४ गांवे बफर झोनमध्ये घेणेची शासनाकडे प्रलंबीत असणारी मागणी
लवकरच पुर्ण होईल असे आमदार शंभूराज देसाईंनी सांगितले आहे.
No comments:
Post a Comment