Thursday, 26 March 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर पुढील तीन महिन्याचे आगाऊ धान्य देण्याचा शासनाचा निर्णय गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंची माहिती. पोलीस विभागाने विनाकारण कुणाला मारहाण करु नये - गृहराज्यमंत्री ना.देसाईंचे आदेश.



                 
              दौलतनगर दि.२६:-  महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोनो आजाराचा वाढता पार्दुभाव लक्षात घेता जनतेला सुरु असलेली संचारबंदी व जमावबंदीमुळे बाहेर पडता येत नसल्याने राज्यातील सर्व विभागातील जनतेला कोरोनाच्या पार्श्वभूमिवर पुढील तीन महिन्यांचे आगाऊ धान्य देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून आपले पाटण विधानसभा मतदारसंघातील पुरवठा विभागाने तात्काळ त्यांचेकडे सदरचे तीन महिन्यांचे धान्य आलेनंतर त्याचे वाटप करावे अशा सक्त सुचना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी प्रांताधिकारी यांना देवून संचारबंदीच्या काळात हुल्लडबाजी करणाऱ्यांना चोप दया मात्र काही कामानिमित्त दोनचाकीवरुन प्रवास करणाऱ्यांना विनाकारण पोलीस विभागाने मारहाण करु नये अशा सुचना पोलीस महासंचालकांना कालच दिल्या आहेत त्याचे पालन पोलीस विभागाने करावे असे आदेशही गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी दिले.
            कोरोना आजारासंदर्भात शासनाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या संचारबंदी व जमावबंदीसंदर्भात आपले होमपीच असणाऱ्या पाटण विधानसभा मतदारसंघातील परिस्थिती जाणून घेणेकरीता गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी आज तिसऱ्यांदा तहसिल कार्यालयात आढावा बैठक घेतली.याप्रसंगी त्यांनी वरीलप्रमाणे माहिती देत काही आवश्यक सुचना उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.बैठकीस प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात,गटविकास अधिकारी मीना साळुंखे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.बी.पाटील,पाटण ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.चंद्रकांत यादव,सपोनि तृप्ती सोनवणे,पाटण नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक परदेशी,नायब तहसिलदार थोरात यांची उपस्थिती होती.
             या बैठकीमध्ये गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी उपस्थित अधिकाऱ्यांना राज्यामध्ये कोरोना आजाराच्या पार्श्वभूमिवर शासनाने लागू केलेल्या संचारबंदी व जमावबंदीमध्ये जनतेला काही अडचणी येत आहेत त्यामध्ये काही विभागामध्ये स्थानिक खाजगी डॉक्टरांनी आपले हॉस्पीटल बंद ठेवल्याने येथील ग्रामीण भागातील जनतेला अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून यासंदर्भात जिल्हाधिकारी सातारा यांनी स्थानिक खाजगी डॉक्टरांनी आपली हॉस्पीटल सुरु ठेवून हॉस्पीटलला आलेल्या रुग्णांवर उपचार करण्याचे बंधनकारक केले आहे.जे खाजगी डॉक्टर उपचार करणार नाहीत अशांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या शासनाच्या सुचना आहेत.तशा सुचना पाटण मतदारसंघातील सर्व खाजगी हॉस्पीटलमधील डॉक्टरांना देण्यात याव्यात.व शासनाच्या सुचनांनुसार अशा खाजगी डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी असे त्यांनी यावेळी सांगितले.
              त्याचबरोबर राज्यामध्ये संचारबंदी व जमावबंदीमुळे जनतेला बाहेर पडता येत नसल्याने राज्यातील जनतेला पुढील तीन महिन्यांचे आगाऊ धान्य देण्याची मागणी कालच राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचेकडे दुरध्वनीवरुन केली असता त्यांनी ही मागणी तातडीने मान्य करीत त्यानुसार तात्काळ निर्णयही घेतला व तसे आदेशही राज्य शासनाच्या संबधित विभागाला त्यांनी दिले आहेत.लवकरच याची अंमलबजावणी करण्याच्या सुचना प्राप्त होतील त्यानुसार तातडीने आपले पाटण विधानसभा मतदारसंघात मतदारसंघातील जनतेला रेशनिंग दुकानदारांच्या माध्यमातून आगाऊ तीन महिन्यांचे धान्यवाटप करण्याची कार्यवाही पुर्ण करुन घ्यावी अशा सुचना प्रांताधिकारी यांना दिल्या.
             तर गटविकास अधिकारी यांनी त्यांचे विभागाकडील ग्रामसेवकांमार्फत गांवातील,वाडयावस्त्यांमधील सर्व गल्लीबोळामध्ये कोरोनाची दक्षता घेण्याच्या दृष्टीने रोगनाशक औषधांची फवारणी करुन घेण्याच्या सुचना ग्रामसेवकांना दयाव्यात असे सांगून पाटण मतदारसंघासह सातारा जिल्हयामध्ये संचारबंदीच्या काळात काही कामानिमित्त दोनचाकीवरुन प्रवास करणाऱ्यांना विनाकारण पोलीस विभागाच्या बंदोबस्ताकरीता असलेल्या कर्मचाऱ्यांकडून काठीने मारहाण करण्यात येत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. काही कारण नसताना रस्त्यावर दुचाकीवरुन हुल्लडबाजी करणाऱ्यांना चोप दया परंतू विनाकारण कुणाला मारहाण करु नका यासंदर्भातही मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचेशी बोलणे झाले असता तशा सुचना राज्याचे पोलीस महासंचालक यांना मी कालच दिल्या आहेत आपल्या मतदारसंघात त्या सुचनांचे पोलीस विभागाने तात्काळ पालन करावे असे सक्त आदेश देवून पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्व जनतेने कोरोनाच्या पार्श्वभूमिवर स्वत:ची आणि स्वत:च्या परिवाराची काळजी घेण्याचे जाहीर आवाहनही त्यांनी बैठकीच्या माध्यमातून केले आहे.



Tuesday, 24 March 2020

कोरोनोपासून बचावासाठी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंकडून मतदारसंघातील सर्व विभागात केले 10 हजार मास्कचे वाटप. ना.शंभूराज देसाईंनी या उपक्रमातून जपली सामाजीक बांधीलकी.



                 

              
दौलतनगर दि.24:- महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोनो विषाणूने अक्षरश: तैमान घातले असून राज्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनो बाधित व्यक्तींमध्ये वाढच होत आहे.पाटण विधानसभा मतदारसंघातील मुंबई,पुणे या शहरात असणारे बहूतांशी नागरिक हे आपआपल्या गांवी आले आहेत.कोरोनो आजाराचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेवून आपल्या मतदारसंघातील जनतेच्या आरोग्याची काळजी व दक्षता घेणेकरीता राज्याचे गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाईंनी मतदारसंघातील जनतेला स्व.शिवाजीराव देसाई चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने पहिल्या टप्प्यात 10 हजार मास्कचे वाटप करण्यात आले असून ना.शंभूराज देसाईंचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज मतदारसंघातील प्रत्येक विभागातील गावोगांवी,खेडयापाडयात जावून वयोवृध्द नागरिकांना,महिलांना,युवकांना या मास्कचे वाटप केले. कोणतेही संकट आले तरी येणाऱ्या संकटाला न डगमगता आपल्या कर्मभूमितील जनतेला आधार देण्याची भूमिका ना.शंभूराज देसाईंनी नेहमीच जपली आहे.मास्कचे वाटप करुन त्यांनी या उपक्रमातून पुन्हा एकदा सामाजीक बांधिलकी, माणूसकी जपली आहे.
           गत पाच,सहा महिन्यापुर्वी पाटण मतदारसंघातील जनतेवर अतिवृष्टीचे व महापुराचे संकट आले होते. या संकटातून मतदारसंघातील जनतेला बाहेर काढण्याकरीता,त्यांना आधार देणेकरीता ना.शंभूराज देसाईंनी पुढाकार घेवून या महाकाय संकटातून मतदारसंघातील जनतेला दिलासा दिला होता. अहोरात्र मतदारसंघात तळ ठोकून त्यांनी महापुरात अडकलेल्यांना स्वत: जेसीबीतून,नावेतून,बोटीतून जावून नागरिकांना,महिलांना,लहान मुला बाळांना बाहेर काढण्याचे काम केले होते तर ज्यांची घरे अतिवृष्टीमुळे कोसळली आहेत त्यांना या काळात निवारा देण्याचे काम त्यांनी केले तर अनेक दानशुरांकडून अगदी धान्यांपासून,कपडे,पांघरुण ते घरगुती वापराच्या भांडयापर्यंतची सर्व मदत मागवून घेवून ती मतदारसंघातील जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम तळमळीने सलग दीड महिना त्यांनी केले. शेतकऱ्यांना शेतीच्या झालेल्या नूकसानीची भरपाई मिळवून देण्याकरीता शासनदरबारी त्यांनी प्रयत्न करुन ही मदत शेतकऱ्यांच्या पदरात टाकण्यास मोलाचा हातभार लावला.
            गत महिन्याभरात कोरोनो या आजाराचे भलेमोठे संकट सर्वांसमोर उभे राहिले आहे. देशाबरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोनो विषाणूचा फैलाव वाढू लागला असून यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सर्वच स्तरावरुन मोठया प्रमाणात प्रयत्न केले जात असून कोरोनो आजाराचा फैलाव आपल्या मतदारसंघाकडे होवू नये याकरीता गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्व शासकीय यंत्रणाही सतर्क ठेवली असून कोरोनोच्या पार्श्वभूमिवर मतदारसंघातील जनतेने स्वत:ची आणि त्यांच्या परिवाराची काळजी घेणेकरीता प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांचेकडून सातत्याने करण्यात येत आहे.मतदारसंघात कोरोनो आजाराच्या संदर्भातील आढावा घेण्याबरोबर मतदारसंघातील जनता हा माझा परीवार आहे या परिवाराची काळजी घेणे माझे कर्तव्य आहे याकरीता ते शासकीय यंत्रणांच्या सातत्याने बैठका घेवून यावर उपाययोजना करण्याकरीता सर्व यंत्रणांना वेळोवेळी सुचित करीत आहेत.
          कोरोनोच्या पार्श्वभूमिवर केवळ बैठका घेवून ते थांबले नाहीत तर मतदारसंघातील जनतेच्या आरोग्याची काळजी व दक्षता घेणेकरीता त्यांनी पुढाकार घेतला असून स्व.शिवाजीराव देसाई चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने पहिल्या टप्प्यात 10  हजार मास्क खरेदी करीत त्यांनी आपले पदाधिकारी,कार्यकर्ते यांचेमार्फत आज मतदारसंघातील प्रत्येक विभागातील गावोगांवी, खेडयापाडयात जावून मतदारसंघातील जनतेला 10 हजार मास्कचे वाटप केले असून वाढीव मास्कचीही मागणी स्व.शिवाजीराव देसाई चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आली असून दुसऱ्या टप्प्यात मास्कच्या उपलब्तेनुसार याची खरेदी करुन वाढीवच्या मास्कचे वाटप मतदारसंघातील प्रत्येक विभागात करण्यात येणार आहे. आज पाटण मतदारसंघातील जनतेला कोरोनोच्या पार्श्वभूमिवर ना.शंभूराज देसाईंकडून वाटप करण्यात आलेल्या मास्कच्या संदर्भात पाटण मतदारसंघातील जनतेने ना.शंभूराज देसाईंना धन्यवाद दिले असून संकटे येतात आणि जातात त्यात टिकते ती माणुसकी,सामाजीक बांधीलकी हाच संदेश ना.शंभूराज देसाईंनी या उपक्रमातून दिला असून स्वत:ची आणि स्वत:च्या परीवाराची काळजी घ्या असे आवाहनही ना.शंभूराज देसाईंनी पाटण मतदारसंघासह महाराष्ट्र राज्यातील जनतेला केले आहे.



Monday, 23 March 2020

बाहेरगांवाहून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आरोग्य तपासणी करुन घ्या. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या आरोग्य अधिकाऱ्यांना सुचना व जनतेला आवाहन.



                 
              दौलतनगर दि.२३:-  महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोनो विषाणूचे सुमारे ७५ विषाणू बाधित लोक आढळून आले असून दिवसेंदिवस यामध्ये वाढ होत आहे.त्यामुळे प्रत्येक नागरिकांने स्वत:ची आणि त्यांच्या परिवाराची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.पाटण विधानसभा मतदारसंघात मोठया संख्येने नागरिक हे मुंबई, पुणे तसेच बाहेर गांवाहून आपआपल्या गांवी आले आहेत.बाहेरगांवाहून आलेल्या प्रत्येक व्यक्तीची तालुका प्रशासनातील आरोग्य विभागाने तात्काळ आरोग्य तपासणी करुन घ्यावी जेणेकरुन कोणताही धोका निर्माण होणार नाही.अशा सक्त सुचना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या व बाहेरुन आलेल्या प्रत्येक व्यक्तीने आपली आरोग्य तपासणी तातडीने करुन घ्यावी व आरोग्य विभागाला सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी बाहेरगांवाहुन आलेल्या प्रत्येक नागरिकांना केले आहे.
            कोरोनो आजाराचे संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेवून कालच संपुर्ण देशामध्ये जनता कर्फ्यूचे पालन झालेनंतर सातारा जिल्हयात या पार्श्वभूमिवर कोरोनो विषाणूचा फैलाव वाढू नये याकरीता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्हाधिकारी,सातारा यांनी कलम १४४ लागू केले आहे.यासंदर्भात तसेच कोरोनो आजाराच्या दक्षते साठी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पाटण तहसिल कार्यालय याठिकाणी आज पुन्हा एकदा आढावा बैठक घेण्यात आली.याप्रसंगी त्यांनी वरीलप्रमाणे सुचना केल्या.बैठकीस प्रांताधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार समीर यादव,उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात,गटविकास अधिकारी मीना साळुंखे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.बी.पाटील,पाटण ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.चंद्रकांत यादव, सपोनि तृप्ती सोनवणे,पाटण नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक परदेशी यांची उपस्थिती होती.
        या बैठकीमध्ये गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी प्रांताधिकारी श्रीरंग तांबे यांचेकडून प्रारंभी पाटण मतदारसंघात बाहेरील देशातून,राज्यातून तसेच मुंबई,पुणे शहरातून किती व्यक्ती आल्या आहेत याची माहिती घेतली.यामध्ये बाहेरील देशातून २० तर मुंबई,पुणे या शहरासह इतर शहरातून मोठया प्रमाणांत नागरिक मतदारसंघात आले असल्याची माहिती समोर आली.पाटण मतदारसंघात बाहेरुन मुंबई,पुणे शहरातून येणाऱ्यांची संख्या जास्त आहे.त्यामुळे तालुका प्रशासनाने गांभीर्याने याची काळजी घेणे गरजेचे आहे.असे सांगत ना.देसाईंनी महसूल विभागाचे मंडलाधिकारी,तलाठी तसेच ग्रामविकास विभागाचे ग्रामसेवक व पोलीस यंत्रणेने संबधित गावचे पोलीस पाटील यांच्यामार्फत त्या त्या गांवामध्ये बाहेरगांवाहून आलेल्या प्रत्येक व्यक्तीची माहिती गोळा करुन टप्प्या टप्प्याने तालुका प्रशासनातील आरोग्य विभागाने अशा व्यक्तींची तात्काळ आरोग्य तपासणी करुन घ्यावी. आशा संव्यसेविका, तसेच आरोग्य विभागाच्या यंत्रणेकडून केवळ बाहेरील व्यक्तींना सर्दी, खोकला आहे का?  अशी विचारणा केली जात आहे या तपासणी बरोबर डिजीटल थर्मामीटरचा वापर करुन अशा व्यक्तींना ताप आहे का याचीही खात्री करुन घ्यावी. गत १५ दिवसात बाहेरील गांवाहून आलेल्या प्रत्येक नागरिकांने आपल्या स्वत:च्या व गावांतील इतरांच्या आरोग्यासाठी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जावून आपली तपासणी करुन घ्यावी. व आरोग्य विभागाला तसेच तालुका प्रशासनाला सहकार्य करावे. आपली स्वत:ची व आपल्या परिवाराची तसेच गावातील नागरिेकांची काळजी घेणे हे आपले आद्य कर्तव्य आहे अद्यापपर्यंत पाटण मतदारसंघात कोणाही व्यक्तीमध्ये कोरोनो विषाणू बाधितची काही लक्षणे आढळून आली नाहीत ही बाब आनंदाची असल्याचे सांगून त्यांनी महसूल यंत्रणेमार्फत मंडलाधिकारी,तलाठी,कोतवाल तसेच पंचायत समितीमार्फत विस्तार अधिकारी,ग्रामसेवक,पोलीस यंत्रणेमार्फत पोलीस पाटील यांना गावा गांवामध्ये जावून जनजागृती करण्याच्या सुचना त्यांनी यावेळी केल्या तसेच कालच संपुर्ण देशामध्ये जनता कर्फ्यूचे पालन झाले मात्र आज मोठया प्रमाणात लोक रस्त्यावर आहेत. या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी,सातारा यांनी संपुर्ण सातारा जिल्हयामध्ये कलम १४४ लागू केले आहे. पाटण मतदारसंघातील सर्व पोलीस स्टेशनच्या यंत्रणांनी तसेच ग्रामसेवकांनी सतर्क राहून ५ पेक्षा अधिक लोक एकत्र येणार नाहीत याकरीता गावोगांवी ग्रामपंचायतीच्या कार्यालयातून स्पीकरव्दारे आवाहन करावे. अशा सुचना उपविभागीय पोलीस अधिकारी व गटविकास अधिकारी यांना केल्या.अत्यावश्यक सेवेमध्ये हॉस्पीटल,मेडीकल, अन्न, दुध, फळे,भाजीपाला व किराणा घेणेकरीता मोठया प्रमाणात गर्दी होत आहे तसेच दुचाकीवरुन युवकही मोठया प्रमाणावर रस्त्यावर फिरताना दिसत आहेत यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे त्याकरीता अत्यावश्यक सेवेमध्ये हॉस्पीटल,मेडीकल यांच्या व्यतिरिक्त दुध,फळे, भाजीपाला व किराणा आणणेकरीता नागरिकांना सकाळची वेळ ठरवून देणेबाबतही सुचना करण्यात याव्यात याकरीता जिल्हाधिकारी,सातारा यांना सुचित करणार असल्याचेही त्यांनी शेवठी बैठकीत सांगितले.

Saturday, 21 March 2020

अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंमुळे डोंगरपठारावरील मोगरवाडीला मिळाला कायमचा रस्ता. कधीही न होणारे रस्त्याचे काम ना.शंभूराज देसाईंमुळे प्रगतीपथावर. ग्रामस्थांच्यामध्ये आनंदाचे वातावरण.

              
       दौलतनगर दि.२१:- राज्याचे अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी मागील पंचवार्षिकमध्ये आमदार असताना पाटण विधानसभा मतदारसंघातील दुर्गम भागातील विशेषत: डोंगरपठारावरील वाडया वस्त्यांकरीता आतापर्यंत कधीही न झालेले गावपोहोच रस्ते करण्याची मोहिम राबविली होती.गत पंचवार्षिकमध्ये पाटण मतदारसंघातील ५० हून अधिक डोंगरपठावरील गांवे व वाडयावस्त्यांना जोडणारे गावपोहोच रस्ते त्यांनी केवळ आमदार असताना लाखो,करोडे रुपये शासनाकडून मंजुर करुन घेत ते पुर्ण करुन घेतले आहेत.अशाच प्रकारे तारळे विभागातील डोंगरपठारावर वसलेले मोगरवाडी हे गाव.या गावाची लोकसंख्या जेमतेमच पण स्वातंत्र्यापासून या गावाला रस्त्याची सोय नव्हती.साध्या पायवाटेवरुन या गावातील लोकांना ये-जा करावी लागत होती.मागील पंचवार्षिक मध्ये ना.शंभूराज देसाईंनी आमदार असताना कोयना भूकंप पुनर्वसन निधी समिती व ३०५४ योजनेतंर्गत या गावाला रस्ता करणेकरीता ६० लक्ष रुपयांचा निधी मंजुर केला आता या रस्त्याचे काम प्रगतीपथावर असून केवळ आणि केवळ शंभूराज देसाईंच्या मुळेच आमच्या गांवाला हा कायमचा रस्ता मिळाला अशा प्रतिक्रिया या गांवातील ग्रामस्थ, महिलांनी दिल्या असून ग्रामस्थांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
             तारळे विभागातील अनेक गांवे डोंगरपठारावर वसलेली आहेत त्यातीलच सातारा आणि पाटण तालुक्याच्या हद्दीवर असणारे मोगरवाडी हे गाव,स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाली तरी या गांवाला रस्ता ही मुलभूत सुविधा नव्हती. साध्या पायवाटेवरुन या गावातील ग्रामस्थ,महिला आपल्या मुलाबाळांना घेवून ये-जा करीत होती. विशेषत: पावसाळयात येथील ग्रामस्थ,महिला गुडघाभर चिखल तुडवत आपला प्रवास करीत होती.शालेय विद्यार्थी, नोकरी निमित्त दैनंदिन कामाकरीता प्रवास करणारे प्रवाशी यांचे रस्ता नसल्यामुळे अतोनात हाल होत होते. मोगरवाडी या कोंजवडे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गावाकरीता डोंगर कपारीतून पायवाट असून डोंगरकडा फोडून या गांवाला रस्ता करणेकरीता नामदार शंभूराज देसाईंनी मागील पंचवार्षिकमध्ये कोयना भूकंप पुनर्वसन समितीच्या माध्यमातून प्रथमत: १० लक्ष रुपयांचा निधी मंजुर करुन दिल्याने प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली. रस्त्याची लांबी जास्त असल्याने तसेच डोंगर कपारी फोडाव्या लागत असल्यामुळे या रस्त्याच्या कामांकरीता सुमारे ५० लक्षहून अधिक निधीची गरज असल्याचे ओळखून त्यांनी पुनश्च: कोयना भूकंपमधुन १५ लक्ष व जिल्हा नियोजन समितीमधून १५ लक्ष व आता पुनश्च: ३०५४ योजनेतंर्गत २० लक्ष असा एकूण ६० लक्ष रुपयांचा निधी मंजुर करुन दिला.यातील सुमारे ४० लक्ष रुपयांचे काम प्रगतीपथावर असून २० लक्ष रुपयांच्या कामांला सुरुवात होणे बाकी असून लवकरच या कामालाही सुरुवात होईल.सध्या मोगरवाडी गावाला जोडणाऱ्या रस्त्याचे काम प्रगतीपथावर असून बहूतांशी रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे गेले आहे.गावामध्ये कधीही न येणाऱ्या दोन चाकी, चार चाकी गाडया पहिल्यांदाच यायला सुरुवात होणार असून पिढ्यानपिढ्या तेथील लोकांनी खुप त्रासात काढले आहेत नामदार शंभुराज देसाईंनी या गांवाच्या रस्त्याकरीता एवढा मोठा निधी दिल्यामुळे कधीही न होणारे आमचे रस्त्याचे काम आता त्यांच्या माध्यमातून पुर्णत्वाकडे जात आहे. रस्ता या प्रथम मुलभूत सुविधेमुळे गावातील ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत असून येथील ग्रामस्थ,महिला नामदार शंभुराज देसाईंना धन्यवाद देत आहेत. रस्त्याचे संपुर्ण काम पुर्ण झाल्यानंतर आमच्या गांवात पहिल्यांदाच दुचाकी व चारचाकी वहाने येणार असून आम्हाला आता प्रतिक्षा आहे ती नामदार शंभुराज देसाईसाहेब आमच्या गांवामध्ये मोगरवाडीला केव्हा येतात त्याची अशीही प्रतिक्रिया मोगरवाडीतील ग्रामस्थ व महिलांनी दिली आहे.

अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या प्रयत्नातून पाटण मतदारसंघातील नव्याने करावयाच्या ग्रामीण रस्त्यांच्या कामांना ०४ कोटी रुपयांचा निधी मंजूर. दि. १७ मार्च, २०२० रोजी शासन निर्णय पारित.


                
          दौलतनगर दि.२१:- पाटण विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण व डोंगरी भागातील गावपोहोच रस्ते नव्याने करण्याकरीता अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून सन २०१९-२० आर्थिक वर्षात राज्य शासनाकडून एकूण २५ ग्रामीण रस्त्यांच्या कामांना ०४ कोटी रुपयांचा निधी मंजुर झाला आहे. निधी मंजुरीचा शासन निर्णय राज्य शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाने दि.१७ मार्च, २०२० रोजी पारित केला असून सदर रस्त्यांची कामे पुर्ण करुन घेण्याकरीता जिल्हा परीषद,बांधकाम विभाग ही यंत्रणा देण्यात आली आहे.
          डोंगरी आणि दुर्गम अशा पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरी भागात वसलेल्या गांवाना रस्ता ही मुलभूत सुविधा मिळवून देणेकरीता पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे सुरवातीपासूनच आग्रही राहिले आहेत. गत पंचवार्षिकमध्ये डोंगरी आणि दुर्गम भागातील गांवामध्ये तसेच वाडयावस्त्यांवर रस्ता ही मुलभूत सुविधा पोहचविण्याकरीता त्यांनी राज्य शासनामार्फत मोठया प्रमाणात निधी आणून डोंगरी भागातील रस्त्यांची कामे मार्गी लावली आहेत. राज्याचे अर्थराज्यमंत्री झालेनंतर ना.शंभूराज देसाई यांनी पाटण मतदारसंघातील नव्याने करावयाच्या ग्रामीण रस्त्यांच्या कामांना राज्य शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागामार्फत आवश्यक असणारा निधी मंजुर करुन आणला आहे.सन २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभुत सुविधा पुरविणे या योजनेअंतर्गत अनुदान वितरणाबाबत ग्रामविकास व पंचायत राज विभागाने दि.१७ मार्च, २०२० रोजीचे शासन निर्णयानुसार पाटण मतदारसंघातील एकूण २५ गावांतील व वाडया वस्त्यांमधील गावपोहोच रस्ते नव्याने करण्याकरीता ०४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
            सन २०१९-२० आर्थिक वर्षात मंजूर झालेल्या विकासकामामध्ये आडदेव ते कुसरुंड रस्ता खडीकरण, डांबरीकरण करणे-१५ लाख,जानुगडेवाडी ते शितपवाडी रस्ता- २० लाख,आंबळे पद्मावती देवी मंदिर रस्ता- १५ लाख, भोकरवाडी सावरघर जोतिर्लिंग मंदिर रस्ता -१० लाख, शिबेवाडी कुंभारगाव ता.पाटण कुंभारवाडी संरक्षक भिंत बाधणे-१५ लाख,गोठणे गावपोहोच रस्ता- २० लाख,मरड ता.पाटण येथे धनगरवाडा गवळीसमाज रस्ता - २५ लाख,काळोली ता. पाटण गावपोहोच रस्ता - २० लाख,खराडेवस्ती नुने रस्ता -१५ लाख,शिंगणवाडी गावपोहोच रस्ता -१० लाख,निनाईवाडी कसणी मुख्य रस्ता - २० लाख,चाळकेवाडी येथे भैरवनाथ मंदीर ते गुढेकर आव्हाड रस्ता-१५ लाख, निगडे ते धनावडेवाडी रस्ता - २५ लाख,धडामवाडी धजगाव ते शिंदेवाडी पोहोच रस्ता-१५ लाख, सुतारवाडी मालदन मोरेवस्ती पोहोच रस्ता - १५ लाख,कवठेकरवाडी (नाणेगाव बुद्रुक) गोळेवस्ती रस्ता -१५ लाख,मोरेवाडी कुठरे येथे लोकरेवस्ती ते सकपाळवस्ती पोहोच रस्ता-१० लाख,जाईचीवाडी बोंद्री पोहोच रस्ता - १० लाख,डोणीचावाडा वांझोळे पोहोच रस्ता- २० लाख,कारळे येथे नवाळवस्ती ते पाटील आवाड उर्वरित पोहोच रस्ता -२० लाख,भूडकेवाडी वरची पोहोच रस्ता- २० लाख,काळगाव जोशेवाडी पोहोच रस्ता -१५ लाख, खुडुपलेवाडी पोहोच रस्ता - २० लाख,मान्याचीवाडी गुंजाळी गावपोहोच रस्ता -१० लाख,जरेवाडी पोहोच रस्ता - ०५ लाख या विकासकामांचा समावेश असून या २५ कामांना एकूण ०४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांचेकडून निविदा प्रक्रिया झाल्यानंतर तातडीने या रस्त्यांच्या कामांना सुरुवात करण्याच्या सुचना  ना. शंभूराज देसाईंनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.



Thursday, 19 March 2020

१०० खाटांचे सुसज्ज रुग्णालय उभारण्याकरीता गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईकडून ग्रामीण रुग्णालयाच्या परिसराची अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पहाणी.



                
          दौलतनगर दि.१९:- राज्याचे गृह व अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी सन २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात पाटण जि.सातारा येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुपातंर करुन या रुग्णालयामध्ये १०० खाटांचे सुसज्ज असे रुग्णालय उभारण्यात येणार आहे अशी घोषणा विधानपरिषदेमध्ये दि.०६ मार्च रोजी सन २०२०-२१ चा अर्थसंकल्प मांडताना केली होती.पाटण ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुपातंर करण्याच्या हालचाली ना.शंभूराज देसाईंनी पुढाकार घेवून गतिमान केल्या असून १५ दिवसांचा कालावधी पुर्ण होण्याच्या अगोदरच ना.शंभूराज देसाईंनी १०० खाटांचे सुसज्ज असे रुग्णालय उभारण्याकरीता पाटण ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात कुठे जागा उपलब्ध आहे व कशाप्रकारे हे उपजिल्हा रुग्णालय उभे करता येईल याकरीता ग्रामीण रुग्णालयाच्या परिसराची अधिकाऱ्यांसमवेत बुधवारी दि.१८ रोजी प्रत्यक्ष पहाणी केली.
        पाटण ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुपांतर करुन या रुग्णालयामध्ये १०० खाटांचे सुसज्ज असे उपजिल्हा रुग्णालय व्हावे याकरीता ना.शंभूराज देसाईंचे मागील पंचवार्षिकमध्ये आमदार असताना राज्य शासनाकडे सातत्याने प्रयत्न सुरु होते. दोन महिन्यापुर्वी त्यांचेवर राज्याच्या अर्थखात्याचे राज्यमंत्री म्हणून जबाबदारी आलेनंतर या विषयीच्या हालचाली त्यांनी गतीमान करुन राज्याचे अर्थराज्यमंत्री म्हणून विधानपरिषदेमध्ये दि.०६ मार्च रोजी सन २०२०-२१ चा अर्थसंकल्प मांडताना त्यांनी पाटण जि.सातारा येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुपातंर करुन या रुग्णालयामध्ये १०० खाटांचे सुसज्ज असे रुग्णालय उभारण्यात येणार आहे अशी घोषणा विधानपरीषद सभागृहात केली.
           पाटण हा मतदारसंघ डोंगरी व दुर्गम असुन मतदारसंघातील जनतेला आरोग्य सुविधा घेणेकरीता कराड किंवा सातारा येथील उपजिल्हा व जिल्हा रुग्णालयाकडे जावे लागत असल्याने ही आरोग्य सुविधा पाटण या तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपजिल्हा रुग्णालय करुन मतदारसंघातील जनतेला मिळवून दयावी याकरीता त्यांची सातत्याची तळमळ होती.त्यांच्या प्रयत्नातून पाटण ग्रामीण रुग्णालयाचे रुपातंर आता उपजिल्हा रुग्णालयामध्ये झाले असून हे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात कसे व कुठे उभे करावे याकरीता त्यांनी घोषणेनंतरचा १५ दिवसांचा कालावधीही न दवडता तात्काळ या परिसराची अधिकाऱ्यांसमवेत पहाणी केली व ग्रामीण रुग्णालयाकरीता अस्तित्वात असणाऱ्या जागेंची तात्काळ मोजणी करुन या १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचा आराखडा पाटण ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक व सार्वजनीक बांधकाम विभागाचे उपअभियंता यांनी तात्काळ तयार करावा अशा सुचना त्यांनी यावेळी दिल्या.१०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाची उभारणी झालेनंतर याठिकाणी तज्ञ वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या नेमणूका करणेसंदर्भातही माझा शासनाकडे पाठपुरावा सुरु असून पहिल्या टप्प्प्यामध्ये हे रुग्णालय कसे व कुठे उभे करावयाचे याचे नियोजन करुया असेही ना.शंभूराज देसाईंनी या पहाणी दौऱ्यात अधिकाऱ्यांना सांगितले. यावेळी ना.शंभूराज देसाईंसमवेत पाटण प्रांताधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार समीर यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात,गटविकास अधिकारी श्रीमती मीना साळुंखे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.पाटील,पाटण ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.चंद्रकांत यादव, सार्वजनीक बांधकाम विभागाचे उपअभियंता अजित पाटील,सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती तृप्ती सोनवणे यांची उपस्थिती होती.

अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे प्रयत्नातून नाविण्यपुर्ण योजनेअंतर्गत पाटण तालुक्यातील ०९ मागासवर्गींय वस्त्यांमध्ये अभ्यासिका बांधणेच्या कामांना ०१ कोटी ३५ लाख निधी मंजुर.



      
दौलतनगर दि.१९:-पाटण विधानसभा मतदारसंघात अनेक गांवामध्ये असणाऱ्या मातंग व बौध्द वस्त्यांमध्ये येथील मातंग व बौध्द या मागासवर्गीय समाजातील शालेय,महाविद्यालयीन युवक- युवतींना अभ्यास करणेकरीता हक्काची जागा उपलब्ध व्हावी याकरीता अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या संकल्पनेतून जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपुर्ण योजनेतंर्गत मागासवर्गीय वस्त्यांमध्ये अभ्यासिका उभारण्याच्या कामांना अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी ०१ कोटी ३५ लक्ष रुपयांचा निधी मंजुर दिला आहे. प्रत्येक अभ्यासिकेकरीता १५ लक्ष रुपयांप्रमाणे एकूण ०९ गावातील मागासवर्गीय वस्त्यांमध्ये अभ्यासिका उभारण्यात येणार आहेत.मागील वर्षी अशाचप्रकारे पाटण मतदारसंघात ०७ गावांतील मागासवर्गीय वस्त्यांमध्ये ना.शंभूराज देसाईंच्या प्रयत्नातून अभ्यासिका उभारण्याकरीता निधी मंजुर करण्यात आला होता त्या अभ्यासिकेंची कांमे प्रगतीपथावर आहेत.
                   पाटण या डोंगराळ आणि दुर्गम विधानसभा मतदारसंघात वसलेल्या विविध गांवातील मातंग व बौध्द या मागासवर्गीय वस्त्यांमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपुर्ण योजनेतंर्गत मातंग व बौध्द समाजातील शालेय, महाविद्यालयीन युवक-युवतींना अभ्यास करणेकरीता हक्काची व स्वतंत्र्य अशी जागा उपलब्ध करुन त्याठिकाणी अभ्यासिका उभारण्याचा उपक्रम ना.शंभूराज देसाईंनी मागील वर्षी आमदार असताना राबविला त्या आर्थिक वर्षात त्यांनी पाटण विधानसभा मतदारसंघात एकूण ०७ गावांमध्ये ही योजना राबविली. त्यांच्या संकल्पनेतून ०७ गावांमधील मागासवर्गीय वस्त्यांमध्ये अभ्यासिका उभारण्याचे काम प्रगतीपथावर असून सन २०१९-२० च्या आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपुर्ण योजनेतंर्गत ०९ गांवातील मागासवर्गीय वस्त्यांमध्ये हा नाविण्यपुर्ण उपक्रम राबवून नाविण्यपुर्ण योजनेअंतर्गत अभ्यासिका बांधणेची कामे प्रस्तावित करण्यात आली होती.त्यानुसार पाटण मतदारसंघातील कोकीसरे बौध्दवस्ती - १५.०० लाख, गोकूळ तर्फ पाटण बौध्दवस्ती-१५.०० लाख,वेताळवाडी बौध्दवस्ती-१५.०० लाख,जळव बौध्दवस्ती -१५.०० लाख, कोरिवळे बौध्दवस्ती- १५.०० लाख, घोट मातंगवस्ती -१५.०० लाख, क्रांतीनगर नाडे मातंगवस्ती - १५.०० लाख,चोपदारवाडी बौध्दवस्ती -१५.०० लाख,नाटोशी मातंगवस्ती - १५.०० लाख या ०९ गांवामधील मातंग व बौध्द या मागासवर्गीय वस्त्यांमध्ये अभ्यासिका उभारण्यात येणार असून या कामांना एकूण ०१ कोटी ३५ लाख रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. या कामांना प्रशासकीय मान्यतेचे आदेश जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा नियोजन समिती, सातारा यांचेमार्फत दि.१८.०३.२०२० रोजी देण्यात आले आहेत. लवकरच या कामांच्या निविदा प्रसिध्द होवून या कामांना प्रत्यक्षात सुरुवात होईल असा विश्वास ना.शंभूराज देसाईंनी व्यक्त केला असून मातंग व बौध्द या मागासवर्गीय वस्त्यांमध्ये अभ्यासिका उभारण्याची संकल्पना नाविन्यपुर्ण असून या अभ्यासिकेंचा लाभ मातंग व बौध्दवस्त्यांमधील युवक- युवतींना होणार असल्याचे ना.शंभूराज देसाईंनी म्हंटले आहे.