Saturday 21 March 2020

अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंमुळे डोंगरपठारावरील मोगरवाडीला मिळाला कायमचा रस्ता. कधीही न होणारे रस्त्याचे काम ना.शंभूराज देसाईंमुळे प्रगतीपथावर. ग्रामस्थांच्यामध्ये आनंदाचे वातावरण.

              
       दौलतनगर दि.२१:- राज्याचे अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी मागील पंचवार्षिकमध्ये आमदार असताना पाटण विधानसभा मतदारसंघातील दुर्गम भागातील विशेषत: डोंगरपठारावरील वाडया वस्त्यांकरीता आतापर्यंत कधीही न झालेले गावपोहोच रस्ते करण्याची मोहिम राबविली होती.गत पंचवार्षिकमध्ये पाटण मतदारसंघातील ५० हून अधिक डोंगरपठावरील गांवे व वाडयावस्त्यांना जोडणारे गावपोहोच रस्ते त्यांनी केवळ आमदार असताना लाखो,करोडे रुपये शासनाकडून मंजुर करुन घेत ते पुर्ण करुन घेतले आहेत.अशाच प्रकारे तारळे विभागातील डोंगरपठारावर वसलेले मोगरवाडी हे गाव.या गावाची लोकसंख्या जेमतेमच पण स्वातंत्र्यापासून या गावाला रस्त्याची सोय नव्हती.साध्या पायवाटेवरुन या गावातील लोकांना ये-जा करावी लागत होती.मागील पंचवार्षिक मध्ये ना.शंभूराज देसाईंनी आमदार असताना कोयना भूकंप पुनर्वसन निधी समिती व ३०५४ योजनेतंर्गत या गावाला रस्ता करणेकरीता ६० लक्ष रुपयांचा निधी मंजुर केला आता या रस्त्याचे काम प्रगतीपथावर असून केवळ आणि केवळ शंभूराज देसाईंच्या मुळेच आमच्या गांवाला हा कायमचा रस्ता मिळाला अशा प्रतिक्रिया या गांवातील ग्रामस्थ, महिलांनी दिल्या असून ग्रामस्थांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
             तारळे विभागातील अनेक गांवे डोंगरपठारावर वसलेली आहेत त्यातीलच सातारा आणि पाटण तालुक्याच्या हद्दीवर असणारे मोगरवाडी हे गाव,स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाली तरी या गांवाला रस्ता ही मुलभूत सुविधा नव्हती. साध्या पायवाटेवरुन या गावातील ग्रामस्थ,महिला आपल्या मुलाबाळांना घेवून ये-जा करीत होती. विशेषत: पावसाळयात येथील ग्रामस्थ,महिला गुडघाभर चिखल तुडवत आपला प्रवास करीत होती.शालेय विद्यार्थी, नोकरी निमित्त दैनंदिन कामाकरीता प्रवास करणारे प्रवाशी यांचे रस्ता नसल्यामुळे अतोनात हाल होत होते. मोगरवाडी या कोंजवडे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गावाकरीता डोंगर कपारीतून पायवाट असून डोंगरकडा फोडून या गांवाला रस्ता करणेकरीता नामदार शंभूराज देसाईंनी मागील पंचवार्षिकमध्ये कोयना भूकंप पुनर्वसन समितीच्या माध्यमातून प्रथमत: १० लक्ष रुपयांचा निधी मंजुर करुन दिल्याने प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली. रस्त्याची लांबी जास्त असल्याने तसेच डोंगर कपारी फोडाव्या लागत असल्यामुळे या रस्त्याच्या कामांकरीता सुमारे ५० लक्षहून अधिक निधीची गरज असल्याचे ओळखून त्यांनी पुनश्च: कोयना भूकंपमधुन १५ लक्ष व जिल्हा नियोजन समितीमधून १५ लक्ष व आता पुनश्च: ३०५४ योजनेतंर्गत २० लक्ष असा एकूण ६० लक्ष रुपयांचा निधी मंजुर करुन दिला.यातील सुमारे ४० लक्ष रुपयांचे काम प्रगतीपथावर असून २० लक्ष रुपयांच्या कामांला सुरुवात होणे बाकी असून लवकरच या कामालाही सुरुवात होईल.सध्या मोगरवाडी गावाला जोडणाऱ्या रस्त्याचे काम प्रगतीपथावर असून बहूतांशी रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे गेले आहे.गावामध्ये कधीही न येणाऱ्या दोन चाकी, चार चाकी गाडया पहिल्यांदाच यायला सुरुवात होणार असून पिढ्यानपिढ्या तेथील लोकांनी खुप त्रासात काढले आहेत नामदार शंभुराज देसाईंनी या गांवाच्या रस्त्याकरीता एवढा मोठा निधी दिल्यामुळे कधीही न होणारे आमचे रस्त्याचे काम आता त्यांच्या माध्यमातून पुर्णत्वाकडे जात आहे. रस्ता या प्रथम मुलभूत सुविधेमुळे गावातील ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत असून येथील ग्रामस्थ,महिला नामदार शंभुराज देसाईंना धन्यवाद देत आहेत. रस्त्याचे संपुर्ण काम पुर्ण झाल्यानंतर आमच्या गांवात पहिल्यांदाच दुचाकी व चारचाकी वहाने येणार असून आम्हाला आता प्रतिक्षा आहे ती नामदार शंभुराज देसाईसाहेब आमच्या गांवामध्ये मोगरवाडीला केव्हा येतात त्याची अशीही प्रतिक्रिया मोगरवाडीतील ग्रामस्थ व महिलांनी दिली आहे.

2 comments:

  1. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदा म्हणजे 70 वर्षानंतर या गावाला रस्ता मिळाला तो केवळ आणि केवळ साहेबांमुळे...आदरणीय साहेबांनी मोगरवाडीकरांच्या समस्यांना योग्य न्याय मिळवून दिला आहे...साहेबांना मोगरवाडीकर सदैव स्मरणात ठेवतील...

    ReplyDelete
  2. आदरणीय साहेबांचे ऋण शब्दात मांडणे कठीण आहे... २०२०मध्ये आम्ही गाडी घरापर्यंत घेऊन गेलो हे स्वप्नवत होते आणि हे केवळ शक्य झाले साहेब तुमच्यामुळे रस्त्याच्या कामासोबत पाणी प़श्नही आपण लवकरच सोडवाल अशी आशा करतो व समस्त मोरवाडीकरांमार्फत कृतज्ञता व्यक्त करतो...

    ReplyDelete