Saturday, 21 March 2020

अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या प्रयत्नातून पाटण मतदारसंघातील नव्याने करावयाच्या ग्रामीण रस्त्यांच्या कामांना ०४ कोटी रुपयांचा निधी मंजूर. दि. १७ मार्च, २०२० रोजी शासन निर्णय पारित.


                
          दौलतनगर दि.२१:- पाटण विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण व डोंगरी भागातील गावपोहोच रस्ते नव्याने करण्याकरीता अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून सन २०१९-२० आर्थिक वर्षात राज्य शासनाकडून एकूण २५ ग्रामीण रस्त्यांच्या कामांना ०४ कोटी रुपयांचा निधी मंजुर झाला आहे. निधी मंजुरीचा शासन निर्णय राज्य शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाने दि.१७ मार्च, २०२० रोजी पारित केला असून सदर रस्त्यांची कामे पुर्ण करुन घेण्याकरीता जिल्हा परीषद,बांधकाम विभाग ही यंत्रणा देण्यात आली आहे.
          डोंगरी आणि दुर्गम अशा पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरी भागात वसलेल्या गांवाना रस्ता ही मुलभूत सुविधा मिळवून देणेकरीता पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे सुरवातीपासूनच आग्रही राहिले आहेत. गत पंचवार्षिकमध्ये डोंगरी आणि दुर्गम भागातील गांवामध्ये तसेच वाडयावस्त्यांवर रस्ता ही मुलभूत सुविधा पोहचविण्याकरीता त्यांनी राज्य शासनामार्फत मोठया प्रमाणात निधी आणून डोंगरी भागातील रस्त्यांची कामे मार्गी लावली आहेत. राज्याचे अर्थराज्यमंत्री झालेनंतर ना.शंभूराज देसाई यांनी पाटण मतदारसंघातील नव्याने करावयाच्या ग्रामीण रस्त्यांच्या कामांना राज्य शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागामार्फत आवश्यक असणारा निधी मंजुर करुन आणला आहे.सन २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभुत सुविधा पुरविणे या योजनेअंतर्गत अनुदान वितरणाबाबत ग्रामविकास व पंचायत राज विभागाने दि.१७ मार्च, २०२० रोजीचे शासन निर्णयानुसार पाटण मतदारसंघातील एकूण २५ गावांतील व वाडया वस्त्यांमधील गावपोहोच रस्ते नव्याने करण्याकरीता ०४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
            सन २०१९-२० आर्थिक वर्षात मंजूर झालेल्या विकासकामामध्ये आडदेव ते कुसरुंड रस्ता खडीकरण, डांबरीकरण करणे-१५ लाख,जानुगडेवाडी ते शितपवाडी रस्ता- २० लाख,आंबळे पद्मावती देवी मंदिर रस्ता- १५ लाख, भोकरवाडी सावरघर जोतिर्लिंग मंदिर रस्ता -१० लाख, शिबेवाडी कुंभारगाव ता.पाटण कुंभारवाडी संरक्षक भिंत बाधणे-१५ लाख,गोठणे गावपोहोच रस्ता- २० लाख,मरड ता.पाटण येथे धनगरवाडा गवळीसमाज रस्ता - २५ लाख,काळोली ता. पाटण गावपोहोच रस्ता - २० लाख,खराडेवस्ती नुने रस्ता -१५ लाख,शिंगणवाडी गावपोहोच रस्ता -१० लाख,निनाईवाडी कसणी मुख्य रस्ता - २० लाख,चाळकेवाडी येथे भैरवनाथ मंदीर ते गुढेकर आव्हाड रस्ता-१५ लाख, निगडे ते धनावडेवाडी रस्ता - २५ लाख,धडामवाडी धजगाव ते शिंदेवाडी पोहोच रस्ता-१५ लाख, सुतारवाडी मालदन मोरेवस्ती पोहोच रस्ता - १५ लाख,कवठेकरवाडी (नाणेगाव बुद्रुक) गोळेवस्ती रस्ता -१५ लाख,मोरेवाडी कुठरे येथे लोकरेवस्ती ते सकपाळवस्ती पोहोच रस्ता-१० लाख,जाईचीवाडी बोंद्री पोहोच रस्ता - १० लाख,डोणीचावाडा वांझोळे पोहोच रस्ता- २० लाख,कारळे येथे नवाळवस्ती ते पाटील आवाड उर्वरित पोहोच रस्ता -२० लाख,भूडकेवाडी वरची पोहोच रस्ता- २० लाख,काळगाव जोशेवाडी पोहोच रस्ता -१५ लाख, खुडुपलेवाडी पोहोच रस्ता - २० लाख,मान्याचीवाडी गुंजाळी गावपोहोच रस्ता -१० लाख,जरेवाडी पोहोच रस्ता - ०५ लाख या विकासकामांचा समावेश असून या २५ कामांना एकूण ०४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांचेकडून निविदा प्रक्रिया झाल्यानंतर तातडीने या रस्त्यांच्या कामांना सुरुवात करण्याच्या सुचना  ना. शंभूराज देसाईंनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.



No comments:

Post a Comment