दौलतनगर दि.२६:- महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोनो आजाराचा वाढता
पार्दुभाव लक्षात घेता जनतेला सुरु असलेली संचारबंदी व जमावबंदीमुळे बाहेर पडता
येत नसल्याने राज्यातील सर्व विभागातील जनतेला कोरोनाच्या पार्श्वभूमिवर पुढील तीन
महिन्यांचे आगाऊ धान्य देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून आपले पाटण
विधानसभा मतदारसंघातील पुरवठा विभागाने तात्काळ त्यांचेकडे सदरचे तीन महिन्यांचे
धान्य आलेनंतर त्याचे वाटप करावे अशा सक्त सुचना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी प्रांताधिकारी यांना देवून संचारबंदीच्या
काळात हुल्लडबाजी करणाऱ्यांना चोप दया मात्र काही कामानिमित्त दोनचाकीवरुन प्रवास
करणाऱ्यांना विनाकारण पोलीस विभागाने मारहाण करु नये अशा सुचना पोलीस
महासंचालकांना कालच दिल्या आहेत त्याचे पालन पोलीस विभागाने करावे असे आदेशही
गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी दिले.
कोरोना आजारासंदर्भात
शासनाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या संचारबंदी व जमावबंदीसंदर्भात आपले होमपीच
असणाऱ्या पाटण विधानसभा मतदारसंघातील परिस्थिती जाणून घेणेकरीता गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी आज तिसऱ्यांदा तहसिल कार्यालयात आढावा
बैठक घेतली.याप्रसंगी त्यांनी वरीलप्रमाणे माहिती देत
काही आवश्यक सुचना उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.बैठकीस
प्रांताधिकारी श्रीरंग तांबे,
उपविभागीय
पोलीस अधिकारी अशोक थोरात,गटविकास अधिकारी मीना
साळुंखे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.बी.पाटील,पाटण ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.चंद्रकांत यादव,सपोनि
तृप्ती सोनवणे,पाटण नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी
अभिषेक परदेशी,नायब तहसिलदार थोरात यांची उपस्थिती होती.
या बैठकीमध्ये
गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी उपस्थित
अधिकाऱ्यांना राज्यामध्ये कोरोना आजाराच्या पार्श्वभूमिवर शासनाने लागू केलेल्या
संचारबंदी व जमावबंदीमध्ये जनतेला काही अडचणी येत आहेत त्यामध्ये काही विभागामध्ये
स्थानिक खाजगी डॉक्टरांनी आपले हॉस्पीटल बंद ठेवल्याने येथील ग्रामीण भागातील
जनतेला अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून यासंदर्भात जिल्हाधिकारी सातारा यांनी
स्थानिक खाजगी डॉक्टरांनी आपली हॉस्पीटल सुरु ठेवून हॉस्पीटलला आलेल्या रुग्णांवर
उपचार करण्याचे बंधनकारक केले आहे.जे खाजगी डॉक्टर उपचार करणार
नाहीत अशांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या शासनाच्या सुचना आहेत.तशा सुचना पाटण मतदारसंघातील सर्व खाजगी हॉस्पीटलमधील
डॉक्टरांना देण्यात याव्यात.व शासनाच्या सुचनांनुसार अशा
खाजगी डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी असे त्यांनी यावेळी सांगितले.
त्याचबरोबर राज्यामध्ये संचारबंदी
व जमावबंदीमुळे जनतेला बाहेर पडता येत नसल्याने राज्यातील जनतेला पुढील तीन
महिन्यांचे आगाऊ धान्य देण्याची मागणी कालच राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचेकडे दुरध्वनीवरुन केली असता त्यांनी ही
मागणी तातडीने मान्य करीत त्यानुसार तात्काळ निर्णयही घेतला व तसे आदेशही राज्य
शासनाच्या संबधित विभागाला त्यांनी दिले आहेत.लवकरच
याची अंमलबजावणी करण्याच्या सुचना प्राप्त होतील त्यानुसार तातडीने आपले पाटण
विधानसभा मतदारसंघात मतदारसंघातील जनतेला रेशनिंग दुकानदारांच्या माध्यमातून आगाऊ
तीन महिन्यांचे धान्यवाटप करण्याची कार्यवाही पुर्ण करुन घ्यावी अशा सुचना
प्रांताधिकारी यांना दिल्या.
तर गटविकास अधिकारी यांनी त्यांचे
विभागाकडील ग्रामसेवकांमार्फत गांवातील,वाडयावस्त्यांमधील
सर्व गल्लीबोळामध्ये कोरोनाची दक्षता घेण्याच्या दृष्टीने रोगनाशक औषधांची फवारणी
करुन घेण्याच्या सुचना ग्रामसेवकांना दयाव्यात असे सांगून पाटण मतदारसंघासह सातारा
जिल्हयामध्ये संचारबंदीच्या काळात काही कामानिमित्त दोनचाकीवरुन प्रवास
करणाऱ्यांना विनाकारण पोलीस विभागाच्या बंदोबस्ताकरीता असलेल्या कर्मचाऱ्यांकडून
काठीने मारहाण करण्यात येत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. काही
कारण नसताना रस्त्यावर दुचाकीवरुन हुल्लडबाजी करणाऱ्यांना चोप दया परंतू विनाकारण कुणाला
मारहाण करु नका यासंदर्भातही मुख्यमंत्री ना.उध्दवजी
ठाकरे यांचेशी बोलणे झाले असता तशा सुचना राज्याचे पोलीस महासंचालक यांना मी कालच
दिल्या आहेत आपल्या मतदारसंघात त्या सुचनांचे पोलीस विभागाने तात्काळ पालन करावे
असे सक्त आदेश देवून पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्व जनतेने कोरोनाच्या
पार्श्वभूमिवर स्वत:ची आणि स्वत:च्या परिवाराची काळजी घेण्याचे जाहीर आवाहनही त्यांनी
बैठकीच्या माध्यमातून केले आहे.
No comments:
Post a Comment