दौलतनगर दि.24:- महाराष्ट्र
राज्यामध्ये कोरोनो विषाणूने अक्षरश: तैमान घातले असून राज्यामध्ये दिवसेंदिवस
कोरोनो बाधित व्यक्तींमध्ये वाढच होत आहे.पाटण विधानसभा मतदारसंघातील मुंबई,पुणे
या शहरात असणारे बहूतांशी नागरिक हे आपआपल्या गांवी आले आहेत.कोरोनो आजाराचा
संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेवून आपल्या मतदारसंघातील जनतेच्या आरोग्याची
काळजी व दक्षता घेणेकरीता राज्याचे गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाईंनी
मतदारसंघातील जनतेला स्व.शिवाजीराव देसाई चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने पहिल्या
टप्प्यात 10 हजार मास्कचे वाटप करण्यात आले असून ना.शंभूराज देसाईंचे पदाधिकारी व
कार्यकर्त्यांनी आज मतदारसंघातील प्रत्येक विभागातील गावोगांवी,खेडयापाडयात जावून
वयोवृध्द नागरिकांना,महिलांना,युवकांना या मास्कचे वाटप केले. कोणतेही संकट आले
तरी येणाऱ्या संकटाला न डगमगता आपल्या कर्मभूमितील जनतेला आधार देण्याची भूमिका
ना.शंभूराज देसाईंनी नेहमीच जपली आहे.मास्कचे वाटप करुन त्यांनी या उपक्रमातून
पुन्हा एकदा सामाजीक बांधिलकी, माणूसकी जपली आहे.
गत पाच,सहा
महिन्यापुर्वी पाटण मतदारसंघातील जनतेवर अतिवृष्टीचे व महापुराचे संकट आले होते.
या संकटातून मतदारसंघातील जनतेला बाहेर काढण्याकरीता,त्यांना आधार देणेकरीता ना.शंभूराज
देसाईंनी पुढाकार घेवून या महाकाय संकटातून मतदारसंघातील जनतेला दिलासा दिला होता.
अहोरात्र मतदारसंघात तळ ठोकून त्यांनी महापुरात अडकलेल्यांना स्वत:
जेसीबीतून,नावेतून,बोटीतून जावून नागरिकांना,महिलांना,लहान मुला बाळांना बाहेर
काढण्याचे काम केले होते तर ज्यांची घरे अतिवृष्टीमुळे कोसळली आहेत त्यांना या
काळात निवारा देण्याचे काम त्यांनी केले तर अनेक दानशुरांकडून अगदी धान्यांपासून,कपडे,पांघरुण
ते घरगुती वापराच्या भांडयापर्यंतची सर्व मदत मागवून घेवून ती मतदारसंघातील
जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम तळमळीने सलग दीड महिना त्यांनी केले. शेतकऱ्यांना
शेतीच्या झालेल्या नूकसानीची भरपाई मिळवून देण्याकरीता शासनदरबारी त्यांनी प्रयत्न
करुन ही मदत शेतकऱ्यांच्या पदरात टाकण्यास मोलाचा हातभार लावला.
गत महिन्याभरात
कोरोनो या आजाराचे भलेमोठे संकट सर्वांसमोर उभे राहिले आहे. देशाबरोबर महाराष्ट्र
राज्यामध्ये कोरोनो विषाणूचा फैलाव वाढू लागला असून यावर प्रतिबंधात्मक उपाय
म्हणून सर्वच स्तरावरुन मोठया प्रमाणात प्रयत्न केले जात असून कोरोनो आजाराचा
फैलाव आपल्या मतदारसंघाकडे होवू नये याकरीता गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी
पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्व शासकीय यंत्रणाही सतर्क ठेवली असून कोरोनोच्या
पार्श्वभूमिवर मतदारसंघातील जनतेने स्वत:ची आणि त्यांच्या परिवाराची काळजी
घेणेकरीता प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांचेकडून सातत्याने करण्यात येत
आहे.मतदारसंघात कोरोनो आजाराच्या संदर्भातील आढावा घेण्याबरोबर मतदारसंघातील जनता
हा माझा परीवार आहे या परिवाराची काळजी घेणे माझे कर्तव्य आहे याकरीता ते शासकीय
यंत्रणांच्या सातत्याने बैठका घेवून यावर उपाययोजना करण्याकरीता सर्व यंत्रणांना वेळोवेळी
सुचित करीत आहेत.
कोरोनोच्या
पार्श्वभूमिवर केवळ बैठका घेवून ते थांबले नाहीत तर मतदारसंघातील जनतेच्या
आरोग्याची काळजी व दक्षता घेणेकरीता त्यांनी पुढाकार घेतला असून स्व.शिवाजीराव
देसाई चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने पहिल्या टप्प्यात 10 हजार मास्क खरेदी करीत त्यांनी आपले
पदाधिकारी,कार्यकर्ते यांचेमार्फत आज मतदारसंघातील प्रत्येक विभागातील गावोगांवी,
खेडयापाडयात जावून मतदारसंघातील
जनतेला 10
हजार मास्कचे वाटप केले असून वाढीव मास्कचीही मागणी स्व.शिवाजीराव देसाई चॅरीटेबल
ट्रस्टच्या वतीने करण्यात आली असून दुसऱ्या टप्प्यात मास्कच्या उपलब्तेनुसार याची
खरेदी करुन वाढीवच्या मास्कचे वाटप मतदारसंघातील प्रत्येक विभागात करण्यात येणार
आहे. आज पाटण मतदारसंघातील जनतेला कोरोनोच्या पार्श्वभूमिवर ना.शंभूराज देसाईंकडून
वाटप करण्यात आलेल्या मास्कच्या संदर्भात पाटण मतदारसंघातील जनतेने ना.शंभूराज
देसाईंना धन्यवाद दिले असून संकटे येतात आणि जातात त्यात टिकते ती माणुसकी,सामाजीक
बांधीलकी हाच संदेश ना.शंभूराज देसाईंनी या उपक्रमातून दिला असून स्वत:ची आणि
स्वत:च्या परीवाराची काळजी घ्या असे आवाहनही ना.शंभूराज देसाईंनी पाटण मतदारसंघासह
महाराष्ट्र राज्यातील जनतेला केले आहे.
No comments:
Post a Comment