दौलतनगर दि.१९:- राज्याचे गृह व अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज
देसाईंनी सन २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात पाटण जि.सातारा येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुपातंर
करुन या रुग्णालयामध्ये १०० खाटांचे सुसज्ज असे रुग्णालय उभारण्यात येणार आहे अशी
घोषणा विधानपरिषदेमध्ये दि.०६ मार्च रोजी सन २०२०-२१ चा
अर्थसंकल्प मांडताना केली होती.पाटण ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुपातंर करण्याच्या हालचाली
ना.शंभूराज देसाईंनी पुढाकार घेवून गतिमान केल्या असून १५
दिवसांचा कालावधी पुर्ण होण्याच्या अगोदरच ना.शंभूराज देसाईंनी १०० खाटांचे सुसज्ज असे रुग्णालय उभारण्याकरीता पाटण
ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात कुठे जागा उपलब्ध आहे व कशाप्रकारे हे उपजिल्हा
रुग्णालय उभे करता येईल याकरीता ग्रामीण रुग्णालयाच्या परिसराची अधिकाऱ्यांसमवेत
बुधवारी दि.१८ रोजी प्रत्यक्ष पहाणी केली.
पाटण ग्रामीण
रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुपांतर करुन या रुग्णालयामध्ये १०० खाटांचे
सुसज्ज असे उपजिल्हा रुग्णालय व्हावे याकरीता ना.शंभूराज देसाईंचे मागील
पंचवार्षिकमध्ये आमदार असताना राज्य शासनाकडे सातत्याने प्रयत्न सुरु होते. दोन
महिन्यापुर्वी त्यांचेवर राज्याच्या अर्थखात्याचे राज्यमंत्री म्हणून जबाबदारी
आलेनंतर या विषयीच्या हालचाली त्यांनी गतीमान करुन राज्याचे अर्थराज्यमंत्री
म्हणून विधानपरिषदेमध्ये दि.०६ मार्च रोजी सन २०२०-२१ चा
अर्थसंकल्प मांडताना त्यांनी पाटण
जि.सातारा येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुपातंर करुन या
रुग्णालयामध्ये १०० खाटांचे सुसज्ज असे रुग्णालय उभारण्यात येणार आहे अशी घोषणा
विधानपरीषद सभागृहात केली.
पाटण हा मतदारसंघ डोंगरी व दुर्गम असुन
मतदारसंघातील जनतेला आरोग्य सुविधा घेणेकरीता कराड किंवा सातारा येथील उपजिल्हा व
जिल्हा रुग्णालयाकडे जावे लागत असल्याने ही आरोग्य सुविधा पाटण या तालुक्याच्या
ठिकाणी असणाऱ्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपजिल्हा रुग्णालय करुन मतदारसंघातील
जनतेला मिळवून दयावी याकरीता त्यांची सातत्याची तळमळ होती.त्यांच्या प्रयत्नातून
पाटण ग्रामीण रुग्णालयाचे रुपातंर आता उपजिल्हा रुग्णालयामध्ये झाले असून हे १००
खाटांचे उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात कसे व कुठे उभे करावे
याकरीता त्यांनी घोषणेनंतरचा १५ दिवसांचा कालावधीही न दवडता तात्काळ या परिसराची
अधिकाऱ्यांसमवेत पहाणी केली व ग्रामीण रुग्णालयाकरीता अस्तित्वात असणाऱ्या जागेंची
तात्काळ मोजणी करुन या १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचा आराखडा पाटण
ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक व सार्वजनीक बांधकाम विभागाचे उपअभियंता यांनी
तात्काळ तयार करावा अशा सुचना त्यांनी यावेळी दिल्या.१०० खाटांच्या उपजिल्हा
रुग्णालयाची उभारणी झालेनंतर याठिकाणी तज्ञ वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या
नेमणूका करणेसंदर्भातही माझा शासनाकडे पाठपुरावा सुरु असून पहिल्या टप्प्प्यामध्ये
हे रुग्णालय कसे व कुठे उभे करावयाचे याचे नियोजन करुया असेही ना.शंभूराज देसाईंनी
या पहाणी दौऱ्यात अधिकाऱ्यांना सांगितले. यावेळी ना.शंभूराज देसाईंसमवेत पाटण प्रांताधिकारी
श्रीरंग तांबे,तहसिलदार समीर यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात,गटविकास
अधिकारी श्रीमती मीना साळुंखे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.पाटील,पाटण ग्रामीण
रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.चंद्रकांत यादव, सार्वजनीक बांधकाम विभागाचे उपअभियंता
अजित पाटील,सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती तृप्ती सोनवणे यांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment