दौलतनगर दि.१९:-पाटण विधानसभा मतदारसंघात अनेक गांवामध्ये असणाऱ्या मातंग व बौध्द वस्त्यांमध्ये येथील मातंग व बौध्द
या मागासवर्गीय समाजातील शालेय,महाविद्यालयीन युवक-
युवतींना अभ्यास करणेकरीता हक्काची जागा उपलब्ध व्हावी याकरीता अर्थराज्यमंत्री
ना.शंभूराज देसाईंच्या संकल्पनेतून जिल्हा नियोजन समितीच्या
नाविन्यपुर्ण योजनेतंर्गत मागासवर्गीय
वस्त्यांमध्ये अभ्यासिका उभारण्याच्या कामांना अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी ०१ कोटी ३५ लक्ष रुपयांचा निधी मंजुर दिला आहे. प्रत्येक अभ्यासिकेकरीता १५ लक्ष
रुपयांप्रमाणे एकूण ०९ गावातील मागासवर्गीय वस्त्यांमध्ये अभ्यासिका उभारण्यात येणार आहेत.मागील वर्षी
अशाचप्रकारे पाटण मतदारसंघात ०७ गावांतील मागासवर्गीय वस्त्यांमध्ये ना.शंभूराज देसाईंच्या प्रयत्नातून अभ्यासिका
उभारण्याकरीता निधी मंजुर करण्यात आला होता त्या अभ्यासिकेंची कांमे प्रगतीपथावर
आहेत.
पाटण या डोंगराळ
आणि दुर्गम विधानसभा मतदारसंघात वसलेल्या विविध गांवातील मातंग व बौध्द या मागासवर्गीय वस्त्यांमध्ये जिल्हा
नियोजन समितीच्या नाविन्यपुर्ण योजनेतंर्गत मातंग व बौध्द समाजातील शालेय, महाविद्यालयीन युवक-युवतींना अभ्यास करणेकरीता
हक्काची व स्वतंत्र्य अशी जागा उपलब्ध करुन त्याठिकाणी अभ्यासिका उभारण्याचा
उपक्रम ना.शंभूराज देसाईंनी मागील वर्षी आमदार असताना राबविला त्या आर्थिक वर्षात
त्यांनी पाटण विधानसभा मतदारसंघात एकूण ०७ गावांमध्ये ही योजना राबविली. त्यांच्या
संकल्पनेतून ०७ गावांमधील मागासवर्गीय वस्त्यांमध्ये अभ्यासिका उभारण्याचे काम प्रगतीपथावर असून सन २०१९-२०
च्या आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपुर्ण
योजनेतंर्गत ०९
गांवातील मागासवर्गीय वस्त्यांमध्ये हा नाविण्यपुर्ण उपक्रम राबवून नाविण्यपुर्ण
योजनेअंतर्गत अभ्यासिका बांधणेची कामे प्रस्तावित करण्यात आली होती.त्यानुसार पाटण मतदारसंघातील कोकीसरे
बौध्दवस्ती -
१५.०० लाख, गोकूळ
तर्फ पाटण बौध्दवस्ती-१५.०० लाख,वेताळवाडी बौध्दवस्ती-१५.०० लाख,जळव बौध्दवस्ती -१५.०० लाख,
कोरिवळे बौध्दवस्ती- १५.०० लाख,
घोट मातंगवस्ती -१५.०० लाख, क्रांतीनगर नाडे मातंगवस्ती - १५.०० लाख,चोपदारवाडी बौध्दवस्ती -१५.०० लाख,नाटोशी मातंगवस्ती - १५.०० लाख या ०९ गांवामधील मातंग व बौध्द या मागासवर्गीय वस्त्यांमध्ये
अभ्यासिका उभारण्यात येणार असून या कामांना एकूण ०१ कोटी ३५ लाख रुपयांचा निधी मंजुर
करण्यात आला आहे. या कामांना प्रशासकीय मान्यतेचे आदेश जिल्हाधिकारी तथा सदस्य
सचिव जिल्हा नियोजन समिती, सातारा यांचेमार्फत दि.१८.०३.२०२० रोजी देण्यात आले
आहेत. लवकरच या
कामांच्या निविदा प्रसिध्द होवून या कामांना प्रत्यक्षात सुरुवात होईल
असा विश्वास ना.शंभूराज देसाईंनी व्यक्त
केला असून मातंग
व बौध्द या मागासवर्गीय वस्त्यांमध्ये अभ्यासिका उभारण्याची संकल्पना नाविन्यपुर्ण
असून या अभ्यासिकेंचा लाभ मातंग व बौध्दवस्त्यांमधील युवक- युवतींना होणार
असल्याचे ना.शंभूराज देसाईंनी म्हंटले आहे.
No comments:
Post a Comment