Saturday, 18 September 2021

राज्य सरकार सहकारी साखर उद्योगाच्या पाठीशी ठाम-ना.शंभूराज देसाईं लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याची ऑनलाईन ५१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न.

                                                        


               

दौलतनगर दि.18 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- शेतकऱ्यांच्या उसाला एफ.आर.पी प्रमाणे  योग्य भाव मिळावा म्हणून केंद्र सरकार धोरण ठरविते मात्र त्याचप्रमाणे राज्यातील सहकारी  साखर कारखान्यात तयार होणाऱ्या साखरेला ही योग्य भाव मिळाला पाहिजे याबाबत केंद्रसरकार का निर्णय घेत नाही ?असा सवाल उपस्थित करून देशातील अडचणीत असलेल्या साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारनेच मदत करणे गरजेचे आहे,असे मत राज्याचे गृह व अर्थ राज्यमंत्री ना.शंभुराज देसाई यांनी व्यक्त केले.दरम्यान राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार राज्यातील सहकारी साखर उद्योगाच्या पाठीशी ठाम पणे असल्याचे ही ना.शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.

                लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याची 51 वी वार्षिक सर्वसाधारण सभा गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली “महाराष्ट्र दौलत”लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार दूरदृष्यप्रणालीव्दारे ऑनलाईन पार पडली. यावेळी त्यांच्यासमवेत मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, युवानेते यशराज देसाई, जयराज देसाई, चेअरमन अशोकराव पाटील, व्हाईस चेअरमन राजाराम पाटील, माजी चेअरमन डॉ. दिलीपराव चव्हाण,आनंदराव चव्हाण,सोमनाथ खामकर, गजानन जाधव,शशिकांत निकम,संपतराव सत्रे,पांडूरंग नलवडे,बाळासो शेजवळ,राजेंद्र गुरव,संचालिका सौ. विश्रांती  जंबुरे, दिपाली पाटील,बशीर खोंदू,भरत साळूंखे,विजय पवार,संतोष गिरी, सुरेश पानस्कर, प्रकाशराव जाधव,यांचेसह संचालक मंडळाची प्रमुख उपस्थिती होती.तसेच शिवदौलत बँकेच्या तारळे,पाटण व ढेबेवाडी या शाखांमधून सभासद शेतकरी ऑनलाईन पध्दतीने या सभेस उपस्थिती राहिले.

               यावेळी बोलताना ना.शंभूराज देसाई म्हणाले,सध्या सर्वच क्षेत्रात स्पर्धा असल्याने सहकारी साखर क्षेत्रात ही मोठी स्पर्धा आहे.या स्पर्धेत यशस्वीपणे टिकण्यासाठी जिल्ह्यातील च नव्हे राज्यातील इतर मोठ्या कारखान्याच्या तुलनेत देसाई कारखाना लहान असताना ही इतर कारखान्याबरोबर एफ.आर.पी. प्रमाणे देसाई कारखान्याने शेतकऱ्यांना दर दिला आहे. याचा आपणाला अभिमान आहे.कोणताही कारखाना कधीही मुद्दाम एफ.आर.पी.चे हप्ते करीत नाही मात्र केंद्र सरकारचे साखर धोरणच राज्यातील सहकारी साखर कारखानदारी साठी जबाबदार आहे.परिणामी राज्यातील साखर कारखानदारी अडचणीत आली आहे.त्यातच राज्याच्या वीज वितरण विभाग सध्या विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण असल्याने ज्या कारखान्यांनी वीज तयार केली आहे ती वीज कारखान्याकडे तशीच आहे.परिणामी वीज विक्री अभावी कारखान्याचे वीज उत्पन्न करणारे प्लांट  सध्या बंद आहेत .त्यामुळे राज्यातील कारखान्यांचे को जनरेशन प्लांट मध्ये कोट्यवधी रुपये अडकून पडले आहेत मात्र सध्या इथेनॉल निर्मितीसाठी कारखान्यांना वाव आहे कारण पेट्रोल मध्ये यापूर्वी केवळ ५टक्के इथेनॉल वापरण्यासाठी परवानगी होती ती आता २० टक्के वापरण्यावर केंद्र सरकार विचार करीत असल्याचे ही त्यांनी स्पष्ट करत ना. देसाई पुढे म्हणाले,राज्यातील आघाडी सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली भक्कम असून राज्यातील सहकारी साखर कारखानदारी यशवीपणे टिकविण्यासाठी हे सरकार निश्चितपणे प्रयत्न करीत असून सहकारी साखर उद्योगाच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यावर ही सरकारचे लक्ष असून लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या दूरदृष्टी तुन निर्माण झालेल्या आणि स्व. शिवाजीराव देसाई यांच्या आदर्श विचारावर चालणाऱ्या या कारखान्याला राज्य सरकार सर्वोतोपरी सहकार्य करण्यासाठी कटिबद्ध आहे अशी ग्वाही देवुन मंत्री देसाई म्हणाले  प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही आपल्या कारखान्याची चांगली वाटचाल सुरु आहे. 1250 मे. टन क्षमतेचा कारखाना संपूर्ण एफ.आर.पी.प्रमाणे शेतकऱ्या ऊसाचा दर देतो हे एकमेव उदाहरण आहे. 1250 मे. टन क्षमतेचे अनेक कारखाने डबघाईला आले,लिलावात निघाले. खर्चामध्ये काटकसर करत जादा उत्पादन करुन एफ.आर.पी.देण्याचा प्रयत्न केला.लोकनेते बाळासाहेब देसाई व स्व.शिवाजीराव देसाई यांचे योगदानतून साकारलेल्या या सहकारी संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी सर्व ऊस उत्पादक सभासद व शेतकरी यांनी आपला पिकविलेला संपूर्ण ऊस या कारखान्यास गळीतास घालून सहकार्य करावे तसेच ऊस उत्पादकांनी आपलेपणांन कारखान्याकडे पाहणं गरजेचे आहे,असेही यावेळी बोलताना म्हणाले.

चौकट :-पाटण मतदारसंघात पाणंद रस्त्यांसाठी पायलट प्रोजेक्ट राबविणार

         पाटण तालुक्यात शेत शिवारामध्ये अनेक पाणंद रस्ते अस्तित्वात असून या रस्त्यावरुन ऊस वाहतूक करताना सभासद शेतकरी यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून तालुक्यात असणारे पाणंद रस्त्यांची कामे होण्यासाठी सभासदांकडून सातत्याने मागणी होत आहे. दरम्यान राज्यातील पांणंद रस्त्यांना मोठा निधी देऊन या रस्त्यांचा विकास करण्यासंदर्भात राज्य सरकार विचाराधीन आहे. लवकरच या संदर्भात राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे,असे झाल्यास मोठया प्रमाणांत पाणंद रस्ते करण्याकरीता सातारा जिल्ह्यातील पाटण मतदार संघात पहिला पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविला जाईल,अशी ग्वाही मंत्री शंभुराज देसाई यांनी यावेळी दिली.

चौकट; तर त्यांचे सभासदत्व रद्द होणार..!

        जे ऊस उत्पादक  सभासद शेतकरी कारखान्याची सवलतीची साखर घेऊन,कारखान्याचे इतर सर्व लाभ घेऊन ही आपल्या क्षेत्रात पिकलेला शंभर टक्के ऊस आपले देसाई कारखान्याला घालत नसतील अथवा त्यांच्या शंभर टक्के पिकलेल्या ऊसापैकी थोडा जरी ऊस बाहेर गेला तरी त्या सभासदाला संचालक मंडळ खुलासा मागतील आणि हा खुलासा समाधानकारक नसेल केवळ साखरेचे कार्ड बंद न करता कारखान्याचे संचालक मंडळाला त्या सभासदाचे सभासदत्व रद्द करणेचा अधिकार राहील असा महत्त्व पूर्ण ठराव देसाई कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमुखाने संमत करण्यात आला.

चौकट. नाडे येथे बहुउद्देशिय कृषी संकुल तर आणि मरळी येथे शेतकरी प्रशिक्षण केंद्र यांचा समावेश

          लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व राज्याचे गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री वाशिम जिल्हा यांच्या संकल्पनेतून शेतमालाची विक्री व्यवस्था, प्रतवारी व पॅकिंग सुविधाआणि पुर्वशितकरण सुविधा इत्यादीसाठी वाशिम येथे साकार झालेल्या स्व. बाळासाहेब ठाकरे बहुउद्देशिय कृषी संकुल वाशिमचे धर्तीवर राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये बहुउद्देशिय कृषीसंकुलाची उभारणी करणेचे धोरण शासनाने निश्चित केले आहे. मंत्री देसाई यांच्या या दूरदृष्टीकोनातून पाटण तालुक्यातील नाडे येथे बहुउद्देशिय कृषी संकुल आणि मरळी येथे शेतकरी प्रशिक्षण केंद्र यांचा समावेश केल्याबद्दल मंत्री देसाई यांच्या अभिनंदनाचा ठराव जिल्हा परिषद सदस्य विजय पवार यांनी मांडला.

     दरम्यान या सभेत विषय पत्रिकेवरील आणि ऐनवेळेच्या सर्व विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली यामध्ये, कारखाना क्षेत्रात पेट्रोल पंप लवकरच उभा राहणार,ऊस तोडेल त्याला ऊस तोड मजुरी दिली जाणार,ऊस बाहेर घालणाऱ्या सभासदांबाबत कठोर निर्णय आदींचा समावेश असून कारखान्याची ५१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

Thursday, 16 September 2021

पाटण,संगमनगर धक्का ते घाटमाथा रस्त्याचे काम तातडीने सुरु करा. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईं यांच्या राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना सुचना.

 

दौलतनगर दि.16(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- गत तीन महिन्यामध्ये सातत्याने पडलेल्या पावसामुळे कराड ते चिपळूण राष्ट्रीय महामार्गावरील पाटण,संगमनगर धक्का ते घाटमाथ्यापर्यंतच्या रस्त्याची दुरावस्था झाली असून या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या वाहनधारकांची व प्रवाशांची गैरसोय होत असल्याने कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्गावरील उर्वरीत राहिलेल्या पाटण मतदारसंघातील  संगमनगर धक्का ते घाटमाथा पर्यंतच्या एकूण 13.100 किमी रस्त्याचे डांबरीकरणाचे  16.85 कोटी तसेच पाटण ते संगमनगर या 14 कि.मी.रस्त्याचे दुरुस्तीचे 02 कोटी रुपयांचा निधी मंजूर असलेली दोन्ही कामे तातडीने सुरु करण्याच्या सुचना गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी राष्ट्रीय महार्गाच्या अधिकाऱ्यांना बैठकीमध्ये केल्या.

         कराड ते चिपळूण राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती व प्रलंबित कामाच्या संदर्भात आयोजित केलेल्या बैठकीप्रसंगी ते बोलत होते. या बैठकीस राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य अभियंता संतोष शेलार हे नांदेड येथून तर अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, अधिक्षक अभियंता आवटी, कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडे,पाटणचे उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे व इतर संबंधित अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय,सातारा येथून तर एल.अँड टी. कंपनीचे वरिष्ठ अधिकारी परेश हे मुंबई येथून दूरदृश्यप्रणालीव्दारे बैठकीस उपस्थित होते.

                 प्रसिध्दीपत्रकात म्हंटले आहे की, कराड चिपळूण रस्त्यास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देवून या रस्त्याच्या कामांस आवश्यक असणारा निधी मंजुर करावा अशी मागणी सर्वप्रथम केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री ना.नितीन गडकरी यांचेकडे सातत्याने मागणी केल्यानंतर या रस्त्यास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मागील पंचवार्षिकमध्ये मिळाला. यामध्ये कराड ते संगमनगर धक्का रस्त्याचे काँक्रीटीकरण आणि संगमनगर धक्का ते घाटमाथा पर्यंतच्या रस्त्याचे पक्के डांबरीकरण करणेच्या कामांचा समावेश होता.कराड ते संगमनगर धक्का रस्त्याचे काँक्रीटीकरण कामांकरीता आवश्यक असणारा निधी उपलब्ध झाल्यानंतर कराड ते पाटणपर्यंत रस्त्याचे काम पुर्णत्वाकडे गेले असून काही ठिकाणी काम प्रगतीपथावर आहे. दरम्यान संगमनगर धक्का ते घाटमाथा पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करणेच्या कामाकरीता आवश्यक असणारा निधी मंजुर होण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री ना.नितीन गडकरी यांनी 13.100 किमी लांबीच्या पक्कया डांबरीकरणाच्या या रस्त्याकरीता 16.85 कोटी रुपयांचा निधी मंजूरही केला.पाटण तालुक्यातमध्ये गत तीन महिन्यापासून सुरु असलेल्या पाऊस विशेषत: माहे जुलै महिन्यामध्ये मोठया प्रमाणांत झालेल्या अतिवृष्टीमुळे पाटण,संगमनगर धक्का ते घाटमाथा पर्यंतच्या रस्त्याची मोठया प्रमाणांत दुरावस्था होऊन रस्त्यामध्ये मोठ-मोठे खड्डे पडले असल्याने या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या वाहनधारक तसेच प्रवाशांची दळण-वळणाची मोठी गैरसोय होत असल्याने लोकांच्यामध्ये रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे मंजूर असलेली दोन्ही कामे लवकर सुरुवात करण्याकरीता मंत्रालयीन स्तरावर यासंदर्भात राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली.त्यानंतर संगमनगर धक्का ते घाटमाथा या रस्त्याचे डांबरीकरणाचे कामाची निविदा राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी प्रसिध्द करुन या कामासाठी ठेकेदार निश्चित करुन दि.19 जुलै 2021 रोजी कार्यारंभ आदेशही देण्यात आला आहे. तसेच पाटण ते संगमनगर या 14 कि.मी. रस्त्याच्या 02 कोटी 02 लाख रुपयांच्या दुरुस्तीच्या कामाचाही कार्यारंभ आदेशही देण्यात आला आहे. त्यामुळे पाटण ते संगमनगर रस्ता दुरुस्तीचे व संगमनगर धक्का ते घाटमाथा या रस्त्याचे डांबरीकरणाचे कामांस दहा दिवसांत तातडीने सुरुवात करावी अशा सुचना मुख्य अभियंता यांना केल्यानंतर मुख्य अभियंता यांनीही दहा दिवसाचे आत संगमनगर धक्का ते घाटमाथा या रस्त्याचे काम सुरु करणार असल्याचे सांगीतले. तसेच पाटण ते संगमनगर या रस्त्याचे मजबुतीकरणाचे 13 किमीचे काम एल.एन्ङटी. कंपनी करणार नसेल तर तात्काळ नव्याने मंजूरी घेऊन दुसऱ्या कंपनीकडून हे काम लवकरात लवकर पुर्ण घेण्याच्याही सूचना यावेळी बैठकीत दिल्या असल्याने लवकरच या कामांस सुरवात होऊन या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या वाहनधारकांची व प्रवाशांची होणारी गैरसोय दूर होण्यास मदत होईल असे त्यांनी शेवटी म्हंटले आहे. 

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना व शिवदौलत बँकेची ऑनलाईन पध्दतीने शनिवार दि. 18 मार्च रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा.

 

दौलतनगर दि.16(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):-:दौलतनगर,ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याची 51 वी वार्षिक सर्वसाधारण सभा “महाराष्ट्र दौलत” लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक दौलतनगर,ता.पाटण या ठिकाणी शनिवार दि18 सप्टेंबर, 2021 रोजी सकाळी 11.00 वा. व शिवदौलत सहकारी बँकेची 20 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मल्हारपेठ, ता.पाटण या ठिकाणी दुपारी 01.00 वा.लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग समुहाचे मार्गदर्शक व महाराष्ट्र राज्याचे गृह(ग्रामीण)  राज्यमंत्री  ना. शंभूराज देसाई यांचे प्रमुख उपस्थितीत ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. या वार्षिक सर्वसाधारण सभेकरीता मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई (दादा),युवा नेते मा. यशराज देसाई (दादा) व सर्व संचालक मंडळ हे उपस्थित राहणार आहेत.

             कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे शासनाच्या सर्व नियमांचे पालन करुन लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना व शिवदौलत सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा हया ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार असून या दोन्ही वार्षिक सर्वसाधारण सभांच्या ठिकाणी गर्दी होऊ नये याकरीता शिवदौलत बँकेच्या तारळे,पाटण व ढेबेवाडी या शाखांमध्ये प्रोजेक्टरच्या माध्यमातून संबंधित वार्षिक सभांचे वेळेमध्ये कारखान्याचे व बँकेच्या सभासदांना ऑनलाईन पध्दतीने सहभागी होण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन दिली असून या ठिकाणी कारखान्याचे व बँकेच्या सभासदांनी उपस्थित रहावे.तसेच लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे सर्वसाधारण सभेकरीता ज्या सभासदांना ऑनलाईन पध्दतीने सभेत सहभागी व्हायचे असेल त्यांनी कारखान्याचे www.maralisugar.com या वेबसाईटवरती प्रसिध्द करण्यात आलेल्या लिंकव्दारे या सभेत ऑनलाईन उपस्थित राहता येणार आहेत. तर शिवदौलत सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेकरीता उपस्थित राहण्यासाठी सभासदांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर मेसेज किंवा ईमेल आय.डी.व्दारे लॉगईन व पासवर्ड पाठविणत येणार असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक सुहास देसाई व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव जाधव यांनी प्रसिध्दी पत्रकांत दिली आहे.




Tuesday, 14 September 2021

राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी साताऱ्यात नगरपालिकेने उभारलेल्या पर्यावरणपूरक कृत्रिम तळयात केले श्री गणेश विसर्जन.


दौलतनगर दि.13(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):-आज गौरी विसर्जनादिवशी गृह व वित्तराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे सातारा नगरपालिकेने उभारलेल्या कृत्रिम तळयात पर्यावरणपुरक असे पारंपारिक श्री.गणेशमुर्तीचे विसर्जन करुन राज्यातील जनतेनेही यंदा व यापुढेही कृत्रिम तळयात पर्यावरणपुरक श्री. गणेशमुर्तींचे विर्सजन करावे,असा संदेश दिला आहे.यावेळी युवा नेते यशराज देसाई(दादा) हे उपस्थित होते.

              सातारा येथे नगरपालिकेने उभारलेल्या कृत्रिम तळयात पर्यावरणपुरक असे पारंपारिक श्री.गणेशमुर्तीचे विसर्जन करताना राज्याचे गृह व वित्तराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई म्हणाले, आमचे घरातल्या गणरायाचं प्रथेप्रमाणे गौरी ज्या दिवशी जातात त्या दिवशी विसर्जन होत असते त्याप्रमाणे घरगुती पध्दतीने मी माझ्या घरातल्या गणरायाचे आज माझे परीवारासह उपस्थित राहून याठिकाणी सातारा नगरपालिकेने तयार केलेल्या गणेश विसर्जनाच्या कृत्रीम हौदामध्ये श्री.गणेशमुर्तीचे विसर्जन केलेले आहे. गणेश चतुर्थी पासून घरातले सर्व धार्मिक सोपस्कार आम्ही सर्व परिवाराने मिळून एकत्र पार पाडले. गत वर्षापासून कोरेानाचा संसर्ग असल्यामुळे खुप मोठे कार्यक्रम कुणालाच करता आले नाहीत.परंतु तरी सुध्दा विधी मार्ग शास्त्रपरंपरेप्रमाणे आपण सगळयांनी आपआपल्या घरी हा गणेशोत्सव साजरा केला आहे. मी सातारा नगरपालिकेने श्री.गणेशमुर्ती विर्सजनाकरीता जे कृत्रिम तळयाच नियोजन केले आहे त्याठिकाणी माझे घरचे श्री.गणेशमुर्तीचे पर्यावरणपुरक असे विर्सजन केले आहे. सातारा नगरपालिकेने अतिशय चांगल नियोजन केलेले आहे. पर्यावरणाच रक्षण करण्यासाठी अशा पध्दतीने तयार केलेल्या कृत्रिम तळयामध्ये श्री.गणेशमुर्तीचे विसर्जन करणं योग्य आहे. श्री.गणरायाला आज सातव्या दिवशी मानानं अनेकांनी निरोप दिलेला आहे.अकराव्या दिवशीही पर्यावरण पुरक असेच श्री.गणेशमुर्तीचे विसर्जन राज्यातील जनतेने करावे, असे आवाहन करुन गणपती बाप्पा राज्यावर आलेलं हे कोरोनाचं संकट लवकरात लवकर दूर करा आणि पुढच्या वर्षी लवकर या यावर्षी कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे श्री.गणेशोत्सवानिमित्त जे उत्सव करणे बाकी राहीले आहेत तो उत्सव याच्यापेक्षा दुप्पट आनंदात पुढच्या वर्षी साजरा करण्याची संधी श्री.गणरायाने आम्हा सर्वांना दयावी,अशी मी गणराया चरणी प्रार्थना केली असल्याचे गृह व वित्तराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी शेवठी बोलताना सांगितले.


Monday, 13 September 2021

अतिवृष्टीमध्ये बाधित झालेल्या कुटुंबांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी शासन सकारात्मक-ना.शंभूराज देसाई. गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी केली कोयनानगर येथील तात्पुरत्या निवारा शेडची पाहणी.

 

दौलतनगर दि.13(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):-माहे जुलै महिन्यामध्ये दोन ते तीन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरी व दुर्गम भागातील अनेक गावांमध्ये मोठया प्रमाणांत भूस्खलन होऊन मोठी हानी झाली.विशेषत: कोयना विभागातील अनेक गावांचे न भरुन येणारे  असे अतोनात नुकसान झाले. अतिवृष्टीच्या कालावधीत भूस्खलन होऊन दरडी कोसळण्याचा धोका असणाऱ्या गावांचे तात्पुरते स्थलांतर केले होते. आपत्तीग्रस्त गावातील कुटुंबांच्या निवाऱ्यासाठी ज्या पध्दतीने सध्या कोयनानगर येथे तात्पुरती निवारा शेडच्या उभारण्याचे काम तातडीने सुरु केले त्याचपध्दतीने भूस्खलामध्ये बाधित झालेल्या गावांतील कुटुंबियांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यासाठी शासन सकारात्मक असल्याची माहिती गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी  दिली.

               कोयनानगर,ता.पाटण येथे अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांचे तात्पुरत्या निवारासाठी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या निवारा शेडची पाहणी केली.त्यानंतर मिरगाव येथे भूस्खलनामध्ये पुर्णत: आपत्तीग्रस्त झालेल्या बाकाडे कुटुंबियांना प्रातिनिध स्वरुपात देण्यात आलेल्या तात्पुरते  निवासस्थानी बसवलेल्या गणपतीचे दर्शन घेऊन बाकाडे कुटुंबियांशी चर्चा केली.यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार,शिवदौलत बँकेचे संचालक अशोकराव पाटील,शशिकांत जाधव,शैलेंद्र शेलार,भरत साळुंखे,अभिजित पाटील, तहसिलदार योगेश टोमपे,विजय बाकाडे,धोंडीराम बाकाडे,संजय बाकाडे,उत्तम बाकाडे  यांची  उपस्थिती  होती.

              यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की,गेल्या दिड महिन्यापुर्वी मोठया प्रमाणांत झालेल्या अतिवृष्टीमुळे भूस्खलन होऊन पुर्ण घर जमिनीदोस्त होऊन अनेक कुटुंबे बाधित झाली. अशा बाधित झालेल्या मिरगाव,ढोकावळे, हुंबरळी या गावांतील लोकांची तात्पुरती निवाऱ्याची सोय करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार आणि नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी दिलेले होते.अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी ना. एकनाथ शिंदे यांचे समवेत मी स्वत: केली.त्यावेळी कोयना वसाहतीतील रिकाम्या निवासी इमारतींची तातडीने दुरुस्ती करुन त्यातील आज प्रातनिधिक स्वरुपात ठराविक घरांचा तात्पुरत्या निवाऱ्यासाठी बाकडे  कुटुंबियांना  निवासासाठी देण्यात आला. येणाऱ्या काही दिवसांमध्ये उर्वरित सर्व बाधित कुटुंबियांना तात्पुरती निवारा शेड उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.पहिल्या टप्प्यामध्ये ज्यांची पुर्ण घरे जमिनीदोस्त झाली आहेत त्यांच्या तात्पुरत्या निवाऱ्याची सोय या ठिकाणी केली जाईल असे सांगत ते पुढे म्हणाले की अतिवृष्टीमुळे बाधित कुटुंबांचे कायमस्वरुपी  पुनर्वसन करण्यासंदर्भात शासनस्तरावर दोन बैठकाही झाल्या आहेत. तसेच सिडको आणि एम.एस.आर.डी.सी.च्या माध्यमातून घरांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचे नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी मान्य केले आहे. कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यासाठी लागणाऱ्या जागा निश्चित करण्याचे काम महसूल विभागाकडून युध्द पातळीवर सुरु आहे.पुनर्वसनासाठी खाजगी जागा खरेदी करुन त्या ठिकाणी त्यांचे  पुनर्वसन करण्याची तयारी शासनाने ठेवली आहे.जागा घेण्यासाठी तसेच पुनर्वसित ठिकाणी नागरी सुविधा देण्याकरीता निधी देण्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी मान्य केले असून पहिल्या टप्प्यात घरे जमीनदोस्त झालेल्यांना जलदगतीने तात्पुरता निवारा देण्याचे काम झाले आहे त्याच धर्तीवर कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे त्यांनी शेवटी सांगीतले.

चौकट: बाकाडे कुटुंबियांचे तात्पुरत्या निवारा शेडमधील गणपतीचे ना.देसाई यांनी घेतले दर्शन.

    मिरगाव येथे भूस्खलनामध्ये पुर्णत: बाधित झालेल्या बाकाडे कुटुंबियांना प्रातिनिध स्वरुपात देण्यात आलेल्या तात्पुरते  निवासस्थानी गणपतीची  स्थापना बाकाडे कुटुंबियांनी केली. दिड महिन्यापुर्वी झालेल्या अतिवृष्टीमध्ये घरातील सदस्यांवर काळाने घाला घातला.यावेळी ना.देसाई यांनी बाकाडे कुटुंबियांना धीर देण्याचे काम केले होते.आज तात्पुरत्या निवासस्थानी स्थापना केलेल्या गणपतीची  ना. देसाई यांनी पूजा करुन दर्शन घेत सर्व मिरगाव येथील बाधित कुटुबियां बरोबर बसून काही अडचणी आहेत का याची आस्थेवाईपणे विचारपूस करत लवकरच कायमस्वरुपी पुनर्वसनाचा प्रश्न शासन स्तरावर मार्गी लावू असे सांगून मिरगाव येथील बाधित कुटुंबियांना ना.देसाई यांनी आधार दिला.

Wednesday, 8 September 2021

स्व.बाळासाहेब ठाकरे कृषि संकुल वाशिमचे धर्तीवर सर्व जिल्हयांमध्ये कृषी संकुलाची होणार उभारणी. कृषी विभागाकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना.

 



दौलतनगर दि.08(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- शेतमालाची विक्री व्यवस्था,प्रतवारी व पॅकींग सुविधा व पुर्वशितकरण सुविधा इ.साठी वाशिम जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून वाशिम येथे स्व.बाळासाहेब ठाकरे बहुउद्देशीय कृषि संकुल उभारणीचे काम सुमारे 1.5 हेक्टर क्षेत्रावर रु. 5 कोटी 44 लाख तरतुदीसह सुरु आहे.याच धर्तीवर राज्यातील सर्व जिल्हयामंध्ये बहुउद्देशीय कृषि संकुल उभारणीबाबतचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीचे उपलब्ध निधीमधून सादर करण्याचे निर्देश कृषि मंत्री ना.दादा भुसे यांनी दिले असल्याने राज्यातील सर्व जिल्हयामध्ये बहुउद्देशीय कृषि संकुल उभारणीबाबतचे प्रस्ताव सादर करावेत,अशा सूचना सहसंचालक, मृदसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन,कृषि आयुक्तालय,पुणे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना सूचना केल्या असल्याने गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री वाशिम ना.शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून स्व.बाळासाहेब ठाकरे बहुउद्देशीय कृषि संकुल वाशिमचे धर्तीवर आता राज्यातील सर्व जिल्हयामध्ये बहुउद्देशीय कृषि संकुलांची उभारणी होणार आहे.

             वाशिम जिल्हा हा आकांक्षित जिल्हा असून जिल्ह्यातील शेती निसर्गावर अवलंबून आहे. जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी जिल्ह्यातील शेतीतील उत्पन्न वाढविणे आवश्यक आहे. त्यामुळे कृषि क्षेत्रात अमुलाग्र बदल प्रयत्न केले जात आहेत.जिल्ह्यातील सोयाबीन पिकाखालील क्षेत्र अधिक आहे. या पिकातून अधिक उत्पादन घेण्यासाठी संशोधन व्हावे, शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाविषयी प्रशिक्षण मिळावे. त्याविषयीचे प्रात्यक्षिक पाहण्याची सुविधा उपलब्ध व्हावी, याकरिता गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री वाशिम ना.शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून वाशिम या ठिकाणी स्व. बाळासाहेब ठाकरे बहुउद्देशीय कृषि संकुल उभारण्यात येत आहे. या संकुलासाठी जिल्हा नियोजन समितीमधून ५ कोटी ४४ लाख रुपये तरतूद करण्यात आली आहे. या संकुलात रायपनिंग चेंबर, प्री-कुलिंग व शीतगृहाची सुविधा उपलब्ध राहणार आहे. शेतमालाची प्रतवारी व पॅकिंग, शेतमाल विक्रीकरीता स्वतंत्र दालन, अद्ययावत प्रशिक्षण हॉल तसेच महीला व पुरुषांकरिता निवासाची स्वतंत्र व्यवस्था राहणार आहे.स्व.बाळासाहेब ठाकरे कृषि संकूलाचे ई-भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी वाशिम येथे उभारण्यात येत असलेल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे बहुउद्देशीय कृषि संकुलाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानविषयक प्रशिक्षणाच्या सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होणार असल्याने त्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार असून प्रत्येक जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारचे कृषि संकुल असावे,असे प्रतिपादन मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे यांनी केले होते. राज्याची कृषी मंत्री ना.दादा भुसे यांनी याबाबत दि. 26 जुलै व 23 ऑगस्ट रोजी सर्व कृषि संचालक,विभागीय कृषि सहसंचालक व सर्व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांची बैठक घेत शेतमालाची विक्री व्यवस्था,प्रतवारी व पॅकींग सुविधा व पुर्वशितकरण सुविधा इ.साठी वाशिम जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून वाशिम येथे स्व.बाळासाहेब ठाकरे बहुउद्देशीय कृषि संकुल उभारणीचे काम सुमारे 1.5 हेक्टर क्षेत्रावर रु. 5 कोटी 44 लाख तरतुदीसह सुरु आहे. एक जिल्हा, एक पीक या संकल्पनेनुसार प्रत्येक जिल्ह्याच्या वैशिष्ट्यपूर्ण पिकाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याने याच धर्तीवर राज्यातील सर्व जिल्हयामंध्ये बहुउद्देशीय कृषि संकुल उभारणीबाबतचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीचे उपलब्ध निधीमधून सादर करण्याचे निर्देश कृषि मंत्री ना.दादा भुसे यांनी दिले असल्याने राज्यातील सर्व जिल्हयामध्ये बहुउद्देशीय कृषि संकुल उभारणीबाबतचे प्रस्ताव सादर करावेत,अशा सूचना सहसंचालक, मृदसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन,कृषि आयुक्तालय,पुणे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना सूचना केल्या आहेत. त्यामुळे गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री वाशिम ना.शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून स्व.बाळासाहेब ठाकरे बहुउद्देशीय कृषि संकुल वाशिमचे धर्तीवर आता राज्यातील सर्व जिल्हयामध्ये बहुउद्देशीय कृषि संकुलांची उभारणी होणार आहे. वाशिमसारख्या आकांक्षित आणि जिल्हा नियोजन व विकास समितीमध्ये अत्यंत मर्यादित आर्थिक स्त्रोत उपलब्ध असतानाही ना.शंभूराज देसाई यांनी त्यांच्या कल्पकतेतून असा शेतकऱ्यांसाठी जिल्हा नियोजन मधून प्रकल्प सुरु केला आणि सदरचा प्रकल्प राज्यासाठी दिशादर्शक व्हावा,हि गोष्ट वाशिम आणि सातारा जिल्हावासियांसाठी निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे.

Wednesday, 1 September 2021

मल्हारपेठ नवीन पोलीस ठाण्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखणेसाठी मदत होईल. गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई. मल्हारपेठ नवीन पोलीस ठाण्याचे प्रत्यक्ष कामकाजास आजपासून प्रारंभ.


दौलतनगर दि.01 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- पाटण तालुक्याची भौगोलिक परिस्थिती व मल्हारपेठ येथील मोठी बाजारपेठ,वाढते गुन्हे तसेच कराड ते चिपळूण या राज्यमार्गाचे एन.एच.199 ई असे महामार्गाचे नव्याने वर्गीकरण झाल्याने वाढत्या रस्ते अपघातांचा विचार करता तसेच कायदा व सुव्यवस्था राखणेकरीता स्वतंत्र पोलीस ठाणेची निर्मिती व्हावी अशी सातत्याची मागणी लक्षात घेऊन मल्हारपेठ पोलीस औटपोस्टचे  अपग्रेडेशन करुन नवीन पोलीस स्टेशन करण्याच्या अनेक वर्षांच्या मागणीला मान्यता दिल्यानंतर मल्हारपेठ पोलीस ठाण्याच्या प्रत्यक्ष कामकाजास आजपासून सुरुवात करण्यात येत आहे.यामुळे मल्हारपेठ पोलीस ठाणे व परिसरातील गावांमध्ये या नवीन पोलीस ठाण्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठी मदत होणार असल्याचे प्रतिपादन गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केले.

           मल्हारपेठ,ता.पाटण येथे नवीन पोलीस ठाण्याचे शुभारंभ कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,व्हा.राजाराम पाटील,संचालक अशोकराव डिगे,शशिकांत निकम,शिवदौलत सहकारी बँकेचे चेअरमन ॲङमिलिंद पाटील,चंद्रकांत पाटील,संजय गांधी निराधार योजना समितीचे मा.अध्यक्ष भरत साळूंखे,पंचायत समिती सदस्य सुरेश पानस्कर,शिवाजी देसाई,पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल,अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील,प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.रणजित पाटील,पाटणचे पोलीस निरिक्षक चौखंडे,मल्हारपेठ पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरिक्षक उत्तम भापकर आदी मान्यवर उपस्थिती होते.

               याप्रसंगी बोलताना ते पुढे म्हणाले की, पाटण तालुक्यामधील मध्यवर्ती बाजारपेठेचे मुख्य ठिकाण असणाऱ्या मल्हारपेठ,ता.पाटण येथील औट पोस्टचे अपग्रेडेशन करुन तेथे नवीन पोलीस स्टेशन करणेकरीता सन 2001 मध्ये राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सन 2007 मध्ये या प्रस्तावा संदर्भात विधानसभेत तारांकीत प्रश्न दाखल केलेनंतर तत्कालीन गृहमंत्री स्व.आर.आर. पाटील यांनी सदर प्रस्ताव हा तपासणीकामी पोलीस महासंचालक यांचेकडे पाठविण्यात आला असल्याचे सांगितले होते. परंतु मल्हारपेठ ता. पाटण येथील पोलीस औटपोस्टचे अपग्रेडेशन करुन नवीन पोलीस स्टेशन करण्याचा प्रस्ताव अनेक वर्षापासून प्रलंबित राहिला होता. गेल्या अनेक वर्षांपासून मल्हारपेठ ता.पाटण हे पाटण विधानसभा मतदारसंघाचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने येथील औटपोस्टचे अपग्रेडेशन करुन याठिकाणी नविन पोलीस स्टेशन होण्याकरीता माझा सातत्याने पाठपुरावा सुरु होता. दरम्यान गृहराज्यमंत्री झालेनंतर प्रथमत: गृह विभागाचे उपसचिव कैलास गायकवाड,अप्पर पोलीस महासंचालक जग्गनाथन,कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक सुहास वारके,सातारा पोलीस अधिक्षकासह गृह विभागाचे व वित्त विभागाच्या अव्वर सचिव गावकर यांच्यासह वरीष्ठ अधिकाऱी या अधिकाऱ्यांचे बैठकीमध्ये मल्हारपेठ ता. पाटण येथील पोलीस औटपोस्टचे अपग्रेडेशन करुन याठिकाणी नवीन पोलीस स्टेशन करणेसंदर्भातील सर्व प्रक्रिया पुर्ण करुन विलंब न करता हा प्रस्ताव मान्यतेकरीता शासनाकडे सादर करा अशा सुचना  वरिष्ठ अधिकाऱ्यांना केल्या होत्या.या मागणीची गंभीर्याने आणि तात्काळ दखल घेऊन पोलीस अधीक्षक सातारा यांच्या आस्थापनेवरील पाटण पोलीस ठाणे व उंब्रज पोलीस ठाणेचे विभाजन करून  मल्हारपेठ दुरक्षेत्र आणि चाफळ दुरक्षेत्र यांचे उन्नतीकरण करून नवीन मल्हारपेठ पोलीस ठाणे निर्माण करण्यास तसेच त्याअनुषंगाने मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यास  शासनाच्या गृह विभागाने निर्णय घेत दि. 07 ऑक्टोंबर, 2020 रोजी गृह विभागाने मल्हारपेठ पोलीस औटपोस्टचे  अपग्रेडेशन करुन नवीन पोलीस स्टेशन करण्याच्या शासन निर्णय पारित केला. नव्याने मंजूर करण्यात आलेल्या मल्हारपेठ पोलीस ठाणे व कर्मचारी वसाहत इमारतीचा ऑनलाईन भूमिपूजन सोहळा राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे व मान्यवरांचे उपस्थितीमध्ये दि. 24 जून 2021 रोजी पार पडल्यानंतर मल्हारपेठ पोलीस दूरक्षेत्राची जुनी इमारत पाडून याठिकाणी उभ्या रहात असलेल्या पोलीस ठाण्याच्यानवीन सुसज्ज इमातीचे काम सध्या वेगाने सुरु आहे.नव्याने निर्माण झालेल्या मल्हारपेठ पोलीस ठाण्याचा प्रत्यक्ष कामकाजाचा शुभारंभ आज करण्यात आला असून  मल्हारपेठ पोलीस ठाण्यासाठी सहाययक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक,सहाययक पोलीस उपनिरीक्षक यांचेसह 30 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी असे मनुष्यबळ देण्यात आले आहे. नवीन मल्हारपेठ पोलीस ठाण्याची अधिसूचना‍ निर्गमित केल्यानंतर या पोलीस ठाण्यांतर्गत चाफळ, मल्हारपेठ, नाडे, मारुलहवेली, मरळी या विभागातील विविध 52 गावांचा समावेश करण्यात आला असल्याचे सांगत मल्हारपेठ पोलीस ठाणे निर्मितीबाबत आदेश‍ निर्गमित झाल्यानंतर आवश्यक त्या बाबींची पूर्तता करुन मल्हारपेठ पोलीस ठाणे येथे प्रत्यक्ष कामकाजास आजपासून सुरुवात होत आहे. यामुळे या परिसरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मदत होणार असल्याचे त्यांनी शेवटी प्रसिध्दीपत्रकांत म्हंटले आहे