दौलतनगर दि.08(जनसंपर्क
कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- शेतमालाची विक्री व्यवस्था,प्रतवारी
व पॅकींग सुविधा व पुर्वशितकरण सुविधा इ.साठी वाशिम जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज
देसाई यांचे संकल्पनेतून वाशिम येथे स्व.बाळासाहेब ठाकरे बहुउद्देशीय कृषि संकुल उभारणीचे
काम सुमारे 1.5 हेक्टर क्षेत्रावर रु. 5 कोटी 44 लाख तरतुदीसह सुरु आहे.याच धर्तीवर
राज्यातील सर्व जिल्हयामंध्ये बहुउद्देशीय कृषि संकुल उभारणीबाबतचा प्रस्ताव जिल्हा
नियोजन समितीचे उपलब्ध निधीमधून सादर करण्याचे निर्देश कृषि मंत्री ना.दादा भुसे यांनी
दिले असल्याने राज्यातील सर्व जिल्हयामध्ये बहुउद्देशीय कृषि संकुल उभारणीबाबतचे प्रस्ताव
सादर करावेत,अशा सूचना सहसंचालक, मृदसंधारण व पाणलोट
क्षेत्र व्यवस्थापन,कृषि आयुक्तालय,पुणे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना
सूचना केल्या असल्याने गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री वाशिम ना.शंभूराज देसाई
यांचे संकल्पनेतून स्व.बाळासाहेब ठाकरे बहुउद्देशीय कृषि संकुल वाशिमचे धर्तीवर
आता राज्यातील सर्व जिल्हयामध्ये बहुउद्देशीय कृषि संकुलांची उभारणी होणार आहे.
वाशिम जिल्हा हा आकांक्षित जिल्हा असून जिल्ह्यातील शेती निसर्गावर अवलंबून आहे. जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी जिल्ह्यातील शेतीतील उत्पन्न वाढविणे आवश्यक आहे. त्यामुळे कृषि क्षेत्रात अमुलाग्र बदल प्रयत्न केले जात आहेत.जिल्ह्यातील सोयाबीन पिकाखालील क्षेत्र अधिक आहे. या पिकातून अधिक उत्पादन घेण्यासाठी संशोधन व्हावे, शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाविषयी प्रशिक्षण मिळावे. त्याविषयीचे प्रात्यक्षिक पाहण्याची सुविधा उपलब्ध व्हावी, याकरिता गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री वाशिम ना.शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून वाशिम या ठिकाणी स्व. बाळासाहेब ठाकरे बहुउद्देशीय कृषि संकुल उभारण्यात येत आहे. या संकुलासाठी जिल्हा नियोजन समितीमधून ५ कोटी ४४ लाख रुपये तरतूद करण्यात आली आहे. या संकुलात रायपनिंग चेंबर, प्री-कुलिंग व शीतगृहाची सुविधा उपलब्ध राहणार आहे. शेतमालाची प्रतवारी व पॅकिंग, शेतमाल विक्रीकरीता स्वतंत्र दालन, अद्ययावत प्रशिक्षण हॉल तसेच महीला व पुरुषांकरिता निवासाची स्वतंत्र व्यवस्था राहणार आहे.स्व.बाळासाहेब ठाकरे कृषि संकूलाचे ई-भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी वाशिम येथे उभारण्यात येत असलेल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे बहुउद्देशीय कृषि संकुलाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानविषयक प्रशिक्षणाच्या सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होणार असल्याने त्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार असून प्रत्येक जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारचे कृषि संकुल असावे,असे प्रतिपादन मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे यांनी केले होते. राज्याची कृषी मंत्री ना.दादा भुसे यांनी याबाबत दि. 26 जुलै व 23 ऑगस्ट रोजी सर्व कृषि संचालक,विभागीय कृषि सहसंचालक व सर्व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांची बैठक घेत शेतमालाची विक्री व्यवस्था,प्रतवारी व पॅकींग सुविधा व पुर्वशितकरण सुविधा इ.साठी वाशिम जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून वाशिम येथे स्व.बाळासाहेब ठाकरे बहुउद्देशीय कृषि संकुल उभारणीचे काम सुमारे 1.5 हेक्टर क्षेत्रावर रु. 5 कोटी 44 लाख तरतुदीसह सुरु आहे. एक जिल्हा, एक पीक या संकल्पनेनुसार प्रत्येक जिल्ह्याच्या वैशिष्ट्यपूर्ण पिकाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याने याच धर्तीवर राज्यातील सर्व जिल्हयामंध्ये बहुउद्देशीय कृषि संकुल उभारणीबाबतचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीचे उपलब्ध निधीमधून सादर करण्याचे निर्देश कृषि मंत्री ना.दादा भुसे यांनी दिले असल्याने राज्यातील सर्व जिल्हयामध्ये बहुउद्देशीय कृषि संकुल उभारणीबाबतचे प्रस्ताव सादर करावेत,अशा सूचना सहसंचालक, मृदसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन,कृषि आयुक्तालय,पुणे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना सूचना केल्या आहेत. त्यामुळे गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री वाशिम ना.शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून स्व.बाळासाहेब ठाकरे बहुउद्देशीय कृषि संकुल वाशिमचे धर्तीवर आता राज्यातील सर्व जिल्हयामध्ये बहुउद्देशीय कृषि संकुलांची उभारणी होणार आहे. वाशिमसारख्या आकांक्षित आणि जिल्हा नियोजन व विकास समितीमध्ये अत्यंत मर्यादित आर्थिक स्त्रोत उपलब्ध असतानाही ना.शंभूराज देसाई यांनी त्यांच्या कल्पकतेतून असा शेतकऱ्यांसाठी जिल्हा नियोजन मधून प्रकल्प सुरु केला आणि सदरचा प्रकल्प राज्यासाठी दिशादर्शक व्हावा,हि गोष्ट वाशिम आणि सातारा जिल्हावासियांसाठी निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे.
No comments:
Post a Comment