दौलतनगर दि.13(जनसंपर्क
कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):-माहे जुलै महिन्यामध्ये दोन ते
तीन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरी व दुर्गम भागातील अनेक गावांमध्ये मोठया
प्रमाणांत भूस्खलन होऊन मोठी हानी झाली.विशेषत: कोयना विभागातील अनेक गावांचे न भरुन
येणारे असे अतोनात नुकसान झाले. अतिवृष्टीच्या
कालावधीत भूस्खलन होऊन दरडी कोसळण्याचा धोका असणाऱ्या गावांचे तात्पुरते स्थलांतर केले
होते. आपत्तीग्रस्त गावातील कुटुंबांच्या निवाऱ्यासाठी ज्या पध्दतीने सध्या कोयनानगर
येथे तात्पुरती निवारा शेडच्या उभारण्याचे काम तातडीने सुरु केले त्याचपध्दतीने भूस्खलामध्ये
बाधित झालेल्या गावांतील कुटुंबियांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यासाठी शासन सकारात्मक
असल्याची माहिती गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी दिली.
कोयनानगर,ता.पाटण येथे अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांचे तात्पुरत्या निवारासाठी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या निवारा शेडची पाहणी केली.त्यानंतर मिरगाव येथे भूस्खलनामध्ये पुर्णत: आपत्तीग्रस्त झालेल्या बाकाडे कुटुंबियांना प्रातिनिध स्वरुपात देण्यात आलेल्या तात्पुरते निवासस्थानी बसवलेल्या गणपतीचे दर्शन घेऊन बाकाडे कुटुंबियांशी चर्चा केली.यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार,शिवदौलत बँकेचे संचालक अशोकराव पाटील,शशिकांत जाधव,शैलेंद्र शेलार,भरत साळुंखे,अभिजित पाटील, तहसिलदार योगेश टोमपे,विजय बाकाडे,धोंडीराम बाकाडे,संजय बाकाडे,उत्तम बाकाडे यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की,गेल्या
दिड महिन्यापुर्वी मोठया प्रमाणांत झालेल्या अतिवृष्टीमुळे भूस्खलन होऊन पुर्ण घर जमिनीदोस्त
होऊन अनेक कुटुंबे बाधित झाली. अशा बाधित झालेल्या मिरगाव,ढोकावळे, हुंबरळी या गावांतील
लोकांची तात्पुरती निवाऱ्याची सोय करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे,
उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार आणि नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी दिलेले होते.अतिवृष्टीमुळे
झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी ना. एकनाथ शिंदे यांचे समवेत मी स्वत: केली.त्यावेळी
कोयना वसाहतीतील रिकाम्या निवासी इमारतींची तातडीने दुरुस्ती करुन त्यातील आज प्रातनिधिक
स्वरुपात ठराविक घरांचा तात्पुरत्या निवाऱ्यासाठी बाकडे कुटुंबियांना
निवासासाठी देण्यात आला. येणाऱ्या काही दिवसांमध्ये उर्वरित सर्व बाधित कुटुंबियांना
तात्पुरती निवारा शेड उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.पहिल्या टप्प्यामध्ये ज्यांची
पुर्ण घरे जमिनीदोस्त झाली आहेत त्यांच्या तात्पुरत्या निवाऱ्याची सोय या ठिकाणी केली
जाईल असे सांगत ते पुढे म्हणाले की अतिवृष्टीमुळे बाधित कुटुंबांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यासंदर्भात शासनस्तरावर दोन बैठकाही
झाल्या आहेत. तसेच सिडको आणि एम.एस.आर.डी.सी.च्या माध्यमातून घरांचे कायमस्वरुपी पुनर्वसन
करण्याचे नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी मान्य केले आहे. कायमस्वरुपी पुनर्वसन
करण्यासाठी लागणाऱ्या जागा निश्चित करण्याचे काम महसूल विभागाकडून युध्द पातळीवर सुरु
आहे.पुनर्वसनासाठी खाजगी जागा खरेदी करुन त्या ठिकाणी त्यांचे पुनर्वसन करण्याची तयारी शासनाने ठेवली आहे.जागा
घेण्यासाठी तसेच पुनर्वसित ठिकाणी नागरी सुविधा देण्याकरीता निधी देण्याचे मदत व पुनर्वसन
मंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी मान्य केले असून पहिल्या टप्प्यात घरे जमीनदोस्त झालेल्यांना
जलदगतीने तात्पुरता निवारा देण्याचे काम झाले आहे त्याच धर्तीवर कायमस्वरुपी पुनर्वसन
करण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे त्यांनी शेवटी सांगीतले.
चौकट: बाकाडे कुटुंबियांचे तात्पुरत्या निवारा शेडमधील गणपतीचे ना.देसाई
यांनी घेतले दर्शन.
No comments:
Post a Comment