Thursday 16 September 2021

पाटण,संगमनगर धक्का ते घाटमाथा रस्त्याचे काम तातडीने सुरु करा. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईं यांच्या राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना सुचना.

 

दौलतनगर दि.16(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- गत तीन महिन्यामध्ये सातत्याने पडलेल्या पावसामुळे कराड ते चिपळूण राष्ट्रीय महामार्गावरील पाटण,संगमनगर धक्का ते घाटमाथ्यापर्यंतच्या रस्त्याची दुरावस्था झाली असून या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या वाहनधारकांची व प्रवाशांची गैरसोय होत असल्याने कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्गावरील उर्वरीत राहिलेल्या पाटण मतदारसंघातील  संगमनगर धक्का ते घाटमाथा पर्यंतच्या एकूण 13.100 किमी रस्त्याचे डांबरीकरणाचे  16.85 कोटी तसेच पाटण ते संगमनगर या 14 कि.मी.रस्त्याचे दुरुस्तीचे 02 कोटी रुपयांचा निधी मंजूर असलेली दोन्ही कामे तातडीने सुरु करण्याच्या सुचना गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी राष्ट्रीय महार्गाच्या अधिकाऱ्यांना बैठकीमध्ये केल्या.

         कराड ते चिपळूण राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती व प्रलंबित कामाच्या संदर्भात आयोजित केलेल्या बैठकीप्रसंगी ते बोलत होते. या बैठकीस राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य अभियंता संतोष शेलार हे नांदेड येथून तर अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, अधिक्षक अभियंता आवटी, कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडे,पाटणचे उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे व इतर संबंधित अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय,सातारा येथून तर एल.अँड टी. कंपनीचे वरिष्ठ अधिकारी परेश हे मुंबई येथून दूरदृश्यप्रणालीव्दारे बैठकीस उपस्थित होते.

                 प्रसिध्दीपत्रकात म्हंटले आहे की, कराड चिपळूण रस्त्यास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देवून या रस्त्याच्या कामांस आवश्यक असणारा निधी मंजुर करावा अशी मागणी सर्वप्रथम केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री ना.नितीन गडकरी यांचेकडे सातत्याने मागणी केल्यानंतर या रस्त्यास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मागील पंचवार्षिकमध्ये मिळाला. यामध्ये कराड ते संगमनगर धक्का रस्त्याचे काँक्रीटीकरण आणि संगमनगर धक्का ते घाटमाथा पर्यंतच्या रस्त्याचे पक्के डांबरीकरण करणेच्या कामांचा समावेश होता.कराड ते संगमनगर धक्का रस्त्याचे काँक्रीटीकरण कामांकरीता आवश्यक असणारा निधी उपलब्ध झाल्यानंतर कराड ते पाटणपर्यंत रस्त्याचे काम पुर्णत्वाकडे गेले असून काही ठिकाणी काम प्रगतीपथावर आहे. दरम्यान संगमनगर धक्का ते घाटमाथा पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करणेच्या कामाकरीता आवश्यक असणारा निधी मंजुर होण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री ना.नितीन गडकरी यांनी 13.100 किमी लांबीच्या पक्कया डांबरीकरणाच्या या रस्त्याकरीता 16.85 कोटी रुपयांचा निधी मंजूरही केला.पाटण तालुक्यातमध्ये गत तीन महिन्यापासून सुरु असलेल्या पाऊस विशेषत: माहे जुलै महिन्यामध्ये मोठया प्रमाणांत झालेल्या अतिवृष्टीमुळे पाटण,संगमनगर धक्का ते घाटमाथा पर्यंतच्या रस्त्याची मोठया प्रमाणांत दुरावस्था होऊन रस्त्यामध्ये मोठ-मोठे खड्डे पडले असल्याने या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या वाहनधारक तसेच प्रवाशांची दळण-वळणाची मोठी गैरसोय होत असल्याने लोकांच्यामध्ये रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे मंजूर असलेली दोन्ही कामे लवकर सुरुवात करण्याकरीता मंत्रालयीन स्तरावर यासंदर्भात राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली.त्यानंतर संगमनगर धक्का ते घाटमाथा या रस्त्याचे डांबरीकरणाचे कामाची निविदा राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी प्रसिध्द करुन या कामासाठी ठेकेदार निश्चित करुन दि.19 जुलै 2021 रोजी कार्यारंभ आदेशही देण्यात आला आहे. तसेच पाटण ते संगमनगर या 14 कि.मी. रस्त्याच्या 02 कोटी 02 लाख रुपयांच्या दुरुस्तीच्या कामाचाही कार्यारंभ आदेशही देण्यात आला आहे. त्यामुळे पाटण ते संगमनगर रस्ता दुरुस्तीचे व संगमनगर धक्का ते घाटमाथा या रस्त्याचे डांबरीकरणाचे कामांस दहा दिवसांत तातडीने सुरुवात करावी अशा सुचना मुख्य अभियंता यांना केल्यानंतर मुख्य अभियंता यांनीही दहा दिवसाचे आत संगमनगर धक्का ते घाटमाथा या रस्त्याचे काम सुरु करणार असल्याचे सांगीतले. तसेच पाटण ते संगमनगर या रस्त्याचे मजबुतीकरणाचे 13 किमीचे काम एल.एन्ङटी. कंपनी करणार नसेल तर तात्काळ नव्याने मंजूरी घेऊन दुसऱ्या कंपनीकडून हे काम लवकरात लवकर पुर्ण घेण्याच्याही सूचना यावेळी बैठकीत दिल्या असल्याने लवकरच या कामांस सुरवात होऊन या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या वाहनधारकांची व प्रवाशांची होणारी गैरसोय दूर होण्यास मदत होईल असे त्यांनी शेवटी म्हंटले आहे. 

No comments:

Post a Comment