दौलतनगर
दि.16(जनसंपर्क
कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):-:दौलतनगर,ता.पाटण
येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याची 51 वी वार्षिक सर्वसाधारण सभा
“महाराष्ट्र दौलत” लोकनेते
बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक दौलतनगर,ता.पाटण या ठिकाणी शनिवार दि18 सप्टेंबर,
2021 रोजी सकाळी 11.00 वा. व शिवदौलत सहकारी बँकेची 20 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मल्हारपेठ,
ता.पाटण या ठिकाणी दुपारी 01.00 वा.लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग समुहाचे
मार्गदर्शक व महाराष्ट्र राज्याचे गृह(ग्रामीण)
राज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांचे
प्रमुख उपस्थितीत ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. या वार्षिक सर्वसाधारण सभेकरीता मोरणा
शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई (दादा),युवा नेते मा. यशराज देसाई (दादा) व सर्व
संचालक मंडळ हे उपस्थित राहणार आहेत.
कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे शासनाच्या
सर्व नियमांचे पालन करुन लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना व शिवदौलत सहकारी
बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा हया ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार असून या दोन्ही वार्षिक
सर्वसाधारण सभांच्या ठिकाणी गर्दी होऊ नये याकरीता शिवदौलत बँकेच्या तारळे,पाटण व ढेबेवाडी
या शाखांमध्ये प्रोजेक्टरच्या माध्यमातून संबंधित वार्षिक सभांचे वेळेमध्ये कारखान्याचे
व बँकेच्या सभासदांना ऑनलाईन पध्दतीने सहभागी होण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन दिली असून
या ठिकाणी कारखान्याचे व बँकेच्या सभासदांनी उपस्थित रहावे.तसेच लोकनेते बाळासाहेब
देसाई सहकारी साखर कारखान्याचे सर्वसाधारण सभेकरीता ज्या सभासदांना ऑनलाईन पध्दतीने
सभेत सहभागी व्हायचे असेल त्यांनी कारखान्याचे www.maralisugar.com या वेबसाईटवरती
प्रसिध्द करण्यात आलेल्या लिंकव्दारे या सभेत ऑनलाईन उपस्थित राहता येणार आहेत. तर
शिवदौलत सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेकरीता उपस्थित राहण्यासाठी सभासदांना त्यांच्या
नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर मेसेज किंवा ईमेल आय.डी.व्दारे लॉगईन व पासवर्ड पाठविणत
येणार असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक सुहास देसाई व बँकेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी शिवाजीराव जाधव यांनी प्रसिध्दी पत्रकांत दिली आहे.
No comments:
Post a Comment