Tuesday, 8 March 2022

लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब यांचा दि.10 मार्च रोजी 112 वा जयंती सोहळा कार्यक्रम. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे मुंबई येथे करणार अभिवादन. कारखाना कार्यस्थळावर युवानेते यशराज देसाई,अध्यक्ष रविराज देसाईंची प्रमुख उपस्थिती.

 

                

 

            दौलतनगर दि.08:- महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,राज्याचे माजी गृहमंत्री,पाटण तालुक्याचे दैवत लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचा 112 वा जयंती सोहळा कार्यक्रम गुरुवार दि.10 मार्च, 2022 रोजी सकाळी 10.00 वा. दौलतनगर (मरळी), ता.पाटण या ठिकाणी अत्यंत साध्या पध्दतीने संपन्न होणार आहे. सदर कार्यक्रम “महाराष्ट्र दौलत” लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक येथे आयोजीत करण्यात आला आहे. सध्या मुंबई येथे राज्य शासनाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून दि.11 रोजी राज्याचे गृह,वित्त व नियोजन राज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे विधानपरीषद सभागृहात राज्याचा अर्थसंकल्प मांडणार असल्याने ते मुंबई येथे दि.10 मार्च रोजी लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे जयंतीनिमित्त सुरुची निवासस्थानी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करणार आहेत.कारखाना कार्यस्थळा वरील कार्यक्रमास युवा नेते यशराज देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई उपस्थित राहणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

                प्रसिध्दीपत्रकात त्यांनी पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,राज्याचे माजी गृहमंत्री,पाटण तालुक्याचे दैवत लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब यांचा जयंती सोहळा प्रतिवर्षी पाटण तालुक्यात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येतो.प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी गुरुवार दि.10 मार्च, 2022 रोजी स्व.लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचा 112 वा जयंती सोहळा कार्यक्रम दौलतनगर ता.पाटण येथे “महाराष्ट्र दौलत”लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक याठिकाणी आयोजीत करण्यात आला आहे.

                 गृह,वित्त,नियोजन राज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सभागृहामध्ये सादर केलेल्या सन 2020-21 च्या पहिल्याच अर्थसंकल्पामध्ये आदरणीय स्व.लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे शताब्दी स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामांकरीता 15 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली होती त्यानुसार या शताब्दी स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामांकरीता शासनाकडून प्रशासकीय मान्यता घेवून शताब्दी स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सध्या प्रगतीपथावर सुरु आहे.गृह,वित्त व नियोजन राज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे विधानपरीषद सभागृहात दि.11 रोजी राज्याचा अर्थसंकल्प मांडणार असल्याने ते मुंबई येथे दि.10 मार्च रोजी लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे जयंतीनिमित्त सुरुची निवासस्थानी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करणार आहेत.जयंती सोहळ्याचे कार्यक्रमास लोकनेते बाळासाहेब देसाई प्रेमी तसेच लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी कारखान्याचे सभासद,हितचिंतक यांनी लोकनेते बाळासाहेब देसाई यांना अभिवादन करण्याकरीता मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही शेवटी पत्रकात करण्यात आले आहे.

             चौकट:-जयंतीनिमित्त तालुकास्तरीय समित्यावर निवड झालेल्यांना समारंभात नियुक्ती पत्र मिळणार.

             राज्य शासनामार्फत तालुकास्तरावर लोककार्यासाठी ज्या काही जनहितार्थ समित्या गठीत करण्यात येतात त्या तालुकास्तरीय समित्यांवर गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे शिफारशीवरुन विविध पदाधिकारी यांच्या निवडी झाल्या आहेत. त्या पदाधिकाऱ्यांना लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे 112 व्या जयंती सोहळयानिमित्त युवा नेते यशराज देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाईंचे हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात येणार आहेत.

 

Saturday, 5 March 2022

साजूर,तांबवे,पश्चिम सुपने,केसे गावांना कोयना नदीकाठी घाट बांधल्याने चांगली सोय झाली. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई

         


         दौलतनगर दि.04 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- दरवर्षीच्या अतिवृष्टी व महापुराने कोयना नदीकाठ ढासळलेनं नदीपात्र रुंदावत चालले आहे.महापुराच्या पाण्याने नदीकाठच्या गावांना धोका निर्माण झाल्याने अशा धोका पोहचणाऱ्या सुपने मंडलमधील साजुर,तांबवे,पश्चिम सुपने व केसे या गांवाना कोयना नदीकाठी पुर संरक्षक भिंती व घाटांची कामे ही मागील पंचवार्षिकमध्ये आमदार असतानांच मंजुर करुन आणली होती.आज ही कामे पुर्ण झाल्याने या गांवाना महापुराचा धोका पोहचणार नसून या चार गांवात कोयना नदीकाठी घाट बांधल्याने या गावांची चांगली सोय झाली असल्याचे प्रतिपादन गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी केले.

         पाटण विधानसभा मतदारसंघातील केसे ता.कराड येथे तांबवे,पश्चिम सुपने व केसे येथील कोयना नदीकाठी उभारण्यात आलेल्या घाट व पुर संरक्षक भिंतींच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी जिल्हा परीषद सदस्य प्रदीप पाटील,बाजार समितीचे माजी संचालक प्रकाश पाटील,कराड खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष हणमंतराव चव्हाण,रयत कारखान्याचे संचालक शिवाजीराव गायकवाड,ख.वि.सं.माजी व्हा.चेअरमन प्रभाकर शिंदे,ॲड.विजयसिंह पाटील,कोयना बॅकेचे संचालक अविनाश पाटील,लक्ष्मण देसाई,शिवाजी शिंदे,पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील,पंजाबराव पाटील,चंद्रकांत पाटील,आनंदा कळके,सरपंच हासम मुजावर, आनंदराव जमाले,महादेव पाटील,भैरवनाथ पाणी पुरवठा संस्थेचे मा. चेअरमन अशोक शिंदे,रमेश शिंदे, सचिन पवार, संदीप सावंत,केसे विकास सोसायटीचे चेअरमन सर्जेराव पाटील,पांडूरंग शिंदे,मुनाफ मुलाणी,तानाजी तोरस्कर,अधिक शिंदे,बाळासो शिंदे,निजाम सुतार,लालासो सुतार,अरुण सावंत,सचिन शिंदे, सचिन पाटील,नामदेव पाटील, कोयना धरण व्यवस्थापनचे कार्यकारी अभियंता  नितिश पोतदार, उपअभियंता शिवाजी पवार आदींची प्रमुख उपस्थित होती.

             याप्रसंगी बोलताना ना.शंभुराज देसाई म्हणाले,2009 साली कराड तालुक्यातील सुपने मंडल पाटण विधानसभा मतदारसंघाला जोडल्यानंतर 2009 ते 2014 या कार्यकालात या मंडलकरीता प्रतिनिधीत्व करण्याची संधी नाही मिळाली. या कार्यकालात प्रतिनिधीत्व करणाऱ्यांचे कामकाज कसे होते हे या मंडलमधील जनतेने पाहिले आणि 2014 च्या निवडणूकीत मला विजयी करण्याकरीता खुप चांगले सहकार्य केले त्यानंतर 2019 च्या निवडणूकीतही या विभागातील नागरिक मोठया संख्येने माझ्या पाठीशी उभे राहिले.  कुणी मतदान दिले, कुणी दिले नाही याचा विचार न करता मी 2014 ते 2019 या आमदारकीच्या कालावधीत आणि आताही राज्याचा राज्यमंत्री म्हणून सुपने मंडलमधील गांवागांवात, वाडीवस्तीवर विकासाची कामे पोहचविण्याचा प्रयत्न केला.ज्येष्ठ नेते कै. विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या विचारांचा असलेला सुपने विभाग विकासकामांमुळे माझे पाठीशी ठाम उभा आहे.गत पंचवार्षिकमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून मतदारसंघात चांगले कार्य केल्याने मतदारसंघातील जनतेच्या आर्शिवादाने मंत्री होण्याची संधीही मला मिळाली.मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी आणि राज्याचा मंत्री म्हणून मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी निधी आणण्याकरीता मी कुठेही कमी पडणार नाही.पाटण विधानसभा मतदारसंघातील इतर जिल्हा परीषद गटाप्रमाणे याही जिल्हा परीषद गटाला विकासकामांच्या बाबतीत झुकते माप देण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे.विकासकामांबरोबर या विभागातील नागरिकांचे वैयक्तीक प्रश्न सोडविण्यासाठी ही माझे नेहमी प्रयत्न राहिले आणि यापुढेही राहतील असे आश्वासन त्यांनी शेवठी बोलताना दिले.प्रास्ताविक विनायक शिंदे यांनी केले आभार सचिन शिंदे यांनी  मानले.

चौकट:- मागेल त्या गांवाला विकासकामे दिली. मतांची आकडेवारी पाहिली नाही.

            मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून काम करताना मतदारसंघातील गांवे असो वा वाडयावस्त्या ज्यांनी विकासकाम मागितले त्या त्या गांवाना, वाडयावस्त्यांना आमदार, मंत्री म्हणून मी विकासकामे दिली. मतांची आकडेवारी पहात बसलो नाही. म्हणूनच मतदारसंघातील गांवामध्ये, वाडयावस्त्यांमध्ये विविध विकासकामे आज मार्गी लागलेली आपल्याला दिसून येत आहेत असेही ना.शंभूराज देसाई म्हणाले.

Friday, 4 March 2022

गृहराज्यमंत्री असावा तर तुमच्यासारखा कणकर आणि सडेतोड राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांचेकडून ना.शंभूराज देसाईंच्या कार्याचे कौतुक.

 


 

                मुंबई दि.04 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- गृहराज्यमंत्री असावा तर तुमच्यासारखा कणखर आणि सडेतोड, सभागृहात मग ती विधानसभेत असो वा विधानपरीषदेत गृह विभागाची बाजू अगदी कणखरपणे आणि भक्कमपणे मांडता, विरोधकांना सडेतोड उत्तरे देवून गप्पगार करता असे गौरवोगार राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंच्या बाबतीत काढत ना.शंभूराज देसाईंच्या राज्याच्या गृहविभागातील कार्याचे तोंडभरुन कौतुक केले.

               राज्य शासनाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सुरु असून विधानपरीषदेच्या लॉबीमध्ये राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंची भेट झाली त्यावेळी ना.जयंत पाटील म्हणाले, शंभूराजजी, गृहराज्यमंत्री असावा तर तुमच्यासारखा यावर ना.शंभूराज देसाई आदबीने म्हणाले, का हो पाटील साहेब, माझे काही चुकले का? असे का बोलत आहात. त्यावर ना.जयंत पाटील म्हणाले अहो कणखर आणि सडेतोड असणारे तुम्ही गृहराज्यमंत्री आहात म्हणून मी तुम्हाला गृहराज्यमंत्री असावा तर तुमच्यासारखा असे म्हणालो. सभागृहात मग ती विधानसभेत असो वा विधानपरीषदेत गृह विभागाची बाजू अगदी कणखरपणे आणि भक्कमपणे मांडता, विरोधकांना सडेतोड उत्तरे देवून गप्पगार करता मीही राज्याचा गृहमंत्री राहिलो आहे. पण तुमचा कणखर आणि सडेतोडपणा वाखाणण्यासारखा आहे.राज्यमंत्री म्हणून पहिल्याच टर्ममध्ये एवढे चांगले काम आहे तर कॅबिनेट मंत्री म्हणून तुम्ही उत्कृष्ट काम करु शकता असेही ना.जयंत पाटील हे ना.शंभूराज देसाईंना म्हणाले व ना.शंभूराज देसाईंच्या गृहविभागातील राज्यातील कार्याचे त्यांनी तोंडभरुन कौतुक केले. यावर गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी ना.जयंत पाटील यांचे आभार मानले आणि दोघेही सभागृहात गेले.

दि.05 मार्च रोजी लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक,दौलतनगरला स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन सत्राचे आयोजन.

 


                दौलतनगर दि.04 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- शिवाजी विद्यापिठ कोल्हापूर,लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासन,इतिहास अधिविभाग व लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक स्पर्धा परिक्षा केंद्र,पाटण यांचे संयुक्त विद्यमाने शनिवार दि.05 फेब्रुवारी,2022 रोजी लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक स्पर्धा परिक्षा केंद्र दौलतनगर,ता.पाटण येथे स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन सत्र आयोजित केले आहे. या स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन सत्राचे उद्घाटन लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासन,शिवाजी विद्यापिठ कोल्हापूर सल्लागार समितीचे सदस्य मा.यशराज देसाई यांचे शुभहस्ते सकाळी 11.00 वा. होणार आहे.

            लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासन,शिवाजी विद्यापिठ,कोल्हापूरचे समन्वयक डॉ. अवनीश पाटील हे कार्यक्रमाचे प्रास्तावित करणार आहेत.पहिल्या सत्रामध्ये सकाळी 11.30 ते दुपारी 02.00 वा.पर्यंत या वेळेत स्पर्धा परिक्षा मार्गदर्शक मा.वैभव जगधने हे चालू घडामोडी या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.दुसऱ्या सत्रामध्ये वैध फौंडेशनचे संचालक मा.रुद्र पाटील हे पोलीस भरतीची तयारी याविषयावर मार्गदर्शन करणार असून तिसऱ्या सत्रामध्ये मा.सोमनाथ सातपुते हे इतिहास व राज्यव्यवस्था विषय तयारी या संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत.तरी पाटण विधानसभा मतदारसंघातील स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या युवक-युवतींनी या स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन सत्राला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक स्पर्धा परिक्षा केंद्राच्यावतीने करण्यात आले आहे.

Wednesday, 2 March 2022

जनतेच्या विकासाची जाण असली की विकासकामे मार्गी लागतात. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई.

 



         दौलतनगर दि.03 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- जनतेच्या विकासाची जाण असली की अनेक विकासकांमे मार्गी लागतात याचे मुर्तींमंत उदाहरण म्हणजे पाटण विधानसभा मतदारसंघ आहे. सन 2004, 2014 व 2019 या तीन पंचवार्षिक निवडणूकीत पाटण मतदारसंघातील जनतेने मला या मतदारसंघाचा आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली. मतदार संघाचा आमदार म्हणून मतदारसंघातील प्रलंबीत विविध विकासकामे मार्गी लावण्याकरीता आवश्यक असणारा कोटयावधी रुपयांचा निधी मंजुर करायला मी कुठेही कमी पडलो नाही. आज मतदारसंघात कोटयावधी रुपयांची कामे मार्गी लागली ती विकासाची जाण असल्यामुळेच असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी केले.

               मल्हारपेठ ता.पाटण येथील कार्यकर्ता मेळावा कार्यक्रमात ते बोलत होते.मेळाव्यापुर्वी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या शुभहस्ते गिरेवाडी व मंद्रुळहवेली ता.पाटण येथील कोयना नदीकाठी बांधण्यात आलेल्या संरक्षक भिंतीचे उदघाटन, येराडवाडी येथील मातोश्री योजनेतंर्गत उभारण्यात आलेल्या ग्रामपंचायत इमारतीचा लोकार्पण, कदमवाडी-मल्हारपेठ येथील पोहोच रस्त्याचे भूमिपुजन करण्यात आले.यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, युवा नेते यशराज देसाई, आदित्यराज देसाई, जिल्हा परीषद सदस्य विजय पवार, पंचायत समिती सदस्य सुरेश पानस्कर, कारखान्याचे संचालक अशोक डिगे,आंनदराव चव्हाण, गोरख देसाई, बबनराव भिसे, बॅकेचे संचालक सुनिल पवार,जे.एम.पवार,जयवंत पानस्कर,सुनिल पानस्कर,गणेश कदम,बाजीराव पवार, डॉ.विजय देसाई, मानसिंगराव नलवडे, शरद भिसे, प्रकाशराव जाधव, ॲड.मारुती नांगरे,कोयना धरण व्यवस्थापनचे कार्यकारी अभियंता  नितिश पोतदार,उपअभियंता शिवाजी पवार आदींची प्रमुख उपस्थित होती.

             याप्रसंगी बोलताना ना.शंभुराज देसाई म्हणाले, मतदार संघाचा आमदार म्हणून मी विकासकामे मार्गी लावण्याकरीता कुठेही कमी पडलो नाही.गांवातील असो, वा वाडीवस्तीतील असो ज्या ज्या कामांची मागणी जनतेने केली, ती मागणी पुर्ण करण्यात आपण यशस्वी झालो आहे. मतदारसंघातील गांवागावांत, वाडीवस्तीवर मागील सात वर्षात एक-एक नाहीतर चार चार कामे मार्गी लागली आहेत. प्राधान्याने गांवागांवाना जोडणारे रस्ते, पिण्याच्या पाण्याच्या योजना,मंदीरांपुढे सभामंडप,सार्वजनीक सभामंडप,ग्रामपंचायतीच्या इमारती, चावडी इमारती, नदीकाठच्या गांवाना सरंक्षण भिंती अशी विविध विकासकांमे मार्गी लागली आहेत.मतदारसंघातील जनतेने 2004 साली मतदारसंघाचा आमदार म्हणून काम करण्याची पहिल्यांदा संधी दिल्या नंतर मी मतदारसंघातील जनतेचे बारीकसारीक अनेक वर्षापासून प्रलंबीत असणारे प्रश्न जागेवर सोडविण्याकरीता जनता दरबार ही संकल्पना राबविली या माध्यमातून मतदारसंघातील अनेक जनतेचे प्रश्न मार्गी लागले आज मंत्री असलो तरी जनता दरबार ही संकल्पना सुरुच ठेवली आहे. मागील दोन वर्षात कोरोनाचा प्रार्दुभाव होता त्यामुळे आपल्याला जनता दरबार घेता आला नाही. मागील महिन्यात घेतलेल्या जनता दरबार मध्ये अनेक प्रश्न जागेवर मार्गी लागले. सुरवातीला आमदार झालेनंतर जनता दरबारची संकल्पना तत्कालीन जिल्हाधिकारी यांना सांगितली होती तेव्हा त्यांनी आमदारांना जनता दरबार घेता येणार नाही मंत्री जनता दरबार घेवू शकतात असे सांगितले होते पण मी तत्कालीन मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख यांना तात्काळ फोन केला त्यांना जनता दरबारची संकल्पना सांगितली 10 व्या मिनींटात तत्कालीन मुख्यमंत्री यांचा जिल्हाधिकाऱ्यांना फोन आला आणि त्यांनी सांगितले आमदार शंभूराज देसाईंची जनता दरबारची संकल्पना चांगली आहे सगळे अधिकारी उपस्थित रहा.  जनतेचे काम करण्याची तळमळ असेल तर सर्व काही शक्य आहे असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.प्रास्ताविक सुरेश पानस्कर यांनी केले आभार बाजीराव पवार यांनी  मानले.

चौकट:- कांमे दया, निधी दयायचा आहे कार्यालयातून फोन येतो.

            राज्याचा मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यानंतर मतदारसंघातील विकासकामांना निधी आणण्यात मला यश मिळाले, मतदारसंघातील गांवागावांत मागील पंचवार्षिकमध्ये एवढी विकासांची कामे आपण मार्गी लावली आता पदाधिकारी व कार्यकर्ते सांगतात, साहेब, तुमच्या कार्यालयातून आता आम्हाला फोन येतो, कामे सुचवा, साहेबांनी मागितली आहेत निधीसाठी पत्र दयायचे आहे. म्हणजे गावोंगावी विकासकामे मार्गी लागली आहेत हे याचे उदाहरण असल्याचेही ना.शंभूराज देसाईंनी सांगितले.

लोकप्रतिनिधी म्हणून विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला नाही यापुढेही कमी पडू देणार नाही. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे आश्वासन.

 


         दौलतनगर दि.02 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- विकासकामांच्या बाबतीत पाटण विधानसभा मतदारसंघ जिल्ह्यात नव्हेतर  पश्चिम महाराष्ट्रात आघाडीवर राहील यासाठी लोकप्रतिनिधी म्हणुन मी नेहमीच प्रयत्नशील राहिलो असुन मतदारसंघाचा आमदार म्हणून मतदारसंघातील विकासकामांसाठी यापुर्वी निधी कमी पडू दिला नाही, यापुढेही कमी पडू देणार नाही.गावाच्या विकासासाठी नवनविन योजना मतदारसंघातील जनतेने तयार करा. लागेल तो निधी  व  सहकार्य करण्यास मी तयार आहे.असे आश्वासन गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी दिले.

               बनपेठ ता.पाटण येथील कोयना नदीकाठी घाट व पुर संरक्षक भिंत बांधकामाच्या भुमिपुजन कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,जयराज देसाई, सदानंद साळुंखे, भागोजी शेळके, पांडुरंग बेबले, गणीभाई चाफेरकर,अशोकराव पाटील तळीयेकर,नथुराम सावंत, बळीराम साळुंखे,आबासो साळुंखे, प्रकाश साळुंखे, निलेश साळुंखे, यशवंत जाधव,निवृत्ती कदम,सुदर्शन वाईकर,नवनाथ सुर्यवंशी,आनंदा लाड, विजय बाबर, कोयना धरण व्यवस्थापनचे कार्यकारी अभियंता  नितिश पोतदार,उपअभियंता शिवाजी पवार आदींची प्रमुख उपस्थित होती.

             याप्रसंगी बोलताना ना.शंभुराज देसाई म्हणाले, लोकनेते बाळासाहेब देसाई याचेनंतर देसाई कुटुंबांत मंत्री होण्याची संधी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिली त्यांनी महत्वाची पाच खात्याचे  राज्यमंत्री म्हणुन मंत्रिमंडळात माझा समावेश केला.मंत्रीपदाच्या शपथविधीनंतर काही कालावधीत कोरोनामुळे राज्याची आर्थिक कोलमडल्याने विकासकामाची गती मंदावली होती आता परिस्थिती बदलत असुन हळूहळू पुर्वपदावर येऊ लागली आहे.विकासकामाना निधी मिळु लागला आहे. दरवर्षीच्या अतिवृष्टी व महापुराने कोयना नदीकाठ ढासळलेनं नदीपात्र रूंदावत आहे, पुराच्या पाण्याने गावांना धोका निर्माण झाल्याने पुर संरक्षक भिंती बांधण्यात येत आहे. पाटण विधानसभा मतदारसंघात आपण सन 2014 ते 2019 या आमदारकीच्या काळात 10 गांवाकरीता कोयना नदीकाठी घाट व पुरसंरक्षक भिंतीची कामे आपण मंजुर करुन आणली यातील 07 कामे पुर्ण झाली आहेत. बनपेठ येथील पुर संरक्षक भिंतीचेही  लवकरच काम पुर्ण होईल.

              कोयना नदीकाठावर निसर्गरम्य परिसरात येडोबा मंदीर  असुन दरवर्षी मोठी यात्रा भरत असते, वर्षभर देवदर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते या मंदिर परिसराच्या विकासासाठी सर्वानी सकारात्मक विचाराने एकत्र येऊन या परिसराचा विकास करुन घ्यावा मी मंत्री म्हणुन सर्वतोपरी मदतीसाठी कमी पडणार नाही असे शेवटी सांगितले या कार्यक्रमास  परिसरातील गावचे सरपंच, पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक दिलीपराव सपकाळ आभार राजेंद्र पुजारी यांनी  मानले.

चौकट:- येडोबा देवस्थानचा ब वर्ग चा प्रस्ताव सादर करा.

            येडोबा देवस्थान हे पश्चिम महाराष्ट्रातील जागृत देवस्थान असून दर्शनाकरीता पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील भाविक दर्शनासाठी येत असतात. या देवस्थानला राज्य शासनाचा ब वर्गचा दर्जा प्राप्त झाल्यास राज्य शासनाकडून भरघोस असा निधी येडोबा देवस्थानच्या विकासासाठी उपलब्ध होईल याकरीता ब वर्गचा प्रस्ताव सादर करा याच्या मंजुरीसाठी शासनस्तरावर मी स्वत: प्रयत्न करेन असेही ना.शंभूराज देसाईंनी यावेळी बोलताना सांगितले.

Tuesday, 1 March 2022

जिल्हा बॅकेच्या पराभवानंतर देसाई गटाने घेतली भरारी चार सोसायटीमध्ये केले सत्तांतर. विजयी उमदेवारांचा ना.शंभूराज देसाईंच्या हस्ते मल्हारपेठला सत्कार संपन्न.

 

            


         दौलतनगर दि.02 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):-  सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत अल्पशा मतांनी  झालेल्या पराभवाचे उट्टे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या नेतृत्वाखालील देसाई गटाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी काढले असून बँकेच्या पराभवानंतर चार विविध कार्यकारी सेवा सोसायटीमध्ये सत्तांतर करीत चार सोसायटया मिळविण्यात देसाई गटाला यश प्राप्त झाले आहे.सत्तातंराची ही परंपरा कायम ठेवत बहूतांशी सोसायटया देसाई गटाच्या ताब्यात घेवून सोसायटीवर शिवसेनेचा झेंडा फडकविण्याचा चंग देसाई गटाच्या कार्यकर्त्यांनी बांधला आहे. चार सोसायटीमध्ये विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचा सत्कार आज गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या हस्ते करण्यात आला.

          सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत अल्पशा मतांनी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचा झालेला पराभव देसाई गटाच्या कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला असून कोणत्याही परिस्थितीमध्ये सोसायटयांच्या निवडणूकांमध्ये विजय मिळविण्याकरीता देसाई गटाच्या कार्यकर्त्यांनीच कंबर कसली असून याचा प्रत्यय नुकत्याच झालेल्या सोसायटयांच्या निवडणूकांमध्ये दिसून आला. विरोधकांच्या ताब्यात असणाऱ्या सोसायटीची सत्ता खेचून आणण्यात देसाई गटाच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना यश मिळाले आहे.

              मल्हारपेठ ता.पाटण विभागातील विविध विकासकामांच्या उदघाटनांचा कार्यक्रम आज गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाईंच्या हस्ते पार पडले.याप्रसंगी मल्हारपेठ येथे कार्यकर्त्यांचा जाहीर मेळावा आयोजीत करण्यात आला होता. याप्रसंगी सोसायटीमध्ये निवडून आलेल्या उमेदवारांचा सत्कार करण्यात आला.यामध्ये साईकडे,बेलवडे,धामणी सोसायटयांमधील विजयी उमेदवार उपस्थित होते.

             सत्कार करण्यात आलेल्या साईकडे विविध कार्यकारी सेवा सोसायटीमधील विजयी उमेदवार पांडूरंग मोरे,आनंदा भुलुगडे,नेताजी मोरे,रामचंद्र शामराव यादव,भगवंत करपे,आकाराम करपे,एकनाथ करपे,हणमंत ताईकडे,संगिता ताईगडे,पुष्पा यादव,सोपान कांबळे,नथूराम साळूंखे, बेलवडे विविध कार्यकारी सेवा सोसायटी राजेंद्र पवार,आनंदा पवार,राजाराम पवार,श्रीमती अलका पवार,गोविंदराव कांबळे,बंडू पवार, शामराव सोनार,अधिक पाटील,यशवंत कवर,विजया पवार,हणमंत पवार,धामणी विविध कार्यकारी सेवा सोसायटी श्रीमती सिमा दुधंडे,आनंदराव पाटील,बाजीराव गुरव,रघुनाथ जाधव,आंनदा सावंत,शिवाजी सावंत,तानाजी लोकरे,अशोक मस्कर, महादेव घराळ, मारुती बोर्गे तसेच भरघोस मतांनी निवडून आलेल्या लोकनेते बाळासाहेब देसाई विकास सेवा सोसायटी मंद्रुळहवेली मधील काशिनाथ चव्हाण, दिपाली पानस्कर श्रीमती विमल देसाई,दिनगर चव्हाण,वसंतराव पानस्कर,विवेक यादव,मानसिंगराव कदम,रमेश चव्हाण,तुकाराम चव्हाण,शंकरराव देसाई,दत्तात्रय भिसे,लक्ष्मण कळंत्रे या विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान मौजे गारवडे सोसायटीमध्येही सत्तातंर करुन देसाई गटाने बाजी मारली असून दोन दिवसापुर्वी गारवडे येथील सत्कार समारंभामध्ये विजयी उमेदवारांचा सत्कार समारंभ गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या पार पडला होता.