दौलतनगर दि.03 (जनसंपर्क
कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- जनतेच्या
विकासाची जाण असली की अनेक विकासकांमे मार्गी लागतात याचे मुर्तींमंत उदाहरण
म्हणजे पाटण विधानसभा मतदारसंघ आहे. सन 2004, 2014 व 2019 या तीन पंचवार्षिक
निवडणूकीत पाटण मतदारसंघातील जनतेने मला या मतदारसंघाचा आमदार म्हणून काम करण्याची
संधी दिली. मतदार संघाचा आमदार म्हणून मतदारसंघातील प्रलंबीत विविध विकासकामे मार्गी
लावण्याकरीता आवश्यक असणारा कोटयावधी रुपयांचा निधी मंजुर करायला मी कुठेही कमी
पडलो नाही. आज मतदारसंघात कोटयावधी रुपयांची कामे मार्गी लागली ती विकासाची जाण
असल्यामुळेच असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी केले.
मल्हारपेठ ता.पाटण
येथील कार्यकर्ता मेळावा कार्यक्रमात ते बोलत होते.मेळाव्यापुर्वी गृहराज्यमंत्री
ना.शंभूराज देसाई यांच्या शुभहस्ते गिरेवाडी व मंद्रुळहवेली ता.पाटण येथील कोयना
नदीकाठी बांधण्यात आलेल्या संरक्षक भिंतीचे उदघाटन, येराडवाडी येथील मातोश्री
योजनेतंर्गत उभारण्यात आलेल्या ग्रामपंचायत इमारतीचा लोकार्पण, कदमवाडी-मल्हारपेठ
येथील पोहोच रस्त्याचे भूमिपुजन करण्यात आले.यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष
रविराज देसाई, युवा नेते यशराज देसाई, आदित्यराज देसाई, जिल्हा परीषद सदस्य विजय
पवार, पंचायत समिती सदस्य सुरेश पानस्कर, कारखान्याचे संचालक अशोक डिगे,आंनदराव
चव्हाण, गोरख देसाई, बबनराव भिसे, बॅकेचे संचालक सुनिल पवार,जे.एम.पवार,जयवंत
पानस्कर,सुनिल पानस्कर,गणेश कदम,बाजीराव पवार, डॉ.विजय देसाई, मानसिंगराव नलवडे,
शरद भिसे, प्रकाशराव जाधव, ॲड.मारुती नांगरे,कोयना धरण व्यवस्थापनचे कार्यकारी
अभियंता नितिश पोतदार,उपअभियंता शिवाजी पवार आदींची प्रमुख उपस्थित होती.
याप्रसंगी बोलताना ना.शंभुराज देसाई
म्हणाले, मतदार संघाचा आमदार म्हणून मी विकासकामे मार्गी लावण्याकरीता कुठेही कमी
पडलो नाही.गांवातील असो, वा वाडीवस्तीतील असो ज्या ज्या कामांची मागणी जनतेने केली,
ती मागणी पुर्ण करण्यात आपण यशस्वी झालो आहे. मतदारसंघातील गांवागावांत,
वाडीवस्तीवर मागील सात वर्षात एक-एक नाहीतर चार चार कामे मार्गी लागली आहेत.
प्राधान्याने गांवागांवाना जोडणारे रस्ते, पिण्याच्या पाण्याच्या
योजना,मंदीरांपुढे सभामंडप,सार्वजनीक सभामंडप,ग्रामपंचायतीच्या इमारती, चावडी
इमारती, नदीकाठच्या गांवाना सरंक्षण भिंती अशी विविध विकासकांमे मार्गी लागली
आहेत.मतदारसंघातील जनतेने 2004 साली मतदारसंघाचा आमदार म्हणून काम करण्याची
पहिल्यांदा संधी दिल्या नंतर मी मतदारसंघातील जनतेचे बारीकसारीक अनेक वर्षापासून
प्रलंबीत असणारे प्रश्न जागेवर सोडविण्याकरीता जनता दरबार ही संकल्पना राबविली या
माध्यमातून मतदारसंघातील अनेक जनतेचे प्रश्न मार्गी लागले आज मंत्री असलो तरी जनता
दरबार ही संकल्पना सुरुच ठेवली आहे. मागील दोन वर्षात कोरोनाचा प्रार्दुभाव होता
त्यामुळे आपल्याला जनता दरबार घेता आला नाही. मागील महिन्यात घेतलेल्या जनता दरबार
मध्ये अनेक प्रश्न जागेवर मार्गी लागले. सुरवातीला आमदार झालेनंतर जनता दरबारची
संकल्पना तत्कालीन जिल्हाधिकारी यांना सांगितली होती तेव्हा त्यांनी आमदारांना
जनता दरबार घेता येणार नाही मंत्री जनता दरबार घेवू शकतात असे सांगितले होते पण मी
तत्कालीन मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख यांना तात्काळ फोन केला त्यांना जनता
दरबारची संकल्पना सांगितली 10 व्या मिनींटात तत्कालीन मुख्यमंत्री यांचा
जिल्हाधिकाऱ्यांना फोन आला आणि त्यांनी सांगितले आमदार शंभूराज देसाईंची जनता
दरबारची संकल्पना चांगली आहे सगळे अधिकारी उपस्थित रहा. जनतेचे काम करण्याची तळमळ असेल तर सर्व काही
शक्य आहे असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.प्रास्ताविक सुरेश पानस्कर यांनी
केले आभार बाजीराव पवार यांनी मानले.
चौकट:- कांमे दया, निधी दयायचा आहे कार्यालयातून फोन
येतो.
राज्याचा मंत्री म्हणून काम करण्याची
संधी मिळाल्यानंतर मतदारसंघातील विकासकामांना निधी आणण्यात मला यश मिळाले,
मतदारसंघातील गांवागावांत मागील पंचवार्षिकमध्ये एवढी विकासांची कामे आपण मार्गी
लावली आता पदाधिकारी व कार्यकर्ते सांगतात, साहेब, तुमच्या कार्यालयातून आता
आम्हाला फोन येतो, कामे सुचवा, साहेबांनी मागितली आहेत निधीसाठी पत्र दयायचे आहे.
म्हणजे गावोंगावी विकासकामे मार्गी लागली आहेत हे याचे उदाहरण असल्याचेही ना.शंभूराज
देसाईंनी सांगितले.
No comments:
Post a Comment