Saturday 5 March 2022

साजूर,तांबवे,पश्चिम सुपने,केसे गावांना कोयना नदीकाठी घाट बांधल्याने चांगली सोय झाली. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई

         


         दौलतनगर दि.04 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- दरवर्षीच्या अतिवृष्टी व महापुराने कोयना नदीकाठ ढासळलेनं नदीपात्र रुंदावत चालले आहे.महापुराच्या पाण्याने नदीकाठच्या गावांना धोका निर्माण झाल्याने अशा धोका पोहचणाऱ्या सुपने मंडलमधील साजुर,तांबवे,पश्चिम सुपने व केसे या गांवाना कोयना नदीकाठी पुर संरक्षक भिंती व घाटांची कामे ही मागील पंचवार्षिकमध्ये आमदार असतानांच मंजुर करुन आणली होती.आज ही कामे पुर्ण झाल्याने या गांवाना महापुराचा धोका पोहचणार नसून या चार गांवात कोयना नदीकाठी घाट बांधल्याने या गावांची चांगली सोय झाली असल्याचे प्रतिपादन गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी केले.

         पाटण विधानसभा मतदारसंघातील केसे ता.कराड येथे तांबवे,पश्चिम सुपने व केसे येथील कोयना नदीकाठी उभारण्यात आलेल्या घाट व पुर संरक्षक भिंतींच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी जिल्हा परीषद सदस्य प्रदीप पाटील,बाजार समितीचे माजी संचालक प्रकाश पाटील,कराड खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष हणमंतराव चव्हाण,रयत कारखान्याचे संचालक शिवाजीराव गायकवाड,ख.वि.सं.माजी व्हा.चेअरमन प्रभाकर शिंदे,ॲड.विजयसिंह पाटील,कोयना बॅकेचे संचालक अविनाश पाटील,लक्ष्मण देसाई,शिवाजी शिंदे,पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील,पंजाबराव पाटील,चंद्रकांत पाटील,आनंदा कळके,सरपंच हासम मुजावर, आनंदराव जमाले,महादेव पाटील,भैरवनाथ पाणी पुरवठा संस्थेचे मा. चेअरमन अशोक शिंदे,रमेश शिंदे, सचिन पवार, संदीप सावंत,केसे विकास सोसायटीचे चेअरमन सर्जेराव पाटील,पांडूरंग शिंदे,मुनाफ मुलाणी,तानाजी तोरस्कर,अधिक शिंदे,बाळासो शिंदे,निजाम सुतार,लालासो सुतार,अरुण सावंत,सचिन शिंदे, सचिन पाटील,नामदेव पाटील, कोयना धरण व्यवस्थापनचे कार्यकारी अभियंता  नितिश पोतदार, उपअभियंता शिवाजी पवार आदींची प्रमुख उपस्थित होती.

             याप्रसंगी बोलताना ना.शंभुराज देसाई म्हणाले,2009 साली कराड तालुक्यातील सुपने मंडल पाटण विधानसभा मतदारसंघाला जोडल्यानंतर 2009 ते 2014 या कार्यकालात या मंडलकरीता प्रतिनिधीत्व करण्याची संधी नाही मिळाली. या कार्यकालात प्रतिनिधीत्व करणाऱ्यांचे कामकाज कसे होते हे या मंडलमधील जनतेने पाहिले आणि 2014 च्या निवडणूकीत मला विजयी करण्याकरीता खुप चांगले सहकार्य केले त्यानंतर 2019 च्या निवडणूकीतही या विभागातील नागरिक मोठया संख्येने माझ्या पाठीशी उभे राहिले.  कुणी मतदान दिले, कुणी दिले नाही याचा विचार न करता मी 2014 ते 2019 या आमदारकीच्या कालावधीत आणि आताही राज्याचा राज्यमंत्री म्हणून सुपने मंडलमधील गांवागांवात, वाडीवस्तीवर विकासाची कामे पोहचविण्याचा प्रयत्न केला.ज्येष्ठ नेते कै. विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या विचारांचा असलेला सुपने विभाग विकासकामांमुळे माझे पाठीशी ठाम उभा आहे.गत पंचवार्षिकमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून मतदारसंघात चांगले कार्य केल्याने मतदारसंघातील जनतेच्या आर्शिवादाने मंत्री होण्याची संधीही मला मिळाली.मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी आणि राज्याचा मंत्री म्हणून मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी निधी आणण्याकरीता मी कुठेही कमी पडणार नाही.पाटण विधानसभा मतदारसंघातील इतर जिल्हा परीषद गटाप्रमाणे याही जिल्हा परीषद गटाला विकासकामांच्या बाबतीत झुकते माप देण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे.विकासकामांबरोबर या विभागातील नागरिकांचे वैयक्तीक प्रश्न सोडविण्यासाठी ही माझे नेहमी प्रयत्न राहिले आणि यापुढेही राहतील असे आश्वासन त्यांनी शेवठी बोलताना दिले.प्रास्ताविक विनायक शिंदे यांनी केले आभार सचिन शिंदे यांनी  मानले.

चौकट:- मागेल त्या गांवाला विकासकामे दिली. मतांची आकडेवारी पाहिली नाही.

            मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून काम करताना मतदारसंघातील गांवे असो वा वाडयावस्त्या ज्यांनी विकासकाम मागितले त्या त्या गांवाना, वाडयावस्त्यांना आमदार, मंत्री म्हणून मी विकासकामे दिली. मतांची आकडेवारी पहात बसलो नाही. म्हणूनच मतदारसंघातील गांवामध्ये, वाडयावस्त्यांमध्ये विविध विकासकामे आज मार्गी लागलेली आपल्याला दिसून येत आहेत असेही ना.शंभूराज देसाई म्हणाले.

1 comment:

  1. लोकनेते आदरनिय कै. बाळासाहेब देसाई यांच्या विचाराया वारस म्हणजे मा शंभूराज देसाई साहेब

    ReplyDelete