Tuesday 8 March 2022

लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब यांचा दि.10 मार्च रोजी 112 वा जयंती सोहळा कार्यक्रम. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे मुंबई येथे करणार अभिवादन. कारखाना कार्यस्थळावर युवानेते यशराज देसाई,अध्यक्ष रविराज देसाईंची प्रमुख उपस्थिती.

 

                

 

            दौलतनगर दि.08:- महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,राज्याचे माजी गृहमंत्री,पाटण तालुक्याचे दैवत लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचा 112 वा जयंती सोहळा कार्यक्रम गुरुवार दि.10 मार्च, 2022 रोजी सकाळी 10.00 वा. दौलतनगर (मरळी), ता.पाटण या ठिकाणी अत्यंत साध्या पध्दतीने संपन्न होणार आहे. सदर कार्यक्रम महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक येथे आयोजीत करण्यात आला आहे. सध्या मुंबई येथे राज्य शासनाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून दि.11 रोजी राज्याचे गृह,वित्त व नियोजन राज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे विधानपरीषद सभागृहात राज्याचा अर्थसंकल्प मांडणार असल्याने ते मुंबई येथे दि.10 मार्च रोजी लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे जयंतीनिमित्त सुरुची निवासस्थानी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करणार आहेत.कारखाना कार्यस्थळा वरील कार्यक्रमास युवा नेते यशराज देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई उपस्थित राहणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

                प्रसिध्दीपत्रकात त्यांनी पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,राज्याचे माजी गृहमंत्री,पाटण तालुक्याचे दैवत लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब यांचा जयंती सोहळा प्रतिवर्षी पाटण तालुक्यात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येतो.प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी गुरुवार दि.10 मार्च, 2022 रोजी स्व.लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचा 112 वा जयंती सोहळा कार्यक्रम दौलतनगर ता.पाटण येथे महाराष्ट्र दौलतलोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक याठिकाणी आयोजीत करण्यात आला आहे.

                 गृह,वित्त,नियोजन राज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सभागृहामध्ये सादर केलेल्या सन 2020-21 च्या पहिल्याच अर्थसंकल्पामध्ये आदरणीय स्व.लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे शताब्दी स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामांकरीता 15 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली होती त्यानुसार या शताब्दी स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामांकरीता शासनाकडून प्रशासकीय मान्यता घेवून शताब्दी स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सध्या प्रगतीपथावर सुरु आहे.गृह,वित्त व नियोजन राज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे विधानपरीषद सभागृहात दि.11 रोजी राज्याचा अर्थसंकल्प मांडणार असल्याने ते मुंबई येथे दि.10 मार्च रोजी लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे जयंतीनिमित्त सुरुची निवासस्थानी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करणार आहेत.जयंती सोहळ्याचे कार्यक्रमास लोकनेते बाळासाहेब देसाई प्रेमी तसेच लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी कारखान्याचे सभासद,हितचिंतक यांनी लोकनेते बाळासाहेब देसाई यांना अभिवादन करण्याकरीता मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही शेवटी पत्रकात करण्यात आले आहे.

             चौकट:-जयंतीनिमित्त तालुकास्तरीय समित्यावर निवड झालेल्यांना समारंभात नियुक्ती पत्र मिळणार.

             राज्य शासनामार्फत तालुकास्तरावर लोककार्यासाठी ज्या काही जनहितार्थ समित्या गठीत करण्यात येतात त्या तालुकास्तरीय समित्यांवर गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे शिफारशीवरुन विविध पदाधिकारी यांच्या निवडी झाल्या आहेत. त्या पदाधिकाऱ्यांना लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे 112 व्या जयंती सोहळयानिमित्त युवा नेते यशराज देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाईंचे हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात येणार आहेत.

 

No comments:

Post a Comment