Friday 4 March 2022

दि.05 मार्च रोजी लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक,दौलतनगरला स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन सत्राचे आयोजन.

 


                दौलतनगर दि.04 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- शिवाजी विद्यापिठ कोल्हापूर,लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासन,इतिहास अधिविभाग व लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक स्पर्धा परिक्षा केंद्र,पाटण यांचे संयुक्त विद्यमाने शनिवार दि.05 फेब्रुवारी,2022 रोजी लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक स्पर्धा परिक्षा केंद्र दौलतनगर,ता.पाटण येथे स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन सत्र आयोजित केले आहे. या स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन सत्राचे उद्घाटन लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासन,शिवाजी विद्यापिठ कोल्हापूर सल्लागार समितीचे सदस्य मा.यशराज देसाई यांचे शुभहस्ते सकाळी 11.00 वा. होणार आहे.

            लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासन,शिवाजी विद्यापिठ,कोल्हापूरचे समन्वयक डॉ. अवनीश पाटील हे कार्यक्रमाचे प्रास्तावित करणार आहेत.पहिल्या सत्रामध्ये सकाळी 11.30 ते दुपारी 02.00 वा.पर्यंत या वेळेत स्पर्धा परिक्षा मार्गदर्शक मा.वैभव जगधने हे चालू घडामोडी या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.दुसऱ्या सत्रामध्ये वैध फौंडेशनचे संचालक मा.रुद्र पाटील हे पोलीस भरतीची तयारी याविषयावर मार्गदर्शन करणार असून तिसऱ्या सत्रामध्ये मा.सोमनाथ सातपुते हे इतिहास व राज्यव्यवस्था विषय तयारी या संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत.तरी पाटण विधानसभा मतदारसंघातील स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या युवक-युवतींनी या स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन सत्राला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक स्पर्धा परिक्षा केंद्राच्यावतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment