दौलतनगर दि.02 (जनसंपर्क
कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- विकासकामांच्या बाबतीत पाटण
विधानसभा मतदारसंघ जिल्ह्यात नव्हेतर पश्चिम
महाराष्ट्रात आघाडीवर राहील यासाठी लोकप्रतिनिधी म्हणुन मी नेहमीच प्रयत्नशील राहिलो
असुन मतदारसंघाचा आमदार म्हणून मतदारसंघातील विकासकामांसाठी यापुर्वी निधी कमी पडू
दिला नाही, यापुढेही कमी पडू देणार नाही.गावाच्या विकासासाठी नवनविन योजना मतदारसंघातील
जनतेने तयार करा. लागेल तो निधी व सहकार्य
करण्यास मी तयार आहे.असे आश्वासन गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी दिले.
बनपेठ ता.पाटण
येथील कोयना नदीकाठी घाट व पुर संरक्षक भिंत बांधकामाच्या भुमिपुजन कार्यक्रमात ते
बोलत होते.यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,जयराज देसाई, सदानंद
साळुंखे, भागोजी शेळके, पांडुरंग बेबले, गणीभाई चाफेरकर,अशोकराव पाटील तळीयेकर,नथुराम
सावंत, बळीराम साळुंखे,आबासो साळुंखे, प्रकाश साळुंखे, निलेश साळुंखे, यशवंत जाधव,निवृत्ती
कदम,सुदर्शन वाईकर,नवनाथ सुर्यवंशी,आनंदा लाड, विजय बाबर, कोयना धरण व्यवस्थापनचे कार्यकारी
अभियंता नितिश पोतदार,उपअभियंता शिवाजी पवार आदींची प्रमुख उपस्थित होती.
याप्रसंगी बोलताना ना.शंभुराज देसाई
म्हणाले, लोकनेते बाळासाहेब देसाई याचेनंतर देसाई कुटुंबांत मंत्री होण्याची संधी
महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिली त्यांनी महत्वाची पाच
खात्याचे राज्यमंत्री म्हणुन मंत्रिमंडळात माझा समावेश केला.मंत्रीपदाच्या
शपथविधीनंतर काही कालावधीत कोरोनामुळे राज्याची आर्थिक कोलमडल्याने विकासकामाची
गती मंदावली होती आता परिस्थिती बदलत असुन हळूहळू पुर्वपदावर येऊ लागली आहे.विकासकामाना
निधी मिळु लागला आहे. दरवर्षीच्या अतिवृष्टी व महापुराने कोयना नदीकाठ ढासळलेनं नदीपात्र रूंदावत आहे,
पुराच्या पाण्याने गावांना धोका निर्माण झाल्याने पुर संरक्षक भिंती बांधण्यात येत
आहे. पाटण विधानसभा मतदारसंघात आपण सन 2014 ते 2019 या आमदारकीच्या काळात 10
गांवाकरीता कोयना नदीकाठी घाट व पुरसंरक्षक भिंतीची कामे आपण मंजुर करुन आणली
यातील 07 कामे पुर्ण झाली आहेत. बनपेठ येथील पुर संरक्षक भिंतीचेही लवकरच काम
पुर्ण होईल.
कोयना
नदीकाठावर निसर्गरम्य परिसरात येडोबा मंदीर असुन दरवर्षी
मोठी यात्रा भरत असते, वर्षभर देवदर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते या मंदिर
परिसराच्या विकासासाठी सर्वानी सकारात्मक विचाराने एकत्र येऊन या परिसराचा विकास
करुन घ्यावा मी मंत्री म्हणुन सर्वतोपरी मदतीसाठी कमी पडणार नाही असे शेवटी
सांगितले या कार्यक्रमास परिसरातील
गावचे सरपंच, पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक
दिलीपराव सपकाळ आभार राजेंद्र पुजारी यांनी मानले.
चौकट:- येडोबा देवस्थानचा ब वर्ग चा प्रस्ताव सादर
करा.
येडोबा देवस्थान हे पश्चिम
महाराष्ट्रातील जागृत देवस्थान असून दर्शनाकरीता पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटक
राज्यातील भाविक दर्शनासाठी येत असतात. या देवस्थानला राज्य शासनाचा ब वर्गचा
दर्जा प्राप्त झाल्यास राज्य शासनाकडून भरघोस असा निधी येडोबा देवस्थानच्या
विकासासाठी उपलब्ध होईल याकरीता ब वर्गचा प्रस्ताव सादर करा याच्या मंजुरीसाठी
शासनस्तरावर मी स्वत: प्रयत्न करेन असेही ना.शंभूराज देसाईंनी यावेळी बोलताना
सांगितले.
No comments:
Post a Comment