Wednesday, 10 July 2024

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून मातोश्री ग्रामसमृध्दी शेत / पाणंद रस्ते योजना अंतर्गत पाटण विधानसभा मतदार संघातील 47 गावातील 118 कि.मी.अंतराच्या पाणंद रस्त्यांच्या कामांना मंजूरी

 


दौलतनगर दि.10 :- पाटण या डोंगरी व दुर्गम भागामधील अनेक गांवामध्ये शेत पाणंद रस्ते अरुंद व ना दुरुस्त असल्याने या रस्त्यावरुन शेतीशी निगडीत  विविध बाबींसाठी कमी प्रमाणात या रस्त्यावरुन वहिवाट होत होती शेतीच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या शेत पाणंद रस्त्यांची कामे मार्गी लागणे गरजेचे असल्याने पाटण मतदारसंघातील शेत/पाणंद रस्त्यांची प्रलंबित असलेली कामे तातडीने मार्गी लागण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री व सातारा,ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण मतदारसंघातील 47 गावातील तब्बल 118 कि.मी.लांबीच्या शेत/पाणंद रस्त्यांची कामे ही राज्य शासनाने नव्याने सुरु केलेल्या मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजनेतून मंजूर होण्यासाठी तत्कालीन रोजगार हमी मंत्री ना.संदिपान भुमरे यांचेकडे शिफारस केली होती.त्यानुसार पाटण मतदारसंघातील 47 गावातील सुमारे 118 कि.मी.लांबीच्या शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांचा समावेश हा मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजनेच्या सन 2024-25 या आर्थिक वर्षाच्या आराखडयामध्ये समावेश करत या शेत/पाणंद रस्त्यांना मंजूरी देण्यात आली असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाचे नियोजन विभाग(रोहयो) यांनी पारित केला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचे वतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

          प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, महाराष्ट्र हे शेतीप्रधान राज्य असून राज्यातील शेतकरी हिताच्यादृष्टीने अनेक निर्णय राज्य शासनाचेवतीने घेण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना शेतीचे मशागतीचे साहित्य व शेत मालाची वाहतूक करण्यासाठी शेत पाणंद रस्त्यांची सुविधा नसल्याने स्थानिक शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शेत पाणंद रस्त्यांची कामे झाल्यास शेतकऱ्यांच्या बांधावर वाहन जाऊन शेती विषयक कामे जलदगतीने पुर्ण होण्यास मदत होणार आहे. पाटण विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांची शेत/पाणंद रस्त्यांअभावी होणारी गैरसोय लक्षात घेऊन राज्य शासनाच्या रोजगार हमी विभागाकडे शेत/पाणंद रस्ते मंजूर होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. त्यामुळे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून सन 2021-22 व सन 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये मातोश्री  ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजनेअंतर्गत आतापर्यंत पाटण विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत 135 गावांतील 209 कि.मी. लांबीच्या,सन 2023-24 या आर्थिक वर्षाच्या पुरवणी आराखडयांतर्गत 151 गावांतील तब्बल 297 कि.मी.लांबीच्या शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांचा समावेश करुन या कामांना मंजूरी देण्यात आली होती. तर सन 2024-25 या आर्थिक वर्षाच्या आराखडयामध्ये 47 गावातील 118 कि.मी.लांबीच्या शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांना मंजूरी देण्यात  आली असून मंजूर शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांची गावे व अंतर आंबळे गावठाण ते जांबळपट्टी 1 किमी, आंबळे चांभार वाडा ते जांभळपटी ढोरोशी 1 किमी, आंब्रुळे बेलवडे रस्ता ते एम.एस.ई.बी.फिडर 2 किमी, आवर्डे मातंगवस्ती ते तलाव काटे यांची शेती 1 किमी, कडवे बु दत्त मंदिर ते वाघजाईचा माळ 2 किमी, कडवे बुद्रुक माळवाडी ते भैराबाचा सडा 2 किमी, कळंबे हायुस्कूल ते कळंबे गावठाण 2 किमी, कुंभारगाव मातेपट्रटी ते मोरेवाडी 1 किमी, कुसरुंड कोळेकरवस्ती ते सुतारवस्ती 1 किमी, कुसरुंड मोरेवस्ती 1 किमी, कोंजवडे गाडंगवड ते पड क्षेत्र 1 किमी, कोंजवडे गावाचा आड ते 10 बीगा क्षेत्र 2 किमी, कोकीसरे नवलाई पालखी 2 किमी, खबालवाडी ते भगतवाडी 2 किमी, गलमेवाडी पूर्व आळी ते येवती रस्ता 1 किमी, गलमेवाडी मावळ आळी ते रान पट्टा 1 किमी, गलमेवाडी रामचंद्र चोरगे यांचे घर ते पाटील आळी 2 किमी, गायमुखवाडी बांबवडे ते जळव 2 किमी, गारवडे बहुले ते गारवडे मार्गे साजूर 2 किमी, घोटील शंकर गणपती पवार यांचे घर ते यशवंत मारुती पवार यांचे घर 1 किमी, घोटील शांताराम हरी पवार यांचे घर ते मुख्य रस्ता 1 किमी, चव्हाणवाडी धामणी सुनिता घराळ यांचे घर ते महादेव मंदिर  2 किमी, चोपदारवाडी कारखाना पेट्रोल पंप ते पाटलांचा दरा ते पाचवड 1.5 किमी, चोपदारवाडी घावरखडी ते पाटलाची विहिर सिंधी 2 किमी, जन्नेवाडी घोट ते बोर्गेवाडी 2 किमी, जाधववाडी लोरेवाडी फाटा नुने ते नदी 1 किमी, डफळवाडी  बस स्टँड ते सावार मळी बाराभाई  2 किमी, डफळवाडी होळीची पट्टी ते बनारवाली 1 किमी, डावरी गावठाण ते वाल्मिकी रोड 2 किमी, ढोरोशी नार गौंडी ते जांभळीची पटी 1 किमी, तारळे इनाम शिवार 1 किमी, तारळे धुरुंग शिवार 1.5 किमी, तारळे मांगझडी राहुडे शिवार 1 किमी, दुटाळवाडी नुने ते महादेव मंदिर शिवार 500 मी., दुटाळवाडी नुने ते मातंगवस्ती 2 किमी, धनगरवाडी तारळे जुना घोट 1 किमी, निवडे पूनर्वसन ते नार गौंडी 1.5 किमी, नुने पाटीलवस्ती ते टेकचा मळा 1.5 किमी, नुने दुटाळवाडी माळवस्ती ते लिंबाची पटी 1 किमी, पाडेकरवाडी मालोशी बळवंत कृष्णा पवार यांचे घर ते मधेलेाडी शिवार 1.5 किमी, पाडेकरवाडी मालोशी शामराव पवार यांचे घर ते बाबरापर्यंत 2 किमी, पापर्डे कुंभारकी ते देऊळ 2 किमी, पापर्डे देऊळ ते पाऊदका 2 किमी, पापर्डे देशमुख आळी ते डवरी यांचे शेतापर्यंत 2 किमी, फडतरवाडी घोट ते जंगला आंबेळे गाव हद्द 2 किमी, फडतरवाडी घोट ते बुरंबुडी पाण्याचा विहिर 2 किमी, फडतरवाडी बोर्गेवाडी घोट 1 किमी, बनपूरी बौध्दसमाज शेती 1 किमी, भुडकेवाडी डोंगराकडे जाणारा पाणंद 2 किमी, भैरेवाडी ढोरोशी भैरवनाथ मंदिर ते माऊली सडा 2 किमी, मणदुरे जळव पाटण रस्ता ते बामणवस्ती ब्रम्हाचा खडक 1.5 किमी, माजगाव ऊरुल माजगाव रस्ता ते चाफळ 2 किमी, माजगाव वेताळबा ओढा ते सुरेश जाधव शेड 1.5 किमी, मुळगाव नावेचा गौंड ते मुळगाव कवरवाडी  1 किमी, मुळगाव यमाई देवी मंदिर ते जोतिर्लिंग गुरवाळ 1 किमी, मेंढोशी बंडू तबलजी यांचे घर ते स्मशानभूमी 1 किमी, मेंढोशी वेताळबा ते ओड 1 किमी, मेंढोशी वरची फाटा ते ओड 1.5 किमी, रासाटी नवलाई मंदिर ते शेत 1 किमी, राहुडे मेन रोड ते डोंगर रस्ता बगा 1.5 किमी, वजरोशी जूनी चिंचेवाडी गावठाण ते वजराई देवी मंदिर 1 किमी, वजरोशी तारळे पाटण रोड ते हायस्कूल पर्यंत1 किमी, वजरोशी बाबू शिंदे यांचे घर ते तारळे चिंचेवाउी जूना पाणंद 1 किमी, वजरोशी शिवारातून खडकवाडी 1.5 किमी, वजरोशी स्टँड ते पडसाळ रोडपर्यंत 2 किमी, वाघळवाडी ढोरोशी ते जांभेकरवाडी 2 किमी, वाडीकोतावडे कमानीपासून मोरणा नदीपर्यंत 1 किमी, वाडीकोतावडे तुकाराम बाळा सुर्वे यांचे घर ते तुकाराम सुर्वे यांच्या बागेपर्यंत 500 मीटर, वाडीकोतावडे वाडीकोतावडे ते टकलेवाडी नाटोशी 1.5 किमी, वाडीकोतावडे विष्णू सर्वे यांचे घर ते श्रीरंग गणपत सुर्वे यांचे घर 500 मीटर, वेखंडवाडी ते करमाळे 2 किमी, वेताळवाडी आनंदा चव्हाण यांचे शेत ते तुकाराम पवार यांचे शेत 1 किमी, वेताळवाडी  खडी ते इरिगेशन 1.5 किमी, वेताळवाडी गावठाण ते बाबूराव केशव पवार यांची विहिर 1.5 किमी, शिंगणवाडी ग्रामपंचायत ते शामराव सखराम पवार यांचे घरापर्यंत 1.5 किमी, सुळेवाडी नाईकबाचा वाडा ते जळकेवाडी पाणंद 1 किमी, सोनाईचीवाडी नाना शिवा घर ते दहाबिगा 1 किमी, सोनाईचीवाडी नाना शिवा जाधव ते खारुती 2 किमी, सोनाईचीवाडी रामचंद्र राजाराम विभूते ते निनाई मंदिर 1.5 किमी, सोनाईचीवाडी  सोनाई मंदिर ते पडसाळ 2 किमी, सोनाईचीवाडी स्मशानभूमी ते कोंढार 1 किमी, हेळवाक कराड चिपळूण रोड ते स्मशानभूमी 1 किमी या गावांतील पाणंद रस्त्यांच्या कामांचा समावेश असल्याचे शेवटी पत्रकांत म्हंटले आहे.

Thursday, 4 July 2024

ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून वाटोळे येथे होणार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे राज्यातील पहिले प्रशिक्षण केंद्र. वाटोळे येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे स्वतंत्र प्रशिक्षण केंद्रासाठी 93 कोटी 34 लक्ष निधी मंजूर.

 


दौलतनगर दि.04:- राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी वाटोळे येथे प्रशिक्षण केंद्र होण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना.शंभूराज देसाई हे सातारा जिल्हयाचे सुपूत्र व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांचेकडे सत्तचा पाठपुरावा करत होते. तत्पुर्वी वाटोळे येथील प्रशिक्षण केंद्राच्या प्रस्तावित जागेची पाहणी ना. शंभूराज देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह करत या प्रशिक्षण केंद्राचा मंजूरीचा प्रस्तावीत आराखडा तातडीने शासनाकडे सादर केला होता. सादर केलेला प्रस्ताव सातारा जिल्हयाचे सुपूत्र व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांनी सकारात्मकता दर्शवत मान्य केला होता.त्यानुसार वाटोळे येथे ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे 19.16 हे. आर. क्षेत्रात उभारण्यात येणाऱ्या राज्यातील पहिल्या अद्यावत अशा सर्व सोयीनीयुक्त स्वतंत्र प्रशिक्षण केंद्राचे  इमारतीचे बांधकामसाठी 93 कोटी 34 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाल्या असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाचे गृह विभागाने  दि. 03 जुलै 2024 रोजी पारित केला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

          पत्रकांत पुढे म्हंटले आहे की, ना.शंभूराज देसाई यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे काम पाहताना या विभागाचे महसूल वाढीसाठी तसेच अधिकारी व कर्मचारी यांना सर्व सुविधा देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत.त्यासाठी नवनवीन योजना राबवत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कामकाजामध्ये सुधारणा करुन गतिमान होण्यासाठी प्राथमिकता दिली. त्याचाच एक भाग म्हणून पालकमंत्री ना.शंभूराज देसाई हे राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी स्वतंत्र प्रशिक्षण केंद्रासाठी ना.शंभूराज देसाई हे सातत्याने प्रयत्नशील  होते. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांनी राज्य  उत्पादन शुल्क विभागाचे स्वतंत्र प्रशिक्षण केंद्रासाठी सकारात्मकता दर्शवत या प्रशिक्षण केंद्रास मान्यता दिल्याने पाटण तालुक्यात वाटोळे येथे प्रशिक्षण केंद्राच्या रुपाने महत्त्वपूर्ण शासकीय आस्थापना उभारली जाणार असून पाटण तालुक्यातील वाटोळे येथील एकूण 19.16 हे.आर. क्षेत्रामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागासाठी राज्यातील पहिले स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र बांधकाम करण्यासाठी 93 कोटी 34 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाल्या असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाचे गृह विभागाने  दि. 03 जुलै 2024 रोजी पारित केला असून  या प्रशिक्षण केंद्रासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग ही कार्यानिवत यंत्रणा निश्चित केली आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रशिक्षण केंद्रामुळे अधिकारी,जवान,कर्मचारी यांची क्षमता वृध्दी होण्यास मदत होणार असून या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून सायबर सेल कार्यान्वित होणार असून अवैध मद्य विक्री व निर्मिती,अन्य राज्यातून आवक होणारे अवैध मद्य विक्री व वाहतूक रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाया व गुन्हे नोंद करण्यात येणार असून सदर गुन्हे नोंदवणे, त्याचा तपास करुन गुन्हे सिध्द करण्याच्यादृष्टीने हा सायबर सेल उपयुक्त ठरणार आहे. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना अद्ययावत तंत्रज्ञानाचे तसेच कायदेविषयक व शारिरीक प्रशिक्षण देणे आवश्यक असते मात्र उत्पादन शुल्क विभागाचे स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र नसल्याने विभागाला पोलीस प्रशिक्षण केंद्रावर अवलंबून रहावे लागत होते. तसेच 51 नवीन पदे प्रशिक्षण केंद्रासाठी मंजूर करण्यात आली असून सुरुवातील दोन वर्षे पोलीस विभागातील प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य यांची प्रतिनियुक्तीवर सेवा घेऊन प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

चौकट:- राज्य उत्पादन शुल्क विभागाचे राज्यातील पहिले प्रशिक्षण केंद्र वाटोळे येथे होणार.

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी गत चार वर्षामध्ये आपल्या विभागामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबविताना दिसत असून आपल्या वेगळया कार्यशैलीमधून या विभागामध्ये उठावदार कामगिरी  करताना दिसत आहेत.ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून पाटण तालुक्यातील डोंगरी व दुर्गम भागातील वाटोळे येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे राज्यातील पहिले प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार असल्याने भविष्यामध्ये या विभागामध्ये दळणवळणासह स्थानिकांना रोजगार निर्मिती तसेच लहान मोठया उद्योगांना चालना मिळणार असल्याने येथील स्थानिकांचा याचा निश्चितच चांगला फायदा होणार असून वाटोळे व आसपासच्या परिसराचा कायापालट होण्यास मदत होणार आहे.




Monday, 1 July 2024

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत 90 गावांतील सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामांना वाढीवचा 22 कोटी 50 लक्ष रुपयांचा निधी मंजूर.

 

 


 

दौलतनगर दि.01:- राज्य उत्पादन शुल्क मंत्री व सातारा,ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील 90 गावांतील अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत निधी मंजूर होण्यासाठी रोजगार हमी विभागाकडे शिफारस केली होती.ना.शंभूराज देसाई यांचे शिफारशीनुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील 90 गावांतील अंतर्गत रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरणाचे कामांसाठी 22 कोटी 50 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाचे नियोजन विभाग (रोहयो) यांनी पारित केला असल्याची माहिती  पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचे वतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

          प्रसिध्दींस दिलेल्या पत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण या डोंगरी व दुर्गम भागातील अनेक गावांतील रस्त्यांची प्रतिवर्षी होणाऱ्या अतिवृष्टीमुळे मोठया प्रमाणांत नुकसान होत असते. त्यामुळे या गावांतील ग्रामस्थांची दळण वळणाची मोठी गैरसोय होत असल्याने अनेक गावांतील अंतर्गत रस्त्यांच्या कामांना निधीची गरज होती. पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील 90 गावांतील अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामांना निधी मंजूर होण्यासाठी शिफारस केली होती. पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे शिफारशीनुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील तब्बल 90 विविध गावांतील अंतर्गत रस्त्यांच्या कामांना प्रत्येक गावनिहाय 25 लाख या प्रमाणे एकूण 22 कोटी 50 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचा शासन निर्णय  राज्य शासनाचे नियोजन विभाग (रोहयो) यांनी पारित केला आहे. मंजूर झालेल्या कामांमध्ये रामिष्टेवाडी,सलतेवाडी वाझोली,डाकेवाडी वाझोली,कसणी,भरेवाडी काळगाव,लोहारवाडी काळगाव,शिद्रुकवाडी वरची खळे, चाळकेवाडी निवडुंगे आळी,माटेकरवाडी नं.1,गुढे,पाचुपतेवाडी ग्रा.प.,जांभूळवाडी कुंभारगाव,शिद्रुकवाडी ग्रा.प.,डूबलवाडी शिद्रुकवाडी,खळे,मानेगाव,गलमेवाडी,देवघर गोवारे,हेळवाक,गोषटवाडी,कडववाडी नाणेगाव बु.,माथणेवाडी चाफळ भैरवनाथ मंदिर,बाटेवाडी पाठवडे,बोर्गेवाडी भैरेवाडी डेरवण,जितकरवाडी जिंती,भोसगाव,काटकरवाडी मंद्रुळकोळे, उमरकांचन, कोळेकरवाडी, उधवणे,पाणेरी,उधवणे जोतिर्लिंग मंदिर,सळवे,डांगीष्टेवाडी सुंदरनगर,पांढरवाडी तारळे,आंबेवाडी घोट,फडतरवाडी घोट,वेखंडवाडी,दुसाळे,तारळे,करमाळे वजरोशी,जन्नेवाडी‍ घोट,ढोरोशी,गर्जेवाडी कडवे,घाटेवाडी मालोशी,कडवे बुद्रुक,काढोली, सुतारवस्ती कुसरुंड,कोळेकरवाडी कुसरुंड,पाचगणी केदारर्लिंग मंदिर,दिक्षी,मणेरी,कवरवाडी,नेरळे,डोंगरुबाचीवाडी मुळगाव, आडदेव,बेलवडे खुर्द,विहे बौध्दवस्ती,ठोमसे,गणेवाडी ठोमसे,मल्हारपेठ,ऊरुल,बोडकेवाडी,सोनाईचीवाडी,आसवलेवाडी,बहुले, पापर्डे,सोनवडे,बहुले,बोर्गेवाडी पुनर्वसन सांगवड,चोपदारवाडी,डफळवाडी मणदुरे,येराड,बनपेठ येराड,लुगडेवाडी सोनगाव, पिंपळोशी बौध्दवस्ती,फुरसाई दिवशी खुर्द,मळयाचावाडा दिवशी खुर्द,वाघाचीवाडी नायकवाडीवाडी दिवशी खुर्द,मराठवाडी दिवशी खुर्द,टोळेवाडी,दिवशी खुर्द धोरश्वर मंदिर,मिसाळवाडी मरड,कुसवडे,खुडुपलेवाडी गावडेवाडी,धुईलवाडी गावडेवाडी,वस्ती साकुर्डी,म्होप्रे,पाठरवाडी (गमेवाडी),आरेवाडी या गावांतील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरणाचे कामांचा समावेश आहे.पाटण विधानसभा मतदारसंघातील एकाच वेळी तब्बल 90 गावांतील अंतर्गत रस्त्यांची कामे तातडीने मार्गी लागण्यासंदर्भात पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी अधिकारी यांना सूचना केल्या असल्याची माहिती शेवटी प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

Wednesday, 5 June 2024

लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याकडून रुपये 150/- प्र.मे.टन प्रमाणे ऊसबिल बँक खाती वर्ग. चेअरमन यशराज देसाई यांची माहिती.

 



दौलतनगर दि.5: लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने सन 2023-24 चा गळीत हंगाम राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली कारखाना व्यवस्थापनाने यशस्वीपणे पार पाडत गळीतास आलेल्या ऊसाच्या एफ.आर.पी.पोटी रु. 150/- प्र.मे.टन प्रमाणे होणारी रक्कम रु.336,62 लाख संबंधित ऊस पुरवठादारांच्या बँक खाती आजरोजी वर्ग करण्यात आली असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

        पत्रकात पुढे म्हंटले आहे की, आपले लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने सन 2023-24 चे गळीत हंगामामध्ये 2,24,413.652 मे.टन ऊस गाळप करुन सरासरी 11.98 टक्के साखर उताऱ्याने 2,68,775 क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.कारखान्याची सन 2023-24 चे गळीत हंगामामध्ये पहिली उचल एफ.आर.पी.पोटी रु.2500/- प्र.मे.टन प्रमाणे यापूर्वीच रु. 5610.34 लाख रक्कम ऊस पुरवठादारांना अदा केली आहे. तसेच उर्वरित एफ.आर.पी.पोटी रक्कम रु. 150/- प्र.मे.टन प्रमाणे रु.336.62 लाख आज संबंधित ऊस पुरवठादारांच्या बँक खाती 5 जुन 2024 रोजी वर्ग केली असून ऊस पुरवठादारांनी संबंधित सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या  शाखेशी संपर्क साधावा असे ही म्हंटले आहे. ते पुढे म्हणाले की,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक व महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री तसेच सातारा,ठाणे जिल्हा पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली कारखाना व्यवस्थापनाने आर्थिक नियोजन करुन सन 2024-25 च्या गळीत हंगामाची तयारी सध्या सुरु केली असून ऊस तोडणी वाहतूकीचे कराराचे काम  सुरु आहे. कारखान्याचे आधुनिकीकरणासह विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाले असून  कारखान्यातील आँफ सिजन मेंटेनन्सचे कामकाज प्रगतीपथावर आहे.साखरेच्या दरातील अस्थिरता व मोलॅसेसवर निर्यात बंदी केल्याने दरात झालेली घसरण यामुळे सर्व साखर उद्योगाला अडचण निर्माण झाली असून त्यावर नियोजन करुन उर्वरित शिल्लक एफ.आर.पी.पोटी देय रक्कम लवकरच अदा करण्याचा कारखाना व्यवस्थापनाचा प्रयत्न राहणार आहे.  तरी कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक सभासद शेतकरी यांनी आपला पिकविलेला सर्व ऊस आपले लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यास नोंद करुन  सन 2024-25 चा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहनही शेवटी  चेअरमन यशराज देसाई यांनी प्रसिध्दी पत्रकांत केले आहे.

Sunday, 26 May 2024

ना.शंभूराज देसाई यांनी सांगवड येथील कोयना नदीवर सुरु असलेल्या पूलाच्या कामाची केली प्रत्यक्ष पाहणी.

 


दौलतनगर दि.25:- नाडे सांगवड ढेबेवाडी  रस्त्यावर कोयना नदीवर सांगवड गावाजवळ जुन्या पुलाच्या शेजारी नवीन मोठया पुलाचे बांधकाम करण्यासाठी  राज्याचे अर्थसंकल्पातून 18 कोटी रुपयांचा निधीतून मंजूर असलेल्या नवीन पुलाच्या कामाला 1 फेब्रुवारी 2024 ला सुरुवात झाली असून पाटण विधानसभा मतदारसंघातील राज्य मार्गा तसेच प्रमुख जिल्हा मार्ग,ग्रमीण मार्गावरील पुलांचे कामांसाठी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी राज्य शासनाचे विविध लेखाशिर्षाखाली भरघोस निधी मंजूर केला आहे. या मंजूर निधीतून सध्या पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये  काही मोठया पूलांची कामे पूर्णत्वास गेली आहेत तर काही पूलांची कामे ही सध्या प्रगतीत असून लवकरच या पूलांची कामे  पूर्णत्वाकडे जाणार आहेत.या पैकी  नाडे सांगवड ढेबेवाडी  रस्त्यावर कोयना नदीवर सांगवड गावाजवळ नवीन मोठया पुलाचे कामाची पाहणी आज पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी कोयना नदीवरील सांगवड येथील पुलाच्या कामाची अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी  केली.

            पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये दळण वळणाच्यादृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग तसेच ग्रामीण मार्ग या मोठया रस्त्यांवरील अनेक पूल हे सत्तच्या अतिवृष्टीमुळे नादुरुस्त झाल्याने व अतिवृष्टीच्या कालावधीत पुराच्या पाण्याखाली जात असल्याने या रस्त्यांवरील वाहतूक विस्कळीत होत असल्याने या मार्गावरुन ये-जा करणाऱ्या प्रवाशी व नागरीक यांचे दळण-वळणाचे मोठे हाल होत होते. दरम्यान सन 2021 साली पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये मोठया प्रमाणांत झालेल्या अतिवृष्टी मुळे दळण वळणाचे मुख्य रस्त्यांवरील अनेक पूलांचे अतोनात नुकसान झाल्याने या पूलांवरील वाहतूक बंद होऊन नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या पूलांचे पुनर्बांधणीसाठी तसेच काही ठिकाणी नव्याने पूल उभारणे आवश्यक असल्याने पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी राज्य शासनाचे विविध लेखाशिर्षाखाली भरघोस निधी मंजूर केला असून या मंजूर निधीतून सध्या पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये  काही मोठया पूलांची कामे पूर्णत्वास गेली आहेत तर काही पूलांची कामे ही सध्या प्रगतीत असून लवकरच या पूलांची कामे  पूर्णत्वाकडे जाणार आहेत.या पैकी  सांगवड पूलाच्या कामाच्या प्रगतीचा आढावा यावेळी त्यांनी  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून घेत या सांगवड पूलाच्या कामा संदर्भात काही सूचनाही अधिकाऱ्यांना केल्या.दरम्यान पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये गत पाच वर्षामध्ये पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून कोयना नदीवरी त्रिपुडी येथील पूलासाठी 20 कोटी, मोरणा नदीवरील आंब्रुळे पूलासाठी 8 कोटी, गोकूळ तर्फ पाटण येथील पूलासाठी 7 कोटी 60 लक्ष, बेलवडे खुर्द पूलासाठी 6 कोटी 65 लाख, तारळी  नदीवरील तारळे पूलासाठी 8 कोटी,  आंबळे पूलासाठी 6 कोटी 50 लक्ष, वांग नदीवरील मंद्रुळकोळे पूलासाठी 6 कोटी 50 लक्ष, बाचोली पूल 5 कोटी, काढणे पुल 5कोटी, खळे पूल 5 कोटी, भालेकरवाडी बनपूरी पूल 4 कोटी ,काजळी नदीवरील काढोली पूलासाठी 5 कोटी, केरा नदीवरील देवघर पूल 2 कोटी 50 लक्ष, गावडेवाडी  ते खुडुपलेवाडी येथील  छोटापूल 2 कोटी 50 लक्ष,माईंगडेवाडी पूल 2 कोटी 50 लक्ष, काटेवाडी आवर्डे मुरुड मालोशी रस्त्यावर पूल 2 कोटी 45 लक्ष,भोसगाव आंब्रुळकरवाडी नवीवाडी रुवले पाणेरी रस्त्यावर पूल 3 कोटी व ढेबेवाडी सणबूर महिंद  नाटोशी रस्त्यावरील पूल 4 कोटी अशा मोठया 18 पूलांचे कामांसाठी 117 कोटी 25 लक्ष रुपयांचा तर भारसाखळे रस्त्यावरील पूल 2 कोटी 10 लक्ष, कसणी पूल 2 कोटी , काटेवाडी आवर्डे मुरुड मालोशी रस्त्यावर पूर 1 कोटी 90 लक्ष, काठी टेक चाफोली दिवशी खुर्द रस्त्यावर पूल 1 कोटी 80 लक्ष, धायटी येथील पूल 1 कोटी 50 लक्ष, कवरवाडी पूल 1 कोटी 50 लक्ष, चाफोली दिवशी खुर्द चिटेघर केर रस्त्यावर पूल 1 कोटी, सणबूर रुवले तामिणे वाल्मिकी रस्त्यावर पूल 1 कोटी,पवारवाडी कुठरे पूल 98 कोटी 26 लाख, मोरगिरी आडदेव आंब्रुळे बेलवडे खुर्द रस्ता कोळीवस्तीजवळ पूल 95 लाख, हुंबरणे ते पांढरेपाणी रस्त्यावर पूल 80 लक्ष, वाघजाईवाडी जवळ पूल 63 लाख,हुंबरळी पूल 62 .69लाख, नेरळे पूल 51.58 लाख, सणबूर रुवले तामिणे वाल्मिकी रस्त्यावर कोलदकाटा कुरु येथे पूल 40 लाख व वनकुसवडे ते पळासरी येथे पूल 35 लाख या 16 लहान पूलांचे कामासाठी 18 कोटी 05 लाख  असा 34 पूलांचे कामांसाठी 135 कोटी 30 लाख 59 हजार एवढा राज्य शासनाचे विविध लेखाशिर्षाखाली भरघोस निधी मंजूर केला असून  काही पुलांची कामे पुर्णत्वास गेली असून उर्वरीत पूलांची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत.

चौकट : ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून मतदरसंघात रस्त्यांबरोबर पूलांचेही जाळे.

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण या डोंगरी व दुर्गम भागात वसलेल्या गावांचे दळण वळणाचेदृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या रस्त्यांचे पुनर्बांधणीसाठी  राज्य शासनाच्या विविध लेखाशिर्षाखाली भरघोस निधी मंजूर करुन आणला असून रस्त्यांची कामे पूर्णत्वाकडे जात आहेत. पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी रस्त्यांचे कामांबरोबर बारमाही वाहतूकीसाठी आवश्यक असलेल्या ठिकाणी मोठे व छोटे पूल याही कामांना प्राधान्य देऊन या पूलांचे कामांसाठीही निधी मंजूर करत प्रत्यक्ष पूलांची कामे मार्गी लावल्याने ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून मतदारसंघात रस्त्यांबरोबर पूलांचेही जाळे निर्माण झाले आहे.

         

Monday, 20 May 2024

ताईसाहेबांनी देसाई कुटुंबाला दिशा देण्याची पुण्याई केली ना.शंभूराज देसाई.

 



 

दौलतनगर दि.20:-लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या मंत्रिपदाचे वैभव,सुख यांचा उपभोग दुर्दैवाने ताईसाहेबांना फार काळ घेता आला नाही. मात्र  देसाई कुटुंबावर चांगले संस्कार करून या कुटुंबाला नवी दिशा देण्याचे खऱ्या अर्थाने पुण्याईचे काम त्यांनी केले.असे भावनिक उद्गार राज्याचे उतपादन शुल्कमंत्री तथा सातारा आणि ठाण्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी  केले. ते “महाराष्ट्र दौलत” लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक दौलतनगर,ता.पाटण येथे लोकनेते यांच्या धर्मपत्नी कै.सौ.वत्सलादेवी देसाई यांच्या ६५ व्या पुण्यतिथी कार्यक्रम आणि महिला पदाधिकारी मेळावा व विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रम अशा संयुक्त कार्यक्रमात करताना बोलत होते.यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, लोकनेते बाळासाहेब सहकारी साखर देसाई कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई,महाराष्ट्र राज्य दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा डॉ मछिंद्र सकटे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जयवंतराव शेलार, दिलीपराव चव्हाण,अशोकराव पाटील, मिलिंद पाटील, विजय पवार, संजय देशमुख, बाळासाहेब पाटील, विलास गोडांबे  ,पंजाबराव देसाई, आर.बि.पवार, दिपाली पाटील, श्रीमती जयश्री पवार,सौ. वैशाली शिंदे, तसेच पाटण विधानसभा मतदार संघातील विविध संस्थाचे महिला पदाधिकारी, कार्यकर्ते,पालक शिक्षक विद्यार्थी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  मंत्री ना.देसाई म्हणाले,महाराष्ट्राचे पोलादी पुरुष आणि राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या धर्मपत्नी कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचा  पुण्यतिथी कार्यक्रम लोकनेत्यांच्या जन्म शताब्दी वर्षापासून साजरा केला जात आहे.प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्त पाटण विधानसभा मतदारसंघातील गरीब कुटुंबातील गरजू मुलींना दहावीनंतरचे महाविद्यालयीन शिक्षण घेणेकरीता कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे नावाने सुरु असलेल्या शिष्यवृत्तीचे वितरण करताना आपल्याला खऱ्या अर्थाने समाधान वाटत आहे.

पाटण तालुक्याचा चौफेर विकास आणि प्रगती ही लोकनेते बाळासाहेब  देसाई यांनी त्याकाळी केलेल्या मूलभूत सुविधांच्या विकासामुळे आहे. त्यामुळे तालुक्याचा विकास हा लोकनेत्यांनी रचलेला पाया असल्याचे सांगून कोणत्याही यशस्वी पुरुषांच्या मागे कर्तबगार स्त्रीचा हातभार असतो त्याचप्रमाणे लोकनेते कोणत्याही कठीण प्रसंगाला सामोरे गेले.मात्र लोकनेत्यांच्या मंत्रिपदाचे वैभव,सुख,मानसन्मान त्यांना दुर्दैवाने फार काळ उपभोगता आले नाही. देसाई घराण्यातील मुलांवर चांगले संस्कार करून देसाई कुटुंबाला दिशा देण्याची महान पुण्याई ताईसाहेबांनी केली.दुर्दैवाने लोकनेत्यांना ही त्यांची साथ फार काळ लाभली नाही.असे स्पष्ट करून पाटण विधानसभा मतदारसंघातील  गरीब आणि गरजू कुटुंबातील मुलींना शिक्षणाकरीता हातभार लागावा याकरीता होतकरू विद्यार्थिनींनी वत्सलादेवी देसाई शिष्यवृत्ती चा लाभ घेऊन आपली आपली शैक्षणिक प्रगती कायम उंचावण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन करून महाराष्ट्र दौलत या लोकनेत्यांच्या शताब्दी स्मारकात मोफत असलेल्या अत्याधुनिक स्टडी सेंटर चा लाभ घ्यावा असे ही आवाहन त्यांनी केले. पाटण विधानसभा मतदारसंघातील महिला पदाधिकारी यांनी चूल आणि मूल ही संकल्पना आता बाजूला करुन आपल्या गावाच्या व समाजाच्या प्रगतीसाठी पुरुषांच्याप्रमाणे खांद्याला खांदा देऊन काम करण्याची खरी गरज आहे. त्याबरोबर महिलांचे संघटनही वाढण्याचे काम आता या महिलांनी हाती घ्यावे जेणेकरुन शासनाच्या विविध योजना गावा-गावातील गरजू महिलांपर्यंत पोहचविण्याचे काम सुलभ होईल असे सांगत ते पुढे म्हणाले की, जिजाऊ महिला ट्रस्टच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना स्वयं  रोजगारासाठी व शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासंदर्भात लवकरच एक आराखडा तयार करण्यात येणार असून लवकरच पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्व महिलांचा एक भव्य महिला मेळावा घेणार असल्याचे ही त्यांनी  शेवटी स्पष्ट केले.

चौकट : पाटण विधानसभा मतदारसंघातील महिलांची संघटना मजबूत.

कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आज दौलतनगर ता.पाटण येथे महिला पदाधिकारी मेळावा आयोजित केला होता.या मेळाव्यासाठी  पाटण विधानसभा मतदारसंघातील महिला सरपंच, उपसरपंच,सदस्या तसेच सोसायटीच्या चेअरमन,व्हा.चेअरमन व संचालिका यांना निमंत्रित करण्यात आले होते. या महिला पदाधिकारी मेळाव्याला सर्व महिला पदाधिकारी यांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती. दरम्यान ना. शंभूराज देसाई यांनी भाषणामध्ये याचा उल्लेख करत केवळ एका निरोपावर या एवढया मोठया प्रमाणांत महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.त्यामुळे आजही पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये महिला पदाधिकारी यांची संघटना मजबूत असल्याचे स्पष्ट केले.

    चौकट : शिष्यवृत्तीसाठी ३१लाख ३१ हजार रुपयांचे वितरण

     पाटण मतदारसंघातील गरीब व गरजू मुलींना दहावीनंतरचे महाविद्यालयीन शिक्षण घेण्याकरीता कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांच्या नावाने शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. यंदाचे हे १४ वे वर्ष असून आतापर्यंत पाटण विधानसभा मतदारसंघातील २०९ मुलींना प्रत्येकी ५५०० रुपयेप्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षीही १६ मुलींना प्रत्येकी ६०५० रुपयेप्रमाणे कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) शिष्यवृत्तीचे वितरण या कार्यक्रमात करण्यात आले.आज पर्यंत शिष्यवृत्ती साठी म्हणून  ३१ लाख ३१ हजार ५००  रुपयांचे वितरण करण्यात आल्याची माहिती मंत्री देसाई यांनी दिली.

 कार्यक्रमात प्रा मच्छीन्द्र सकटे,श्वेता वाघमारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग नलवडे यांनी  केले तर आभार बबनराव शिंदे यांनी मानले.

Friday, 17 May 2024

दौलतनगर,ता. पाटण येथे दि.२० मे रोजी कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचा ६5 वा पुण्यतिथी सोहळा. कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे पुण्यतिथीनिमित्त गरीब कुटुंबातील विद्यार्थीनींना कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रम व महिला पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन.



दौलतनगर दि. १7:- महाराष्ट्राचे पोलादी पुरुष आणि राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या धर्मपत्नी कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचा ६5 वा पुण्यतिथी सोहळा व या पुण्यतिथी सोहळया निमित्त कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) शिष्यवृत्तीचे वितरण कार्यक्रम व पाटण विधानसभा मतदारसंघातील महिला सरपंच,उपसरपंच व सदस्या तसेच सोसायटीच्या महिला चेअरमन,व्हा.चेअरमन व संचालिका यांचा विविध संस्थाच्या महिला पदाधिकारी मेळावा असा संयुक्त कार्यक्रम सोमवार दि.२० मे, २०२4 रोजी सकाळी १०.3० वा. “ महाराष्ट्र दौलत ” लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक दौलतनगर,ता.पाटण येथे राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री मा.ना.श्री.शंभूराज देसाई,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री.यशराज देसाई व मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,युवा नेते यांचे प्रमुख उपस्थितीत होणार आहे. प्रतिवर्षाप्रमाणे कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे पुण्यतिथीनिमित्त पाटण मतदारसंघातील गरीब कुटुंबातील गरजू विद्यार्थीनींना दहावीनंतरचे महाविद्यालयीन शिक्षण घेणेकरीता कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे नावाने सुरु असलेल्या शिष्यवृत्तीचे वितरणाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने प्रसिध्दीस देण्यात आली आहे.

प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकांत म्हंटले आहे की, महाराष्ट्राचे पोलादी पुरुष आणि राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जन्मशताब्दी वर्षापासून त्यांच्या धर्मपत्नी कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचा पुण्यतिथी कार्यक्रम प्रतिवर्षी दि.२० मे रोजी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्या वतीने साजरा करण्यात येतो.राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हा पालकमंत्री मा.ना.श्री.शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमाच्या निमित्ताने पाटण मतदारसंघातील गरीब व गरजू विद्यार्थीनींना दहावीनंतरचे महाविद्यालयीन शिक्षण घेण्याकरीता कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांच्या नावाने शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे.यंदाचे हे चौदा वर्ष असून आतापर्यंत पाटण विधानसभा मतदारसंघातील  दोनशे अकरा हुन अधिक विद्यार्थीनींना शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. गरजू कुटुंबातील विद्यार्थीनींना शिक्षणाकरीता हातभार लागावा याकरीता या शिष्यवृत्तीबरोबर वहया,शालेय साहित्याचे वितरणही करण्यात येते. सध्या शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थीनींना वार्षिक ५५०० रुपयेप्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. दरम्यान कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचा ६5 वा पुण्यतिथी सोहळयाचे निमित्ताने पाटण विधानसभा मतदारसंघातील महिला पदाधिकारी मेळाव्याचे आयोजनही करण्यात आले असून या महिला पदाधिकारी मेळाव्याला लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहातील महिला पदाधिकारी,शिवसेना महिला पदाधिकारी,पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध ग्रामपंचायतींच्या महिला सरपंच,उपसरपंच व सदस्या तसेच विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे महिला चेअरमन,व्हा.चेअरमन व संचालिका या महिला पदाधिकारी यांना निमंत्रित केले आहे. कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे पुण्यतिथी सोहळया निमित्त कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) पुण्यतिथी सोहळा, गरीब व गरजू विद्यार्थीनींना शिष्यवृत्तीचे वितरण कार्यक्रम व महिला पदाधिकारी मेळावा हा संयुक्त कार्यक्रम सोमवार दि.२० मे, २०२4 रोजी सकाळी १०.3० वा. “महाराष्ट्र दौलत” लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक दौलतनगर,ता.पाटण येथे राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री मा.ना.श्री.शंभूराज देसाई,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री.यशराज देसाई व मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, युवा नेते यांचे प्रमुख उपस्थितीत होणार असून या कार्यक्रमास पाटण विधानसभा मतदारसंघातील महिला सरपंच,उपसरपंच,सदस्या तसेच सोसायटीच्या चेअरमन,व्हा.चेअरमन व संचालिका यांनी मोठया संख्यने उपस्थित रहावे,असे आवाहन शेवटी प्रसिध्दीपत्रकांत करण्यात आले आहे.