दौलतनगर दि.04:- राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी वाटोळे येथे प्रशिक्षण केंद्र होण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना.शंभूराज देसाई हे सातारा जिल्हयाचे सुपूत्र व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांचेकडे सत्तचा पाठपुरावा करत होते. तत्पुर्वी वाटोळे येथील प्रशिक्षण केंद्राच्या प्रस्तावित जागेची पाहणी ना. शंभूराज देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह करत या प्रशिक्षण केंद्राचा मंजूरीचा प्रस्तावीत आराखडा तातडीने शासनाकडे सादर केला होता. सादर केलेला प्रस्ताव सातारा जिल्हयाचे सुपूत्र व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांनी सकारात्मकता दर्शवत मान्य केला होता.त्यानुसार वाटोळे येथे ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे 19.16 हे. आर. क्षेत्रात उभारण्यात येणाऱ्या राज्यातील पहिल्या अद्यावत अशा सर्व सोयीनीयुक्त स्वतंत्र प्रशिक्षण केंद्राचे इमारतीचे बांधकामसाठी 93 कोटी 34 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाल्या असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाचे गृह विभागाने दि. 03 जुलै 2024 रोजी पारित केला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.
पत्रकांत पुढे म्हंटले आहे की,
ना.शंभूराज देसाई यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे काम पाहताना या विभागाचे
महसूल वाढीसाठी तसेच अधिकारी व कर्मचारी यांना सर्व सुविधा देण्यासाठी सातत्याने
प्रयत्नशील आहेत.त्यासाठी नवनवीन योजना राबवत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे
कामकाजामध्ये सुधारणा करुन गतिमान होण्यासाठी प्राथमिकता दिली. त्याचाच एक भाग
म्हणून पालकमंत्री ना.शंभूराज देसाई हे राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी व
कर्मचारी यांचेसाठी स्वतंत्र प्रशिक्षण केंद्रासाठी ना.शंभूराज देसाई हे सातत्याने प्रयत्नशील होते. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी
शिंदे यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे
स्वतंत्र प्रशिक्षण केंद्रासाठी सकारात्मकता दर्शवत या प्रशिक्षण केंद्रास मान्यता
दिल्याने पाटण तालुक्यात वाटोळे येथे प्रशिक्षण केंद्राच्या रुपाने महत्त्वपूर्ण
शासकीय आस्थापना उभारली जाणार असून पाटण तालुक्यातील वाटोळे येथील एकूण 19.16 हे.आर.
क्षेत्रामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागासाठी राज्यातील पहिले स्वतंत्र प्रशिक्षण
केंद्र बांधकाम करण्यासाठी 93 कोटी 34 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाल्या असल्याचा शासन निर्णय
राज्य शासनाचे गृह विभागाने दि. 03 जुलै
2024 रोजी पारित केला असून या प्रशिक्षण
केंद्रासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग ही कार्यानिवत यंत्रणा निश्चित केली आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रशिक्षण केंद्रामुळे अधिकारी,जवान,कर्मचारी
यांची क्षमता वृध्दी होण्यास मदत होणार असून या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून
सायबर सेल कार्यान्वित होणार असून अवैध मद्य विक्री व निर्मिती,अन्य राज्यातून आवक
होणारे अवैध मद्य विक्री व वाहतूक रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाया व गुन्हे
नोंद करण्यात येणार असून सदर गुन्हे नोंदवणे, त्याचा तपास करुन गुन्हे सिध्द
करण्याच्यादृष्टीने हा सायबर सेल उपयुक्त ठरणार आहे. तसेच राज्य उत्पादन शुल्क
विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना अद्ययावत तंत्रज्ञानाचे तसेच कायदेविषयक व
शारिरीक प्रशिक्षण देणे आवश्यक असते मात्र उत्पादन शुल्क विभागाचे स्वतंत्र
प्रशिक्षण केंद्र नसल्याने विभागाला पोलीस प्रशिक्षण केंद्रावर अवलंबून रहावे लागत
होते. तसेच 51 नवीन पदे प्रशिक्षण केंद्रासाठी मंजूर करण्यात आली असून सुरुवातील
दोन वर्षे पोलीस विभागातील प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य यांची प्रतिनियुक्तीवर
सेवा घेऊन प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे ना.शंभूराज देसाई यांचे
कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.
चौकट:- राज्य उत्पादन शुल्क विभागाचे राज्यातील पहिले प्रशिक्षण केंद्र वाटोळे
येथे होणार.
पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी गत चार
वर्षामध्ये आपल्या विभागामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबविताना
दिसत असून आपल्या वेगळया कार्यशैलीमधून या विभागामध्ये उठावदार कामगिरी करताना दिसत आहेत.ना.शंभूराज देसाई यांचे
प्रयत्नातून पाटण तालुक्यातील डोंगरी व दुर्गम भागातील वाटोळे येथे राज्य उत्पादन
शुल्क विभागाचे राज्यातील पहिले प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार असल्याने
भविष्यामध्ये या विभागामध्ये दळणवळणासह स्थानिकांना रोजगार निर्मिती तसेच लहान
मोठया उद्योगांना चालना मिळणार असल्याने येथील स्थानिकांचा याचा निश्चितच चांगला
फायदा होणार असून वाटोळे व आसपासच्या परिसराचा कायापालट होण्यास मदत होणार आहे.
No comments:
Post a Comment