दौलतनगर
दि.10 :- पाटण या
डोंगरी व दुर्गम भागामधील अनेक गांवामध्ये शेत पाणंद रस्ते अरुंद व ना दुरुस्त असल्याने
या रस्त्यावरुन शेतीशी निगडीत विविध बाबींसाठी कमी प्रमाणात या रस्त्यावरुन वहिवाट होत होती शेतीच्या दृष्टीने
महत्वाच्या असलेल्या शेत पाणंद रस्त्यांची कामे मार्गी लागणे गरजेचे असल्याने पाटण
मतदारसंघातील शेत/पाणंद रस्त्यांची प्रलंबित असलेली कामे तातडीने
मार्गी लागण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री व सातारा,ठाणे
जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण मतदारसंघातील
47 गावातील तब्बल 118 कि.मी.लांबीच्या शेत/पाणंद रस्त्यांची
कामे ही राज्य शासनाने नव्याने सुरु केलेल्या मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजनेतून मंजूर होण्यासाठी तत्कालीन रोजगार
हमी मंत्री ना.संदिपान भुमरे यांचेकडे शिफारस केली होती.त्यानुसार पाटण मतदारसंघातील 47 गावातील सुमारे
118 कि.मी.लांबीच्या शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांचा समावेश हा मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजनेच्या सन 2024-25 या आर्थिक वर्षाच्या
आराखडयामध्ये समावेश करत या शेत/पाणंद रस्त्यांना मंजूरी देण्यात
आली असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाचे नियोजन विभाग(रोहयो)
यांनी पारित केला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचे वतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.
प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे
की, महाराष्ट्र हे शेतीप्रधान राज्य असून राज्यातील शेतकरी हिताच्यादृष्टीने अनेक
निर्णय राज्य शासनाचेवतीने घेण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना शेतीचे मशागतीचे
साहित्य व शेत मालाची वाहतूक करण्यासाठी शेत पाणंद रस्त्यांची सुविधा नसल्याने स्थानिक
शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शेत पाणंद रस्त्यांची कामे झाल्यास
शेतकऱ्यांच्या बांधावर वाहन जाऊन शेती विषयक कामे जलदगतीने पुर्ण होण्यास मदत होणार
आहे. पाटण विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांची शेत/पाणंद रस्त्यांअभावी होणारी
गैरसोय लक्षात घेऊन राज्य शासनाच्या रोजगार हमी विभागाकडे शेत/पाणंद रस्ते मंजूर होण्यासाठी
सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. त्यामुळे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून
सन 2021-22 व सन 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजनेअंतर्गत आतापर्यंत
पाटण विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत 135 गावांतील 209 कि.मी. लांबीच्या,सन 2023-24
या आर्थिक वर्षाच्या पुरवणी आराखडयांतर्गत 151 गावांतील तब्बल 297 कि.मी.लांबीच्या
शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांचा समावेश करुन या कामांना मंजूरी देण्यात
आली होती. तर सन 2024-25 या आर्थिक वर्षाच्या आराखडयामध्ये 47 गावातील 118 कि.मी.लांबीच्या
शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांना मंजूरी देण्यात आली असून मंजूर शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांची गावे व अंतर आंबळे गावठाण ते जांबळपट्टी 1 किमी, आंबळे चांभार वाडा ते जांभळपटी ढोरोशी 1
किमी, आंब्रुळे बेलवडे रस्ता ते एम.एस.ई.बी.फिडर 2 किमी, आवर्डे मातंगवस्ती ते तलाव
काटे यांची शेती 1 किमी, कडवे बु दत्त मंदिर ते वाघजाईचा माळ 2 किमी, कडवे बुद्रुक माळवाडी ते भैराबाचा
सडा 2 किमी, कळंबे हायुस्कूल ते कळंबे गावठाण 2 किमी, कुंभारगाव मातेपट्रटी ते मोरेवाडी 1 किमी,
कुसरुंड कोळेकरवस्ती
ते सुतारवस्ती 1 किमी, कुसरुंड मोरेवस्ती 1 किमी, कोंजवडे गाडंगवड ते पड क्षेत्र 1 किमी, कोंजवडे गावाचा आड ते 10 बीगा
क्षेत्र 2 किमी, कोकीसरे नवलाई पालखी 2 किमी, खबालवाडी ते भगतवाडी 2 किमी, गलमेवाडी पूर्व आळी ते येवती
रस्ता 1 किमी, गलमेवाडी मावळ आळी ते रान पट्टा 1 किमी, गलमेवाडी रामचंद्र चोरगे यांचे घर ते पाटील आळी
2 किमी, गायमुखवाडी
बांबवडे ते जळव 2 किमी, गारवडे बहुले ते गारवडे मार्गे साजूर 2 किमी, घोटील शंकर गणपती पवार यांचे
घर ते यशवंत मारुती पवार यांचे घर 1 किमी, घोटील शांताराम हरी पवार यांचे घर ते मुख्य रस्ता 1 किमी,
चव्हाणवाडी धामणी सुनिता
घराळ यांचे घर ते महादेव मंदिर 2 किमी,
चोपदारवाडी कारखाना
पेट्रोल पंप ते पाटलांचा दरा ते पाचवड 1.5 किमी, चोपदारवाडी घावरखडी ते पाटलाची विहिर सिंधी 2
किमी, जन्नेवाडी
घोट ते बोर्गेवाडी 2 किमी, जाधववाडी लोरेवाडी फाटा नुने ते नदी 1 किमी, डफळवाडी बस स्टँड ते सावार मळी बाराभाई 2 किमी, डफळवाडी होळीची पट्टी ते बनारवाली 1 किमी, डावरी गावठाण ते वाल्मिकी
रोड 2 किमी, ढोरोशी नार गौंडी ते जांभळीची पटी 1 किमी, तारळे इनाम शिवार 1 किमी, तारळे धुरुंग शिवार 1.5 किमी,
तारळे मांगझडी राहुडे
शिवार 1 किमी, दुटाळवाडी नुने ते महादेव मंदिर शिवार 500 मी., दुटाळवाडी नुने ते मातंगवस्ती
2 किमी, धनगरवाडी
तारळे जुना घोट 1 किमी, निवडे पूनर्वसन ते नार गौंडी 1.5 किमी, नुने पाटीलवस्ती ते टेकचा
मळा 1.5 किमी, नुने दुटाळवाडी माळवस्ती ते लिंबाची पटी 1 किमी, पाडेकरवाडी मालोशी बळवंत कृष्णा
पवार यांचे घर ते मधेलेाडी शिवार 1.5 किमी, पाडेकरवाडी मालोशी शामराव पवार यांचे घर ते बाबरापर्यंत 2 किमी,
पापर्डे कुंभारकी ते
देऊळ 2 किमी, पापर्डे देऊळ ते पाऊदका 2 किमी, पापर्डे देशमुख आळी ते डवरी यांचे शेतापर्यंत 2 किमी,
फडतरवाडी घोट ते जंगला
आंबेळे गाव हद्द 2 किमी, फडतरवाडी घोट ते बुरंबुडी पाण्याचा विहिर 2 किमी, फडतरवाडी बोर्गेवाडी घोट
1 किमी, बनपूरी
बौध्दसमाज शेती 1 किमी, भुडकेवाडी डोंगराकडे जाणारा पाणंद 2 किमी, भैरेवाडी ढोरोशी भैरवनाथ मंदिर
ते माऊली सडा 2 किमी, मणदुरे जळव पाटण रस्ता ते बामणवस्ती ब्रम्हाचा खडक 1.5 किमी, माजगाव ऊरुल माजगाव रस्ता
ते चाफळ 2 किमी, माजगाव वेताळबा ओढा ते सुरेश जाधव शेड 1.5 किमी, मुळगाव नावेचा गौंड ते मुळगाव
कवरवाडी 1 किमी, मुळगाव यमाई देवी मंदिर ते
जोतिर्लिंग गुरवाळ 1 किमी, मेंढोशी बंडू तबलजी यांचे घर ते स्मशानभूमी 1 किमी, मेंढोशी वेताळबा ते ओड 1 किमी,
मेंढोशी वरची फाटा ते
ओड 1.5 किमी, रासाटी नवलाई मंदिर ते शेत 1 किमी, राहुडे मेन रोड ते डोंगर रस्ता बगा 1.5 किमी, वजरोशी जूनी चिंचेवाडी गावठाण
ते वजराई देवी मंदिर 1 किमी, वजरोशी तारळे पाटण रोड ते हायस्कूल पर्यंत1 किमी, वजरोशी बाबू शिंदे यांचे घर
ते तारळे चिंचेवाउी जूना पाणंद 1 किमी, वजरोशी शिवारातून खडकवाडी 1.5 किमी, वजरोशी स्टँड ते पडसाळ रोडपर्यंत
2 किमी, वाघळवाडी
ढोरोशी ते जांभेकरवाडी 2 किमी, वाडीकोतावडे कमानीपासून मोरणा नदीपर्यंत 1 किमी, वाडीकोतावडे तुकाराम बाळा
सुर्वे यांचे घर ते तुकाराम सुर्वे यांच्या बागेपर्यंत 500 मीटर, वाडीकोतावडे वाडीकोतावडे ते
टकलेवाडी नाटोशी 1.5 किमी, वाडीकोतावडे विष्णू सर्वे यांचे घर ते श्रीरंग गणपत सुर्वे यांचे
घर 500 मीटर, वेखंडवाडी ते करमाळे 2 किमी, वेताळवाडी आनंदा चव्हाण यांचे शेत ते तुकाराम पवार यांचे शेत
1 किमी, वेताळवाडी
खडी ते इरिगेशन 1.5 किमी, वेताळवाडी गावठाण ते बाबूराव
केशव पवार यांची विहिर 1.5 किमी, शिंगणवाडी ग्रामपंचायत ते शामराव सखराम पवार यांचे घरापर्यंत
1.5 किमी, सुळेवाडी
नाईकबाचा वाडा ते जळकेवाडी पाणंद 1 किमी, सोनाईचीवाडी नाना शिवा घर ते दहाबिगा 1 किमी, सोनाईचीवाडी नाना शिवा जाधव
ते खारुती 2 किमी, सोनाईचीवाडी रामचंद्र राजाराम विभूते ते निनाई मंदिर 1.5 किमी, सोनाईचीवाडी सोनाई मंदिर ते पडसाळ 2 किमी, सोनाईचीवाडी स्मशानभूमी ते
कोंढार 1 किमी, हेळवाक कराड चिपळूण रोड ते स्मशानभूमी 1 किमी या गावांतील पाणंद रस्त्यांच्या कामांचा समावेश असल्याचे शेवटी पत्रकांत म्हंटले आहे.
No comments:
Post a Comment