Thursday, 11 July 2024

मा.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत पाटण तालुक्यातील 22 ग्रामपंचायतींचे कामांना मंजूरी. मंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातनू ग्रामपंचायतींचे नवीन इमारतींसाठी 4 कोटी 45लक्ष रुपयांचा निधी मंजूर.

 

 

  दौलतनगर दि.11:- राज्य शासनाच्या मा.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून पाटण तालुक्यातील एकाचवेळी 22 ग्रामपंचायत कार्यालय इमारतींचे कामांना 4 कोटी 45 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाचे ग्रामविकास विभागाने दि. 05 जुलै,2024 रोजी पारित केला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

           प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण तालुक्यातील विविध गावच्या सध्या अस्तित्वात असलेल्या ग्रामपंचायती हया जुन्या व जीर्ण झाल्या असल्याने या ग्रामपंचायतींमध्ये दैनंदिन कार्यालयीन कामकाज करताना मोठी अडचणी निर्माण होत होत्या.ग्रामपंचायत इमारती अभावी होणारी गैरसोय लक्षात घेऊन जुन्या व जीर्ण झालेल्या ग्रामपंचायत कार्यालय इमारतींचे ठिकाणी नवीन इमारतीचे कामांना मंजूरी मिळावी याकरीता संबंधित गावचे सरपंच व ग्रामस्थ यांनी महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांचेकडे मागणी केली होती. त्यांचे मागणीनुसार मंत्री ना.शंभूराज देसाई यांनी राज्याचे ग्रामविकास विभागाकडे संबंधित गावांमध्ये नवीन ग्रामपंचायत कार्यालय इमारतींची कामे मंजूर होण्याकरीता शिफारस केली होती. दरम्यान राज्यातील ज्या ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नाही अशा ग्रामपंचायतींना स्वतंत्र कार्यालयाची इमारत बांधण्यासाठी मा.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना हि योजना राज्य शासनाचेवतीने राबविण्यात येत आहे. ना.शंभूराज देसाई यांनी शिफारस केलेल्या पाटण तालुक्यातील पाटण तालुक्यातील पाठवडे,नेचल,कळंबे,शितपवाडी,कोचरेवाडी,लुगडेवाडी,सातर,हुंबरवाडी,टेळेवाडी,आंबवणे,काढोली,नाव,किल्ले मोरगिरी, पाचगणी, पाळशी,गावडेवाडी,गोकूळ तर्फ पाटण,चौगुलेवाडी (सां),ढाणकल,रुवले,पापर्डे,नुने या गावांमध्ये मा.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत नवीन ग्रामपंचायत कार्यालय इमारतींचेच्या कामांना मंजूरी देण्यात आली असून याबाबतचा शासन निर्णय राज्य शासनाचे ग्रामविकास विभागाने दि. 05 जुलै,2024 रोजी पारित केला आहे.त्यामुळे पाटण तालुक्यातील मंजूर झालेल्या पाठवडे, नेचल, कळंबे, शितपवाडी, कोचरेवाडी, लुगडेवाडी, सातर, हुंबरवाडी, टेळेवाडी, आंबवणे, काढोली,नाव,किल्ले मोरगिरी, पाचगणी, पाळशी,गावडेवाडी,गोकूळ तर्फ पाटण,चौगुलेवाडी (सां),ढाणकल,रुवले,पापर्डे,नुने या गावांना  नवीन ग्रामपंचायत इमारती  होणार असून प्रत्येक ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचे बांधकामासाठी प्रत्येकी 20 लाख रुपये प्रमाणे 4 कोटी 45 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याने या ग्रामपंचायतीमधील दैनंदिन कार्यालयीन कामकाज सुरळीत होऊन नवीन सोयी-सुविधांसह या इमारतींची कामे होणार आहेत.दरम्यान मा.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत या अगोदर पाटण तालुक्यातील बांधवाट, बोडकेवाडी, जळव,उधवणे,चाळकेवाडी, मरळी, भुडकेवाडी, ठोमसे, घोट,कोळेकरवाडी,नाटोशी,बांबवडे व येराडवाडी या गावांमध्ये मंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून नवीन ग्रामपंचायत कार्यालय इमारतींची कामे मार्गी लावण्यात आली आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या ग्रामपंचायतींना सर्व सोयींनीयुक्त अशी नवीन इमारती होणार असल्याने ग्रामपंचायतींमधून ग्रामस्थांच्या असलेल्या अडी-अडचणी सोडविण्याच्यादृष्टीने दैनंदिन कामकाज सुलभ होण्यास मदत होणार आहे. मा.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कामांचे लवकरात लवकर निविदा प्रक्रिया करण्यात येऊन ही कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना ना.शंभूराज देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या असल्याची माहितीही शेवटी प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

पाटण मतदारसंघातील 26 तलाठी कार्यालयांचे बांधकामासाठी 3 कोटी 90 लक्ष रुपयांची तरतूद. ना.शंभूराज दसेाई यांचे प्रयत्नातून मतदारसंघात 26 तलाठी कार्यालयांच्या इमारतींचा प्रश्न मार्गी.

 

 

  दौलतनगर दि.11:- पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये तलाठी सजा असलेल्या गावांच्या ठिकाणी सुसज्ज असे तलाठी कार्यालयांच्या इमारतींचे बांधकामासाठी निधी मंजूर होण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना.शंभूराज देसाई यांनी महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे-पाटील यांचेकडे शिफारस केली होती. त्यानुसार राज्याचे पुरवणी अर्थसंकल्पामध्ये पाटण मतदारसंघातील 26 नवीन तलाठी कार्यालयांच्या इमारतींचे बांधकामासाठी 3 कोटी 90 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

           प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण मतदासंघामध्ये तलाठी सजा असलेल्या गावांमध्ये तलाठी कार्यालयांसाठी स्वतंत्र अशा इमारती नसून या गावांमध्ये भाडयाचे खोलीमध्ये किंवा त्या-त्या विभागातील मुख्य बाजारपेठेचे गाव असलेल्या ठिकाणी तलाठी कार्यालयांचे  कामकाज सुरु असून याच ठिकाणी  सर्व कागदपत्रांचे रेकॉर्ड ठेवले जात आहे.त्यामुळे गावाला सजा असूनही इमारतीच्या अभावी गावा-गावांतील लोकांना कामकाज सुरु असलेल्या तलाठी कार्यालयात कामासाठी त्या-त्या विभागातील मुख्य बाजारपेठ असलेल्या ठिकाणी जावे  लागत असल्याने या नागरीकांचा वेळेसह आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याने नागरीकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन पाटण विधानसभा मतदारसंघातील तलाठी सजा असलेल्या ठिकाणी सुसज्ज अशी अद्यावत इमारती मंजूर होण्यासाठी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई हे प्रयत्नशील होते.त्यानुसार त्यांनी राज्याचे महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांचेकडे मतदारसंघातील 26 तलाठी कार्यालयांच्या इमारतीचे बांधकामासाठी निधी मंजूर होण्यासाठी शिफारस केली होती.त्यानुसार महसूल विभागाकडून संबंधित 26 तलाठी कार्यालयांच्या इमारतीचे बांधकामासाठी निधी मंजूर होण्यासाठीचा आवश्यक तो प्रस्तावही सादर करण्यात आला होता.नुकतेच मुंबई या‍ ठिकाणी सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी अर्थसंकल्पामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघातील 26 नवीन तलाठी कार्यालयांचे बांधकामासाठी 3 कोटी 90 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मंजूर झालेल्या नवीन तलाठी कार्यालयांमध्ये मरळी,सांगवड,कोकीसरे,आंब्रुळे,सोनवडे,काळगाव,चोपडी,नाटोशी,चाफळ,येराड,आवर्डे,नवसरी,घोट,नुने,डेरवण,मरळोशी, हेळवाक,वेताळवाडी,शेडगेवाडी,दिवशी बुद्रुक,विहे,कुंभारगाव,मारुलहवेली,कडवे बुद्रुक,पाडळोशी व वेखंडवाडी या तलाठी सजा असलेल्या गावांचा समावेश असून या ठिकाणी तलाठी कार्यालयांसाठी आता नव्याने इमारती होणार असल्याने गावा-गावातील तलाठयांकडे असणारी कामे ही गावांमध्येच होण्यासाठी याचा मोठा फायदा होणार असून नवीन तलाठी इमारतींमध्ये कार्यालयीन कामकाज करताना मोठी सुलभता येणार आहे.

चौकट: ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून मतदारसंघात सुसज्ज  तलाठी कार्यालय

सन 2014 ते 19 या पंचवार्षिकमध्ये पाटण मतदारसंघातील तारळे,नाडे,ऊरुल,आडूळपेठ,मल्हारपेठ व बहुले या 6 ठिकाणी नवीन तलाठी कार्यालयांचे बांधकामासाठी निधी मंजूर करण्यात येऊन या तलाठी कार्यालयांच्या इमारतींची कामे पूर्ण होऊन या इमारतींमध्ये सध्या कामकाज सुरु आहे.तर नुकतेच मुंबई या ठिकाणी सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान पुरवणी अर्थसंकल्पामध्ये 26 तलाठी कार्यालयांचे नवीन इमारतींचे बांधकामासाठी 3 कोटी 90 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याने पाटण मतदारसंघातील 32 तलाठी कार्यालयांच्या स्वतंत्र इमारतींचा प्रश्न ना.शंभूराज देसाई यांचे माध्यमातून मार्गी लागला आहे.

Wednesday, 10 July 2024

स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचा दि.१२ जुलै रोजी दौलतनगर ता.पाटण येथे ३8वा पुण्यतिथी कार्यक्रम. प्रतिवर्षाप्रमाणे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व मुकबधीर विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप.

 

   

       

दौलतनगर दि. 10:लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचा ३8 वा पुण्यतिथी कार्यक्रम प्रतिवर्षाप्रमाणे शुक्रवार दि.१२ जुलै,२०24 रोजी सकाळी १०.०० वा. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्या वतीने महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक, दौलतनगर ता.पाटण येथे विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार असून स्व.शिवाजीराव देसाई यांचे पुण्यतिथीनिमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे पाटण तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे मार्गदर्शक,महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हा पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई,सातारा जिल्हयाचे जिल्हाधिकारी मा.श्री.जितेंद्र डुडी, जिल्हा पोलीस अधिक्षक मा.श्री.समीर शेख व सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्रीमती याशनी नागराजन यांचे शुभहस्ते, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) व मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई(दादा) यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने कारखान्याचे व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

            दौलतनगर ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्या वतीने कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचा पुण्यतिथी कार्यक्रम प्रतिवर्षी कारखाना कार्यस्थळावर साजरा करण्यात येतो.प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचा ३8 वा पुण्यतिथी कार्यक्रम शुक्रवार दि.१२ जुलै, २०24रोजी सकाळी १०.०० वा.दौलतनगर ता.पाटण येथे आयोजीत केला आहे. स्व.शिवाजीराव देसाई यांचे पुण्यतिथीनिमित्ताने स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे पुर्णाकृती पुतळयासमोर भजनाचा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमानंतर सकाळी १०.०० वा. महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री नामदार शंभूराज देसाई, सातारा जिल्हयाचे जिल्हाधिकारी मा.श्री.जितेंद्र डुडी, जिल्हा पोलीस अधिक्षक मा.श्री.समीर शेख व सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्रीमती याशनी नागराजन,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) व मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई(दादा) यांचे प्रमुख उपस्थितीत लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुर्णाकृती पुतळयास व स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे समाधी व पुर्णाकृती पुतळयास पुष्पचक्र अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात येणार आहे. प्रतिवर्षाप्रमाणे पाटण तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेतील प्रत्येक केंद्रात प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस, प्रशस्तीपत्रक व गौरवचिन्ह देवून या विद्यार्थ्यांचा सत्कार आणि पाटण तालुक्यातील मुकबधीर विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप कार्यक्रम नामदार शंभूराज देसाई, सातारा जिल्हयाचे जिल्हाधिकारी मा.श्री.जितेंद्र डुडी, जिल्हा पोलीस अधिक्षक मा.श्री.समीर शेख व सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्रीमती याशनी नागराजन यांचे शुभहस्ते,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) व मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई(दादा)  यांचे प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमास कारखान्याचे सभासद, हितचिंतक, पालकवर्ग,विद्यार्थी व कार्यकर्ते या सर्वांनी सकाळी १०.०० वा महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक,दौलतनगर ता.पाटण येथे मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कारखान्याचे व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे यांनी पत्रकात केले आहे.

 

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून मातोश्री ग्रामसमृध्दी शेत / पाणंद रस्ते योजना अंतर्गत पाटण विधानसभा मतदार संघातील 47 गावातील 118 कि.मी.अंतराच्या पाणंद रस्त्यांच्या कामांना मंजूरी

 


दौलतनगर दि.10 :- पाटण या डोंगरी व दुर्गम भागामधील अनेक गांवामध्ये शेत पाणंद रस्ते अरुंद व ना दुरुस्त असल्याने या रस्त्यावरुन शेतीशी निगडीत  विविध बाबींसाठी कमी प्रमाणात या रस्त्यावरुन वहिवाट होत होती शेतीच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या शेत पाणंद रस्त्यांची कामे मार्गी लागणे गरजेचे असल्याने पाटण मतदारसंघातील शेत/पाणंद रस्त्यांची प्रलंबित असलेली कामे तातडीने मार्गी लागण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री व सातारा,ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण मतदारसंघातील 47 गावातील तब्बल 118 कि.मी.लांबीच्या शेत/पाणंद रस्त्यांची कामे ही राज्य शासनाने नव्याने सुरु केलेल्या मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजनेतून मंजूर होण्यासाठी तत्कालीन रोजगार हमी मंत्री ना.संदिपान भुमरे यांचेकडे शिफारस केली होती.त्यानुसार पाटण मतदारसंघातील 47 गावातील सुमारे 118 कि.मी.लांबीच्या शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांचा समावेश हा मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजनेच्या सन 2024-25 या आर्थिक वर्षाच्या आराखडयामध्ये समावेश करत या शेत/पाणंद रस्त्यांना मंजूरी देण्यात आली असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाचे नियोजन विभाग(रोहयो) यांनी पारित केला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचे वतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

          प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, महाराष्ट्र हे शेतीप्रधान राज्य असून राज्यातील शेतकरी हिताच्यादृष्टीने अनेक निर्णय राज्य शासनाचेवतीने घेण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना शेतीचे मशागतीचे साहित्य व शेत मालाची वाहतूक करण्यासाठी शेत पाणंद रस्त्यांची सुविधा नसल्याने स्थानिक शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शेत पाणंद रस्त्यांची कामे झाल्यास शेतकऱ्यांच्या बांधावर वाहन जाऊन शेती विषयक कामे जलदगतीने पुर्ण होण्यास मदत होणार आहे. पाटण विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांची शेत/पाणंद रस्त्यांअभावी होणारी गैरसोय लक्षात घेऊन राज्य शासनाच्या रोजगार हमी विभागाकडे शेत/पाणंद रस्ते मंजूर होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. त्यामुळे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून सन 2021-22 व सन 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये मातोश्री  ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजनेअंतर्गत आतापर्यंत पाटण विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत 135 गावांतील 209 कि.मी. लांबीच्या,सन 2023-24 या आर्थिक वर्षाच्या पुरवणी आराखडयांतर्गत 151 गावांतील तब्बल 297 कि.मी.लांबीच्या शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांचा समावेश करुन या कामांना मंजूरी देण्यात आली होती. तर सन 2024-25 या आर्थिक वर्षाच्या आराखडयामध्ये 47 गावातील 118 कि.मी.लांबीच्या शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांना मंजूरी देण्यात  आली असून मंजूर शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांची गावे व अंतर आंबळे गावठाण ते जांबळपट्टी 1 किमी, आंबळे चांभार वाडा ते जांभळपटी ढोरोशी 1 किमी, आंब्रुळे बेलवडे रस्ता ते एम.एस.ई.बी.फिडर 2 किमी, आवर्डे मातंगवस्ती ते तलाव काटे यांची शेती 1 किमी, कडवे बु दत्त मंदिर ते वाघजाईचा माळ 2 किमी, कडवे बुद्रुक माळवाडी ते भैराबाचा सडा 2 किमी, कळंबे हायुस्कूल ते कळंबे गावठाण 2 किमी, कुंभारगाव मातेपट्रटी ते मोरेवाडी 1 किमी, कुसरुंड कोळेकरवस्ती ते सुतारवस्ती 1 किमी, कुसरुंड मोरेवस्ती 1 किमी, कोंजवडे गाडंगवड ते पड क्षेत्र 1 किमी, कोंजवडे गावाचा आड ते 10 बीगा क्षेत्र 2 किमी, कोकीसरे नवलाई पालखी 2 किमी, खबालवाडी ते भगतवाडी 2 किमी, गलमेवाडी पूर्व आळी ते येवती रस्ता 1 किमी, गलमेवाडी मावळ आळी ते रान पट्टा 1 किमी, गलमेवाडी रामचंद्र चोरगे यांचे घर ते पाटील आळी 2 किमी, गायमुखवाडी बांबवडे ते जळव 2 किमी, गारवडे बहुले ते गारवडे मार्गे साजूर 2 किमी, घोटील शंकर गणपती पवार यांचे घर ते यशवंत मारुती पवार यांचे घर 1 किमी, घोटील शांताराम हरी पवार यांचे घर ते मुख्य रस्ता 1 किमी, चव्हाणवाडी धामणी सुनिता घराळ यांचे घर ते महादेव मंदिर  2 किमी, चोपदारवाडी कारखाना पेट्रोल पंप ते पाटलांचा दरा ते पाचवड 1.5 किमी, चोपदारवाडी घावरखडी ते पाटलाची विहिर सिंधी 2 किमी, जन्नेवाडी घोट ते बोर्गेवाडी 2 किमी, जाधववाडी लोरेवाडी फाटा नुने ते नदी 1 किमी, डफळवाडी  बस स्टँड ते सावार मळी बाराभाई  2 किमी, डफळवाडी होळीची पट्टी ते बनारवाली 1 किमी, डावरी गावठाण ते वाल्मिकी रोड 2 किमी, ढोरोशी नार गौंडी ते जांभळीची पटी 1 किमी, तारळे इनाम शिवार 1 किमी, तारळे धुरुंग शिवार 1.5 किमी, तारळे मांगझडी राहुडे शिवार 1 किमी, दुटाळवाडी नुने ते महादेव मंदिर शिवार 500 मी., दुटाळवाडी नुने ते मातंगवस्ती 2 किमी, धनगरवाडी तारळे जुना घोट 1 किमी, निवडे पूनर्वसन ते नार गौंडी 1.5 किमी, नुने पाटीलवस्ती ते टेकचा मळा 1.5 किमी, नुने दुटाळवाडी माळवस्ती ते लिंबाची पटी 1 किमी, पाडेकरवाडी मालोशी बळवंत कृष्णा पवार यांचे घर ते मधेलेाडी शिवार 1.5 किमी, पाडेकरवाडी मालोशी शामराव पवार यांचे घर ते बाबरापर्यंत 2 किमी, पापर्डे कुंभारकी ते देऊळ 2 किमी, पापर्डे देऊळ ते पाऊदका 2 किमी, पापर्डे देशमुख आळी ते डवरी यांचे शेतापर्यंत 2 किमी, फडतरवाडी घोट ते जंगला आंबेळे गाव हद्द 2 किमी, फडतरवाडी घोट ते बुरंबुडी पाण्याचा विहिर 2 किमी, फडतरवाडी बोर्गेवाडी घोट 1 किमी, बनपूरी बौध्दसमाज शेती 1 किमी, भुडकेवाडी डोंगराकडे जाणारा पाणंद 2 किमी, भैरेवाडी ढोरोशी भैरवनाथ मंदिर ते माऊली सडा 2 किमी, मणदुरे जळव पाटण रस्ता ते बामणवस्ती ब्रम्हाचा खडक 1.5 किमी, माजगाव ऊरुल माजगाव रस्ता ते चाफळ 2 किमी, माजगाव वेताळबा ओढा ते सुरेश जाधव शेड 1.5 किमी, मुळगाव नावेचा गौंड ते मुळगाव कवरवाडी  1 किमी, मुळगाव यमाई देवी मंदिर ते जोतिर्लिंग गुरवाळ 1 किमी, मेंढोशी बंडू तबलजी यांचे घर ते स्मशानभूमी 1 किमी, मेंढोशी वेताळबा ते ओड 1 किमी, मेंढोशी वरची फाटा ते ओड 1.5 किमी, रासाटी नवलाई मंदिर ते शेत 1 किमी, राहुडे मेन रोड ते डोंगर रस्ता बगा 1.5 किमी, वजरोशी जूनी चिंचेवाडी गावठाण ते वजराई देवी मंदिर 1 किमी, वजरोशी तारळे पाटण रोड ते हायस्कूल पर्यंत1 किमी, वजरोशी बाबू शिंदे यांचे घर ते तारळे चिंचेवाउी जूना पाणंद 1 किमी, वजरोशी शिवारातून खडकवाडी 1.5 किमी, वजरोशी स्टँड ते पडसाळ रोडपर्यंत 2 किमी, वाघळवाडी ढोरोशी ते जांभेकरवाडी 2 किमी, वाडीकोतावडे कमानीपासून मोरणा नदीपर्यंत 1 किमी, वाडीकोतावडे तुकाराम बाळा सुर्वे यांचे घर ते तुकाराम सुर्वे यांच्या बागेपर्यंत 500 मीटर, वाडीकोतावडे वाडीकोतावडे ते टकलेवाडी नाटोशी 1.5 किमी, वाडीकोतावडे विष्णू सर्वे यांचे घर ते श्रीरंग गणपत सुर्वे यांचे घर 500 मीटर, वेखंडवाडी ते करमाळे 2 किमी, वेताळवाडी आनंदा चव्हाण यांचे शेत ते तुकाराम पवार यांचे शेत 1 किमी, वेताळवाडी  खडी ते इरिगेशन 1.5 किमी, वेताळवाडी गावठाण ते बाबूराव केशव पवार यांची विहिर 1.5 किमी, शिंगणवाडी ग्रामपंचायत ते शामराव सखराम पवार यांचे घरापर्यंत 1.5 किमी, सुळेवाडी नाईकबाचा वाडा ते जळकेवाडी पाणंद 1 किमी, सोनाईचीवाडी नाना शिवा घर ते दहाबिगा 1 किमी, सोनाईचीवाडी नाना शिवा जाधव ते खारुती 2 किमी, सोनाईचीवाडी रामचंद्र राजाराम विभूते ते निनाई मंदिर 1.5 किमी, सोनाईचीवाडी  सोनाई मंदिर ते पडसाळ 2 किमी, सोनाईचीवाडी स्मशानभूमी ते कोंढार 1 किमी, हेळवाक कराड चिपळूण रोड ते स्मशानभूमी 1 किमी या गावांतील पाणंद रस्त्यांच्या कामांचा समावेश असल्याचे शेवटी पत्रकांत म्हंटले आहे.

Thursday, 4 July 2024

ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून वाटोळे येथे होणार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे राज्यातील पहिले प्रशिक्षण केंद्र. वाटोळे येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे स्वतंत्र प्रशिक्षण केंद्रासाठी 93 कोटी 34 लक्ष निधी मंजूर.

 


दौलतनगर दि.04:- राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी वाटोळे येथे प्रशिक्षण केंद्र होण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना.शंभूराज देसाई हे सातारा जिल्हयाचे सुपूत्र व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांचेकडे सत्तचा पाठपुरावा करत होते. तत्पुर्वी वाटोळे येथील प्रशिक्षण केंद्राच्या प्रस्तावित जागेची पाहणी ना. शंभूराज देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह करत या प्रशिक्षण केंद्राचा मंजूरीचा प्रस्तावीत आराखडा तातडीने शासनाकडे सादर केला होता. सादर केलेला प्रस्ताव सातारा जिल्हयाचे सुपूत्र व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांनी सकारात्मकता दर्शवत मान्य केला होता.त्यानुसार वाटोळे येथे ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे 19.16 हे. आर. क्षेत्रात उभारण्यात येणाऱ्या राज्यातील पहिल्या अद्यावत अशा सर्व सोयीनीयुक्त स्वतंत्र प्रशिक्षण केंद्राचे  इमारतीचे बांधकामसाठी 93 कोटी 34 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाल्या असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाचे गृह विभागाने  दि. 03 जुलै 2024 रोजी पारित केला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

          पत्रकांत पुढे म्हंटले आहे की, ना.शंभूराज देसाई यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे काम पाहताना या विभागाचे महसूल वाढीसाठी तसेच अधिकारी व कर्मचारी यांना सर्व सुविधा देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत.त्यासाठी नवनवीन योजना राबवत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कामकाजामध्ये सुधारणा करुन गतिमान होण्यासाठी प्राथमिकता दिली. त्याचाच एक भाग म्हणून पालकमंत्री ना.शंभूराज देसाई हे राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी स्वतंत्र प्रशिक्षण केंद्रासाठी ना.शंभूराज देसाई हे सातत्याने प्रयत्नशील  होते. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांनी राज्य  उत्पादन शुल्क विभागाचे स्वतंत्र प्रशिक्षण केंद्रासाठी सकारात्मकता दर्शवत या प्रशिक्षण केंद्रास मान्यता दिल्याने पाटण तालुक्यात वाटोळे येथे प्रशिक्षण केंद्राच्या रुपाने महत्त्वपूर्ण शासकीय आस्थापना उभारली जाणार असून पाटण तालुक्यातील वाटोळे येथील एकूण 19.16 हे.आर. क्षेत्रामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागासाठी राज्यातील पहिले स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र बांधकाम करण्यासाठी 93 कोटी 34 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाल्या असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाचे गृह विभागाने  दि. 03 जुलै 2024 रोजी पारित केला असून  या प्रशिक्षण केंद्रासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग ही कार्यानिवत यंत्रणा निश्चित केली आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रशिक्षण केंद्रामुळे अधिकारी,जवान,कर्मचारी यांची क्षमता वृध्दी होण्यास मदत होणार असून या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून सायबर सेल कार्यान्वित होणार असून अवैध मद्य विक्री व निर्मिती,अन्य राज्यातून आवक होणारे अवैध मद्य विक्री व वाहतूक रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाया व गुन्हे नोंद करण्यात येणार असून सदर गुन्हे नोंदवणे, त्याचा तपास करुन गुन्हे सिध्द करण्याच्यादृष्टीने हा सायबर सेल उपयुक्त ठरणार आहे. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना अद्ययावत तंत्रज्ञानाचे तसेच कायदेविषयक व शारिरीक प्रशिक्षण देणे आवश्यक असते मात्र उत्पादन शुल्क विभागाचे स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र नसल्याने विभागाला पोलीस प्रशिक्षण केंद्रावर अवलंबून रहावे लागत होते. तसेच 51 नवीन पदे प्रशिक्षण केंद्रासाठी मंजूर करण्यात आली असून सुरुवातील दोन वर्षे पोलीस विभागातील प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य यांची प्रतिनियुक्तीवर सेवा घेऊन प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

चौकट:- राज्य उत्पादन शुल्क विभागाचे राज्यातील पहिले प्रशिक्षण केंद्र वाटोळे येथे होणार.

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी गत चार वर्षामध्ये आपल्या विभागामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबविताना दिसत असून आपल्या वेगळया कार्यशैलीमधून या विभागामध्ये उठावदार कामगिरी  करताना दिसत आहेत.ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून पाटण तालुक्यातील डोंगरी व दुर्गम भागातील वाटोळे येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे राज्यातील पहिले प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार असल्याने भविष्यामध्ये या विभागामध्ये दळणवळणासह स्थानिकांना रोजगार निर्मिती तसेच लहान मोठया उद्योगांना चालना मिळणार असल्याने येथील स्थानिकांचा याचा निश्चितच चांगला फायदा होणार असून वाटोळे व आसपासच्या परिसराचा कायापालट होण्यास मदत होणार आहे.




Monday, 1 July 2024

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत 90 गावांतील सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामांना वाढीवचा 22 कोटी 50 लक्ष रुपयांचा निधी मंजूर.

 

 


 

दौलतनगर दि.01:- राज्य उत्पादन शुल्क मंत्री व सातारा,ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील 90 गावांतील अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत निधी मंजूर होण्यासाठी रोजगार हमी विभागाकडे शिफारस केली होती.ना.शंभूराज देसाई यांचे शिफारशीनुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील 90 गावांतील अंतर्गत रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरणाचे कामांसाठी 22 कोटी 50 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाचे नियोजन विभाग (रोहयो) यांनी पारित केला असल्याची माहिती  पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचे वतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

          प्रसिध्दींस दिलेल्या पत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण या डोंगरी व दुर्गम भागातील अनेक गावांतील रस्त्यांची प्रतिवर्षी होणाऱ्या अतिवृष्टीमुळे मोठया प्रमाणांत नुकसान होत असते. त्यामुळे या गावांतील ग्रामस्थांची दळण वळणाची मोठी गैरसोय होत असल्याने अनेक गावांतील अंतर्गत रस्त्यांच्या कामांना निधीची गरज होती. पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील 90 गावांतील अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामांना निधी मंजूर होण्यासाठी शिफारस केली होती. पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे शिफारशीनुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील तब्बल 90 विविध गावांतील अंतर्गत रस्त्यांच्या कामांना प्रत्येक गावनिहाय 25 लाख या प्रमाणे एकूण 22 कोटी 50 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचा शासन निर्णय  राज्य शासनाचे नियोजन विभाग (रोहयो) यांनी पारित केला आहे. मंजूर झालेल्या कामांमध्ये रामिष्टेवाडी,सलतेवाडी वाझोली,डाकेवाडी वाझोली,कसणी,भरेवाडी काळगाव,लोहारवाडी काळगाव,शिद्रुकवाडी वरची खळे, चाळकेवाडी निवडुंगे आळी,माटेकरवाडी नं.1,गुढे,पाचुपतेवाडी ग्रा.प.,जांभूळवाडी कुंभारगाव,शिद्रुकवाडी ग्रा.प.,डूबलवाडी शिद्रुकवाडी,खळे,मानेगाव,गलमेवाडी,देवघर गोवारे,हेळवाक,गोषटवाडी,कडववाडी नाणेगाव बु.,माथणेवाडी चाफळ भैरवनाथ मंदिर,बाटेवाडी पाठवडे,बोर्गेवाडी भैरेवाडी डेरवण,जितकरवाडी जिंती,भोसगाव,काटकरवाडी मंद्रुळकोळे, उमरकांचन, कोळेकरवाडी, उधवणे,पाणेरी,उधवणे जोतिर्लिंग मंदिर,सळवे,डांगीष्टेवाडी सुंदरनगर,पांढरवाडी तारळे,आंबेवाडी घोट,फडतरवाडी घोट,वेखंडवाडी,दुसाळे,तारळे,करमाळे वजरोशी,जन्नेवाडी‍ घोट,ढोरोशी,गर्जेवाडी कडवे,घाटेवाडी मालोशी,कडवे बुद्रुक,काढोली, सुतारवस्ती कुसरुंड,कोळेकरवाडी कुसरुंड,पाचगणी केदारर्लिंग मंदिर,दिक्षी,मणेरी,कवरवाडी,नेरळे,डोंगरुबाचीवाडी मुळगाव, आडदेव,बेलवडे खुर्द,विहे बौध्दवस्ती,ठोमसे,गणेवाडी ठोमसे,मल्हारपेठ,ऊरुल,बोडकेवाडी,सोनाईचीवाडी,आसवलेवाडी,बहुले, पापर्डे,सोनवडे,बहुले,बोर्गेवाडी पुनर्वसन सांगवड,चोपदारवाडी,डफळवाडी मणदुरे,येराड,बनपेठ येराड,लुगडेवाडी सोनगाव, पिंपळोशी बौध्दवस्ती,फुरसाई दिवशी खुर्द,मळयाचावाडा दिवशी खुर्द,वाघाचीवाडी नायकवाडीवाडी दिवशी खुर्द,मराठवाडी दिवशी खुर्द,टोळेवाडी,दिवशी खुर्द धोरश्वर मंदिर,मिसाळवाडी मरड,कुसवडे,खुडुपलेवाडी गावडेवाडी,धुईलवाडी गावडेवाडी,वस्ती साकुर्डी,म्होप्रे,पाठरवाडी (गमेवाडी),आरेवाडी या गावांतील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरणाचे कामांचा समावेश आहे.पाटण विधानसभा मतदारसंघातील एकाच वेळी तब्बल 90 गावांतील अंतर्गत रस्त्यांची कामे तातडीने मार्गी लागण्यासंदर्भात पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी अधिकारी यांना सूचना केल्या असल्याची माहिती शेवटी प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

Wednesday, 5 June 2024

लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याकडून रुपये 150/- प्र.मे.टन प्रमाणे ऊसबिल बँक खाती वर्ग. चेअरमन यशराज देसाई यांची माहिती.

 



दौलतनगर दि.5: लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने सन 2023-24 चा गळीत हंगाम राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली कारखाना व्यवस्थापनाने यशस्वीपणे पार पाडत गळीतास आलेल्या ऊसाच्या एफ.आर.पी.पोटी रु. 150/- प्र.मे.टन प्रमाणे होणारी रक्कम रु.336,62 लाख संबंधित ऊस पुरवठादारांच्या बँक खाती आजरोजी वर्ग करण्यात आली असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

        पत्रकात पुढे म्हंटले आहे की, आपले लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने सन 2023-24 चे गळीत हंगामामध्ये 2,24,413.652 मे.टन ऊस गाळप करुन सरासरी 11.98 टक्के साखर उताऱ्याने 2,68,775 क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.कारखान्याची सन 2023-24 चे गळीत हंगामामध्ये पहिली उचल एफ.आर.पी.पोटी रु.2500/- प्र.मे.टन प्रमाणे यापूर्वीच रु. 5610.34 लाख रक्कम ऊस पुरवठादारांना अदा केली आहे. तसेच उर्वरित एफ.आर.पी.पोटी रक्कम रु. 150/- प्र.मे.टन प्रमाणे रु.336.62 लाख आज संबंधित ऊस पुरवठादारांच्या बँक खाती 5 जुन 2024 रोजी वर्ग केली असून ऊस पुरवठादारांनी संबंधित सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या  शाखेशी संपर्क साधावा असे ही म्हंटले आहे. ते पुढे म्हणाले की,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक व महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री तसेच सातारा,ठाणे जिल्हा पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली कारखाना व्यवस्थापनाने आर्थिक नियोजन करुन सन 2024-25 च्या गळीत हंगामाची तयारी सध्या सुरु केली असून ऊस तोडणी वाहतूकीचे कराराचे काम  सुरु आहे. कारखान्याचे आधुनिकीकरणासह विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाले असून  कारखान्यातील आँफ सिजन मेंटेनन्सचे कामकाज प्रगतीपथावर आहे.साखरेच्या दरातील अस्थिरता व मोलॅसेसवर निर्यात बंदी केल्याने दरात झालेली घसरण यामुळे सर्व साखर उद्योगाला अडचण निर्माण झाली असून त्यावर नियोजन करुन उर्वरित शिल्लक एफ.आर.पी.पोटी देय रक्कम लवकरच अदा करण्याचा कारखाना व्यवस्थापनाचा प्रयत्न राहणार आहे.  तरी कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक सभासद शेतकरी यांनी आपला पिकविलेला सर्व ऊस आपले लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यास नोंद करुन  सन 2024-25 चा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहनही शेवटी  चेअरमन यशराज देसाई यांनी प्रसिध्दी पत्रकांत केले आहे.