Thursday 11 July 2024

पाटण मतदारसंघातील 26 तलाठी कार्यालयांचे बांधकामासाठी 3 कोटी 90 लक्ष रुपयांची तरतूद. ना.शंभूराज दसेाई यांचे प्रयत्नातून मतदारसंघात 26 तलाठी कार्यालयांच्या इमारतींचा प्रश्न मार्गी.

 

 

  दौलतनगर दि.11:- पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये तलाठी सजा असलेल्या गावांच्या ठिकाणी सुसज्ज असे तलाठी कार्यालयांच्या इमारतींचे बांधकामासाठी निधी मंजूर होण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना.शंभूराज देसाई यांनी महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे-पाटील यांचेकडे शिफारस केली होती. त्यानुसार राज्याचे पुरवणी अर्थसंकल्पामध्ये पाटण मतदारसंघातील 26 नवीन तलाठी कार्यालयांच्या इमारतींचे बांधकामासाठी 3 कोटी 90 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

           प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण मतदासंघामध्ये तलाठी सजा असलेल्या गावांमध्ये तलाठी कार्यालयांसाठी स्वतंत्र अशा इमारती नसून या गावांमध्ये भाडयाचे खोलीमध्ये किंवा त्या-त्या विभागातील मुख्य बाजारपेठेचे गाव असलेल्या ठिकाणी तलाठी कार्यालयांचे  कामकाज सुरु असून याच ठिकाणी  सर्व कागदपत्रांचे रेकॉर्ड ठेवले जात आहे.त्यामुळे गावाला सजा असूनही इमारतीच्या अभावी गावा-गावांतील लोकांना कामकाज सुरु असलेल्या तलाठी कार्यालयात कामासाठी त्या-त्या विभागातील मुख्य बाजारपेठ असलेल्या ठिकाणी जावे  लागत असल्याने या नागरीकांचा वेळेसह आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याने नागरीकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन पाटण विधानसभा मतदारसंघातील तलाठी सजा असलेल्या ठिकाणी सुसज्ज अशी अद्यावत इमारती मंजूर होण्यासाठी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई हे प्रयत्नशील होते.त्यानुसार त्यांनी राज्याचे महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांचेकडे मतदारसंघातील 26 तलाठी कार्यालयांच्या इमारतीचे बांधकामासाठी निधी मंजूर होण्यासाठी शिफारस केली होती.त्यानुसार महसूल विभागाकडून संबंधित 26 तलाठी कार्यालयांच्या इमारतीचे बांधकामासाठी निधी मंजूर होण्यासाठीचा आवश्यक तो प्रस्तावही सादर करण्यात आला होता.नुकतेच मुंबई या‍ ठिकाणी सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी अर्थसंकल्पामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघातील 26 नवीन तलाठी कार्यालयांचे बांधकामासाठी 3 कोटी 90 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मंजूर झालेल्या नवीन तलाठी कार्यालयांमध्ये मरळी,सांगवड,कोकीसरे,आंब्रुळे,सोनवडे,काळगाव,चोपडी,नाटोशी,चाफळ,येराड,आवर्डे,नवसरी,घोट,नुने,डेरवण,मरळोशी, हेळवाक,वेताळवाडी,शेडगेवाडी,दिवशी बुद्रुक,विहे,कुंभारगाव,मारुलहवेली,कडवे बुद्रुक,पाडळोशी व वेखंडवाडी या तलाठी सजा असलेल्या गावांचा समावेश असून या ठिकाणी तलाठी कार्यालयांसाठी आता नव्याने इमारती होणार असल्याने गावा-गावातील तलाठयांकडे असणारी कामे ही गावांमध्येच होण्यासाठी याचा मोठा फायदा होणार असून नवीन तलाठी इमारतींमध्ये कार्यालयीन कामकाज करताना मोठी सुलभता येणार आहे.

चौकट: ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून मतदारसंघात सुसज्ज  लाठी कार्यालय

सन 2014 ते 19 या पंचवार्षिकमध्ये पाटण मतदारसंघातील तारळे,नाडे,ऊरुल,आडूळपेठ,मल्हारपेठ व बहुले या 6 ठिकाणी नवीन तलाठी कार्यालयांचे बांधकामासाठी निधी मंजूर करण्यात येऊन या तलाठी कार्यालयांच्या इमारतींची कामे पूर्ण होऊन या इमारतींमध्ये सध्या कामकाज सुरु आहे.तर नुकतेच मुंबई या ठिकाणी सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान पुरवणी अर्थसंकल्पामध्ये 26 तलाठी कार्यालयांचे नवीन इमारतींचे बांधकामासाठी 3 कोटी 90 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याने पाटण मतदारसंघातील 32 तलाठी कार्यालयांच्या स्वतंत्र इमारतींचा प्रश्न ना.शंभूराज देसाई यांचे माध्यमातून मार्गी लागला आहे.

No comments:

Post a Comment