Wednesday 10 July 2024

स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचा दि.१२ जुलै रोजी दौलतनगर ता.पाटण येथे ३8वा पुण्यतिथी कार्यक्रम. प्रतिवर्षाप्रमाणे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व मुकबधीर विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप.

 

   

       

दौलतनगर दि. 10:लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचा ३8 वा पुण्यतिथी कार्यक्रम प्रतिवर्षाप्रमाणे शुक्रवार दि.१२ जुलै,२०24 रोजी सकाळी १०.०० वा. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्या वतीने महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक, दौलतनगर ता.पाटण येथे विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार असून स्व.शिवाजीराव देसाई यांचे पुण्यतिथीनिमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे पाटण तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे मार्गदर्शक,महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हा पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई,सातारा जिल्हयाचे जिल्हाधिकारी मा.श्री.जितेंद्र डुडी, जिल्हा पोलीस अधिक्षक मा.श्री.समीर शेख व सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्रीमती याशनी नागराजन यांचे शुभहस्ते, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) व मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई(दादा) यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने कारखान्याचे व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

            दौलतनगर ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्या वतीने कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचा पुण्यतिथी कार्यक्रम प्रतिवर्षी कारखाना कार्यस्थळावर साजरा करण्यात येतो.प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचा ३8 वा पुण्यतिथी कार्यक्रम शुक्रवार दि.१२ जुलै, २०24रोजी सकाळी १०.०० वा.दौलतनगर ता.पाटण येथे आयोजीत केला आहे. स्व.शिवाजीराव देसाई यांचे पुण्यतिथीनिमित्ताने स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे पुर्णाकृती पुतळयासमोर भजनाचा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमानंतर सकाळी १०.०० वा. महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री नामदार शंभूराज देसाई, सातारा जिल्हयाचे जिल्हाधिकारी मा.श्री.जितेंद्र डुडी, जिल्हा पोलीस अधिक्षक मा.श्री.समीर शेख व सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्रीमती याशनी नागराजन,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) व मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई(दादा) यांचे प्रमुख उपस्थितीत लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुर्णाकृती पुतळयास व स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे समाधी व पुर्णाकृती पुतळयास पुष्पचक्र अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात येणार आहे. प्रतिवर्षाप्रमाणे पाटण तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेतील प्रत्येक केंद्रात प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस, प्रशस्तीपत्रक व गौरवचिन्ह देवून या विद्यार्थ्यांचा सत्कार आणि पाटण तालुक्यातील मुकबधीर विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप कार्यक्रम नामदार शंभूराज देसाई, सातारा जिल्हयाचे जिल्हाधिकारी मा.श्री.जितेंद्र डुडी, जिल्हा पोलीस अधिक्षक मा.श्री.समीर शेख व सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्रीमती याशनी नागराजन यांचे शुभहस्ते,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) व मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई(दादा)  यांचे प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमास कारखान्याचे सभासद, हितचिंतक, पालकवर्ग,विद्यार्थी व कार्यकर्ते या सर्वांनी सकाळी १०.०० वा महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक,दौलतनगर ता.पाटण येथे मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कारखान्याचे व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे यांनी पत्रकात केले आहे.

 

No comments:

Post a Comment