Tuesday, 25 June 2019

प्रादेशिक पाणी योजना सुरु करा अन्यथा त्याअंतर्गत छोटया गांवाना स्वतंत्र्य पाणी योजना करायला निधी दया. तालिका अध्यक्ष आमदार शंभूराज देसाईंचे शासनाला निर्देश. उपाययोजना करण्याचे पाणी पुरवठा मंत्र्यांचे आश्वासन.



दौलतनगर दि.२५:- राज्यातील बहूतांशी भागामध्ये सुमारे सात ते आठ गांवाना उपयुक्त अशा प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना करण्यात आल्या आहेत परंतू यातील बऱ्याच अंशी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना सध्या बंद अवस्थेत असल्यामुळे या योजनातंर्गत समाविष्ठ गांवाना पाणी मिळत नाही.राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता खात्याकडून या प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती करावी. योजनांची दुरुस्ती करणे शक्य नसेल तर या योजनेतंर्गत समाविष्ठ असणाऱ्या छोटया छोटया गांवाना राज्य शासनाने स्वत:च्या स्वतंत्र्य नळ पाणी पुरवठा योजना करणेकरीता आवश्यक असणारा निधी मंजुर करुन तो उपलब्ध करुन दयावा असे निर्देश तालिका अध्यक्ष आमदार शंभूराज देसाईंनी शासनाला देत राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना.बबनराव लोणीकर यांना तालिका अध्यक्ष पदावरुन सुचित केले.यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री यांनी या योजनांच्या संदर्भात उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
 सन २०१९-२० च्या अतिरिक्त अर्थस्ंकल्पावरील चर्चेला राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना.बबनराव लोणीकर हे सभागृहात उत्तर देत असताना तालिका अध्यक्ष म्हणून आमदार शंभूराज देसाईंनी राज्यातील बंद अवस्थेत असणाऱ्या प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनांची बाब मंत्री ना.लोणीकर यांच्या निदर्शनास आणून देत त्यांना वरीलप्रमाणे तालिका अध्यक्ष आमदार शंभूराज देसाईंनी सुचित केले.
 विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवरुन तालिका अध्यक्ष म्हणून आमदार शंभूराज देसाईंनी अतिरिक्त अर्थस्ंकल्पा वरील चर्चेचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री यांचे उत्तर सुरु असताना,पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्रीमहोदय राज्यातील बहूतांशी भागामध्ये प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना या बऱ्याच अंशी सध्या बंद अवस्थेत आहेत या योजनांतंर्गत सुमारे सात ते आठ छोटया छोटया गांवाचा समावेश आहे.एकत्रित सात ते आठ छोटया छोटया गांवाना या योजनेचा लाभ मिळावा याकरीता ही योजना शासनाने राबविली आहे.परंतू बहूतांशी योजना या जीर्ण आणि नादुरुस्त झाल्या असल्यामुळे समाविष्ठ असणाऱ्या छोटया छोटया अनेक गांवाना या योजनेचे पाणी मिळणे बंद झाले आहे.प्रादेशिक पाणी योजनेचे पाणी मिळत नसल्याने अनेक छोटया छोटया गांवाच्या पिण्याच्या पाण्याची मोठया प्रमाणात गैरसोय होत असून शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता खात्याकडून या प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती करावी. योजनांची दुरुस्ती करणे विभागाला शक्य नसेल तर या योजनेतंर्गत समाविष्ठ असणाऱ्या छोटया छोटया गांवाना राज्य शासनाने स्वत:च्या स्वतंत्र्य नळ पाणी पुरवठा योजना करणेकरीताचा सर्व्हे करुन अहवाल शासनास सादर करावा व शासनाने अशा छोटया छोटया गांवाच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना करणेकरीता आवश्यक असणारा निधी मंजुर करुन तो उपलब्ध करुन दयावा असे शासनाला व पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री यांना निर्देश दिले. यावर पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री यांनी अतिरिक्त अर्थस्ंकल्पावरील चर्चेवर उत्तर देताना अशा योजनांच्या संदर्भात उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.


आश्वासन पुर्तीच्या दिशेने युती शासनाची वाटचाल- आमदार शंभूराज देसाई. राज्याचा समतोल विकास साधणारा व आश्वासन पुर्तीचा हा अतिरिक्त अर्थसंकल्प.



दौलतनगर दि.२५:- राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री यांचे मार्गदर्शनाखाली ०४ लाख ०३ हजार २०७ कोटींचा अर्थसंकल्प राज्याचे वित्तमंत्री यांनी दि.२७ फेब्रुवारी,२०१९ सादर केला होता.नवीन बाबीव्दारे दि.१९ जुन रोजी या अर्थस्ंकल्पामध्ये ०१ हजार ५८६ कोटींची अतिरिक्त वाढ करुन या अधिवेशनात हा अर्थसंकल्प  ०४ लाख ०४ हजार ७९३ कोटींचा सादर करण्यात आला.या अर्थस्ंकल्पातून सबका साथ,सबका विकास व सबका विश्वास या धोरणानुसार राज्यातील ग्रामीण भागातील शेतकरी हा केंद्रबिंदू मानून मांडलेला हा अर्थसंकल्प आहे.आश्वासन पुर्तीच्या दिशेने युती शासनाची वाटचाल असून राज्याचा समतोल विकास साधणारा आणि २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत जी जी आश्वासने दिली होती त्याची पुर्तता करणारा हा अर्थसंकल्प असल्याचे प्रतिपादन आमदार शंभूराज देसाईंनी विधानसभेत केले.
                    शिवसेना पक्षाच्या वतीने प्रथमत: आमदार शंभूराज देसाईंना सन २०१९-२० च्या अतिरिक्त अर्थसंकल्पावर बोलण्याची संधी देण्यात आली होती.त्यावेळी युती शासनाने गत साडेचार वर्षात महाराष्ट्र राज्यात केलेल्या विविध जनहितार्थ विकासकामांना स्पर्श करीत त्यांनी  अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये युतीच्या शासनाने जनतेच्या मुलभूत सुविधा पुर्ण करण्याकरीता केलेल्या विविध खात्यांच्या अर्थसंकल्पावरील तरतूदीचे कौतुक केले. राज्याच्या ग्रामीण भागामध्ये राज्यातील शेतकरी केंद्रबिंदू मानून युतीच्या शासनाने राज्यामध्ये कृषी, सिंचन,तीर्थक्षेत्र विकास,विद्यूत विकास, ग्रामीण विकास,ग्रामीण शिक्षण,कला,आरोग्य तसेच दर्जेदार रस्त्यांच्या बांधकामांकरीता  बांधकाम विभाग या सर्व विभागांना केलेली तरतूद ही प्रगतीच्या दिशेने नेणारी आहे.प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेच्या माध्यमातून सिंचन क्षेत्र वाढविण्याकरीता युती शासनाचे धोरण या अर्थसंकल्पातून स्पष्ट दिसून येत आहे. आणि सगळयात महत्वाचे म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने राज्यातील शेतकऱ्यांना दिलेली शेतकरी सन्मान योजना. २०१४ च्या निवडणूकीनंतर सत्तेवर येताना युती शासनाने जी जी आश्वासने महाराष्ट्र राज्यातील जनतेला दिली होती ती ती आश्वासने पुर्ण करण्याचा गत साडेचार वर्षात कसोशीने प्रयत्न केला आहे. युती शासनाचा एक घटक म्हणून मला याचा सार्थ अभिमान आहे. आज आम्ही युतीचे सर्व आमदार ठामपणे आपआपल्या मतदारसंघातील जनतेला सांगु शकतो की, आम्ही जे बोललो ते करुन दाखविले ते केवळ आणि केवळ युती शासनाने आम्हाला दिलेल्या पाठबळामुळेच असे सांगून आमदार शंभूराज देसाईंनी पाटण विधानसभा मतदारसंघातील काही प्रलंबीत प्रश्नाकडेही शासनाचे व शासनाच्या विविध खात्यांच्या मंत्रीमहोदयांचे लक्ष वेधले.
      पाटण मतदारसंघातील प्रश्नाविषयी बोलताना आमदार देसाई म्हणाले,जलसंपदा विभागाला १२ हजार ५९७ कोटी रुपयांची तर प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेकरीता २७२० कोटी रुपयांची शासनाने तरतूद केली आहे. पाटण मतदारसंघातील मोरणा धरण प्रकल्पातून शेतकऱ्यांच्या वाढीव क्षेत्राला इरिगेशनच्या माध्यमातून पाणी देणेकरीता वाढीव निधीची अजुनही गरज असून कोयना नदीकाठच्या गांवाना संरक्षण देणेकरीता तीन गांवाच्या घाटांचा निधी अद्याप मिळाला नाही तो लवकरात लवकर उपलब्ध करुन दयावा. मतदारसंघातील १५ अवर्गीकृत ग्रामीण मार्ग/ इजिमा रस्त्यांचा प्रजिमा मध्ये समावेश करण्याची मागणी करण्यात आली असून याचा प्रस्ताव तात्काळ मागवावा. तसेच राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या काशीळ ते पाल-तारळे-जळव- निवकणे-मणदुरे-केरळ- सुरुल ते पाटण या ३८ किमी रस्त्याला विशेष बाब म्हणून राज्य मार्गाचा दर्जा दयावा असे सांगत त्यांनी पाटण न्यायालयाच्या इमारतीचे काम पुर्णत्वाकडे गेले असून याकरीता आवश्यक असणाऱ्या फर्नीचरच्या कामांना निधी आवश्यक आहे याचा प्रस्ताव शासनाकडे आला असून या निधी मंजुर करावा. मल्हारपेठला पोलीस औटपोस्ट असून या औटपोस्टला पोलीस स्टेशनचा दर्जा देवून पोलीस स्टेशन बांधणेकरीता निधी दयावा.मल्हारपेठ, ढेबेवाडी येथील पोलीसांच्या वसाहतींची दुरावस्था झाली असून या वसाहतींच्या बांधकामांना निधी दयावा तर अवकाळी पावसामुळे नुकसान होणाऱ्यांना नुकसानभरपाई देताना सन १९८८ साली ६५ मिमी ची अट घालण्यात आली आहे अवकाळी पाऊस काही सांगून येत नाही त्यामुळे ही अट शिथील करावी व नुकसानग्रस्तांना मदत करावी.कोयना पर्यटनातील काही कामांना निधी मंजुर झाला आहे उर्वरीत कामांना यंदाच्या वर्षी निधी मंजुर करावा यामध्ये वन्यजीव विभागाकडीलही अनेक कामे आहेत यासंदर्भातील मागणी वनमंत्री यांचेकडे केली आहे.पाटणच्या ग्रामीण रुग्णलयाला श्रेणीवर्धन देण्याचा प्रस्ताव शासनाकडे बरेच वर्षे प्रलंबीत आहे यासही मान्यता दयावी.मुख्यमंत्री रोजगार कार्यक्रम शासनाने हाती घेतला आहे आमचे पाटण शेजारच्या तामकडे एमआयडीसीमध्ये दोन चार उद्योग सोडले तर बाकीचे सर्व प्लॉट पडून आहेत.एमआयडीसीमधील प्लॉट विकसीत करुन ज्यांना उद्योगाकरीता गरजेचे आहेत त्यांना ते देण्यात यावेत असे सांगून त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री व वित्तमंत्री यांनी आम्ही जे मागितले त्या त्या कामांना आवश्यक निधी मंजुर केला जी काही कामे राहिली आहेत त्यासही निधी दयावा असे सांगत मुख्यमंत्री व वित्तमंत्री यांचे कार्याचे कौतुक करुन त्यांचे आभार व्यक्त केले.
चौकट:- पाटणच्या प्रशासकीय इमारतीकरीता निधी मंजुर करा. - आमदार शंभूराज देसाई.
पाटण हा मतदारसंघ डोंगंराळ असून पाटण हे तालुक्याचे ठिकाण आहे. तालुक्याच्या ठिकाणी शासकीय कार्यालये ही वेगवेगळया ठिकाणी असून ही सर्व कार्यालये एका छताखाली आणणेकरीता प्रशासकीय इमारत उभी करणे गरजेचे आहे. या प्रशासकीय कार्यालयास विशेष बाब म्हणून निधी मंजुर करावा असा आग्रह आमदार शंभूराज देसाईंनी मुख्यमंत्री व वित्तमंत्री यांना अर्थसंकल्पावरील चर्चेवर बोलताना केला.

Monday, 24 June 2019

मुख्यमंत्र्यांच्या योग्य नियोजनामुळे राज्यातील दुष्काळ,पाणीटंचाई परिस्थितीवर उपाययोजना होवू शकल्या. आमदार शंभूराज देसाईंचे २९३ अन्यवे चर्चेवर विधानसभेत प्रतिपादन.


                

दौलतनगर दि.२5:- राज्यावर आलेले पाणीटंचाईचे संकट राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या योग्य नियोजनामुळे दुर होण्यास मदत झाली.राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील डोंगरी व दुर्गम भागात जाणवणाऱ्या दुष्काळासंदर्भात तसेच पाणीटंचाई संदर्भात आवश्यक असणाऱ्या नळ पाणी पुरवठा योजनांना,पाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्तीच्या कामांना,पाण्याच्या विहीरी खोल करणे,नवीन विंधन विहीरी घेणे,गाळ काढणे,विधंन विहीरींची विशेष दुरुस्ती करणे, टँकरची आवश्यकता असणाऱ्या गांवाना तहसिलदारांमार्फत तात्काळ टँकर मंजुर करुन देणे, तसेच आवश्यक ठिकाणी चारा छावण्या उभारुन चारा छावणीतील जनावरांना खाद्य पुरवठा करणे,शेतीच्या पंपाची वीज खंडीत न करणे इत्यादी कामांचे विविध खात्यांमार्फत नियोजन करुन निधी उपलब्ध करुन दिल्यानेच त्यांच्या योग्य नियोजनामुळेच राज्य शासनाने आवश्यक त्या उपाययोजना  करुन युतीच्या शासनाने दुष्काळावर व पाणीटंचाई परिस्थितीवर मात केली असून सर्वात महत्वाचे म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात देण्यात आलेली कर्जमाफी हे युती शासनाचे मोठे यश असल्याचे प्रतिपादन आमदार शंभूराज देसाईंनी विधानसभेत केले.
                    महाराष्ट्र विधानसभेच्या मुंबई येथे सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दि.२१ जुन रोजी सत्ताधारी पक्षाने मांडलेल्या मविस २९३ अन्वये चर्चेवर आमदार शंभूराज देसाईंनी आपली भूमिका मांडली.या चर्चेवर बोलताना त्यांनी सत्ताधारी पक्षाने राज्यातील दुष्काळी परिस्थिती निवारणार्थ व पाणीटंचाईच्या संदर्भात  राज्य शासनाने राज्याचे मुख्यमंत्री यांनी योग्य नियोजन करुन शासनाच्या विविध खात्यांच्या माध्यमातून उपरोक्त उपाययोजना केल्यामुळेच राज्यावरील दुष्काळाचे आणि पाणीटंचाईचे संकट दुर होवू शकले असल्याचे प्रतिपादन केले.याप्रसंगी त्यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील यासंदर्भातील विविध विषयांवर आपले मत मांडताना युतीच्या शासनाने पाटण मतदारसंघात पाण्याच्या संदर्भात दिलेल्या विविध पिण्याच्या पाण्याच्या योजनांच्या कामांना दिलेल्या निधीच्या संदर्भात शासनाचे व विशेषत: मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. पाटण विधानसभा मतदारसंघात ४ महसूल मंडलामध्ये शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे.या चार मंडलामध्ये पाणीटंचाई जाणवू नये याकरीता उपरोक्त आवश्यक त्या उपाययोजना शासनाच्या मदतीने आम्हास करता आल्या. प्राधान्याने या मंडलातील गांवामध्ये जिथे पाण्याची टंचाई जाणवणार होती त्या ठिकाणच्या गांवामध्ये नळ पाणी पुरवठा योजनां,पाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्ती, पाण्याच्या विहीरी खोल करणे,नवीन विंधन विहीरी घेणे,गाळ काढणे,विधंन विहीरींची विशेष दुरुस्ती करणे,टँकर पुरविणे या कामांना आवश्यक तो निधी वेळेत मिळू शकला तसेच शालेय/ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या प्रवास शुल्कात माफी,कृषीपंपाच्या चालु वीज बिलात मोठया प्रमाणात सुट देणे, वीज बिलामुळे बंद करण्यात आलेल्या नळ पाणी पुरवठा तसेच शेतीच्या पाण्याच्या योजना पुन्हा सुरु करणे ही कामे शासनाच्या योग्यवेळी घेतलेल्या निर्णयामुळे होवू शकली असे सांगून त्यांनी काही उपाययोजनाही शासनास सुचविल्या यामध्ये पाटण मतदारसंघातील तारळी धरण प्रकल्पाकरीता शासनाने ५० मीटरवरील जमीनीस पाणी मिळवून देणेकरीता १६१०.३२ कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. या सुधारित प्रशासकीय मान्यतेमुळे ५५३ कोटी रुपयांचा वाढीवचा निधी मिळाला असून मुख्यमंत्री यांच्या हस्ते या योजनांचे ई भूमिपुजनही करण्यात आले आहे.तारळी प्रकल्पातील ५० मीटरच्या वरील जमिन क्षेत्राला पाणी देणेसंदर्भात कामास जलसंपदा विभागाकडून गती देणे अत्यंत गरजेचे आहे. लवकरात लवकर या विभागातील ५० मीटरच्या वरील कामे पुर्णत्वाकडे गेल्यानंतर या विभागातील १७ गांवातील २७२५ एकर जादाचे क्षेत्र यामुळे ओलिताखाली येण्यास मदत होणार असून जलसंपदा विभागाकडून सदरची कामे लवकर मार्गी लावण्याच्या सक्त सुचना कराव्यात अशी मागणी आमदार शंभूराज देसाईंनी यावेळी केली. तसेच युती शासनाच्या माध्यमातून पाटण मतदारसंघात शासनाच्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल, कोयना भूकंप निधी,जलस्वराज्य प्रकल्प,विशेष घटक योजना या विविध लेखाशिर्षातून एकूण ७६ नळ पाणी पुरवठा योजनांना आवश्यक असणारा निधी मंजुर झाला आहे. एका वर्षात ७६ नळ पाणी पुरवठा योजनांना निधी मंजुर होणे ही पाटण मतदारसंघातील सर्वांत महत्वाची बाब मानली जाते.नळ पाणी पुरवठयाच्या विभागाचे काम हे संत गतीने सुरु आहे. त्या कामांनाही चालना देवून ही पाणी पुरवठा योजनांची कामे लवकरात लवकर पुर्ण करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
चौकट:- कोयना धरणातील ४ टीएमसी पाणी कर्नाटकला न दिल्याने मुख्यमंत्र्याचे आभार.
              पाटण मतदारसंघातील  कोयना धरणात यंदाच्या वर्षी कमी पाणीसाठा असून धरणातील ४ टीएमसी पाणी कर्नाटकला देवू नये अशी मागणी मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री यांच्याकडे केली होती. आमची मागणी मान्य केल्याने मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री यांचा मी आभारी आहे. सदरचे ४ टीएमसी पाणी न दिल्यानेच धरणात आज बऱ्यापैकी पाणीसाठा असून यापुढे कोयना धरणातील पाण्याचे योग्य नियोजन करावे अशीही मागणी आमदार शंभूराज देसाईंनी केली.

Sunday, 23 June 2019

बँक ऑफ महाराष्ट्रच्या तारळे ता.पाटण शाखेतील गैरव्यवहाराची चौकशी करुन दोषींवर कडक कार्यवाही करा.तालिका अध्यक्ष आमदार शंभूराज देसाईंचे शासनाला निर्देश.



                      
दौलतनगर दि.२3:- पाटण तालुक्यातील तारळे येथील बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेच्या शाखेत शाखेचा शाखाप्रमुख यांने या विभागातील एका राजकीय पुढाऱ्याला हाताशी धरुन शाखेत कर्जवाटपामध्ये तसेच अनेक बाबतीत आर्थिक गैरव्यवहार केले असल्याने शाखेतून या विभागातील स्थानिकांना कर्जवाटप करणे थांबविण्यात आले असल्याची बाब निदर्शनास आली असून शाखाप्रमुख व राजकीय पुढारी या दोन व्यक्तींच्यामुळे स्थानिक उद्योजक, व्यापारी तसेच नागरिक हे वेटीस धरले जात असल्याने या बँकेच्या शाखेतील सर्व गैरव्यवहाराची जिल्हाधिकारी यांचेमार्फत उच्चस्तरीय चौकशी करावी व दोषींवर कडक कार्यवाही करुन बँकेतुन कर्जपुरवठा सुरळीत सुरु करावा असे निर्देश तालिका अध्यक्ष आमदार शंभूराज देसाईंनी शासनाला दिले.
                          तारळे ता. पाटण येथे बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेची शाखा असून या शाखेमध्ये शाखेचा संबधित शाखाधिकारी याने तारळे विभागातील एका राजकीय पुढाऱ्याला हाताशी धरुन बँकेच्या शाखेत कर्जवाटपामध्ये तसेच इतरही आर्थिक बाबींमध्ये मोठया प्रमाणात गैरव्यवहार केला असल्याचे उघडपणे या विभागातील स्थानिक उद्योजक, व्यापारी तसेच नागरिकांकडून सांगण्यात येत असून या दोन व्यक्तींच्यामुळे शाखेतून उद्योजक,व्यापारी तसेच नागरिकांना आवश्यक असणारा कर्जपुरवठा पुर्णत: बंद करण्यात आला आहे.स्थानिक उद्योजक,व्यापारी तसेच नागरिकांना तारळे शाखेकडून वेठीस धरण्यात येत असून शाखेतून कर्जपुरवठा बंद होण्यास हे दोन व्यक्तीच जबाबदार असल्याचे सांगण्यात येत असून या सर्व प्रकारामुळे स्थानिक उद्योजक,व्यापारी तसेच नागरिकांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र तारळे शाखेच्या विरोधात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.या शाखेतील गैरव्यवहाराची पुर्णपणे जिल्हाधिकारी,सातारा यांच्यामार्फत चौकशी करुन दोषींवर कडक कार्यवाही करावी व शाखेतील कर्जपुरवठा सुरळीतपणे सुरु करावा अशी मागणी स्थानिक उद्योजक,व्यापारी तसेच नागरिकांकडून करण्यात येत असल्याने तात्काळ बँक ऑफ महाराष्ट्रच्या तारळे शाखेतील कर्जवाटपामध्ये तसेच अनेक बाबतीत झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराची जिल्हाधिकारी, सातारा यांच्यामार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्यात येवून दोषींवर कडक कार्यवाही करावी व  स्थानिक उद्योजक, व्यापारी तसेच नागरिकांच्या मागणीवरुन या शाखेतून सुरळीत असा कर्जपुरवठा सुरु करण्यात यावा असे निर्देश आमदार शंभूराज देसाईंनी विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवरुन तालिका अध्यक्ष म्हणून शासनाला दिले.
चौकट:- जिल्हास्तरीय वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्याची दादागिरी विधानसभेत मांडून कडक कारवाई करण्यास           
              शासनास भाग पाडणार- आमदार शंभूराज देसाई.
              लोकसभा निवडणूकीदिवशी पाटण विधानसभा मतदारसंघात दादागिरी व आपल्या पदाचा गैरवापर करुन मतदारसंघातील जबाबदार पदाधिकाऱ्यास विनाकारण मारहाण करणाऱ्या जिल्हास्तरीय वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांने केलेली दादागिरी वरीष्ठाच्या कानावर घालूनही याकडे वरीष्ठांनी केलेल्या दुर्लक्षामुळे हे दादागिरीचे प्रकरण दोनच दिवसात सुरु असलेल्या अधिवेशनात विधानसभेत मांडून संबधित पोलीस अधिकाऱ्यावर शासनामार्फत कडक कारवाई करण्यास शासनास भाग पाडणार असून पोलीसांची दादागिरी मोडीत काढणार असल्याचे आमदार शंभूराज देसाईंनी सांगितले आहे.

राज्याच्या अर्थसंकल्पातून पाटण मतदारसंघातील रस्त्यांच्या व पुलांच्या कामांना १५.१३ कोटीं रुपयांचा निधी मंजुर.



दौलतनगर दि.२३:- राज्य शासनाचे सन २०१९ चे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सुरु असून या अधिवेशनात अतिरिक्त मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये ५०५४ मार्ग व पुल या लेखाशिर्षाखाली राज्यमार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग असणाऱ्या पाटण विधानसभा मतदारसंघातील सात रस्त्यांच्या कामांना व तीन मोठया पुलाच्या कामांना एकूण १५.१३ कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजुर केला असल्याची माहिती तालुक्याचे आमदार शंभूराज देसाईंनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
                               पत्रकात म्हंटले आहे की, राज्याचे मुख्यमंत्री व सार्वजनीक बांधकाम मंत्री यांचेकडे पाटण या डोंगराळ व दुर्गम भागातील रस्त्यांच्या व पुलाच्या कामांना सन २०१९ च्या जुनच्या अर्थसंकल्पातून निधी मंजुर करणेकरीता पाटण मतदारसंघातील राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग असणाऱ्या रस्त्यांच्या व या मार्गावरील मोठया पुलांचे बांधकाम करण्याची कामे सुचविण्यात आली होती त्यानुसार अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघातील सात रस्त्यांच्या व तीन मोठया पुलांचे बांधकामांस शासनाने निधी मंजुर करुन दिला आहे यामध्ये नवजा हेळवाक मोरगिरी साजूर तांबवे विंग वाठार रेठरे बु.शेणोली रेल्वेस्टेशन रस्ता, राज्यमार्ग क्र.148 किमी 18/00 ते 18/500,39/00 ते 41/00 व 42/600 ते 44/00 रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे 0१ कोटी ५६ लाख, नवजा हेळवाक मोरगिरी साजूर तांबवे विंग वाठार रेठरे बु.शेणोली रेल्वेस्टेशन रस्ता, राज्यमार्ग क्र.148 किमी 51/00 ते 57/00 रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे 0२ कोटी ४०लाख, चरेगाव चाफळ डेरवण दाढोली चोपडी नाटोशी रस्ता प्रजिमा 53 किमी 36/800 ते 37/800 रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ३५ लाख, रामा 136 ते निसरे मारुल मालदन बहुले गुढे काळगाव धनगरवाडी भुरभूशी येळगाव रस्ता रामा 144 रस्ता प्रजिमा 54 किमी 0/00 ते 1/00, 5/200 ते 8/500 व 18/500 ते 19/00 रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. 0१ कोटी ९२ लाख, कराड वाखानवस्ती गोळेश्वर रा.म 4 ते विंग कोळेवाडी ढेबेवाडी महिंद नाटोशी मोरगिरी चाफेर ते रामा 136 रस्ता प्रजिमा 55 किमी 33/500 ते 36/00 रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ०१ कोटी, वाखाणवस्ती कराड ढेबेवाडी महिंद नाटोशी रस्ता प्रजिमा 55 किमी 42/500 ते 46/00 मधील लांबीत मातीकाम व मोरी बांधकाम करणे भाग मठवाडी ते गडगडा ०३ कोटी, पाटण मणदुरे जळव तारळे रस्ता प्रजिमा 57 किमी 28/200 ते 32/00 भाग ढोरोशी फाटा ते तारळे स्टँड सुधारणा करणे ०१ कोटी २० लाख, नाडे सांगवड मंद्रुळकोळे ढेबेवाडी रस्ता प्रजिमा 58 किमी 8/500 व 8/700मध्ये लहान पुलाचे बांधकाम करणे ०१ कोटी ५० लाख,निसरे मारुल गुढे काळगाव रस्ता प्रजिमा 54 किमी 5/00 जवळील मारुलहवेली गावाजवळ लहान पुलाचे बांधकाम करणे ०१ कोटी व निसरे मारुल गुढे काळगाव रस्ता प्रजिमा 54 किमी 7/500 जवळील कोरीवळे गावाजवळ पुलाचे बांधकाम व संरक्षक भिंतीचे बांधकाम करणे ०१ कोटी २० लाख असा एकूण १५ कोटी १३ लाख रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. या कामांच्या निविदा लवकरात लवकर प्रसिध्द करुन सदरची कामे लवकरात लवकर सुरु करणेसंदर्भात बांधकाम विभागांच्या अधिकाऱ्यांना सुचना दिल्या असून अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघातील सात मोठया असणाऱ्या राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्गावरील रस्त्यांच्या कामांचा व तीन मोठया पुलांच्या कामांस मंजुरी देवून निधी मंजुर केलेबद्दल राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व सार्वजनीक बांधकाम मंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील यांचे जाहीर आभार व्यक्त केले असल्याचे आमदार शंभूराज देसाईंनी शेवठी पत्रकात म्हंटले आहे.

Tuesday, 18 June 2019

उरुल लघू पाटबंधाऱ्यांचे काम प्रगतीपथावर, आमदार शंभूराज देसाईंनी दिली उरुलच्या कामाला प्रत्यक्ष भेट. काम लवकरात लवकर पुर्ण करण्याच्या दिल्या सुचना.




दौलतनगर दि.१8:- उरुल,ठोमसे व बोडकेवाडी या तीन गांवाच्या हद्दीत असलेल्या उरुल लघू पाटबंधारे बंधाऱ्याचे काम भूसंपादन केलेल्या खातेदारांना भूसंपादनाची रक्कम मंजुर न झाल्याने बऱ्याच वर्षापासून रखडले होते आमदार शंभूराज देसाईंच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा विषय त्यांनी युतीच्या शासनामार्फत मार्गी लावला असून या तलावाच्या कामांस प्रत्यक्षात सुरुवात देखील करण्यात येवून सदर बंधाऱ्याचे काम चांगलेच प्रगतीपथावर आले आहे. प्रगतीपथावर असलेल्या कामाची आमदार शंभूराज देसाईंनी बंधाऱ्याच्या ठिकाणी जावून प्रत्यक्ष पहाणी केली व सदरचे काम लवकरात लवकर पुर्ण करुन या बंधाऱ्याची घळभरणी करुन पुढील पावसाळयात पाणीसाठा करण्याचे नियोजन करा तसेच शेतकऱ्यांना बंधाऱ्यातील पाणी देणेसंदर्भात बंदिस्त पाईपलाईनचा लवकरात लवकर सर्व्हे करा अशा सक्त सुचना आमदार शंभूराज देसाईंनी संबधित विभागाचे अधिकारी आणि बंधाऱ्याचे ठेकेदार यांना दिल्या.
                  राज्याचे तत्कालीन जलसंधारणमंत्री ना.राम शिंदे यांचेकडे आपली राजकीय ताकद वापरुन गतवर्षी पावसाळी अधिवेशनामध्ये आमदार शंभूराज देसाईंनी बैठक घेतल्याने उरुल,ठोमसे व बोडकेवाडी या गांवातील शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा अनेक वर्षापासून प्रलंबीत राहिलेला विषय मार्गी लागला.आमदार शंभूराज देसाईंच्या सातत्याच्या प्रयत्नामुळे या तलावाच्या कामांस २८ कोटी ३२ लाख रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली यामध्ये शेतकऱ्यांच्या भूसंपदनाकरीता ६ कोटी १३ लाख ९९ हजार रुपयांची रक्कम मंजुरही करण्यात येवून भूसंपादनाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँकखाती जमाही करण्यात आली. यामुळे येथील शेतकऱ्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे.बहूतांशी शेतकऱ्यांच्या भूसंपादनाच्या रक्कमा बँक खाती जमा झालेनंतर शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव आमदार शंभूराज देसाईंच्याच हस्ते या बंधाऱ्याच्या कामांस सुरुवात व्हावी असा आग्रह शेतकऱ्यांनी धरलेनंतर आमदार शंभूराज देसाईंचे हस्ते उरुल बंधाऱ्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. शुभारंभा दिवशीच आमदार शंभूराज देसाईंनी दोन दिवसात बंधाऱ्याच्या कामास सुरुवात करा अशा सुचना दिल्याने बंधाऱ्याचे ठेकेदार शिवानंद पाटील यांनी तातडीने या कामांस सुरुवात करुन सध्या हे काम प्रगतीपथावर आल्याचे पहावयास मिळत आहे.
                      उरुल लघु पाटबंधारे बंधाऱ्याचे कामांस आमदार शंभूराज देसाईंच्या प्रयत्नामुळेच सन २००७ मध्ये ५ कोटी ९० लाख ०९ हजार इतक्या किमंतीस प्रशासकीय मान्यता मिळाली होती. भुसंपादनाची रक्कमेअभावी बंधाऱ्याच्या बांधकामाचे काम पुर्णत: रखडले होते.राज्याचे जलसंधारणमंत्री ना.राम शिंदे यांचेकडे गतवर्षी या विषयासंदर्भात त्यांनी पुढाकार घेवून बैठक घेतल्याने शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा व प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचा विषय मार्गी लागला.एक चांगला प्रकल्प आमदार शंभूराज देसाईंच्या माध्यमातून या विभागात होत आहे. या बंधाऱ्याच्या कामांस त्यांनी शासनाकडे पाठपुरावा करुन २८ कोटी ३२ लाख रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यताही मिळविली असून उरुल,ठोमसे व बोडकेवाडी या तीन गांवाकरीता भूसंपादनाकरीता ६ कोटी १३ लाख ९९ हजार रुपयांची रक्कम मंजुर केली. पहिल्या टप्प्यात एकूण ४.५० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खाती जमा करण्यात आले असून भूसंपादनाच्या दुसऱ्या टप्प्यातील रक्कम शेतकऱ्यांना देणेची कार्यवाही विभागस्तराव सुरु आहे.
                    उरुल लघू पाटबंधारे बंधाऱ्यांची उंची २०.६० मीटर असून लांबी ६६० मीटर आहे. या तलावामध्ये १९०० स.घ.मी. इतका पाणीसाठा अपेक्षित असून या तलावामुळे सुमारे २४३ हेक्टर इतके क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. सद्यस्थितीत बंधाऱ्याच्या कामांमध्ये भराव्याचे काम पुर्णत्वाकडे गेले असून आऊटलेट (पाणी सोडणे) गेटचे काम प्रगतीपथावर आहे.यामध्ये रिंगरोडचे काम करावयाचे असून बुडीत क्षेत्रातला रस्ता व पुल उभारण्याकरीता निधी मंजुर असल्याने सदरचे काम लवकरच हाती घेणार असल्याचे ठेकेदार यांनी आमदार शंभूराज देसाईंना सांगितले. यावेळी बोडकेवाडी व ठोमसे येथील बुडीत जाणाऱ्या विहीरी उंचावर घेवून या विहीरीची दुरुस्ती करण्याचे काम लवकरात हाती घ्यावे. तसेच बंधाऱ्याचे बहूतांशी काम पुर्णत्वाकडे जात असल्याने बंधाऱ्यांची घळभरणी करुन पुढील पावसाळयात या बंधाऱ्यामध्ये पाणीसाठा करता येईल याचे नियोजन ठेकेदार आणि अधिकारी यांनी करावे.बंधाऱ्यातील पाणी या विभागातील शेतकऱ्यांना बंदिस्त पाईपलाईनव्दारे देणेसंदर्भातील सर्व्हेही बंधाऱ्याचे काम पुर्ण होण्याअगोदर करावा. या बंधाऱ्याच्या कामांकरीता आवश्यक असणारी सर्व रक्कम शासनाने एकरक्कमी आपणांस मंजुर केली आहे त्यामुळे निधीच्या संदर्भात कोणतीही अडचण नसून बंधाऱ्याचे काम लवकरात लवकर कसे पुर्ण होईल याकडे प्राधान्याने लक्ष देवून बंधाऱ्याचे काम दर्जेदार करण्यात यावे असेही आमदार शंभूराज देसाईंनी यावेळी संबधितांना सुचित केले.यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे संचालक शशिकांत निकम,बजरंग माने,शिवाजी देसाई, आबासो माने,आनंदा धनावडे,संग्राम मोकाशी या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह लघू पाटबंधारे विभागाचे उपअभियंता पवार, ठेकेदार शिवानंद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

Monday, 17 June 2019

महाराष्ट्र विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी आमदार शंभूराज देसाई यांची चौथ्यांदा निवड.





दौलतनगर दि.१७:- महाराष्ट्र विधानसभेत पहिल्यांदा निवडून गेल्यानंतर पहिल्याच टर्ममध्ये उत्कृष्ट संसदपटु आमदार म्हणून देशाच्या राष्ट्रपती यांच्या हस्ते सन्मानित झालेले शिवसेना पक्षाचे विधिमंडळ पक्षप्रतोद पाटणचे लोकप्रिय व विधानसभेतील अभ्यासू आमदार म्हणून ज्यांची ओळख आहे असे आमदार शंभूराज देसाई यांची मुंबई येथे आज सुरु झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात तालिका अध्यक्षपदी पहिल्याच दिवशी निवड करण्यात आली असून या पंचवार्षिकमध्ये आमदार शंभूराज देसाईंची चौथ्यांदा निवड झाली आहे.पावसाळी अधिवेशनामध्ये आमदार शंभूराज देसाईंची तालिकाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याची घोषणा विधानसभेचे अध्यक्ष ना.हरीभाऊ बागडे यांनी दि.१७ जुन,२०१९ रोजी विधानसभा सभागृहात केली आहे.
                                    महाराष्ट्र विधानसभा हे लोकशाहीचे महामंदीर असून राज्यातील सर्वोच्च असे सभागृह आहे. या सभागृहात अधिवेशन काळात विधानसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या अनुपस्थितीत सभागृहाचे कामकाज चालविण्यासाठी विधानसभा अध्यक्ष हे महाराष्ट्र विधानसभा नियम ८ अन्वये विधानसभेच्या सदस्यांमधून सभाध्यक्ष तालिकेवर विविध पक्षाच्या विधानसभा सदस्यांची नियुक्ती करण्यात येते.शिवसेना पक्षाचे महाराष्ट्र विधानसभेतील आमदार उत्कृष्ट संसदपटु शंभूराज देसाई यांचे विधानसभेतील कामकाज पाहून त्यांची महाराष्ट्र विधानमंडळाने सन २०१४ ते २०१९ या पंचवार्षिक मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या तालिकाध्यक्षपदी चौथ्यांदा नियुक्ती केली आहे.सन २०१६  चे पावसाळी अधिवेशन, २०१८ चे अर्थसंकल्पीय अधिवेशन, २०१९ चे अर्थसंकल्पीय अधिवेशन व सध्या सुरु असलेले पावसाळी अधिवेशन अशा चार अधिवेशनात आमदार शंभूराज देसाईंना तालिकाध्यक्ष म्हणून बसण्याचा बहूमान मिळाला आहे. आमदार शंभूराज देसाई यांना चौथ्यांदा तालिका अध्यक्ष म्हणून अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसण्याची संधी मिळाली त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरावरुन अभिनंदन केले जात आहे.
                                 महाराष्ट्र विधानमंडळाला देशामध्ये आगळी वेगळी प्रतिष्ठा लाभली आहे.अनेकविध क्षेत्रात देशपातळीवर तसेच राज्यपातळीवर नेतृत्व करणारे नेते या विधानमंडळाने घडविले आहेत.आमदार शंभूराज देसाई हे पाटणसारख्या डोंगरी आणि दुर्गम तालुक्यातून आमदार म्हणून निवडून आले असून आमदारकीचा कोणताही पुर्वानुभव नसताना सन २००४ ला आमदार म्हणून विधानसभेची पायरी चढल्यानंतर संसदीय कामकाजाचा खडान्‌खडा अभ्यास करुन त्यांनी आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये आपल्या हुशारीचे कर्तृत्व सिध्द करुन दाखविले आहे.त्यांच्या हुशारीचे मुल्यमापन महाराष्ट्राचे सर्वोच्च सभागृह असणाऱ्या विधानसभेने करुन त्यांना पहिल्याच टर्ममध्ये विधानसभेतील उत्कृष्ट संसदपटु आमदार म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.आमदार शंभूराज देसाई यांची ही दुसरी टर्म असून विधानसभेतील कामकाजाचा व्यासंग त्यांनी इतका वाढविला आहे की विधानसभेतील त्यांच्या उत्कृष्ट ज्ञानामुळे त्यांच्यावर शिवसेना पक्षाच्या वतीने विधानसभेतील उत्कृष्ट जबाबदाऱ्याही सोपविण्यात आल्या आहेत व येत आहेत.पक्षाने सोपविलेल्या जबाबदाऱ्या त्यांनी लिलया पेलल्याही आहेत.विधानसभेतील शिवसेनेचा बलस्थान चेहरा म्हणून त्यांच्यावर शिवसेना पक्षाचे विधिमंडळ पक्षप्रतोद म्हणून जबाबदारी सोपविली असतानाच राष्ट्रकुल संसदीय मंडळाचे महाराष्ट्राचे कार्यकारीणीवरही त्यांची निवड करण्यात आली आहे.विधानसभेचा तालिका अध्यक्ष म्हणून विधानसभेचे संपुर्ण कामकाज पाहताना निपक्ष:पातीपणे सभागृहाचे कामकाज चालवितात त्यामुळे आमदार शंभूराज देसाईंना तालिकाध्यक्ष म्हणून सर्वच पक्षाच्या वतीने नेहमीच चांगला प्रतिसाद मिळाला आहे व मिळत आहे.आजच सुरु झालेल्या अधिवेशनामध्ये विधानसभेचे अध्यक्ष ना.हरीभाऊ बागडे यांनी सभाध्यक्ष तालिकेवर त्यांची नियुक्ती केलेनंतर त्यांचे सर्व स्तरावरुन अभिनंदन होत आहे.
चौकटः- मतदारसंघातील जनतेच्या पाठीब्यांमुळेच अध्यक्षांच्या खुर्चीवर बसण्याचा बहूमान.
           तालिका अध्यक्ष म्हणून विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसल्यानंतर ज्या खुर्चीवर लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब विधानसभा अध्यक्ष म्हणून बसले होते त्याच खुर्चीवर तालिका अध्यक्ष म्हणून मला बसण्याची संधी मिळते. ती केवळ आणि केवळ पाटण मतदारसंघातील जनतेचा मला मिळालेला पाठींबा यामुळेच.मतदारसंघातील जनतेने मला भरघोस मतांनी निवडून दिले म्हणूनच मी विधानसभेचा तालिका अध्यक्ष म्हणून अध्यक्षपदाच्या खुर्चीवर चारवेळा बसू शकलो ही माझेकरीता अभिमानास्पद बाब आहे.