Monday 24 June 2019

मुख्यमंत्र्यांच्या योग्य नियोजनामुळे राज्यातील दुष्काळ,पाणीटंचाई परिस्थितीवर उपाययोजना होवू शकल्या. आमदार शंभूराज देसाईंचे २९३ अन्यवे चर्चेवर विधानसभेत प्रतिपादन.


                

दौलतनगर दि.२5:- राज्यावर आलेले पाणीटंचाईचे संकट राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या योग्य नियोजनामुळे दुर होण्यास मदत झाली.राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील डोंगरी व दुर्गम भागात जाणवणाऱ्या दुष्काळासंदर्भात तसेच पाणीटंचाई संदर्भात आवश्यक असणाऱ्या नळ पाणी पुरवठा योजनांना,पाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्तीच्या कामांना,पाण्याच्या विहीरी खोल करणे,नवीन विंधन विहीरी घेणे,गाळ काढणे,विधंन विहीरींची विशेष दुरुस्ती करणे, टँकरची आवश्यकता असणाऱ्या गांवाना तहसिलदारांमार्फत तात्काळ टँकर मंजुर करुन देणे, तसेच आवश्यक ठिकाणी चारा छावण्या उभारुन चारा छावणीतील जनावरांना खाद्य पुरवठा करणे,शेतीच्या पंपाची वीज खंडीत न करणे इत्यादी कामांचे विविध खात्यांमार्फत नियोजन करुन निधी उपलब्ध करुन दिल्यानेच त्यांच्या योग्य नियोजनामुळेच राज्य शासनाने आवश्यक त्या उपाययोजना  करुन युतीच्या शासनाने दुष्काळावर व पाणीटंचाई परिस्थितीवर मात केली असून सर्वात महत्वाचे म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात देण्यात आलेली कर्जमाफी हे युती शासनाचे मोठे यश असल्याचे प्रतिपादन आमदार शंभूराज देसाईंनी विधानसभेत केले.
                    महाराष्ट्र विधानसभेच्या मुंबई येथे सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दि.२१ जुन रोजी सत्ताधारी पक्षाने मांडलेल्या मविस २९३ अन्वये चर्चेवर आमदार शंभूराज देसाईंनी आपली भूमिका मांडली.या चर्चेवर बोलताना त्यांनी सत्ताधारी पक्षाने राज्यातील दुष्काळी परिस्थिती निवारणार्थ व पाणीटंचाईच्या संदर्भात  राज्य शासनाने राज्याचे मुख्यमंत्री यांनी योग्य नियोजन करुन शासनाच्या विविध खात्यांच्या माध्यमातून उपरोक्त उपाययोजना केल्यामुळेच राज्यावरील दुष्काळाचे आणि पाणीटंचाईचे संकट दुर होवू शकले असल्याचे प्रतिपादन केले.याप्रसंगी त्यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील यासंदर्भातील विविध विषयांवर आपले मत मांडताना युतीच्या शासनाने पाटण मतदारसंघात पाण्याच्या संदर्भात दिलेल्या विविध पिण्याच्या पाण्याच्या योजनांच्या कामांना दिलेल्या निधीच्या संदर्भात शासनाचे व विशेषत: मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. पाटण विधानसभा मतदारसंघात ४ महसूल मंडलामध्ये शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे.या चार मंडलामध्ये पाणीटंचाई जाणवू नये याकरीता उपरोक्त आवश्यक त्या उपाययोजना शासनाच्या मदतीने आम्हास करता आल्या. प्राधान्याने या मंडलातील गांवामध्ये जिथे पाण्याची टंचाई जाणवणार होती त्या ठिकाणच्या गांवामध्ये नळ पाणी पुरवठा योजनां,पाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्ती, पाण्याच्या विहीरी खोल करणे,नवीन विंधन विहीरी घेणे,गाळ काढणे,विधंन विहीरींची विशेष दुरुस्ती करणे,टँकर पुरविणे या कामांना आवश्यक तो निधी वेळेत मिळू शकला तसेच शालेय/ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या प्रवास शुल्कात माफी,कृषीपंपाच्या चालु वीज बिलात मोठया प्रमाणात सुट देणे, वीज बिलामुळे बंद करण्यात आलेल्या नळ पाणी पुरवठा तसेच शेतीच्या पाण्याच्या योजना पुन्हा सुरु करणे ही कामे शासनाच्या योग्यवेळी घेतलेल्या निर्णयामुळे होवू शकली असे सांगून त्यांनी काही उपाययोजनाही शासनास सुचविल्या यामध्ये पाटण मतदारसंघातील तारळी धरण प्रकल्पाकरीता शासनाने ५० मीटरवरील जमीनीस पाणी मिळवून देणेकरीता १६१०.३२ कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. या सुधारित प्रशासकीय मान्यतेमुळे ५५३ कोटी रुपयांचा वाढीवचा निधी मिळाला असून मुख्यमंत्री यांच्या हस्ते या योजनांचे ई भूमिपुजनही करण्यात आले आहे.तारळी प्रकल्पातील ५० मीटरच्या वरील जमिन क्षेत्राला पाणी देणेसंदर्भात कामास जलसंपदा विभागाकडून गती देणे अत्यंत गरजेचे आहे. लवकरात लवकर या विभागातील ५० मीटरच्या वरील कामे पुर्णत्वाकडे गेल्यानंतर या विभागातील १७ गांवातील २७२५ एकर जादाचे क्षेत्र यामुळे ओलिताखाली येण्यास मदत होणार असून जलसंपदा विभागाकडून सदरची कामे लवकर मार्गी लावण्याच्या सक्त सुचना कराव्यात अशी मागणी आमदार शंभूराज देसाईंनी यावेळी केली. तसेच युती शासनाच्या माध्यमातून पाटण मतदारसंघात शासनाच्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल, कोयना भूकंप निधी,जलस्वराज्य प्रकल्प,विशेष घटक योजना या विविध लेखाशिर्षातून एकूण ७६ नळ पाणी पुरवठा योजनांना आवश्यक असणारा निधी मंजुर झाला आहे. एका वर्षात ७६ नळ पाणी पुरवठा योजनांना निधी मंजुर होणे ही पाटण मतदारसंघातील सर्वांत महत्वाची बाब मानली जाते.नळ पाणी पुरवठयाच्या विभागाचे काम हे संत गतीने सुरु आहे. त्या कामांनाही चालना देवून ही पाणी पुरवठा योजनांची कामे लवकरात लवकर पुर्ण करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
चौकट:- कोयना धरणातील ४ टीएमसी पाणी कर्नाटकला न दिल्याने मुख्यमंत्र्याचे आभार.
              पाटण मतदारसंघातील  कोयना धरणात यंदाच्या वर्षी कमी पाणीसाठा असून धरणातील ४ टीएमसी पाणी कर्नाटकला देवू नये अशी मागणी मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री यांच्याकडे केली होती. आमची मागणी मान्य केल्याने मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री यांचा मी आभारी आहे. सदरचे ४ टीएमसी पाणी न दिल्यानेच धरणात आज बऱ्यापैकी पाणीसाठा असून यापुढे कोयना धरणातील पाण्याचे योग्य नियोजन करावे अशीही मागणी आमदार शंभूराज देसाईंनी केली.

No comments:

Post a Comment