दौलतनगर दि.२३:- राज्य शासनाचे सन २०१९ चे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे
सुरु असून या अधिवेशनात अतिरिक्त मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये ५०५४ मार्ग व
पुल या लेखाशिर्षाखाली राज्यमार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग असणाऱ्या पाटण विधानसभा
मतदारसंघातील सात रस्त्यांच्या कामांना व तीन मोठया पुलाच्या कामांना एकूण १५.१३
कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजुर केला असल्याची माहिती तालुक्याचे आमदार शंभूराज
देसाईंनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
पत्रकात म्हंटले आहे की,
राज्याचे मुख्यमंत्री व सार्वजनीक बांधकाम मंत्री यांचेकडे पाटण या डोंगराळ व
दुर्गम भागातील रस्त्यांच्या व पुलाच्या कामांना सन २०१९ च्या जुनच्या
अर्थसंकल्पातून निधी मंजुर करणेकरीता पाटण मतदारसंघातील राज्य मार्ग व प्रमुख
जिल्हा मार्ग असणाऱ्या रस्त्यांच्या व या मार्गावरील मोठया पुलांचे बांधकाम
करण्याची कामे सुचविण्यात आली होती त्यानुसार अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये पाटण विधानसभा
मतदारसंघातील सात रस्त्यांच्या व तीन मोठया पुलांचे बांधकामांस शासनाने निधी मंजुर
करुन दिला आहे यामध्ये नवजा हेळवाक मोरगिरी साजूर तांबवे विंग वाठार रेठरे बु.शेणोली
रेल्वेस्टेशन रस्ता, राज्यमार्ग क्र.148 किमी 18/00 ते 18/500,39/00 ते 41/00 व
42/600 ते 44/00 रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे 0१ कोटी ५६ लाख, नवजा हेळवाक मोरगिरी साजूर तांबवे विंग वाठार रेठरे बु.शेणोली
रेल्वेस्टेशन रस्ता, राज्यमार्ग क्र.148 किमी 51/00 ते 57/00 रस्त्याचे मजबुतीकरण व
डांबरीकरण करणे 0२ कोटी ४०लाख, चरेगाव चाफळ डेरवण दाढोली चोपडी नाटोशी रस्ता प्रजिमा
53 किमी 36/800 ते 37/800 रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ३५ लाख, रामा 136 ते निसरे मारुल मालदन बहुले गुढे काळगाव धनगरवाडी भुरभूशी
येळगाव रस्ता रामा 144 रस्ता प्रजिमा 54 किमी 0/00 ते 1/00, 5/200 ते 8/500 व
18/500 ते 19/00 रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. 0१ कोटी ९२ लाख, कराड वाखानवस्ती
गोळेश्वर रा.म 4 ते विंग कोळेवाडी ढेबेवाडी महिंद नाटोशी मोरगिरी चाफेर ते रामा
136 रस्ता प्रजिमा 55 किमी 33/500 ते 36/00 रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे
०१ कोटी, वाखाणवस्ती कराड ढेबेवाडी महिंद नाटोशी
रस्ता प्रजिमा 55 किमी 42/500 ते 46/00 मधील लांबीत मातीकाम व मोरी बांधकाम करणे भाग
मठवाडी ते गडगडा ०३ कोटी, पाटण मणदुरे जळव तारळे रस्ता प्रजिमा
57 किमी 28/200 ते 32/00 भाग ढोरोशी फाटा ते तारळे स्टँड सुधारणा करणे ०१ कोटी २०
लाख, नाडे सांगवड मंद्रुळकोळे ढेबेवाडी रस्ता
प्रजिमा 58 किमी 8/500 व 8/700मध्ये लहान पुलाचे बांधकाम करणे ०१ कोटी ५० लाख,निसरे
मारुल गुढे काळगाव रस्ता प्रजिमा 54 किमी 5/00 जवळील मारुलहवेली गावाजवळ लहान पुलाचे
बांधकाम करणे ०१ कोटी व निसरे मारुल गुढे काळगाव रस्ता प्रजिमा 54 किमी 7/500 जवळील
कोरीवळे गावाजवळ पुलाचे बांधकाम व संरक्षक भिंतीचे बांधकाम करणे ०१ कोटी २० लाख असा
एकूण १५ कोटी १३ लाख रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. या कामांच्या निविदा
लवकरात लवकर प्रसिध्द करुन सदरची कामे लवकरात लवकर सुरु करणेसंदर्भात बांधकाम
विभागांच्या अधिकाऱ्यांना सुचना दिल्या असून अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये पाटण विधानसभा
मतदारसंघातील सात मोठया असणाऱ्या राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्गावरील
रस्त्यांच्या कामांचा व तीन मोठया पुलांच्या कामांस मंजुरी देवून निधी मंजुर
केलेबद्दल राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व सार्वजनीक बांधकाम मंत्री
ना.चंद्रकांतदादा पाटील यांचे जाहीर आभार व्यक्त केले असल्याचे आमदार शंभूराज
देसाईंनी शेवठी पत्रकात म्हंटले आहे.
No comments:
Post a Comment