दौलतनगर दि.१8:- उरुल,ठोमसे व बोडकेवाडी या तीन गांवाच्या हद्दीत
असलेल्या उरुल लघू पाटबंधारे बंधाऱ्याचे काम भूसंपादन केलेल्या खातेदारांना
भूसंपादनाची रक्कम मंजुर न झाल्याने बऱ्याच वर्षापासून रखडले होते आमदार शंभूराज
देसाईंच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा विषय त्यांनी
युतीच्या शासनामार्फत मार्गी लावला असून या तलावाच्या कामांस प्रत्यक्षात सुरुवात देखील
करण्यात येवून सदर बंधाऱ्याचे काम चांगलेच प्रगतीपथावर आले आहे. प्रगतीपथावर
असलेल्या कामाची आमदार शंभूराज देसाईंनी बंधाऱ्याच्या ठिकाणी जावून प्रत्यक्ष
पहाणी केली व सदरचे काम लवकरात लवकर पुर्ण करुन या बंधाऱ्याची घळभरणी करुन पुढील पावसाळयात
पाणीसाठा करण्याचे नियोजन करा तसेच शेतकऱ्यांना बंधाऱ्यातील पाणी देणेसंदर्भात
बंदिस्त पाईपलाईनचा लवकरात लवकर सर्व्हे करा अशा सक्त सुचना आमदार शंभूराज
देसाईंनी संबधित विभागाचे अधिकारी आणि बंधाऱ्याचे ठेकेदार यांना दिल्या.
राज्याचे तत्कालीन जलसंधारणमंत्री ना.राम शिंदे
यांचेकडे आपली राजकीय ताकद वापरुन गतवर्षी पावसाळी अधिवेशनामध्ये आमदार शंभूराज
देसाईंनी बैठक घेतल्याने उरुल,ठोमसे व बोडकेवाडी या गांवातील शेतकऱ्यांच्या
भूसंपादनाचा अनेक वर्षापासून प्रलंबीत राहिलेला विषय मार्गी लागला.आमदार शंभूराज
देसाईंच्या सातत्याच्या प्रयत्नामुळे या तलावाच्या कामांस २८ कोटी ३२ लाख रुपयांची
सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली यामध्ये शेतकऱ्यांच्या भूसंपदनाकरीता ६ कोटी १३
लाख ९९ हजार रुपयांची रक्कम मंजुरही करण्यात येवून भूसंपादनाची रक्कम
शेतकऱ्यांच्या बँकखाती जमाही करण्यात आली. यामुळे येथील शेतकऱ्यांच्यामध्ये
आनंदाचे वातावरण आहे.बहूतांशी शेतकऱ्यांच्या भूसंपादनाच्या रक्कमा बँक खाती जमा
झालेनंतर शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव आमदार शंभूराज देसाईंच्याच हस्ते या बंधाऱ्याच्या
कामांस सुरुवात व्हावी असा आग्रह शेतकऱ्यांनी धरलेनंतर आमदार शंभूराज देसाईंचे
हस्ते उरुल बंधाऱ्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. शुभारंभा दिवशीच आमदार
शंभूराज देसाईंनी दोन दिवसात बंधाऱ्याच्या कामास सुरुवात करा अशा सुचना दिल्याने
बंधाऱ्याचे ठेकेदार शिवानंद पाटील यांनी तातडीने या कामांस सुरुवात करुन सध्या हे
काम प्रगतीपथावर आल्याचे पहावयास मिळत आहे.
उरुल लघु
पाटबंधारे बंधाऱ्याचे
कामांस आमदार शंभूराज देसाईंच्या प्रयत्नामुळेच सन २००७ मध्ये ५ कोटी ९० लाख ०९
हजार इतक्या किमंतीस प्रशासकीय मान्यता मिळाली होती. भुसंपादनाची रक्कमेअभावी बंधाऱ्याच्या बांधकामाचे काम पुर्णत:
रखडले होते.राज्याचे जलसंधारणमंत्री ना.राम
शिंदे यांचेकडे गतवर्षी या विषयासंदर्भात त्यांनी पुढाकार घेवून बैठक घेतल्याने
शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा व प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचा विषय
मार्गी लागला.एक चांगला प्रकल्प आमदार शंभूराज देसाईंच्या माध्यमातून या विभागात
होत आहे. या बंधाऱ्याच्या कामांस त्यांनी शासनाकडे पाठपुरावा करुन २८ कोटी ३२ लाख
रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यताही मिळविली असून उरुल,ठोमसे व बोडकेवाडी या तीन
गांवाकरीता भूसंपादनाकरीता ६ कोटी १३ लाख ९९ हजार रुपयांची रक्कम मंजुर केली. पहिल्या
टप्प्यात एकूण ४.५० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खाती जमा करण्यात आले असून
भूसंपादनाच्या दुसऱ्या टप्प्यातील रक्कम शेतकऱ्यांना देणेची कार्यवाही विभागस्तराव
सुरु आहे.
उरुल लघू पाटबंधारे बंधाऱ्यांची
उंची २०.६० मीटर असून लांबी ६६० मीटर आहे. या तलावामध्ये १९०० स.घ.मी. इतका
पाणीसाठा अपेक्षित असून या तलावामुळे सुमारे २४३ हेक्टर इतके क्षेत्र ओलिताखाली
येणार आहे. सद्यस्थितीत बंधाऱ्याच्या कामांमध्ये भराव्याचे काम पुर्णत्वाकडे गेले
असून आऊटलेट (पाणी सोडणे) गेटचे काम प्रगतीपथावर आहे.यामध्ये रिंगरोडचे काम
करावयाचे असून बुडीत क्षेत्रातला रस्ता व पुल उभारण्याकरीता निधी मंजुर असल्याने
सदरचे काम लवकरच हाती घेणार असल्याचे ठेकेदार यांनी आमदार शंभूराज देसाईंना
सांगितले. यावेळी बोडकेवाडी व ठोमसे येथील बुडीत जाणाऱ्या विहीरी उंचावर घेवून या
विहीरीची दुरुस्ती करण्याचे काम लवकरात हाती घ्यावे. तसेच बंधाऱ्याचे बहूतांशी काम
पुर्णत्वाकडे जात असल्याने बंधाऱ्यांची घळभरणी करुन पुढील पावसाळयात या
बंधाऱ्यामध्ये पाणीसाठा करता येईल याचे नियोजन ठेकेदार आणि अधिकारी यांनी करावे.बंधाऱ्यातील
पाणी या विभागातील शेतकऱ्यांना बंदिस्त पाईपलाईनव्दारे देणेसंदर्भातील सर्व्हेही
बंधाऱ्याचे काम पुर्ण होण्याअगोदर करावा. या बंधाऱ्याच्या कामांकरीता आवश्यक
असणारी सर्व रक्कम शासनाने एकरक्कमी आपणांस मंजुर केली आहे त्यामुळे निधीच्या
संदर्भात कोणतीही अडचण नसून बंधाऱ्याचे काम लवकरात लवकर कसे पुर्ण होईल याकडे
प्राधान्याने लक्ष देवून बंधाऱ्याचे काम दर्जेदार करण्यात यावे असेही आमदार
शंभूराज देसाईंनी यावेळी संबधितांना सुचित केले.यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई
साखर कारखान्याचे संचालक शशिकांत निकम,बजरंग माने,शिवाजी देसाई, आबासो माने,आनंदा
धनावडे,संग्राम मोकाशी या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह लघू पाटबंधारे विभागाचे उपअभियंता
पवार, ठेकेदार शिवानंद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment