दौलतनगर दि.२3:- पाटण तालुक्यातील तारळे येथील बँक ऑफ महाराष्ट्र या
बँकेच्या शाखेत शाखेचा शाखाप्रमुख यांने या विभागातील एका राजकीय पुढाऱ्याला
हाताशी धरुन शाखेत कर्जवाटपामध्ये तसेच अनेक बाबतीत आर्थिक गैरव्यवहार केले
असल्याने शाखेतून या विभागातील स्थानिकांना कर्जवाटप करणे थांबविण्यात आले
असल्याची बाब निदर्शनास आली असून शाखाप्रमुख व राजकीय पुढारी या दोन
व्यक्तींच्यामुळे स्थानिक उद्योजक, व्यापारी तसेच नागरिक हे वेटीस धरले जात
असल्याने या बँकेच्या शाखेतील सर्व गैरव्यवहाराची जिल्हाधिकारी यांचेमार्फत
उच्चस्तरीय चौकशी करावी व दोषींवर कडक कार्यवाही करुन बँकेतुन कर्जपुरवठा सुरळीत सुरु
करावा असे निर्देश तालिका अध्यक्ष आमदार शंभूराज देसाईंनी शासनाला दिले.
तारळे
ता. पाटण येथे बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेची शाखा असून या शाखेमध्ये शाखेचा संबधित शाखाधिकारी
याने तारळे विभागातील एका राजकीय पुढाऱ्याला हाताशी धरुन बँकेच्या शाखेत
कर्जवाटपामध्ये तसेच इतरही आर्थिक बाबींमध्ये मोठया प्रमाणात गैरव्यवहार केला
असल्याचे उघडपणे या विभागातील स्थानिक उद्योजक,
व्यापारी तसेच नागरिकांकडून सांगण्यात येत असून या दोन व्यक्तींच्यामुळे शाखेतून
उद्योजक,व्यापारी तसेच नागरिकांना आवश्यक असणारा कर्जपुरवठा पुर्णत: बंद करण्यात
आला आहे.स्थानिक उद्योजक,व्यापारी तसेच नागरिकांना तारळे शाखेकडून वेठीस धरण्यात
येत असून शाखेतून कर्जपुरवठा बंद होण्यास हे दोन व्यक्तीच जबाबदार असल्याचे
सांगण्यात येत असून या सर्व प्रकारामुळे स्थानिक उद्योजक,व्यापारी तसेच
नागरिकांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र तारळे शाखेच्या विरोधात तीव्र असंतोष निर्माण
झाला आहे.या शाखेतील गैरव्यवहाराची पुर्णपणे जिल्हाधिकारी,सातारा यांच्यामार्फत
चौकशी करुन दोषींवर कडक कार्यवाही करावी व शाखेतील कर्जपुरवठा सुरळीतपणे सुरु
करावा अशी मागणी स्थानिक उद्योजक,व्यापारी तसेच नागरिकांकडून करण्यात येत असल्याने
तात्काळ बँक ऑफ महाराष्ट्रच्या तारळे शाखेतील कर्जवाटपामध्ये तसेच अनेक बाबतीत
झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराची जिल्हाधिकारी, सातारा यांच्यामार्फत उच्चस्तरीय
चौकशी करण्यात येवून दोषींवर कडक कार्यवाही करावी व स्थानिक उद्योजक, व्यापारी तसेच नागरिकांच्या
मागणीवरुन या शाखेतून सुरळीत असा कर्जपुरवठा सुरु करण्यात यावा असे निर्देश आमदार
शंभूराज देसाईंनी विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवरुन तालिका अध्यक्ष म्हणून
शासनाला दिले.
चौकट:- जिल्हास्तरीय वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्याची दादागिरी
विधानसभेत मांडून कडक कारवाई करण्यास
शासनास भाग पाडणार- आमदार शंभूराज देसाई.
लोकसभा निवडणूकीदिवशी पाटण
विधानसभा मतदारसंघात दादागिरी व आपल्या पदाचा गैरवापर करुन मतदारसंघातील जबाबदार
पदाधिकाऱ्यास विनाकारण मारहाण करणाऱ्या जिल्हास्तरीय वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांने
केलेली दादागिरी वरीष्ठाच्या कानावर घालूनही याकडे वरीष्ठांनी केलेल्या
दुर्लक्षामुळे हे दादागिरीचे प्रकरण दोनच दिवसात सुरु असलेल्या अधिवेशनात
विधानसभेत मांडून संबधित पोलीस अधिकाऱ्यावर शासनामार्फत कडक कारवाई करण्यास शासनास
भाग पाडणार असून पोलीसांची दादागिरी मोडीत काढणार असल्याचे आमदार शंभूराज देसाईंनी
सांगितले आहे.
लवकर कारवाई केली पाहिजे
ReplyDelete