Saturday 29 December 2018

माजी मंत्री पाटणकरसाहेब, विकास केला म्हणता तर मी सांगतो त्या रस्त्यांची कामे तुम्हाला का करता आली नाहीत? आमदार शंभूराज देसाईंचा सवाल.





दौलतनगर दि.29:- माझी विकासकामे कागदावर असल्याची टिका करणारे माजी मंत्री पाटणकरसाहेब यांचे सुपुत्र तुमच्या पिताश्रींनी खरोखरच विकास केलाय तर मग मी सांगतो त्या डोंगरपठारावरील मौजे केळेवाडी,म्हारवंड, गाढखोप,शिद्रुकवाडी,गुढे शिबेवाडी,गणेवाडी,हुंबरणे,आंबेघर ते पाळशी,घोट जन्नेवाडी व सडादाढोली, जांभेकरवाडी या रस्त्यांची कामे माजी मंत्री पाटणकरसाहेबांना का करता आली नाहीत? याचे उत्तर तालुक्यातील जनतेला दया असा सवाल आमदार शंभूराज देसाईंनी पाटणकरांना केला आहे.
                सन 2018-19 च्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत आमदार शंभूराज देसाईंनी मंजूर केलेल्या मौजे म्हारवंड ता.पाटण या ५ किमी अंतराच्या गावपोहोच रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी ते बोलत होते. या रस्त्याच्या कामांकरीता आमदार शंभूराज देसाईंनी ३ कोटी ८९ लक्ष ३४ हजार रुपये एवढी रक्कम मंजुर केली आहे.याप्रसंगी कार्यक्रमास शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, माजी पंचायत समिती सभापती सौ.मुक्ताबाई माळी, शिवदौलत बँकेचे संचालक अशोकराव पाटील, यशवंत जाधव, माजी पं.स. सदस्य सुरेश जाधव,लोकनेते बाळासाहेब देसाई सह साखर कारखान्याचे संचालक बबनराव भिसे, म्हारवंड गावचे संजय निकम सर, संतोष निकम शामराव निकम,लक्ष्मण कदम,उमेश सावंत,दत्तात्रय निकम, शामराव निकम,लक्ष्मण कदम,नाथा निकम मुंबई रहिवाशी कार्यकर्ते विकास निकम,यशवंत निमक,बापूराव निकम, रमेश निकम,दिलीप महाडीक अशोक महाडिक,रघुनाथ निकम,वसंत निकम,रामभाऊ बावधाने,जोतिबा बावधाने, रमेश निकम,अंकूश महाडीक, बबनराव माळी,ग्रामसडक योजनेचे उपअभियंता विलास पानस्कर,शाखा अभियंता जाधव आदी मान्यवरांसह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांची मोठया संख्येने उपस्थित होती.
 याप्रसंगी बोलताना आमदार देसाई म्हणाले, मतदारसंघाचा आमदार आणत असलेला विकासकामांचा निधी प्रत्यक्षात आहे का कागदावरचा तो मतदारसंघातील जनतेला चांगलाच माहिती आहे. विकास कागदावरचा असता तर एवढया मोठया संख्येने डोंगर आणि ग्रामीण भागातील जनतेने माझे एवढे मोठे जंगी स्वागतच मतदारसंघात केले नसते एका गांवाला एक नाहीतर दोन दोन- तीन तीन विकासकांमे करण्याकरीता निधी मंजुर करुन दिला आहे मंजुर केलेल्या निधीचे पुरावे या जनतेकडे उपलब्ध आहेत माझे माध्यमातून कामे होतायत म्हणूनच मतदारसंघातील जनता माझेकडे कामे मागायला येत आहे जो देवू शकतो त्याच्याकडे जनता कामे मागते आपल्या विरोधकांकडे देण्यासारखे काहीच नाही त्यामुळे त्यांना कोण काय मागणार. माजी मंत्री राहिलेल्या पाटणकरसाहेबांना या विभागाने गेल्या अनेक निवडणूकीत पोत्याने भरभरुन मते दिली.मग म्हारवंड गावच्या रस्त्याची ही अवस्था का? असा सवाल आमदार शंभूराज देसाईंनी म्हारवंड ग्रामस्थांना विचारला. मी गांवात येताना मोकळया हाताने आलो नाही सोबत रस्त्याचे काम घेवून आलोय तेही पावणे चार कोटीचे आज माझे हस्ते भूमिपुजन होतय संबधित रस्त्याचे काम करणारी शासकीय यंत्रणा माझे सोबत आली आहे. या गावाचा पाण्याचा प्रश्न होता रस्त्यात वयस्कर आज्जी भेटल्या त्या म्हणाल्या पाण्याचा प्रश्न कधी सुटणार मी त्यांना तिथेच सांगितले आज्जी मी मोकळा आलो नाही रस्त्याबरोबर तुमच्या पाण्याच्या योजनेच्या कामांचा शासनाने दिलेला कार्यारंभ आदेशच सोबत घेवून आलोय. राष्ट्रीय पेयजल योजनेमधून २६ लक्ष रुपयांचा निधी आपण या पिण्याच्या पाण्याच्या कामांकरीता मंजुर केला आहे एवढे सगळे होत असताना मग माजी आमदारपुत्रांना हा विकास कागदावरचा कसा वाटतोय. चार आठ दिवसात रस्त्याचे काम सुरु होईल तेव्हा त्यांनी या गांवात यावे आणि हा रस्ता केवळ कागदावर आहे का प्रत्यक्षात आहे याची उघडया डोळयांनी पहाणी करावी. कोल्हयाला द्राक्षे आंबटच लागतात तशी परिस्थिती या मंडळीची झाली असून आम्ही हे केले, आम्ही ते केले असा विकास केला तसा विकास केला असे सांगणारे माजी मंत्री पाटणकरसाहेब आणि त्यांचे सुपुत्र विकासच केला म्हणताय तर डोंगरी भागातील म्हारवंडसारख्या मौजे केळेवाडी, गाढखोप,शिद्रुकवाडी,गुढे शिबेवाडी,गणेवाडी,हुंबरणे, आंबेघर ते पाळशी,घोट जन्नेवाडी व सडादाढोली,जांभेकर वाडी या महत्वाच्या रस्त्यांची कामे तुम्हाला या २१ वर्षात का करता आली नाहीत याचे उत्तर जनतेला दया असे जाहीर आवाहन त्यांनी बोलताना केले.उपस्थितांचे स्वागत संजय निकम तर विकास निकम यांनी आभार मानले.
चौकट:- आज्जीने शिकवले नातवाला आमदार शंभूराजाचा विजय असो म्हणायला.
रस्त्याच्या भूमिपुजनाकरीता येत असताना आमदार शंभूराज देसाईंचे म्हारवंड या डोंगरी भागातील गावांतील महिलांनी आमदार देसाईंचे रस्त्यावर ठिकठिकाणी स्वागत केले यावेळी येथील महिलांनी औक्षण करताना सोबत घरातील लहानग्या मुलांनाही आणले होते वयस्कर आज्जी कमरेवर नातवांला घेवून धावत आल्या आणि नातवाला आमदार शंभूराजांचा विजय असो असे म्हणायला लावले लहानग्या नातवांनेही बोबडया बोलीत विजय असो असे उद्गार काढले.

3 comments:

  1. सडेतोड.
    उघडा डोळे बघा नीट

    ReplyDelete
  2. मी गणेवाडीकर आमचा गावात आजून तोमोटा दादा कधी आलाच नाही

    ReplyDelete
  3. तो काय आमचा रस्ता करणार

    ReplyDelete