Wednesday 20 November 2019

नेहरु उद्यानामध्ये कोयना पर्यटनातून उभारलेल्या खेळांच्या साहित्यांचा आमदार शंभूराज देसाईंच्या व बालचमूंच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न.



            दौलतनगर दि.१९:- कोयना पर्यटनाच्या माध्यमातून कोयनानगर व कोयनानगरचा १० किमीचा परिसर विकसीत करण्याकरीता पाटण मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाईंनी राज्याच्या पर्यटन विभागाकडून मंजुर करुन आणलेल्या कोयना पर्यटन आराखडयातून कोयनानगर येथील नेहरु उद्यानामध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या लहान मुलांच्या खेळाच्या साहित्यांचा लोकार्पण सोहळा हा देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांचे १३० व्या जयंती कार्यक्रमाचे औचित्य साधून आमदार शंभूराज देसाई व कोयनानगर परिसरातील बालचमूंच्या हस्ते करण्यात आला.
                                कोयनानगर व कोयनानगरचा १० कि.मी.चा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसीत करण्याकरीता कोयना पर्यटनाचा आराखडा करुन राज्याच्या पर्यटन विभागामार्फत आमदार शंभूराज देसाईंनी कोटयावधींचा निधी कोयना पर्यटनाकरीता मंजुर करुन आणला आहे. यामध्ये कोयनानगर येथील अस्तित्वात असणाऱ्या नेहरु उद्यानाचे सुशोभिकरण व नुतनीकरण करणे,कोयनानगर येथील धरण परिसराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील जुन्या झालेल्या कारंजाचे सुशोभिकरण व नुतनीकरण करणे,कोयना धरण व्यवस्थापनाचे जीर्ण झालेल्या विश्रामगृहाचे नुतनीकरण करणे,कोयनानगर येथे पर्यटकांना बसण्याकरीता ठिकठिकाणी बसण्याची व्यवस्था करणे,कोयना धरणातील जलाशयामध्ये बोटिंगची व्यवस्था करणे,कोयनानगर येथे वॉटर पार्क उभारणे,ओझर्डे धबधबा सुशोभिकरण करणे व अंबाखेळती देवी मंदीर बोपोली येथील परिसर सुशोभिकरण करणे अशा अनेक कामांकरीता त्यांनी एकूण ०५.०५ रुपयांचा निधी मंजुर करुन आणला आहे. तर कोयना विश्रामगृहाचे नव्याने बांधकाम करणेकरीता २ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजुर केला असून कोयना पर्यटनाच्या दृष्टीने एकूण ०७ कोटी ५५ लाख रुपयांचा निधी आमदार शंभूराज देसाईंनी मंजुर करुन आणला आहे.यामध्ये नेहरु उद्यानाचे सुशोभिकरण व नुतनीकरण करणे,कोयनानगर येथील धरण परिसराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील जुन्या झालेल्या कारंजाचे सुशोभिकरण व नुतनीकरण करणे पर्यटकांना बसण्याकरीता ठिकठिकाणी बसण्याची व्यवस्था करणे व कोयना विश्रामगृहाचे नव्याने बांधकाम करणे ही कामे प्रगतीपथावर असून नेहरु उद्यानाच्या सुशोभिकरणामध्ये नेहरु गार्डनमध्ये लहान मुलांना खेळण्याकरीता जुने झालेले खेळाचे साहित्य बदलून त्याठिकाणी नवीन खेळाचे साहित्य बसविणे तसेच नव्याने याठिकाणी साहित्यांची उभारणी करणे ही कामे पुर्ण झाली असून  दि.१४ नोव्हेंबर रोजी देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांचे १३० व्या जयंती कार्यक्रमाचे औचित्य साधून नेहरु उद्यानामधील या नवीन खेळांच्या साहित्यांचा लोकार्पण सोहळा आमदार शंभूराज देसाईंच्या हस्ते आयोजीत केला होता. खेळाच्या साहित्यांचा लोकार्पणाचा सोहळा आमदार शंभूराज देसाईंनी या परिसरातील उपस्थित बालचमूंच्या हस्ते करुन काहीकाळ आमदार शंभूराज देसाई हे या बालचमूंच्या खेळण्याच्या साहित्यात व खेळात रममाण झाले. आमदार शंभूराज देसाईंच्या सुचनेवरुन यादिवशी दिवसभर कोयना उद्यानामध्ये येणाऱ्या लहान मुलांकरीता हे खेळाचे साहित्य खेळण्याकरीता मोफत कोयना धरण व्यवस्थापनने उपलब्ध करुन दिले होते. यादिवशी नेहरु जयंतीच्या कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या अनेक लहान मुलांनी नेहरु उद्यानात उभारलेल्या नवीन खेळाच्या साहित्यांचा आंनद मनसोक्त लुटला.
                  यावेळी आमदार शंभूराज देसाई यांच्या समवेत पाटणचे उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार रवींद्र माने,कोयना धरण व्यवस्थापनचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील,उपविभागीय अधिकारी अशोक थोरात, कोयनानगरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बावीकट्टे,शिवसेना जिल्हाप्रमुख जयंवतराव शेलार,शिवदौलत बँकेचे संचालक अशोकराव पाटील, पंचायत समिती माजी सदस्य हरीष भोमकर,धोंडीराम भोमकर,निजाम जमाते, गणपतभाई कदम,कारखान्याचे संचालक बबनराव भिसे यांच्यासह कोयना धरण व्यवस्थापनातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्याबरोबर तालुकास्तरीय सर्व शासकीय अधिकारी व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment