दौलतनगर
दि.२५ :- दौलतनगर, ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचा सन २०१९-२० मधील ४६ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ
समारंभ बुधवार
दि.२७ नोव्हेंबर, २०१९ रोजी सकाळी ११.०० वा. लोकनेते
बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे मार्गदर्शक,उत्कृष्ट संसदपटु आमदार
शंभूराज देसाई व कारखान्याचे ज्येष्ठ ११ सभासद यांचे हस्ते कारखाना कार्यस्थळावर संपन्न होणार असल्याची माहिती
कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
पत्रकात म्हंटले आहे की,या वर्षीच्या गळीत हंगामातील गळीताकरीता मागील हंगामाच्या जवळपास कारखान्याकडे
कार्यक्षेत्रातील ऊसाची नोंद झाली असून कार्यक्षेत्रातील संपुर्ण ऊस गळीताचे
उदीष्ट कारखाना व्यवस्थापनाने ठेवले आहे. चालु गळीत हंगामाची
पुर्वतयारी पुर्ण झाली असून गाळप हंगाम पुर्ण क्षमतेने होण्याच्या दृष्टीने
कारखान्यातील सर्व कामकाज पुर्णत्वाकडे गेले आहे. कारखान्याने
ऊस तोडणी व वाहतूकीकरीता पुरेसे तोडणी मजुर व वाहनांचे करार पुर्ण केलेले असून
कारखान्याकडे करार केलेली सर्व ऊस तोडणी व वाहतूक तोडणी मजुर यंत्रणा कारखाना
कार्यक्षेत्रात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.यंदाचाही
गळीत हंगाम कारखान्याचे सभासद,ऊस उत्पादक शेतकरी यांचे
सहकार्यातून यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त करीत या गळीत हंगामाचा शुभारंभ हा
प्रतिवर्षाप्रमाणे कारखान्याचे ज्येष्ठ ११ सभासद श्री.जयसिंग शिर्के
आडूळ,श्री.चंद्रकांत माळी नुने,श्री. जयसिंग पानस्कर (पानस्करवाडी)
मल्हारपेठ,श्री.व्यंकट पानस्कर बहुले,श्री.वसंत देशमुख चाफळ,श्री.पांडूरंग निकम
बाचोली,श्री. यशवंत जाधव केरळ,श्री. यशवंत पाटील साईकडे,श्री.नानासो पवार
वेताळवाडी,श्री. नामदेव देसाई नाटोशी, श्री.पांडूरंग साळूंखे येराड व लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे मार्गदर्शक,उत्कृष्ट
संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते कारखाना कार्यस्थळ (दौलतनगर)
येथे संपन्न होत आहे. या कार्यक्रमास मोरणा
शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई व युवा नेते यशराज देसाई यांची प्रमुख
उपस्थिती राहणार असून या समारंभानिमित्त कारखान्याचे संचालक वसंत कदम व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.शकुंतला कदम यांचे हस्ते सत्यनारायण
महापुजा आयोजीत केलेली आहे.या समारंभास कारखान्याचे सर्व
सभासद,ऊस उत्पादक शेतकरी, पदाधिकारी, कार्यकर्ते,
हितचिंतक यांनी बुधवार दि.27 नोव्हेंबर, २०१9 रोजी
सकाळी १०.00 वा. बहुसंख्येने
उपस्थित रहावे असे आवाहनही चेअरमन अशोकराव पाटील यांनी शेवठी पत्रकात केले आहे.
No comments:
Post a Comment