Tuesday 5 November 2019

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्यास कटीबध्द. पंचनाम्यापासून कोणीही शेतकरी वंचीत राहणार नाही याची दक्षता घ्या- आमदार शंभूराज देसाईंच्या सुचना नुकसान झालेल्या शेतीपिकांचे आमदार शंभूराज देसाईंकडून अधिकाऱ्यांना बरोबर घेवून पहाणी.



दौलतनगर दि.०५ :- ऑक्टोंबर, २०१९ मध्ये राज्यातील इतर जिल्हयाबरोबर सातारा जिल्हयातील पाटण मतदारसंघात मोठया प्रमाणात झालेल्या अवकाळी व अतिवृष्टीमुळे पाटण मतदारसंघातील डोंगरी आणि दुर्गम भागातील शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठया संख्येने नुकसान झाले असून या नुकसानीचे तात्काळ कृषी व महसूल विभागामार्फत पंचनामे करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणेकरीता पाटणचे आमदार शंभूराज देसाईंनी आमदारकीचे प्रमाणपत्र हाती घेतल्यापासूनच प्रयत्न सुरु केले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळवून देणेकरीता त्यांचे प्रयत्न सुरु आहेत आपण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देणेकरीता कटीबध्द असल्याचेही आमदार शंभूराज देसाईंनी सांगितले असून शेतकऱ्यांना नुकसानीची मदत मिळणेकरीता आवश्यक असणारे पंचनाम्यापासून कोणीही शेतकरी वंचीत राहू नये याची यंत्रणांनी दक्षता घ्यावी अशा सक्त सुचनाही त्यांनी संबधित यंत्रणांना दिल्या आहेत.
                                     आज आमदार शंभूराज देसाईंनी तालुकास्तरीय सर्व अधिकाऱ्यांना बरोबर घेवून अवकाळी व अतिवृष्टीमुळे प्रत्यक्ष नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये जावून शेती पिकांच्या नुकसानीची पहाणी केली. शेतीपिकांचे नुकसान झालेल्या मौजे नावडी, वेताळवाडी,सोनाईचीवाडी व दिवशी या गांवातील शेतांमध्ये आमदार शंभूराज देसाईंनी शेतीपिकांच्या नुकसानीची पहाणी केली. यावेळी पाटणचे तहसिलदार रवींद्र माने, गटविकास अधिकारी श्रीमती मीना साळुंखे, तालुका कृषी अधिकारी अविनाश मोरे या महसूल,ग्रामविकास व कृषी अधिकाऱ्यांसह त्यांचे मंडलअधिकारी,तलाठी,ग्रामसेवक व नुकसानग्रस्त शेतकरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
                                पाटणचे आमदार शंभूराज यांनी पाटण विधानसभा मतदारसंघात अवकाळी व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मतदारसंघातील अनेक गांवातील शेतकऱ्यांच्या शेतीपिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने हाती घेणेकरीता आमदारकीचे प्रमाणपत्र हाती घेतले त्याचदिवशी व त्यानंतर दोनवेळा शासकीय अधिकाऱ्यांच्या तातडीच्या बैठका घेवून अवकाळी व अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेला कोणीही शेतकरी नुकसानीच्या पंचनाम्यापासून वंचीत राहू नये याची शासकीय यंत्रणांनी दक्षता घ्यावी अशा सुचना कृषी व महसूल,ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या होत्या. दि. २५ ऑक्टोंबर,२०१९ रोजीच राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचेकडे लेखी पत्रव्यवहार करुन त्यांनी ऑक्टोंबर, २०१९ मधील अवकाळी व अतिवृष्टीतील नुकसानीसंदर्भात बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करुन या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत दयावी अशी आग्रही मागणी केली आहे त्यानंतर त्यांनी शिवसेना पक्षाचे गटनेते एकनाथ शिंदे यांच्यासमवेत राज्याचे राज्यपाल यांची मुंबई येथे भेट घेवून अवकाळी व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर शासनाकडून पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळवून दयावी अशी मागणी केली होती. नुसती मागणी करुन ते थांबले नाहीत तर ऑक्टोंबर,२०१९ मधील अवकाळी व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांच्या शेतीपिकांच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करुन ते शासनाकडे सादर होणेकरीता त्यांचा तालुकास्तरीय सर्व अधिकाऱ्यांकडे तगादा सुरु होता.नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून यंत्रणांच्या प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 4140.82 हेक्टर एवढया शेती क्षेत्रातील शेतीपिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज असून आजअखेर या पंचनाम्यामध्ये वाढ होणार असल्याची शक्यता आहे. नुकसानीचे झालेले पंचनामे शासनस्तरावर पाठविण्यास विलंब करु नये असे सांगून त्यांनी ऑक्टोंबर, २०१९ मधील अवकाळी व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांच्या शेतीपिकांना त्यांची नुकसानभरपाई मिळवून देणेकरीता आपण कटीबध्द आहोत असे आजही आमदार शंभूराज देसाईंनी शेतीपिकांच्या नुकसानीच्या पहाणी दौऱ्यामध्ये सांगितले.

No comments:

Post a Comment