Saturday 24 October 2020

10 हजार कोटी मंजुर करुन अतिवृष्टीग्रस्तांना मुख्यमंत्र्यांनी दिला दिलासा. अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया.

 



दौलतनगर दि.24 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):-अतिवृष्टी व परतीच्या पावसाचा तडाखा बसलेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी काल राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरेसाहेब यांनी केंद्र शासनाकडून जीएसटीचे 38 हजार कोटी रुपये येणे बाकी असतानाही 10 हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली. मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरेसाहेब यांनी या मदतीची घोषणा करुन राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे.मुख्यमंत्री यांनी घोषित केलेल्या धोरणात्मक निर्णयाचे राज्यातील शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे. दिवाळीपुर्वी नुकसानीची ही रक्कम राज्यातील शेतकऱ्यांच्या हाती पडेल यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्यामध्ये समाधानाचे वातावरण आहे अशी प्रतिक्रिया राज्याचे अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी दिली आहे.

          संपुर्ण राज्यामध्ये अतिवृष्टी व परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असून मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरेसाहेब यांनी स्वत: या आठवडयात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जावून नुकसानीची पहाणी करुन राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 10 हजार कोटी रुपयांची मदतीची घोषणा केली आहे.मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरेसाहेब यांचे मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी शासनाचा हा धोरणात्मक निर्णय असून मुख्यमंत्री यांच्या निर्णयामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. परतीच्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांच्या नुकसानीबरोबर शेतजमिनी खरडून जाणे, ग्रामीण रस्ते, लहान पुल, पिण्याच्या पाण्याच्या योजना, कमकुवत घरे कोसळणे या सर्व बाबींसाठी ही मदत जाहीर करण्यात आली आहे.अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतजकऱ्यांना दिलासा देण्यासाठी व पायाभूत सुविधांच्या पुर्नबांधणीसाठी मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरेसाहेब यांनी घोषित केलेल्या मदतीमध्ये शेतीपिकांसाठी जीरायत व बागायत क्षेत्रासाठी रु 10 हजार प्रतिहेक्टर, फळपिकांसाठी रु.25 हजार प्रति हेक्टर, मृत व्यक्तींच्या वारसांना, मयत पशुधनासाठी व घरपडघडीसाठी 5 हजार 500 केाटी अशी भरीव मदत यामध्ये देण्यात आली आहे. तसेच रस्ते व पुल पुर्नंबांधणीसाठी 2 हजार 635 कोटी, पाणीपुरवठा योजना पुर्नंबांधणीसाठी 1 हजार कोटी,जलसंपदा विभागाकडील कामे करण्याकरीता 102 कोटी, विजेचे खांब बदलणे, वीजपुरवठा सुरळीत करणे या कामांकरीता महावितरण ऊर्जा विभागाला 239 कोटी व नगर विकास विभागाला 300 कोटी असे एकूण 10 हजार कोटींची ही मदत मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरेसाहेब यांनी जाहीर केली आहे.

            राज्य शासनाच्या तिजोरीत पैशाची ओढाताण असताना तसेच केंद्र शासनाकडून जीएसटीचे 38 हजार कोटी रुपये येणे बाकी असतानाही तसेच कोरोनाचे एवढे मोठे संकट राज्यापुढे असतानाही अतिवृष्टी व परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या सर्व नुकसानग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही त्यांना राज्य शासनाकडून आवश्यक ती मदत दिली जाईल असा शब्द मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरेसाहेब यांनी राज्यातील जनतेला दिला होता त्यानुसार ही मदत जाहीर करुन धोरणात्मक असा निर्णय घेतला आहे. ही बाब राज्यातील शेतकऱ्यांना उभारी देणारी आहे. आणि मदत देण्यास विलंब न लावता दिवाळीपुर्वी ही मदत शेतकऱ्यांना मिळणार असल्याने शेतकऱ्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण असून ही मदत जाहीर केल्याबद्दल मी अर्थराज्यमंत्री या नात्याने  मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरेसाहेब यांचे जाहीर आभार व्यक्त करीत असल्याचेही ना.शंभूराज देसाईंनी यावेळी बोलताना सांगितले.

चौक्ट:- राज्याच्या हक्काचा परतावा दयायला केंद्र शासनाकडून विलंब.

             मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने गेल्या वर्षभरात राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी 30 हजार 800 केाटी रुपयांची मदत केली आहे.केंद्र शासना कडून राज्याच्या हक्काचे 38 हजार कोटी रुपये येणे बाकी आहे. राज्य शासन याकरीता केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहे परंतू राज्याचा हक्काचा परतावा दयायला केंद्र शासन विलंब करीत असल्याचा आरोपही अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी केला आहे.

लोकनेते बाळासाहेब देसाई अद्यासनास मंजुर 01 कोटी निधीमधून राबवायचे उपक्रम तयार करा. अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या शिवाजी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना सुचना.

 


दौलतनगर दि.24 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):-महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,राज्याचे माजी गृहमंत्री व कोल्हापुरच्या शिवाजी विद्यापीठाचे निर्मीती करणारे लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नावाने राज्य शासनाने शिवाजी विद्यापीठामध्ये लोकनेते बाळासाहेब देसाई अद्यासनास मंजुरी देत या अद्यासनास 01 कोटी रुपयांचा निधी पहिल्या टप्प्यात मंजुर केला आहे.या निधीमधून शिवाजी विद्यापीठ तसेच विद्यापीठातंर्गत राबवायचे उपक्रम लवकरात लवकर तयार करुन त्याची अंमलबजावणी करा अशा सुचना लोकनेते यांचे नातू,राज्याचे अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी शिवाजी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

          कोल्हापुर शासकीय विश्रामगृहात गृह,अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे अध्यक्षतेखाली शिवाजी विद्यापीठात व विद्यापीठातंर्गत लोकनेते बाळासाहेब देसाई अद्यासनास राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून मंजुर केलेल्या 01 कोटी रु.निधीच्या माध्यमातून राबवायच्या उपक्रमाबाबत आढावा बैठक आयोजीत करण्यात आली होती याप्रसंगी त्यांनी वरीलप्रमाणे सुचना केल्या.याप्रंसगी बैठकीस शिवाजी विद्यापठाचे कुलसचिव डॅा.विलास नांदावडेकर,लोकनेते बाळासाहेब देसाई अद्यासन समन्यवयक प्रा.अवनीश पाटील, सहाय्यक प्राध्यापक (इतिहास विभाग) दत्तात्रय मचले यांची प्रमुख उपस्थिती होती.

              याप्रंसगी बोलताना ना.शंभूराज देसाई म्हणाले, कोल्हापुरच्या शिवाजी विद्यापीठाचे निर्मीतीमध्ये लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या नावाने शिवाजी विद्यापीठामध्ये अद्यासन केंद्र व्हावे याकरीता शासनाकडे माझा सातत्याने पाठपुरावा होता.या अद्यासनाकरीता आवश्यक असणारा 03 कोटी रुपयांचा आर्थिक सहाय्यचा प्रस्ताव राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे सादर करण्यात आला होता त्यानुसार शासनाच्या माध्यमातून या विभागाचे मंत्री ना.उदय सामंत यांनी नुकतेच पहिल्या टप्प्यात 01 कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे.

             या निधीच्या माध्यमातून अद्यासनामध्ये शिवाजी विद्यापीठ व विद्यापीठातंर्गत राबवावयाचे उपक्रम याची सविस्तर माहिती तयार करावी.अद्यासनाची उद्यिष्ठ तयार करावीत यामध्ये लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणाऱ्या संशोधन प्रकल्पाच्या माध्यमातून काय योजना राबविता येतील याच्या धोरणात्मक बाबी तयार कराव्यात.असे सांगत त्यांनी लोकनेते बाळासाहेब देसाई अद्यासनाच्या धोरणात्मक बाबींमध्ये लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे विचारांवर व्याख्यानमाला आयोजीत करणे,त्यांचे विचारांवरील लेख तयार करणे, त्यांचे आत्मचरीत्रावर पुस्तक किंवा ग्रंथ प्रकाशित करणे, त्यांनी राज्याचे विविध खात्यांचे मंत्री म्हणून केलेले कार्यावर अभ्यास विकसित करणे त्याची अंमलबजावणी करणे या बाबींचा समावेश करावा.

              तसेच त्यांचे नावाने दौलतनगर ता.पाटण येथे उभारण्यात आलेल्या अभ्यासिकेमध्ये स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन देणेकरीता तज्ञांचे मार्गदर्शन शिबीरे आयोजीत करावी. कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून युवा विकास करणेकरीता प्रशिक्षणाची सोय याठिकाणी करण्यात यावी. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या कार्याची माहिती देणारी छायाचित्र आहेत त्याची एक सुसज्ज अशी गॅलरी शिवाजी विद्यापीठामध्ये करण्यात यावी.अशा सुचना केल्या.लोकनेते बाळासाहेब देसाई अद्यासनाचे कार्य व्यवस्थित पार पाडण्यासाठी प्रशासकीय बाबी ज्या शासनाकडून मंजुर करुन आणायच्या आहेत त्याची सविस्तर टिपणी तयार करुन तो प्रस्ताव राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे सादर करावा अशाही सुचना त्यांनी यावेळी संबधितांना दिल्या.

चौकट:-  लोकनेते बाळासाहेब देसाई अद्यासन तहयात सुरु राहणेकरीताचे उपक्रम राबवावे.

               महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा सिहांचा वाटा आहे.त्यांनी केलेल्या अतुलनीय कार्याची ओळख संपुर्ण महाराष्ट्राला आहे.नव्या पिढीला त्यांचे कार्य समजणेकरीता अद्यासन हे चांगले माध्यम आहे.त्यामुळे हे अद्यासन तहयात सुरु राहणेकरीताचे उपक्रम या अद्यासनाच्या माध्यमातून राबवावेत असेही ना.शंभूराज देसाईंनी यावेळी सांगितले.

Wednesday 21 October 2020

अर्थराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी मागणी केलेली जलसंपदा विभागाकडील प्रशासकीय मान्यता मिळालेली कामे तात्काळ सुरु करा. जलसंपदा मंत्री ना.जयंतराव पाटील यांचे अधिकाऱ्यांना आदेश.

 


दौलतनगर दि.21 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- पाटण मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी व राज्याचे अर्थराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी मागील पंचवार्षिकमध्ये जलसंपदा विभागाकडून त्यांचे  पाटण विधानसभा मतदारसंघात विविध प्रकल्पांना तसेच कामांना शासनाकडून प्रशासकीय मान्यता घेतल्या आहेत. ना.शंभूराज देसाईंनी प्रशासकीय मान्यता घेतलेली जलसंपदा विभागाकडील कामे तात्काळ सुरु करा या कामांमध्ये जलसंपदा विभागाकडून कसलीही दिरंगाई नको, मुदतीत ही सर्व कामे कशी पुर्ण होतील याकडे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रीत करावे असे स्पष्ट आदेश राज्याचे जलसंपदा मंत्री ना.जयंतराव पाटील यांनी काल मंत्रालयीन अधिकाऱ्यांना दिले.

            राज्याचे अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या विनंतीवरुन राज्याचे जलसंपदा मंत्री ना.जयंतराव पाटील यांचेकडे मंत्रालयातील त्यांचे दालनात पाटण विधानसभा मतदारसंघातील जलसंपदा विभागा कडील विविध प्रकल्प तसेच कामांच्यासंदर्भात आढावा बैठक झाली. अर्थ व गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाईंनी पाटण मतदारसंघातील उपस्थित केलेल्या विविध मुद्यांवर या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.या प्रश्नांची तात्काळ सोडवणूक करण्यासाठीचे निर्देश यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री ना.जयंतराव पाटील यांनी मंत्रालयीन संबधित सर्व अधिकाऱ्यांना दिले.

           अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी या आढावा बैठकीत जलसंपदा मंत्री ना.जयंतराव पाटील यांचेकडे तारळी मध्यम धरण प्रकल्पातील 50 मीटर उंचीच्या वरील पाच उपसा जलसिंचन योजनांच्या कामांना गती देणे व सदरच्या योजनांची कामे मुदतीत पुर्ण करणेसंदर्भातील विषय मांडला. त्याचबरोबर मोरणा गुरेघर धरण प्रकल्पातून उपसा जलसिंचन योजनांच्या माध्यमातून डोंगराकडेच्या जमीन क्षेत्राला पाणी देणेकरीता सादर केलेल्या योजनेच्या कामांस सुधारित प्रशासकीय मान्यता देणे, कोयना नदीकाठच्या नेरळे व गिरेवाडी येथील नदीकाठच्या घाटाच्या कामांची निवीदा प्रसिध्द करण्यास मान्यता देणे,तसेच बनपेठ व गुंजाळी येथील नदीकाठच्या घाटाच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे त्यास निधी उपलब्ध करुन देणे व सांगवड येथील कोयना नदीकाठच्या घाटाच्या कामांस 05 कोटीच्या आत सादर केलेल्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देणे आणि मंद्रुळकोळे,मंद्रुळकोळे खुर्द,जानुगडेवाडी व शितपवाडी ही चार गांवे वांग मराठवाडी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात घेण्यात आली असून या चारही गांवाना वांग मराठवाडी प्रकल्पाचा कोणताही लाभ नसल्याने ही चार गांवे या प्रकल्पातून वगळण्यात यावीत व चार गांवाचा समावेश या गांवाच्या वरील मंहिद धरण लाभक्षेत्रात करावा तसेच कोयना धरण प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता हे पद बदलीने रिक्त झाले असून याठिकाणी नवीन कार्यकारी अभियंता यांची नेमणूक करावी असे विषय जलसंपदा मंत्री यांचेकडे मांडले.

            यावेळी ना.शंभूराज देसाई यांनी उपस्थित केलेल्या विविध मुद्यांवर जलसंपदा मंत्री व अर्थराज्यमंत्री या दोघांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. तारळी मध्यम धरण प्रकल्पातील 50 मीटर उंचीच्या वरील पाच उपसा जलसिंचन योजनांच्या कामांना गती देणेच्या व मुदतीत ही कामे पुर्ण करण्याच्या सुचना करीत मोरणा गुरेघर धरण प्रकल्पातील योजनेच्या कामांस सुधारित प्रशासकीय मान्यता देणेचा विषय राज्य मंत्रीमंडळापुढे मांडण्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्याच्या सुचनाही दिल्या. तसेच नेरळे व गिरेवाडी येथील नदीकाठच्या घाटाच्या निवीदा प्रसिध्द कराव्यात व बनपेठ,गुंजाळी आणि सांगवड नदीकाठच्या घाटांचे निधी मागणीचे प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर करावेत असे निर्देश जलसंपदा मंत्री यांनी मंत्रालयीन अधिकाऱ्यांना देत ना.शंभूराज देसाईंनी प्रशासकीय मान्यता घेतलेल्या कामांना जलसंपदा विभागाकडून अजिबात दिरंगाई नको असेही यावेळी त्यांनी संबधित सर्व अधिकाऱ्यांना सांगितले.

          जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांचेकडे पाटण मतदारसंघातील जलसंपदा विभागाकडील विविध विषयावर  सकारात्मक चर्चा होवून विविध प्रलंबीत विषयांवर धोरणात्मक निर्णय घेतलेबद्दल अर्थराज्य मंत्री ना.शंभूराज देसाईंनी जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांचे आभार व्यक्त केले.

कर्तव्य बजाविताना धारतिर्थी पडणाऱ्या शुर पोलिस शहिदांना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंकडून मुंबई येथे श्रध्दांजली समर्पित.

 


दौलतनगर दि.21 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- प्रतिवर्षी दि. 21 ऑक्टोबर रोजी देशासाठी कर्तव्य बजावताना धारतिर्थी पडणाऱ्या शूर पोलीस शहिदांना राज्य शासनाच्या वतीने श्रध्दांजली समर्पित करण्यात येते.आज दि.21 ऑक्टोंबर,2020 रोजी सकाळी नायगांव,मुंबई येथील पोलीस मुख्यालयाच्या ठिकाणी शासनाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरेसाहेब,राज्याचे गृहमंत्री ना.अनिल देशमुख,गृहराज्यमंत्री (ग्रामीण) मा.ना.शंभूराज देसाई व गृहराज्यमंत्री (शहरे) मा.ना.सतेज पाटील यांनी शहिद झालेल्या शूर पोलीस शहिदांना श्रध्दांजली समर्पित केली.यादिवशी सर्व पोलीस घटकांत पोलीस स्मृतीदिन परेड आयोजित करण्यात येते.प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही सर्व पोलीस घटकांत पोलीस स्मृतीदिन परेड आयोजित करण्यात आली होती.

          दि. 21 ऑक्टोंबर, 1959 रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे पोलीस उप निरिक्षक करमसिंग यांच्या नेतृत्वाखाली लडाख येथील दुर्गम भागात 16000 फूट उंचीवर असलेल्या ठिकाणी गस्त घालत असलेल्या 10 भारतीय जवनांवर दबा धरुन बसलेल्या चिनी सैनिकांनी अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात आपल्या 10 जवानांना वीरमरण आले होते.अतिशय थंड व प्रतिकूल हवामान परिस्थितीत देशासाठी आपले कर्तव्य बजावत असताना या जवानांनी अतिशय शौर्याने शत्रूविरोधात लढा देताना वीरमरण पत्करले. या जवानांच्या हौतात्म्याचे स्मरण म्हणून आजही दरवर्षी 21 ऑक्टोंबरला हॉट स्प्रिंग लडाख येथे देशाच्या प्रत्येक प्रांताचे तसेच निमलष्करी दलांचे प्रतिनिधीत्व करणारे पोलीस पथक पाठवून आदरांजली वाहिली जाते. राज्य शासनाच्या वतीने नायगांव,मुंबई येथील पोलीस मुख्यालयाच्या ठिकाणी  श्रध्दांजली समर्पित करण्याचा कार्यक्रम आयोजीत करण्यात येतो. त्यानुसार आज प्रतिवर्षी दि. 21 ऑक्टोबर रोजी देशासाठी कर्तव्य बजावताना धारतिर्थी पडणाऱ्या शूर पोलीस शहिदांना राज्य शासनाच्या वतीने श्रध्दांजली समर्पित करण्यात आली. याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरेसाहेब,राज्याचे गृहमंत्री ना.अनिल देशमुख,गृहराज्यमंत्री (ग्रामीण) मा.ना.शंभूराज देसाई व गृहराज्यमंत्री (शहरे) मा.ना. सतेज पाटील यांनी उपस्थित राहून पुष्पचक्र अर्पण करीत शहिद झालेल्या शूर पोलीस शहिदांना श्रध्दांजली समर्पित केली. देशातील सर्व पोलीस घटकांत पोलीस स्मृतीदिन परेड आयोजित केली जाते. नायगांव,मुंबई येथील पोलीस मुख्यालयाच्या ठिकाणी  पोलीस स्मृतीदिन परेड आयोजित करण्यात आली होती. ह्या परेडमध्ये दि.01 सप्टेंबर, 2019 ते 31 ऑगस्ट,2020 पर्यंत शहिद झालेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांची नावे वाचण्यात आली.

Monday 19 October 2020

गडचिरोलीत काल नक्षलवाद्याचा खातमा करणाऱ्या पोलीस यंत्रणेला गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी दिली शाबासकीची थाप.

 

 

दौलतनगर दि.19 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- गडचिरोली जिल्ह्यातील आनोरा उपविभागातील कोसमी किसनेली जंगल परिसरात काल रविवार दि.18 ऑक्टोंबर रोजी सायं. 4.30 वा पाच नक्षलवाद्याचा महाराष्ट्र पोलिस यंत्रणेतील गडचिरोली विभागातील वरीष्ठ अधिकारी व पोलिस कर्मचारी यांनी खातमा केला आहे.नक्षलवाद्याचा खातमा करणाऱ्या या विभागातील वरीष्ठ पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना राज्याचे गृहराज्यमंत्री (ग्रामीण) ना.शंभूराज देसाईंनी स्वत: दुरध्वनी करुन या पोलिस यंत्रणेला शाबासकीची थाप देत त्यांचे अभिनंदन करुन त्यांचेवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

              गडचिरोली जिल्ह्यातील आनोरा उपविभागातील कोसमी किसनेली जंगल परिसरात काल रविवारी सायं. 4.30 वा या विभागाचे अप्पर पोलीस अधिक्षक मनिष कलवानीया यांच्या नेतृत्वाखाली  सी-60 चे कमांडो नक्षलविरोधी अभियान राबवित असताना गडचिरोली नक्षलवाद्यांनी या अभियानातील पोलीसांवर हल्ला केला. प्रत्युत्तरादाखल सी- 60 चे जवानांनी नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला आणि या गोळीबारात पाच नक्षलवाधी ठार केले आहेत.

             महाराष्ट्र पोलिस यंत्रणेतील गडचिरोली विभागातील वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या या धाडशी व उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्याचे गृहराज्यमंत्री (ग्रामीण) ना.शंभूराज देसाई यांनी त्यांना गडचिरोली विभागातील पोलिस यंत्रणेची ही बातमी समजताच गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील,गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक अंकित गोयल तसेच या धाडशी कारवाईत सहभागी झालेले अप्पर पोलीस अधिक्षक मनिष कलवानीया यांना स्वत: फोन केला व त्यांचे विशेष अभिनंदन करुन या कारवाईत सहभागी झालेले सर्व पोलिस कर्मचारी यांच्या पाठीवर कौतूकाची थाप दिली व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छाही दिल्या.

चौकट:- गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचा एक फोन पोलिस यंत्रणेचे मनोबल वाढविणारा.

              पाच नक्षलवाद्याचा गडचिरोलीत खातमा करण्यात आला आहे हे समजताच राज्याचे गृहराज्यमंत्री (ग्रामीण) ना.शंभूराज देसाईंनी आम्हाला तसेच येथील नक्षलग्रस्त भागात जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना फोन करुन केलेले कौतुक हे पोलिस यंत्रणेचे मनोबल वाढविणारे आहे अशी प्रतिक्रिया गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे.

Sunday 18 October 2020

सर्वांच्या सहकार्याने गळीत हंगाम यशस्वी होईल-गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचा 47 वा बॉयलर अग्निप्रदिपन कार्यक्रम संपन्न.

 


दौलतनगर दि.18:- कोरोनाच्या संकटामुळे महाराष्ट्रातील सर्व सहकारी साखर कारखान्यांना मोठया अडचणींना सामोरे जावे लागत असून अजूनही कोरोनाचे संकट टळलेले नाही. परंतु कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद,शेतीकरी यांच्या सहकार्याने आपले लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचा सन 2020-21 चा गळीत हंगाम यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त करत या गळीत हंगामात तालुक्यातील ऊस उत्पादक सभासद व शेतकऱ्यांनी कोणत्याही क्षणिक मोहाला बळी न पडता आपला पिकवलेला सर्व ऊस लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याला घालून सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी केले.

              दौलतनगर,ता. पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे 47 व्या बॉयलर अग्निप्रदिपन कार्यक्रमप्रसंगी  बोलत आहे.यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, युवा नेते यशराज देसाई, चेअरमन अशोकराव पाटील, व्हाईस चेअरमन राजाराम पाटील, माजी चेअरमन डॉ. दिलीपराव चव्हाण, शिवसेना सातारा जिल्हा अध्यक्ष जयवंतराव शेलार, संचालक शशिकांत निकम, सोमनाथ खामकर, गजानन जाधव, आनंदराव चव्हाण, राजेंद्र गुरव,बबनराव भिसे, पांडूरंग नलवडे, संचालिका सौ. विश्रांती विजय जंबुरे,सौ. दिपाली पाटील,जिल्हा परिषद सदस्य विजय पवार,पंचायत समिती सदस्य पंजाबराव देसाई, सुरेश पानस्कर,संतोष गिरी,ॲङ डी.पी.जाधव, बशीर खोंदू, भरत साळूंखे,रघुनाथ माटेकर,गणेश भिसे आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमानिमित्त कारखान्याचे संचालक विकास बाळकू गिरी-गोसावी व त्यांच्या पत्नी सौ. स्वाती विकास गिरी गोसावी यांचे हस्ते सत्यनारायण महापुजा आयोजित केली होती.

               यावेळी बोलताना नामदार शंभूराज देसाई पुढे म्हणाले की, अतिशय प्रतिकुल परस्थितीमध्ये राज्यातीला सहकारी साखर उद्योग चालला आहे. जी काही शासकीय बंधने आहेत ती सहकारी साखर उद्योगाला आहेत. दोन तीन वर्षामध्ये चारही बाजूंनी साखर कारखाने अडचणीत येण्याची परस्थिती निर्माण झाली आहे. सहकारी तत्वावर असलेल्या साखर कारखान्यावरती शासनाचे नियंत्रण असल्याने हे सहकारी साखर कारखाने शंभर टक्के शासनाच्या नियमाचे पालन करूनच  कारखाने चालवावे लागतात. गेल्या वेळच्या हंगामाच्या अखेरीस कारखान्यापुढे कोरोनाचे संकट उभे राहिले. अशा संकटात शेतकऱ्यांना कारखान्याने दिलास देत संपूर्ण ऊसतोड पुर्ण करत मागील गळीत हंगाम यशस्वीरित्या पार पाडला. लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे कार्यक्षेत्र पाहिल्यानंतर निम्माहून अधिेक क्षेत्र हे डोंगंरी भागात आहे. संपुर्ण पाटण तालुक्यातील ऊसाची लागवड पाहिली तर तीन ते साडेतीन लाख मे.टनाच्या वर जात नाही. ही वस्तूस्थिती असताना देखील परंतु काही मंडळी जाणिव पूर्वक कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस बाहेरच्या कारखान्यांना कसा जाईल यासाठी प्रयत्न करताना दिसत असून कार्यक्षेत्रातून ऊस बाहेर जाऊ नये याकरीता कारखाना व्यवस्थापनाने आवश्यक ते धोरण राबविले पाहिजे. अनेक अडचणी असतानाही ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित डोळयासमोर ठेवत गत गळीत हंगामामध्ये गळीतास आलेल्या ऊसाला शासन नियामाप्रमाणे संपूर्ण एफ.आर.पी.ची रक्कम शेतकऱ्यांना दिली असून कारखाना संचालक मंडळाने नेहमीच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय घेतले असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की,सन 2020-21 चा गळीत हंगाम लवकर सुरु करण्याच्यादृष्टीने अधिकाऱ्यांनी व कामगारांनी काळजी घेत ऑफ सिजनची कामे पुर्णत्वाकडे नेली आहेत. येत्या काही दिवसात कारखाना गळीतासाठी सज्ज असल्याने तालुक्यातील शेतक-यांनी व सभासदांनी कार्यक्षेत्रातील ऊस बाहेरच्या कारखान्यांना न घालता पिकवलेला संपुर्ण ऊस हा आपलेच लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्यास गळीताकरीता देवून गळीत हंगाम य़शस्वी करण्यासाठी सर्व सभासदांनी सहकार्य करावे, असे आवाहनी त्यांनी शेवटी केले. चेअरमन अशोकराव पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

गत चार दिवसातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीपिकांचे तात्काळ पंचनामे करा. गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाईंच्या शासकीय अधिकाऱ्यांना सुचना.

 


दौलतनगर दि.18:- कमी दाबाच्या पट्टयामुळे गत चार दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये सर्वदूर मुसळधार पाऊस पडत असून डोंगरी व दुर्गम अशा पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक पिकांचे अतोनात नुकसान झाले असून पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये गत चार दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठया प्रमाणांत नुकसान झाले असून मतदारसंघातील शेतकरी हवालदिल झाला आहे. गत चार दिवसातील अवकाळी व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकांचे तात्काळ पंचनामे करण्यात यावेत, अशा सूचना गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी शासकीय अधिकाऱ्यांना केल्या.

            गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे अध्यक्षतेखाली दौलतनगर,ता. पाटण येथे पाटण विधानसभा मतदारसंघातील अवकाळी व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीपिकांचे नुकसानीसंदर्भात सर्व शासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. यावेळी बैठकीस पाटणचे प्रातांधिकारी श्रीरंग तांबे, कराडचे प्रांताधिकारी उत्तम दिघे, पाटणचे तहसिलदार समीर यादव, कराडचे तहसिलदार अमरदिप वाकडे, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, उपविभागीय कृषी अधिकारी दौलत चव्हाण,तालुका कृषी अधिकारी डी.ए.खरात, पशुसंवर्धन अधिकारी जमदाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय उत्तुरे, उपविभाग पाटणचे उपअभियंता अजित पाटील, विद्याधर शिंदे, जिल्हा परिषद बांधकामचे कार्यकारी अभियंता एन.डी. भोसले, जिल्हा परिषद बांधकामचे आर.एस.भंडारे, ग्रामीण पाणी पुरवठा‍ उपविभागाचे एम.आर.कदम यांची उपस्थिती होती.

                      याप्रसंगी ना.शंभूराज देसाईंनी प्रारंभी संपुर्ण पाटण विधानसभा मतदारसंघातील तसेच सुपने मंडलातील अवकाळी व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकांचे नुकसानीची प्राथमिक माहिती तालुका प्रशासनाच्या संबंधित शासकीय अधिकाऱ्यांकडून घेतली.नामदार शंभूराज देसाई पुढे म्हणाले की, कमी दाबाच्या पट्टयामुळे गत चार दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये सर्वदूर मुसळधार पाऊस पडत असून डोंगरी व दुर्गम अशा पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक पिकांचे अतोनात नुकसान झाले असून पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये गत चार दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठया प्रमाणांत नुकसान झाले असून  गेली चार दिवस अखंडपणे सुरु असलेल्या  अवकाळी व अतिवृष्टीमुळे मतदारसंघातील शेतक-यांच्या शेतातील उभ्या पिकांचे मोठया प्रमाणांत नुकसान होवून पिकांची मोठी हानी झालेली आहे. या अतिवृष्टीमुळे शेतामध्ये मोठया प्रमाणांत पाणी साठल्याने शेतातील पिके पुर्णत: कुजली  असून यामध्ये या हंगामातील विशेषत: सोयाबीन, हायब्रीड, भुईमुग, भात,नाचणी व ऊस या पिकांचे मोठया प्रमाणांत नुकसान झाले आहे.त्यामुळे मतदारसंघातील शेतकरी हवालदिल झाला आहे. पाटण विधानसभा मतदारसंघ हा मुळातच डोंगरी व दुर्गम भागातील अतिवृष्टीचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. डोंगरी व दुर्गम भागातील शेतक-यांचे शेती हे एकमेव उदर-निर्वाहाचे साधन आहे. अल्पभूधारक शेतक-यांची मोठया प्रमाणात संख्या असून सततच्या होणा-या अतिवृष्टीमुळे शेतातील उभ्या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी कुटुंबांचे फार मोठया संख्येने आर्थिक नुकसान झाले आहे. सलग तीन महिने सततच्या कोसळणा-या अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त शेतक-यांच्या पाठीशी महाविकास आघाडीचे सरकार कायम पाठीशी असून नुकसानीची भरपाई तातडीने मिळणेकरीता तात्काळ या शेतीपिकांच्या नुकसानीचे महसूल व कृषी व जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत संयुक्तपणे पंचनामे चार दिवसांत पुर्ण करावेत अशा सूचना शासकीय अधिकारी यांना देत पाटण विधानसभा मतदारसंघात गत चार दिवसामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह अंशत: व पुर्णत: पडझड झालेल्या घरांचे तसेच पुल,रस्ते,नळ पाणी पुरवठा योजना,अंगणवाडी इमारती,शाळा खोल्या आदींचे  झालेल्या नुकसानीचे प्रस्ताव सादर करा, अशा सूचनाही त्यांनी शेवटी शासकीय अधिकाऱ्यांन केल्या आहेत.

Friday 16 October 2020

दौलतनगर कोविड केअर सेंटर रुग्णांकरीता वरदान कोविड केअर सेंटर मधून १५ रुग्ण कोरोनामुक्त तर १९ रुग्णांवर औषधोपचार सुरु.

 

 

दौलतनगर दि.१7 :-  कोविड-१९ संसर्गामुळे पाटण विधानसभा मतदारसंघातील रुग्णांची हेळसांड थांबविण्याकरीता गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून उभारलेल्या दौलतनगर,ता.पाटण येथील कोविड केअर सेंटरमध्ये गत तीन आठवडयात  कोरोना बाधित ४७ रुग्ण उपचारासाठी दाखल झाले . त्यापैकी १५ रुग्ण कोरोनामुक्त झालेनंतर घरी सोडण्यात आले आहे. तर १९ कोरोना बाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु असून व्हेंटीलेटरची आवश्यक असलेल्या १३ कोरोना बाधित रुग्णांना पुढील उपचाराकरीता अन्य रुग्णालयामध्ये हलविण्यात आले आहे. दरम्यान या कोविड सेंटरमधून शुक्रवारी कोरोनामुक्त झालेल्या दोन रुग्णांना उपचारानंतर गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे हस्ते प्रशस्तीपत्रक देण्यात येऊन घरी सोडण्यात आले.यावेळी कोविड केअर सेंटरचे आरोग्य अधिकारी डॉ. सुहेल शिकलगार, डॉ. अभिजित देसाई उपस्थित होते.

             सातारा जिल्ह्यामध्ये गत महिन्यात ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणावर वाढत असताना कराड, सातारा याठिकाणी ऑक्सिजन बेडची कमतरता जाणवू लागली.ऑक्सिजन मिळत नसल्यामुळे कोरोना बाधित व्यक्तींच्या मृत्यूंच्या संख्येत वाढ होत असताना अशा परिस्थितीत सामाजिक बांधिलकी म्हणून लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर राज्याचे नगरविकासमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांच्या सहकार्यातून कोवीड केअर सेंटर उभे करुन पाटण विधानसभा मतदारसंघातील कोरोना बाधितांना उपचार देणेकरीता गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी पुढाकार घेत केवळ पाच ते सहा दिवसात दौलतनगर,ता.पाटण येथील कोरोना कोवीड सेंटर रुग्णांच्या सेवेसाठी तातडीने उभे करण्याचे काम करत या कोविड सेंटरमध्ये ५० ऑक्सिजन बेड, २५  नॉन  ऑक्सिजन बेड अशी एकूण ७५ बेडची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. तसेच या कोविड केअर सेंटरसाठी आवश्यक असणारे १८ वैद्यकीय अधिकारी,१७ कर्मचारी, औषधसाठा तसेच इतर आवश्यक साधन सामुग्री उपलब्ध करण्यात येऊन दौलतनगर,ता.पाटण येथील सर्व सोयींनीयुक्त कोविड केअर सेंटर तीन आठवडयापुर्वी कोरोना बाधित रुग्णांना उपचाराकरीता लोकार्पण करण्यात आले. या कोविड सेंटरमध्ये रुग्णांना पिण्यासाठी गरम पाणी, वाफारा घेणेसाठी वाफाऱ्याची भांडी,आवश्यक असणाऱ्या रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करण्यात येत आहे. तसेच वेळच्यावेळी चहा,नाष्टा,जेवण व औषधोपचार या बाबींकडेही लक्ष दिले जात आहे. तसेच कोविड सेंटरमधील रुग्णांकरीता निवासाची चांगली सोय करत वैद्यकीय सेवा देणाऱ्या वैद्यकीय पथकाकरीता स्वतंत्र्यपणे राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या कोविड सेंटरच्या एकूण कामकाजावर गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे बारकाईने लक्ष आहे. तसेच कोविड केअर सेंटरमधील रुग्णांच्या सेवेमध्ये कशाचीही कमतरता भासू नये, यासाठी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी त्या ठिकाणी २४ तास उपलब्ध आहेत. दरम्यान रुग्णांची ने-आण करण्यासाठी कोविड सेंटरला आवश्यक असणारी अद्यावत रुग्णवाहिका शिवसेना पक्षाचे गटनेते व राज्याचे नगरविकासमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचे सहकार्याने डॉ. श्रीकांत शिंदे फौंडेशनकडून उपलब्ध करण्यात आली आहे.

              दरम्यान शुक्रवारी दौलतनगर,ता.पाटण येथील कोविड केअर सेंटरमधून कोरोनामुक्त झालेल्या दोन रुग्णांना गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचेहस्ते प्रशस्तीपत्रक देऊन घरी सोडण्यात आले. यावेळी कोरोनामुक्त रुग्णांची त्यांनी आस्थेवाईकपणे विचारपूस करत कोविड सेंटरमार्फत रुग्णांना देण्यात आलेल्या सुविधांबाबत चौकशी केल्यानंतर कोरोना संकटात जीवन मरणाच्या दारात उभ्या असणाऱ्या गोरगरीबांना हे कोविड सेंटर वरदान ठरत आहे. सकाळी उठल्यापासून कोविड सेंटरमध्ये वेळेमध्ये अंघोळ, चहा, नाष्टा व जेवण तसेच राहण्याची चांगली सोय करण्यात आली असून या कोविड सेंटरमधील डॉक्टरांकडून चांगल्या पध्दतीने औषधोपचार होत आहेत. प्रत्येक रुग्णांवर वैयक्तिक लक्ष दिले जात असल्याचे कोविड मुक्त रुग्णांनी नामदार शंभूराज देसाई यांना सांगीतले.

Monday 12 October 2020

मा.यशराज देसाई(दादा) यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी झाला साजरा. वाढदिवसानिमित्त शालेय वह्या,हॅण्ड सॅनिटायझर व कोविड सेंटरमधील रुग्णांना फळांचे वाटप.

  


दौलतनगर दि. 12 : महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे चिरंजिव व पाटण तालुक्याचे युवा नेते मा.यशराज देसाई (दादा) यांचा वाढदिवस कोरोनाच्या संकटामुळे पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये नामदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेवतीने शालेय वह्या, हॅण्ड सॅनिटायझर व  कोविड सेंटर मधील रुग्णांकरीता फळांचे तसेच कोविड सेंटर व पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये सॅनिटायझर वाटप अशा विविध सामाजिक उपक्रमांनी उत्स्फुर्तपणे साजरा करण्यात आला.

महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे चिरंजिव व पाटण तालुक्याचे युवा नेते                   मा. यशराज देसाई (दादा) यांचा वाढदिवस मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्ते, हितचिंतक यांचेकडून गतवर्षी मोठया उत्साहामध्ये साजरा करण्यात आला होता. परंतु यंदाच्या वर्षी कोरोनाचे संकट असल्यामुळे मा.यशराज देसाई (दादा) यांचे दि. १0 ऑक्टोंबर रोजीचे वाढदिवसा निमित्त पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावतीने शालेय वह्या,हॅण्ड सॅनिटायझर व  कोविड सेंटर मधील रुग्णांकरीता फळांचे तसेच कोविड सेंटर व पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये सॅनिटायझर वाटप असे विविध सामाजिक सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार पाटण मतदारसंघातील तारळे,चाफळ,मल्हारपेठ,पाटण,कोयना,नाटोशी,मरळी,ढेबेवाडी,कुंभारगाव व सुपने मंडल या विभागातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यामार्फत गरीब व गरजू कुटुंबातील सुमारे 213 गावे व वाडया-वस्त्यांतील 3000 शालेय विद्यार्थी व विद्यार्थीनींना सामाजिक अंतर ठेऊन 15000 वहयांचे वाटप करण्यात आले. तसेच कोरोना संसर्गाचे पार्श्वभूमीवर मतदारसंघामध्ये हॅण्ड सॅनिटायझरच्या 4000 बॉटल्स्टचे वाटप करण्यात आले. पाटण विधानसभा मतदारसंघातील ढेबेवाडी व दौलतनगर (मरळी), ता.पाटण येथे कोविड-19 संसर्गामुळे उपचार घेत असलेल्या कोविड केअर सेंटरमधील कोरोना बाधित रुग्णांकरीता फळांचे वाटप करण्यासाठी संबंधित कोविड सेंटरमधील डॉक्टरांकडे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मार्फत फळे देण्यात आली. मा. यशराज देसाई (दादा) यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे सर्व कार्यालयामधील व आसपासच्या परिसराची अधिकारी व कर्मचारी यांनी स्वयंस्फुर्तीने साफ-सफाई करत सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी कारखान्यातील कार्यालयीन कामकाजामध्ये गुणवत्ता राखणेसंदर्भात गुणवत्ता शपथही घेतली. मा. यशराज देसाई (दादा) हे वाढदिवसा दिवशी कामानिमित्त परगांवी असल्याने कोरोना संसर्गाचे पार्श्वभूमीवर पाटण विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक व हितचिंतक यांनी भ्रमणध्वनीवरुन तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.

मल्हारपेठ पोलीस औटपोस्टचे अपग्रेडेशन होऊन नवीन पोलीस ठाण्यास मंजूरी नवीन पोलिस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षकासह 30 कर्मचारी राहणार तैनात. गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांची माहिती.

 


दौलतनगर दि.12 :- सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मल्हारपेठ पोलीस औटपोस्टचे  अपग्रेडेशन करुन नवीन पोलीस स्टेशन करण्याच्या अनेक वर्षांच्या मागणीला महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागाने अखेर मान्यता दिली असून मल्हारपेठ पोलीस ठाण्यास मान्यता दिल्या संदर्भात राज्य शासनाचे गृहविभागाने मंजूरी दिल्याचा शासन निर्णय बुधवारी  दि. 07 ऑक्टोंबर, 2020 रोजी पारित केला असल्याची माहिती गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली.

              प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकांत ना.शंभूराज देसाई यांनी पुढ म्हंटले आहे की, पाटण तालुक्यामधील मध्यवर्ती बाजारपेठेचे मुख्य ठिकाण असणाऱ्या मल्हारपेठ,ता.पाटण येथील औट पोस्टचे अपग्रेडेशन करुन तेथे नवीन पोलीस स्टेशन करणेकरीता सन 2001 मध्ये राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सन 2007 मध्ये या प्रस्तावा संदर्भात विधानसभेत तारांकीत प्रश्न दाखल केलेनंतर तत्कालीन गृहमंत्री स्व.आर.आर. पाटील यांनी सदर प्रस्ताव हा तपासणीकामी पोलीस महासंचालक यांचेकडे पाठविण्यात आला असल्याचे सांगितले होते. त्यानंतर या प्रस्तावावर कोणतीही अंमलबजावणी झाली नव्हती. त्यामुळे मल्हारपेठ ता. पाटण येथील पोलीस औटपोस्टचे अपग्रेडेशन करुन नवीन पोलीस स्टेशन करण्याचा प्रस्ताव अनेक वर्षापासून प्रलंबित राहिला होता. गेल्या अनेक वर्षांपासून मल्हारपेठ ता.पाटण हे पाटण विधानसभा मतदारसंघाचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने येथील औटपोस्टचे अपग्रेडेशन करुन याठिकाणी नविन पोलीस स्टेशन होण्याकरीता सातत्याने राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरु होता असे सांगत त्यांनी पुढे म्हंटले आहे की, एक महिन्यापूर्वीच मुंबई मंत्रालय येथे झालेल्या राज्याच्या गृहविभागातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत राज्याचा गृहराज्यमंत्री म्हणून आता या प्रस्तावास विलंब न लावता एक महिन्याच्या आत मल्हारपेठ ता. पाटण येथील पोलीस औटपोस्टचे अपग्रेडेशन करुन याठिकाणी नवीन पोलीस स्टेशन करणेसंदर्भातील सर्व प्रक्रिया पुर्ण करा याला विलंब करू नका आणि हा प्रस्ताव मान्यतेकरीता शासनाकडे सादर करा अशा सुचना  वरिष्ठ अधिकाऱ्यांना केल्या होत्या. सदर बैठकीकरीता गृह विभागाचे उपसचिव कैलास गायकवाड,अप्पर पोलीस महासंचालक जग्गनाथन,कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक सुहास वारके,सातारा पोलीस अधिक्षकासह गृह विभागाचे व वित्त विभागाच्या अव्वर सचिव गावकर यांच्यासह वरीष्ठ अधिकाऱी उपस्थित होते.त्यानुसार या मागणीची गंभीर्याने आणि तात्काळ दखल घेऊन पोलीस अधीक्षक सातारा यांच्या आस्थापनेवरील पाटण पोलीस ठाणे व उंब्रज पोलीस ठाणेचे विभाजन करून  मल्हारपेठ दुरक्षेत्र आणि चाफळ दुरक्षेत्र यांचे उन्नतीकरण करून नवीन मल्हारपेठ पोलीस ठाणे निर्माण करण्यास तसेच त्याअनुषंगाने मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यास  गृहविभागाकडून मान्यता देणेबाबतचा शासनाच्या गृह विभागाने निर्णय घेतला असून बुधवारी  दि. 07 ऑक्टोंबर, 2020 रोजी गृह विभागाने मल्हारपेठ पोलीस औटपोस्टचे  अपग्रेडेशन करुन नवीन पोलीस स्टेशन करण्याच्या शासन निर्णय पारित केला असल्याची माहिती शेवटी पत्रकांत म्हंटले आहे.

चौकट:- मल्हारपेठ येथील नव्या पोलीस ठाण्यासाठी ३० अधिकारी व कर्मचारी मिळणार..!

     महाराष्ट्र शासनाचे गृहविभागाने मंजूर केलेल्या मल्हारपेठ पोलीस ठाण्यासाठी सहाययक पोलीस निरीक्षक 1, पोलीस उपनिरीक्षक1,सहाययक पोलीस उपनिरीक्षक 3, पोलीस हवालदार 4, पोलीस नाईक 7 आणि 14 पोलीस शिपाई असे एकूण 30 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी  तसेच आवश्यक साधनसामुग्री तातडीने उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती ही गृहराज्यमंत्री  शंभुराज देसाई यांनी दिली.

Wednesday 7 October 2020

कोरोना संकटामुळे मा.यशराज देसाई(दादा) यांचा दि.10 ऑक्टोंबर रोजीचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी होणार साजरा.

 


 

दौलतनगर दि.07: महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे चिरंजिव व पाटण तालुक्याचे युवा नेते मा.यशराज देसाई (दादा) यांचा दि. १0 ऑक्टोंबर,२०२० रोजीचा वाढदिवस कोरोनाच्या संकटामुळे पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये मा.ना.श्री.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेवतीने विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार आहे. दरम्यान वाढदिनी मा.यशराज देसाई (दादा) हे कामानिमित्त परगांवी असल्याने मतदारसंघातील पदाधिकारी,कार्यकर्ते व हितचिंतक यांनी प्रत्यक्ष न भेटता दुरध्वनीवरुन शुभेच्छा दयाव्यात, अशी माहिती गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे कार्यालयाच्यावतीने देण्यात आली  आहे.

 महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे चिरंजिव व पाटण तालुक्याचे युवा नेते                   मा. यशराज देसाई (दादा) यांचा वाढदिवस मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्ते, हितचिंतक यांचेकडून गतवर्षी मोठया उत्साहामध्ये साजरा करण्यात आला होता. परंतु यंदाच्या वर्षी कोरोनाचे संकट असल्यामुळे मा.यशराज देसाई (दादा) यांचे दि. १0 ऑक्टोंबर,२०२० रोजीचे वाढदिवसा निमित्त पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये मा.ना.श्री.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात येणार असून मतदारसंघातील गरीब व गरजू कुटुंबातील शालेय विद्यार्थी व विद्यार्थीनींना पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावतीने सामाजिक अंतर ठेऊन घरपोच वहयांचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच पाटण विधानसभा मतदारसंघातील पाटण, ढेबेवाडी व दौलतनगर (मरळी), ता.पाटण येथील कोविड केअर सेंटरमध्ये औषधोपचार घेत असलेल्या कोरोना बाधित रुग्णांकरीता फळांचे वाटप करण्यासाठी संबंधित कोविड सेंटरकडे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मार्फत फळे व कोविड सेंटरसाठी तसेच पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये वाटप करण्यासाठी सॅनिटायझर देण्यात येणार असून मा. यशराज देसाई (दादा) हे वाढदिवसा दिवशी कामानिमित्त परगांवी जाणार असल्याने कोरोना संसर्गाचे पार्श्वभूमीवर मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक यांनी प्रत्यक्ष न भेटता भ्रमणध्वनीवरुन तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून शुभेच्छा दयाव्यात, असे आवाहनही करण्यात आले आहे.

चौकट:- मा.यशराज देसाई (दादा) हे वाढदिवसा दिवशी कामानिमित्त परगावी.

मा. यशराज देसाई (दादा) हे वाढदिवसा दिवशी कामानिमित्त परगांवी जाणार असून ते सातारा येथील कोयना दौलत निवासस्थानी तसेच कारखाना कार्यस्थळ,दौलतनगर(मरळी) या ठिकाणी उपलब्ध राहणार नसल्याने पाटण विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक यांनी प्रत्यक्ष न भेटता भ्रमणध्वनीवरुन तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून शुभेच्छा देण्यात याव्या,अशी माहिती गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे कार्यालयाच्यावतीने देण्यात आली  आहे.

Thursday 1 October 2020

गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई “माझे कुटूंब माझी जबाबदारी” अभियानातंर्गत गावभेठीकरीता शनिवार,रविवार मतदारसंघातील प्रमुख गांवागांवात

     


     

दौलतनगर दि.०१:- राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांनी कोरोना संसर्गापासून आपला बचाव करण्यासाठी माझे कुटूंब माझी जबाबदारी ही संकल्पना राज्यातील जनतेच्या समोर ठेवली आहे. संपुर्ण राज्यामध्ये ही संकल्पना लोकचळवळ बनली आहे.राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी माझे कुटूंब माझी जबाबदारी या संकल्पनेची ग्रामीण भागात जनजागृती करण्याकरीता पाटण मतदार संघातील गावागांवात जाणार असल्याचे जाहीर केले होते त्यानुसार ते शनिवार दि.०३ व रविवार दि.०४ ऑक्टोंबर या दोन्ही दिवशी मतदारसंघातील मणदुरे व चाफळ विभागातील प्रमुख गांवागांवात गावभेटी करीता जाणार आहेत व कोरोनाच्या महामारीत माझे कुटूंब माझी जबाबदारीया मोहिमेचे महत्व पटवून देणार आहेत.

         राज्य शासनाने राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु केलेल्या 'माझे कुटुंब,माझी जबाबदारी' या अभियानाला संपुर्ण राज्यभर प्रभावीपणे सुरुवात झाली आहे.पाटण विधानसभा मतदारसंघात गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे हस्ते या योजनेचा शुभारंभ झाला त्या शुभारंभादिवशी त्यांनी स्वत: गावागावात जावून या मोहिमेचे महत्व कोरोनाच्या महामारीत काय आहे? हे ग्रामीण भागातील नागरिकांना व महिलांना पटवून दिले होते व यापुढेही मतदारसंघातील प्रमुख गांवामध्ये याची जनजागृती करणार असे त्यांनी सांगितले होते. त्यानुसार ते शनिवार दि.०३ रोजी मणदुरे व रविवार दि.०४ रोजी चाफळ असे सलग दोन दिवस या दोन्ही विभागातील प्रमुख गांवागांवात गावभेटीकरीता जाणार असून या प्रमुख गांवामध्ये जावुन स्पीकरवरुन ते 'माझे कुटुंब,माझी जबाबदारी' या अभियानांची ग्रामस्थ, महिला व युवक-युवतीमध्ये जनजागृती करणार आहेत.

               या उपक्रमाबद्दल बोलताना ना.शंभूराज देसाई म्हणाले,कोरोना संसर्गापासून आपला बचाव करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांनी माझे कुटूंब माझी जबाबदारी ही संकल्पना राज्यातील जनतेच्या समोर ठेवली.आम्ही सर्व लोकप्रतिनिधी तसेच तालुकास्तरावरचे सर्व शासकीय अधिकारी,कर्मचारी गावागावामध्ये या संकल्पनेच्या माध्यमातून जागृती करण्याचा प्रयत्न करत आहेत. पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये मी स्वत: प्रमुख गावांमध्ये येवून या मोहिमेतंर्गत लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे, विशेषत: सतत मास्क वापरला पाहिजे, बाहेरुन घरात आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुतले पाहिजेत,बाहेर जात असताना सामाजिक अंतर पाळले पाहिजे, या ज्या महत्वाच्या बाबी आहेत.त्याचे गावां गावामध्ये जावून लोकांना मी आवाहन करणार आहे.त्यानुसार गावभेटीचे नियोजनही केले आहे.

             मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते,पदाधिकारी या सर्वांना माझी विनंती आहे. गावागावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य असतील,विविध संस्थाचे,राजकीय पक्षांचे प्रमुख कार्यकर्ते असतील यांनी सगळ्यांनी आपआपल्या गावामध्ये,वाडीवस्तीमध्ये,आपल्या वार्डामधील नागरिक,महिला,युवक-युवती यांच्यामध्ये सामाजिक अंतर ठेवून जनजागृती करावी.लोकांना सर्वसामान्य माणसांना,वयोवृध्दांना, तरुण तरुणींना याचे महत्व पटवून द्यावे आणि माझे कुटूंब माझी जबाबदारी या मोहिमेतंर्गत आपण कशी काळजी घेतली पाहिजे,काय खबरदारी घेतली पाहिजे हे सगळ्यांनी आपआपल्या विभागामध्ये,गावामध्ये याचा प्रसार करावा.

             नागरिकांना हे समजून सांगितले पाहिजे, शेवठी ही जबाबदारी आपली स्वत:ची आहे,शासन कोरोनाच्या संदर्भात आवश्यक त्या उपाययोजना करायला कुठेही कमी पडत नाही,आपण पाहिले कोरोनाच्या संदर्भात हा संसर्ग रोखण्याकरीता ज्या ज्या उपाययोजना संपुर्ण राज्यामध्ये करायला लागल्या त्या सर्व उपाययोजना शासनाने केल्या आहेत.याच्यासाठी कधीही निधीची कमतरता पडू देणार नाही असे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांनी जाहीरपणे सांगितले आहे.यापुढे सुध्दा ज्या-ज्या बाबी हा संसर्ग रोखण्याकरीता कराव्या लागतील त्या करण्यासाठी सरकार सदैव कठीबध्द आहे.असेही मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले आहे.पण या रोगापर्यंत आपण जाणारच नाही ही जर खबरदारी आपण अगोदरच घेतली तर निश्चीतपणे याच्यापासून आपला बचाव होईल,आणि म्हणून पाटण विधानसभा मतदार संघातील सर्व कार्यकर्त्यांना,बंधू भगिंनींना माझी विनंती आहे या मोहिमेमध्ये आपण सर्वजण सहभागी व्हा. या सर्व खबरदाऱ्या आपण बाळगा अशी सर्वांना मी राज्य सरकारच्यावतीने नम्र विनंती करीत आहे.