दौलतनगर
दि.१7 :- कोविड-१९
संसर्गामुळे पाटण विधानसभा मतदारसंघातील रुग्णांची हेळसांड थांबविण्याकरीता
गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून उभारलेल्या
दौलतनगर,ता.पाटण येथील कोविड केअर सेंटरमध्ये गत तीन आठवडयात कोरोना बाधित
४७ रुग्ण उपचारासाठी दाखल झाले . त्यापैकी १५ रुग्ण कोरोनामुक्त झालेनंतर घरी
सोडण्यात आले आहे. तर १९ कोरोना बाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु असून व्हेंटीलेटरची
आवश्यक असलेल्या १३ कोरोना बाधित रुग्णांना पुढील उपचाराकरीता अन्य रुग्णालयामध्ये
हलविण्यात आले आहे. दरम्यान या कोविड सेंटरमधून शुक्रवारी कोरोनामुक्त झालेल्या
दोन रुग्णांना उपचारानंतर गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे हस्ते
प्रशस्तीपत्रक देण्यात येऊन घरी सोडण्यात आले.यावेळी कोविड केअर सेंटरचे आरोग्य
अधिकारी डॉ. सुहेल शिकलगार, डॉ. अभिजित देसाई उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यामध्ये गत महिन्यात ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव
फार मोठ्या प्रमाणावर वाढत असताना कराड, सातारा याठिकाणी ऑक्सिजन बेडची कमतरता
जाणवू लागली.ऑक्सिजन मिळत नसल्यामुळे कोरोना बाधित व्यक्तींच्या मृत्यूंच्या
संख्येत वाढ होत असताना अशा परिस्थितीत सामाजिक बांधिलकी म्हणून लोकनेते बाळासाहेब
देसाई सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर राज्याचे नगरविकासमंत्री ना.एकनाथजी शिंदे
यांच्या सहकार्यातून कोवीड केअर सेंटर उभे करुन पाटण विधानसभा मतदारसंघातील कोरोना
बाधितांना उपचार देणेकरीता गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी पुढाकार घेत
केवळ पाच ते सहा दिवसात दौलतनगर,ता.पाटण येथील कोरोना कोवीड सेंटर रुग्णांच्या
सेवेसाठी तातडीने उभे करण्याचे काम करत या कोविड सेंटरमध्ये ५० ऑक्सिजन बेड,
२५ नॉन ऑक्सिजन बेड अशी एकूण ७५ बेडची सुविधा उपलब्ध करुन देण्यात
आली. तसेच या कोविड केअर सेंटरसाठी आवश्यक असणारे १८ वैद्यकीय अधिकारी,१७
कर्मचारी, औषधसाठा तसेच इतर आवश्यक साधन सामुग्री उपलब्ध करण्यात येऊन
दौलतनगर,ता.पाटण येथील सर्व सोयींनीयुक्त कोविड केअर सेंटर तीन आठवडयापुर्वी
कोरोना बाधित रुग्णांना उपचाराकरीता लोकार्पण करण्यात आले. या कोविड सेंटरमध्ये
रुग्णांना पिण्यासाठी गरम पाणी, वाफारा घेणेसाठी वाफाऱ्याची भांडी,आवश्यक असणाऱ्या
रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करण्यात येत आहे. तसेच वेळच्यावेळी चहा,नाष्टा,जेवण व
औषधोपचार या बाबींकडेही लक्ष दिले जात आहे. तसेच कोविड सेंटरमधील रुग्णांकरीता
निवासाची चांगली सोय करत वैद्यकीय सेवा देणाऱ्या वैद्यकीय पथकाकरीता स्वतंत्र्यपणे
राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या कोविड सेंटरच्या एकूण कामकाजावर
गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे बारकाईने लक्ष आहे. तसेच कोविड केअर
सेंटरमधील रुग्णांच्या सेवेमध्ये कशाचीही कमतरता भासू नये, यासाठी वैद्यकीय
अधिकारी व कर्मचारी त्या ठिकाणी २४ तास उपलब्ध आहेत. दरम्यान रुग्णांची ने-आण
करण्यासाठी कोविड सेंटरला आवश्यक असणारी अद्यावत रुग्णवाहिका शिवसेना पक्षाचे
गटनेते व राज्याचे नगरविकासमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचे सहकार्याने डॉ. श्रीकांत
शिंदे फौंडेशनकडून उपलब्ध करण्यात आली आहे.
दरम्यान शुक्रवारी दौलतनगर,ता.पाटण येथील कोविड केअर सेंटरमधून कोरोनामुक्त
झालेल्या दोन रुग्णांना गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचेहस्ते
प्रशस्तीपत्रक देऊन घरी सोडण्यात आले. यावेळी कोरोनामुक्त रुग्णांची त्यांनी
आस्थेवाईकपणे विचारपूस करत कोविड सेंटरमार्फत रुग्णांना देण्यात आलेल्या
सुविधांबाबत चौकशी केल्यानंतर कोरोना संकटात जीवन मरणाच्या दारात उभ्या असणाऱ्या
गोरगरीबांना हे कोविड सेंटर वरदान ठरत आहे. सकाळी उठल्यापासून कोविड सेंटरमध्ये
वेळेमध्ये अंघोळ, चहा, नाष्टा व जेवण तसेच राहण्याची चांगली सोय करण्यात आली असून
या कोविड सेंटरमधील डॉक्टरांकडून चांगल्या पध्दतीने औषधोपचार होत आहेत. प्रत्येक
रुग्णांवर वैयक्तिक लक्ष दिले जात असल्याचे कोविड मुक्त रुग्णांनी नामदार शंभूराज
देसाई यांना सांगीतले.
No comments:
Post a Comment