Wednesday 21 October 2020

कर्तव्य बजाविताना धारतिर्थी पडणाऱ्या शुर पोलिस शहिदांना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंकडून मुंबई येथे श्रध्दांजली समर्पित.

 


दौलतनगर दि.21 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- प्रतिवर्षी दि. 21 ऑक्टोबर रोजी देशासाठी कर्तव्य बजावताना धारतिर्थी पडणाऱ्या शूर पोलीस शहिदांना राज्य शासनाच्या वतीने श्रध्दांजली समर्पित करण्यात येते.आज दि.21 ऑक्टोंबर,2020 रोजी सकाळी नायगांव,मुंबई येथील पोलीस मुख्यालयाच्या ठिकाणी शासनाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरेसाहेब,राज्याचे गृहमंत्री ना.अनिल देशमुख,गृहराज्यमंत्री (ग्रामीण) मा.ना.शंभूराज देसाई व गृहराज्यमंत्री (शहरे) मा.ना.सतेज पाटील यांनी शहिद झालेल्या शूर पोलीस शहिदांना श्रध्दांजली समर्पित केली.यादिवशी सर्व पोलीस घटकांत पोलीस स्मृतीदिन परेड आयोजित करण्यात येते.प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही सर्व पोलीस घटकांत पोलीस स्मृतीदिन परेड आयोजित करण्यात आली होती.

          दि. 21 ऑक्टोंबर, 1959 रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे पोलीस उप निरिक्षक करमसिंग यांच्या नेतृत्वाखाली लडाख येथील दुर्गम भागात 16000 फूट उंचीवर असलेल्या ठिकाणी गस्त घालत असलेल्या 10 भारतीय जवनांवर दबा धरुन बसलेल्या चिनी सैनिकांनी अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात आपल्या 10 जवानांना वीरमरण आले होते.अतिशय थंड व प्रतिकूल हवामान परिस्थितीत देशासाठी आपले कर्तव्य बजावत असताना या जवानांनी अतिशय शौर्याने शत्रूविरोधात लढा देताना वीरमरण पत्करले. या जवानांच्या हौतात्म्याचे स्मरण म्हणून आजही दरवर्षी 21 ऑक्टोंबरला हॉट स्प्रिंग लडाख येथे देशाच्या प्रत्येक प्रांताचे तसेच निमलष्करी दलांचे प्रतिनिधीत्व करणारे पोलीस पथक पाठवून आदरांजली वाहिली जाते. राज्य शासनाच्या वतीने नायगांव,मुंबई येथील पोलीस मुख्यालयाच्या ठिकाणी  श्रध्दांजली समर्पित करण्याचा कार्यक्रम आयोजीत करण्यात येतो. त्यानुसार आज प्रतिवर्षी दि. 21 ऑक्टोबर रोजी देशासाठी कर्तव्य बजावताना धारतिर्थी पडणाऱ्या शूर पोलीस शहिदांना राज्य शासनाच्या वतीने श्रध्दांजली समर्पित करण्यात आली. याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरेसाहेब,राज्याचे गृहमंत्री ना.अनिल देशमुख,गृहराज्यमंत्री (ग्रामीण) मा.ना.शंभूराज देसाई व गृहराज्यमंत्री (शहरे) मा.ना. सतेज पाटील यांनी उपस्थित राहून पुष्पचक्र अर्पण करीत शहिद झालेल्या शूर पोलीस शहिदांना श्रध्दांजली समर्पित केली. देशातील सर्व पोलीस घटकांत पोलीस स्मृतीदिन परेड आयोजित केली जाते. नायगांव,मुंबई येथील पोलीस मुख्यालयाच्या ठिकाणी  पोलीस स्मृतीदिन परेड आयोजित करण्यात आली होती. ह्या परेडमध्ये दि.01 सप्टेंबर, 2019 ते 31 ऑगस्ट,2020 पर्यंत शहिद झालेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांची नावे वाचण्यात आली.

No comments:

Post a Comment