Sunday 18 October 2020

गत चार दिवसातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीपिकांचे तात्काळ पंचनामे करा. गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाईंच्या शासकीय अधिकाऱ्यांना सुचना.

 


दौलतनगर दि.18:- कमी दाबाच्या पट्टयामुळे गत चार दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये सर्वदूर मुसळधार पाऊस पडत असून डोंगरी व दुर्गम अशा पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक पिकांचे अतोनात नुकसान झाले असून पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये गत चार दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठया प्रमाणांत नुकसान झाले असून मतदारसंघातील शेतकरी हवालदिल झाला आहे. गत चार दिवसातील अवकाळी व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकांचे तात्काळ पंचनामे करण्यात यावेत, अशा सूचना गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी शासकीय अधिकाऱ्यांना केल्या.

            गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे अध्यक्षतेखाली दौलतनगर,ता. पाटण येथे पाटण विधानसभा मतदारसंघातील अवकाळी व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीपिकांचे नुकसानीसंदर्भात सर्व शासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. यावेळी बैठकीस पाटणचे प्रातांधिकारी श्रीरंग तांबे, कराडचे प्रांताधिकारी उत्तम दिघे, पाटणचे तहसिलदार समीर यादव, कराडचे तहसिलदार अमरदिप वाकडे, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, उपविभागीय कृषी अधिकारी दौलत चव्हाण,तालुका कृषी अधिकारी डी.ए.खरात, पशुसंवर्धन अधिकारी जमदाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय उत्तुरे, उपविभाग पाटणचे उपअभियंता अजित पाटील, विद्याधर शिंदे, जिल्हा परिषद बांधकामचे कार्यकारी अभियंता एन.डी. भोसले, जिल्हा परिषद बांधकामचे आर.एस.भंडारे, ग्रामीण पाणी पुरवठा‍ उपविभागाचे एम.आर.कदम यांची उपस्थिती होती.

                      याप्रसंगी ना.शंभूराज देसाईंनी प्रारंभी संपुर्ण पाटण विधानसभा मतदारसंघातील तसेच सुपने मंडलातील अवकाळी व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकांचे नुकसानीची प्राथमिक माहिती तालुका प्रशासनाच्या संबंधित शासकीय अधिकाऱ्यांकडून घेतली.नामदार शंभूराज देसाई पुढे म्हणाले की, कमी दाबाच्या पट्टयामुळे गत चार दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये सर्वदूर मुसळधार पाऊस पडत असून डोंगरी व दुर्गम अशा पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक पिकांचे अतोनात नुकसान झाले असून पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये गत चार दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठया प्रमाणांत नुकसान झाले असून  गेली चार दिवस अखंडपणे सुरु असलेल्या  अवकाळी व अतिवृष्टीमुळे मतदारसंघातील शेतक-यांच्या शेतातील उभ्या पिकांचे मोठया प्रमाणांत नुकसान होवून पिकांची मोठी हानी झालेली आहे. या अतिवृष्टीमुळे शेतामध्ये मोठया प्रमाणांत पाणी साठल्याने शेतातील पिके पुर्णत: कुजली  असून यामध्ये या हंगामातील विशेषत: सोयाबीन, हायब्रीड, भुईमुग, भात,नाचणी व ऊस या पिकांचे मोठया प्रमाणांत नुकसान झाले आहे.त्यामुळे मतदारसंघातील शेतकरी हवालदिल झाला आहे. पाटण विधानसभा मतदारसंघ हा मुळातच डोंगरी व दुर्गम भागातील अतिवृष्टीचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. डोंगरी व दुर्गम भागातील शेतक-यांचे शेती हे एकमेव उदर-निर्वाहाचे साधन आहे. अल्पभूधारक शेतक-यांची मोठया प्रमाणात संख्या असून सततच्या होणा-या अतिवृष्टीमुळे शेतातील उभ्या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी कुटुंबांचे फार मोठया संख्येने आर्थिक नुकसान झाले आहे. सलग तीन महिने सततच्या कोसळणा-या अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त शेतक-यांच्या पाठीशी महाविकास आघाडीचे सरकार कायम पाठीशी असून नुकसानीची भरपाई तातडीने मिळणेकरीता तात्काळ या शेतीपिकांच्या नुकसानीचे महसूल व कृषी व जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत संयुक्तपणे पंचनामे चार दिवसांत पुर्ण करावेत अशा सूचना शासकीय अधिकारी यांना देत पाटण विधानसभा मतदारसंघात गत चार दिवसामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह अंशत: व पुर्णत: पडझड झालेल्या घरांचे तसेच पुल,रस्ते,नळ पाणी पुरवठा योजना,अंगणवाडी इमारती,शाळा खोल्या आदींचे  झालेल्या नुकसानीचे प्रस्ताव सादर करा, अशा सूचनाही त्यांनी शेवटी शासकीय अधिकाऱ्यांन केल्या आहेत.

No comments:

Post a Comment