Saturday 24 October 2020

लोकनेते बाळासाहेब देसाई अद्यासनास मंजुर 01 कोटी निधीमधून राबवायचे उपक्रम तयार करा. अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या शिवाजी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना सुचना.

 


दौलतनगर दि.24 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):-महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,राज्याचे माजी गृहमंत्री व कोल्हापुरच्या शिवाजी विद्यापीठाचे निर्मीती करणारे लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नावाने राज्य शासनाने शिवाजी विद्यापीठामध्ये लोकनेते बाळासाहेब देसाई अद्यासनास मंजुरी देत या अद्यासनास 01 कोटी रुपयांचा निधी पहिल्या टप्प्यात मंजुर केला आहे.या निधीमधून शिवाजी विद्यापीठ तसेच विद्यापीठातंर्गत राबवायचे उपक्रम लवकरात लवकर तयार करुन त्याची अंमलबजावणी करा अशा सुचना लोकनेते यांचे नातू,राज्याचे अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी शिवाजी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

          कोल्हापुर शासकीय विश्रामगृहात गृह,अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे अध्यक्षतेखाली शिवाजी विद्यापीठात व विद्यापीठातंर्गत लोकनेते बाळासाहेब देसाई अद्यासनास राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून मंजुर केलेल्या 01 कोटी रु.निधीच्या माध्यमातून राबवायच्या उपक्रमाबाबत आढावा बैठक आयोजीत करण्यात आली होती याप्रसंगी त्यांनी वरीलप्रमाणे सुचना केल्या.याप्रंसगी बैठकीस शिवाजी विद्यापठाचे कुलसचिव डॅा.विलास नांदावडेकर,लोकनेते बाळासाहेब देसाई अद्यासन समन्यवयक प्रा.अवनीश पाटील, सहाय्यक प्राध्यापक (इतिहास विभाग) दत्तात्रय मचले यांची प्रमुख उपस्थिती होती.

              याप्रंसगी बोलताना ना.शंभूराज देसाई म्हणाले, कोल्हापुरच्या शिवाजी विद्यापीठाचे निर्मीतीमध्ये लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या नावाने शिवाजी विद्यापीठामध्ये अद्यासन केंद्र व्हावे याकरीता शासनाकडे माझा सातत्याने पाठपुरावा होता.या अद्यासनाकरीता आवश्यक असणारा 03 कोटी रुपयांचा आर्थिक सहाय्यचा प्रस्ताव राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे सादर करण्यात आला होता त्यानुसार शासनाच्या माध्यमातून या विभागाचे मंत्री ना.उदय सामंत यांनी नुकतेच पहिल्या टप्प्यात 01 कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे.

             या निधीच्या माध्यमातून अद्यासनामध्ये शिवाजी विद्यापीठ व विद्यापीठातंर्गत राबवावयाचे उपक्रम याची सविस्तर माहिती तयार करावी.अद्यासनाची उद्यिष्ठ तयार करावीत यामध्ये लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणाऱ्या संशोधन प्रकल्पाच्या माध्यमातून काय योजना राबविता येतील याच्या धोरणात्मक बाबी तयार कराव्यात.असे सांगत त्यांनी लोकनेते बाळासाहेब देसाई अद्यासनाच्या धोरणात्मक बाबींमध्ये लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे विचारांवर व्याख्यानमाला आयोजीत करणे,त्यांचे विचारांवरील लेख तयार करणे, त्यांचे आत्मचरीत्रावर पुस्तक किंवा ग्रंथ प्रकाशित करणे, त्यांनी राज्याचे विविध खात्यांचे मंत्री म्हणून केलेले कार्यावर अभ्यास विकसित करणे त्याची अंमलबजावणी करणे या बाबींचा समावेश करावा.

              तसेच त्यांचे नावाने दौलतनगर ता.पाटण येथे उभारण्यात आलेल्या अभ्यासिकेमध्ये स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन देणेकरीता तज्ञांचे मार्गदर्शन शिबीरे आयोजीत करावी. कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून युवा विकास करणेकरीता प्रशिक्षणाची सोय याठिकाणी करण्यात यावी. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या कार्याची माहिती देणारी छायाचित्र आहेत त्याची एक सुसज्ज अशी गॅलरी शिवाजी विद्यापीठामध्ये करण्यात यावी.अशा सुचना केल्या.लोकनेते बाळासाहेब देसाई अद्यासनाचे कार्य व्यवस्थित पार पाडण्यासाठी प्रशासकीय बाबी ज्या शासनाकडून मंजुर करुन आणायच्या आहेत त्याची सविस्तर टिपणी तयार करुन तो प्रस्ताव राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे सादर करावा अशाही सुचना त्यांनी यावेळी संबधितांना दिल्या.

चौकट:-  लोकनेते बाळासाहेब देसाई अद्यासन तहयात सुरु राहणेकरीताचे उपक्रम राबवावे.

               महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा सिहांचा वाटा आहे.त्यांनी केलेल्या अतुलनीय कार्याची ओळख संपुर्ण महाराष्ट्राला आहे.नव्या पिढीला त्यांचे कार्य समजणेकरीता अद्यासन हे चांगले माध्यम आहे.त्यामुळे हे अद्यासन तहयात सुरु राहणेकरीताचे उपक्रम या अद्यासनाच्या माध्यमातून राबवावेत असेही ना.शंभूराज देसाईंनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment