Monday 12 October 2020

मा.यशराज देसाई(दादा) यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी झाला साजरा. वाढदिवसानिमित्त शालेय वह्या,हॅण्ड सॅनिटायझर व कोविड सेंटरमधील रुग्णांना फळांचे वाटप.

  


दौलतनगर दि. 12 : महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे चिरंजिव व पाटण तालुक्याचे युवा नेते मा.यशराज देसाई (दादा) यांचा वाढदिवस कोरोनाच्या संकटामुळे पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये नामदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेवतीने शालेय वह्या, हॅण्ड सॅनिटायझर व  कोविड सेंटर मधील रुग्णांकरीता फळांचे तसेच कोविड सेंटर व पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये सॅनिटायझर वाटप अशा विविध सामाजिक उपक्रमांनी उत्स्फुर्तपणे साजरा करण्यात आला.

महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे चिरंजिव व पाटण तालुक्याचे युवा नेते                   मा. यशराज देसाई (दादा) यांचा वाढदिवस मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्ते, हितचिंतक यांचेकडून गतवर्षी मोठया उत्साहामध्ये साजरा करण्यात आला होता. परंतु यंदाच्या वर्षी कोरोनाचे संकट असल्यामुळे मा.यशराज देसाई (दादा) यांचे दि. १0 ऑक्टोंबर रोजीचे वाढदिवसा निमित्त पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावतीने शालेय वह्या,हॅण्ड सॅनिटायझर व  कोविड सेंटर मधील रुग्णांकरीता फळांचे तसेच कोविड सेंटर व पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये सॅनिटायझर वाटप असे विविध सामाजिक सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार पाटण मतदारसंघातील तारळे,चाफळ,मल्हारपेठ,पाटण,कोयना,नाटोशी,मरळी,ढेबेवाडी,कुंभारगाव व सुपने मंडल या विभागातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यामार्फत गरीब व गरजू कुटुंबातील सुमारे 213 गावे व वाडया-वस्त्यांतील 3000 शालेय विद्यार्थी व विद्यार्थीनींना सामाजिक अंतर ठेऊन 15000 वहयांचे वाटप करण्यात आले. तसेच कोरोना संसर्गाचे पार्श्वभूमीवर मतदारसंघामध्ये हॅण्ड सॅनिटायझरच्या 4000 बॉटल्स्टचे वाटप करण्यात आले. पाटण विधानसभा मतदारसंघातील ढेबेवाडी व दौलतनगर (मरळी), ता.पाटण येथे कोविड-19 संसर्गामुळे उपचार घेत असलेल्या कोविड केअर सेंटरमधील कोरोना बाधित रुग्णांकरीता फळांचे वाटप करण्यासाठी संबंधित कोविड सेंटरमधील डॉक्टरांकडे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मार्फत फळे देण्यात आली. मा. यशराज देसाई (दादा) यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे सर्व कार्यालयामधील व आसपासच्या परिसराची अधिकारी व कर्मचारी यांनी स्वयंस्फुर्तीने साफ-सफाई करत सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी कारखान्यातील कार्यालयीन कामकाजामध्ये गुणवत्ता राखणेसंदर्भात गुणवत्ता शपथही घेतली. मा. यशराज देसाई (दादा) हे वाढदिवसा दिवशी कामानिमित्त परगांवी असल्याने कोरोना संसर्गाचे पार्श्वभूमीवर पाटण विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक व हितचिंतक यांनी भ्रमणध्वनीवरुन तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.

1 comment:

  1. अभिनंदन साहेब
    खूपच अप्रतिम

    ReplyDelete