Monday 12 October 2020

मल्हारपेठ पोलीस औटपोस्टचे अपग्रेडेशन होऊन नवीन पोलीस ठाण्यास मंजूरी नवीन पोलिस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षकासह 30 कर्मचारी राहणार तैनात. गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांची माहिती.

 


दौलतनगर दि.12 :- सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मल्हारपेठ पोलीस औटपोस्टचे  अपग्रेडेशन करुन नवीन पोलीस स्टेशन करण्याच्या अनेक वर्षांच्या मागणीला महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागाने अखेर मान्यता दिली असून मल्हारपेठ पोलीस ठाण्यास मान्यता दिल्या संदर्भात राज्य शासनाचे गृहविभागाने मंजूरी दिल्याचा शासन निर्णय बुधवारी  दि. 07 ऑक्टोंबर, 2020 रोजी पारित केला असल्याची माहिती गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली.

              प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकांत ना.शंभूराज देसाई यांनी पुढ म्हंटले आहे की, पाटण तालुक्यामधील मध्यवर्ती बाजारपेठेचे मुख्य ठिकाण असणाऱ्या मल्हारपेठ,ता.पाटण येथील औट पोस्टचे अपग्रेडेशन करुन तेथे नवीन पोलीस स्टेशन करणेकरीता सन 2001 मध्ये राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सन 2007 मध्ये या प्रस्तावा संदर्भात विधानसभेत तारांकीत प्रश्न दाखल केलेनंतर तत्कालीन गृहमंत्री स्व.आर.आर. पाटील यांनी सदर प्रस्ताव हा तपासणीकामी पोलीस महासंचालक यांचेकडे पाठविण्यात आला असल्याचे सांगितले होते. त्यानंतर या प्रस्तावावर कोणतीही अंमलबजावणी झाली नव्हती. त्यामुळे मल्हारपेठ ता. पाटण येथील पोलीस औटपोस्टचे अपग्रेडेशन करुन नवीन पोलीस स्टेशन करण्याचा प्रस्ताव अनेक वर्षापासून प्रलंबित राहिला होता. गेल्या अनेक वर्षांपासून मल्हारपेठ ता.पाटण हे पाटण विधानसभा मतदारसंघाचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने येथील औटपोस्टचे अपग्रेडेशन करुन याठिकाणी नविन पोलीस स्टेशन होण्याकरीता सातत्याने राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरु होता असे सांगत त्यांनी पुढे म्हंटले आहे की, एक महिन्यापूर्वीच मुंबई मंत्रालय येथे झालेल्या राज्याच्या गृहविभागातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत राज्याचा गृहराज्यमंत्री म्हणून आता या प्रस्तावास विलंब न लावता एक महिन्याच्या आत मल्हारपेठ ता. पाटण येथील पोलीस औटपोस्टचे अपग्रेडेशन करुन याठिकाणी नवीन पोलीस स्टेशन करणेसंदर्भातील सर्व प्रक्रिया पुर्ण करा याला विलंब करू नका आणि हा प्रस्ताव मान्यतेकरीता शासनाकडे सादर करा अशा सुचना  वरिष्ठ अधिकाऱ्यांना केल्या होत्या. सदर बैठकीकरीता गृह विभागाचे उपसचिव कैलास गायकवाड,अप्पर पोलीस महासंचालक जग्गनाथन,कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक सुहास वारके,सातारा पोलीस अधिक्षकासह गृह विभागाचे व वित्त विभागाच्या अव्वर सचिव गावकर यांच्यासह वरीष्ठ अधिकाऱी उपस्थित होते.त्यानुसार या मागणीची गंभीर्याने आणि तात्काळ दखल घेऊन पोलीस अधीक्षक सातारा यांच्या आस्थापनेवरील पाटण पोलीस ठाणे व उंब्रज पोलीस ठाणेचे विभाजन करून  मल्हारपेठ दुरक्षेत्र आणि चाफळ दुरक्षेत्र यांचे उन्नतीकरण करून नवीन मल्हारपेठ पोलीस ठाणे निर्माण करण्यास तसेच त्याअनुषंगाने मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यास  गृहविभागाकडून मान्यता देणेबाबतचा शासनाच्या गृह विभागाने निर्णय घेतला असून बुधवारी  दि. 07 ऑक्टोंबर, 2020 रोजी गृह विभागाने मल्हारपेठ पोलीस औटपोस्टचे  अपग्रेडेशन करुन नवीन पोलीस स्टेशन करण्याच्या शासन निर्णय पारित केला असल्याची माहिती शेवटी पत्रकांत म्हंटले आहे.

चौकट:- मल्हारपेठ येथील नव्या पोलीस ठाण्यासाठी ३० अधिकारी व कर्मचारी मिळणार..!

     महाराष्ट्र शासनाचे गृहविभागाने मंजूर केलेल्या मल्हारपेठ पोलीस ठाण्यासाठी सहाययक पोलीस निरीक्षक 1, पोलीस उपनिरीक्षक1,सहाययक पोलीस उपनिरीक्षक 3, पोलीस हवालदार 4, पोलीस नाईक 7 आणि 14 पोलीस शिपाई असे एकूण 30 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी  तसेच आवश्यक साधनसामुग्री तातडीने उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती ही गृहराज्यमंत्री  शंभुराज देसाई यांनी दिली.

No comments:

Post a Comment