दौलतनगर दि.07: महाराष्ट्र
राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे चिरंजिव व पाटण तालुक्याचे युवा नेते
मा.यशराज देसाई (दादा) यांचा दि. १0 ऑक्टोंबर,२०२० रोजीचा वाढदिवस
कोरोनाच्या संकटामुळे पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये मा.ना.श्री.शंभूराज देसाई
यांचे मार्गदर्शनाखाली पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेवतीने विविध
सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार आहे. दरम्यान वाढदिनी मा.यशराज देसाई (दादा)
हे कामानिमित्त परगांवी असल्याने मतदारसंघातील पदाधिकारी,कार्यकर्ते
व हितचिंतक यांनी प्रत्यक्ष न भेटता दुरध्वनीवरुन शुभेच्छा दयाव्यात, अशी माहिती गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे कार्यालयाच्यावतीने
देण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री
ना.शंभूराज देसाई यांचे चिरंजिव व पाटण तालुक्याचे युवा नेते मा. यशराज देसाई (दादा) यांचा
वाढदिवस मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्ते, हितचिंतक यांचेकडून गतवर्षी मोठया
उत्साहामध्ये साजरा करण्यात आला होता. परंतु यंदाच्या वर्षी कोरोनाचे संकट
असल्यामुळे मा.यशराज देसाई (दादा) यांचे दि. १0
ऑक्टोंबर,२०२० रोजीचे वाढदिवसा निमित्त पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये मा.ना.श्री.शंभूराज
देसाई यांचे मार्गदर्शनाखाली पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावतीने
विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात येणार असून मतदारसंघातील गरीब व गरजू
कुटुंबातील शालेय विद्यार्थी व विद्यार्थीनींना पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावतीने
सामाजिक अंतर ठेऊन घरपोच वहयांचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच पाटण विधानसभा
मतदारसंघातील पाटण, ढेबेवाडी व दौलतनगर (मरळी), ता.पाटण
येथील कोविड केअर सेंटरमध्ये औषधोपचार घेत असलेल्या कोरोना बाधित रुग्णांकरीता
फळांचे वाटप करण्यासाठी संबंधित कोविड सेंटरकडे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या
मार्फत फळे व कोविड सेंटरसाठी तसेच पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये वाटप करण्यासाठी सॅनिटायझर देण्यात येणार असून मा. यशराज देसाई (दादा) हे वाढदिवसा दिवशी कामानिमित्त परगांवी जाणार असल्याने कोरोना संसर्गाचे
पार्श्वभूमीवर मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक यांनी प्रत्यक्ष न
भेटता भ्रमणध्वनीवरुन तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून शुभेच्छा दयाव्यात, असे आवाहनही
करण्यात आले आहे.
चौकट:- मा.यशराज देसाई (दादा) हे वाढदिवसा दिवशी
कामानिमित्त परगावी.
मा. यशराज देसाई (दादा) हे वाढदिवसा दिवशी कामानिमित्त परगांवी जाणार असून ते सातारा येथील कोयना दौलत
निवासस्थानी तसेच कारखाना कार्यस्थळ,दौलतनगर(मरळी) या ठिकाणी उपलब्ध राहणार
नसल्याने पाटण विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक यांनी
प्रत्यक्ष न भेटता भ्रमणध्वनीवरुन तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून शुभेच्छा
देण्यात याव्यात,अशी
माहिती गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे कार्यालयाच्यावतीने
देण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment